तुम्ही कुणाला घ्याल?
व्याप्तिनिर्देशः या धाग्याचा मुख्य उद्देश थोडी मजा करणे हा आहे. काही गंभीर चर्चा नि वादंग केलेत तरी आपली काही हरकत नाही. पण तो या धाग्याचा मुख्य उद्धेश नाही याची नोंद घ्यावी. अवांतर ज्ञान पाजळणे, दंगा करणे, फाटे फोडणे, धागा हायज्याक करणे या सगळ्याला खुल्या दिलानं आमंत्रण. गेले दोन दिवस जाम दमायला झालं आहे.
अमुक एक गोष्ट (कथा / कादंबरी) घ्यायची आणि तिच्यावर सिनेमा किंवा सिर्यल बनवायची आहे अशी कल्पना करून त्यात आपल्याला आवडतील अशा अभिनेत्यांची योजना करायची हा माझा आवडता टाइमपास आहे.
कुठले अभिनेते आपल्याला कित्तीही आवडत असले, तरी ते आता तितकेसे तरुण उरलेले नाहीत; कोणाची रुपडं सुटेबल असलं, तरी अभिनयाची बोंब आहे; कोण एकाच टाइपच्या कामांमधे अडकलं आहे; नवीन उल्लेखनीय कोण आहे... असे बरेच साक्षात्कार होतात.
सुरुवातीला मी 'एम टी आयवा मारू' ही सामंतांची कादंबरी घेते. (तिच्यात कुणालाच रस नाही, असं शक्य आहे. कारण सामंत आउटडेटेड अहेत. तसं झाल्यास, तुम्हीच दुसरी लेटेस्ट इंट्रेष्टिंग कथा / कादंबरी सुचवावी.)
(पूर्वी ही कादंबरी जाम म्हणजे जामच आवडत असे. कालांतरानं तिच्यातल्या गडबडी दिसायला लागल्या. आता सामंतही फारसे आवडत नाहीत म्हणा. पण जाम चित्रदर्शी, स्टायलिश नि मराठीत कमी सापडणार्या खलाशी ब्याकग्राउण्डवरची गोष्ट आहे, यात दुमत नसावं. हिच्यावर सिनेमा बनवायचे हक्क म्हणे नाना पाटेकरनं विकत घेऊन ठेवलेत. हा तपशील कळल्यावर या कादंबरीच्या ग्ल्यामरमधे भरच पडली होती. पण ते असो. धाग्यावर अवांतर चालेल म्हटलं, म्हणून इथेच फाटे फोडावेत असं काही नाही. :प)
उज्ज्वला: सई ताम्हणकर
दीपकः सुबोध भावे
अनंतः ???
कॅप्टन रॉसः मोहन आगाशे
... पुरे. पाहा, आता काय करता ते.
छ्या, ते काय पुस्तक आहे?
छ्या, ते काय पुस्तक आहे? म्हणजे ठीके... असावीत धीट वर्णनं. पण थोडी चवीपुरती गोष्ट तरी घालाल की नाही? सारखं आपलं सकाळ-दुपार-संध्याकाळ तेच? शिवाय त्याची देशी आवृत्ती काढायची म्हणजे दोन-पाच बंद्या, एखादा निषेध, एखादा मोर्चा... याला तयारी हवी. नाहीतर घासकडवींच्या शुद्धिचिकित्सकासारखं काहीतरी उपकरण लावून सोवळी आवृत्ती तरी काढायला लागेल.
कादंबरी "बालपणात" (आता वय
कादंबरी ('एम टी आयवा मारू') "बालपणात" (आता वय झालं! :) ) वाचल्याचे पुसटसे आठवते आहे ;)
त्यामुळे त्यावर चित्रपटच बनवणार नै.
मला चित्रपट कशावर बनवावासा वाटला होता तर तो धारपांच्या 'साठे फायक' वर!
लैच जबरा पुस्तक आहे. त्यावर बोलायचं आसंल तर बोला.
बाकी मेघनाकडून चक्क द्व्यर्थी शीर्षक!
साठे फायकसमध्ये एक आणि एकच
साठे फायकसमध्ये एक आणि एकच पात्र मुख्य आहे श्री.साठे यांचं
पुस्तक वाचताना जे व्यक्तीमत्त्व समोर आलं होतं त्याच्या जवळ संतोष जुवेकर जातो खरा पण तरी ते काम 'नाना पाटेकर' किंवा 'स्पप्नील बर्वे'ने पेलावं असं वाट्टं.
बाकी झाडांचं/जंगलाचं काम काय कंप्युटर अॅनिमेशन करेलच
अजिबातच साम्य नाही म्हणूनच
अजिबातच साम्य नाही म्हणूनच दोघांपैकी एक निवडणं शक्य होत नाहिये.
नानाचं टायमिंग, भुमिका कॅरी करणं यामुळे हे मराठीसाठी नव्या पद्धतीचं आव्हान तोच पेलु शकेलसं वाटतं आणि सुनील बर्वेचं तरूण दिसणं, "चकचकीत"(जसा साठे आहे) असूनही अनेकदा अभिनयही चांगला असणं यामुळे त्याचा विचार केला. साठेचा रोल तरूण ते वयस्कर इतक्या लांबीचा आहे त्यामुळे सुनील अधिक शोभून दिसेल पण तो ही भुमिका कॅरी कितपत करेल अंदाज येत नाहिये
बादवे, यावरून आठवले. माझा एक
बादवे, यावरून आठवले. माझा एक मित्र जर्मनीत गेला. हौसेनं बिचारा जर्मनच्या वर्गालाही जाऊन बसला. शिकवणार्या बाईनं नाव विचारलं. यानं सांगितलं. ती कावरीबावरी होऊन पाहत राहिली. 'क्लासनंतर थांब' म्हणाली. हाही कावराबावरा झाला असणार. फायनली तिनं 'फक्त नाव सांगू नको. आयम अमुक अमुक असं सांग' असं म्हणत उलगडा करून सांगितल्यावर एकदाचा सस्पेन्स संपला. त्याचं नाव निमिष. जर्मनमधे 'nimm mich' (निम् मिश्) म्हणजे अक्षरश: आणि अर्थानंही 'टेक मी'.
:)
:)
अहो हे तरी जर्मनीतलं प्रकरण झालं, इथं भारतातलं एक प्रकरण ऐकलय.
हल्ली ऑफबेअॅट नावं ठेवायची फ्याशन आलिये. ऋग्वेद्,रेयान्,आर्यन्,विवान ही नावं तीनेक दर्शकापूर्वी इतकी कॉमन नव्हती; जितकी आता झालियेत.
अगदिच ऑफबीट करायला म्हणून एका जोडप्यानं पोराचं नाव कसं भारदस्त ठेवलं एकदमः- वृत्तान्त!
.
.
दुसरा मुलगा झाल्यावर त्याचं नावः- कृतान्त!!
.
.
.
अजून कुणीतरी राधा-कृष्ण श्टोरीमधील राधापती "अनय" हे नाव ठेवलं मुलाला, थोरल्या "विनय" शी यामक जुळावं म्हणून.
होय रे बाबा होय. दिवस बरीक
होय रे बाबा होय. दिवस बरीक वाईट आले आहेत हे खरेच. एके काळी मुकाट्याने उंबर्याआत खालमानेने सुखात दिवस कंठणार्या स्त्रिया शिकू-बोलू तर लागल्या आहेतच, निर्लज्जपणे पुरुषासारख्या पुरुषांशी भांडूतंडू लागल्या आहेत, नाही ना नाही त्या शीर्षकाखाली लिहू लागल्या आहेत आणि वर या देशचे राज्यशासनही कागदोपत्री त्यांचे संरक्षण करते. कसे व्हायचे कुणास ठाऊक. गेले ते रामराज्याचे दिवस... गेले! :(
शी...
वार्ता नकोच.
वार्ता म्हटलं की बालाजी तांब्यांच्या लेखासारखं "वात सारला की आवाज होतो" असं वचल्यासारखं वाटतं.
त्यापेक्षा बातमी, न्यूज,खबर असं काहीही चालेल.
तसंही खबर सिंग हे नाव पंजाब्यात असणं अवघड नाहिच.
सन्नी सिंग, मॉन्टी सिंग, डॉली सिंग, लकडी सिंग अशी विचित्र नावं तिथं असतातच.
साठे फायकस
अवांतर:
नारायण धारपांचे "साठे फायकस" हे एकदम जबरा प्रकरण आहे.
मी असंख्य वेळा वाचले आहे.
क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क
क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्काय??????????????????????? जॉनी डेप शरीरप्रदर्शनापुर्ता उपयोगी???????????????????????????????????????????????????
आपा, तुमच्याकडून ही अपेक्षा न्हौती. जानराव इब्राहिमसायबांबद्दल बोलत असाल तर ठीक पण जानराव डेपूजींचा नाद नै करायचा. अहो कप्तान ज्याक स्पॅरो कसा विसरलात?
बरं.. मग कॅप्टन रॉस साठी
बरं.. मग कॅप्टन रॉस साठी बर्नार्ड हिलशिवाय दुसरं कोण्णीकोण्णी नजरेसमोर आलं नाही. हिल म्हणजे टायटॅनिकमध्ये कॅप्टन एडवर्डचं काम केलेला अतिशय देखणा म्हातारा.
मला जुनी स्टारकास्ट घेता आली असती तर मी उज्ज्वला म्हणून अर्चना जोगळेकरला घेतली असती नाहीतर निकोल किडमन/नताली पोर्टमनला.
उज्ज्वलाचा बाप म्हणून डॉ. आगाशे. बेशक.
दीपक म्हणून समहाऊ मुक्तातला अविनाश नारकरच येतोय; पण, त्याच्या मिशा टोचतात आणि तो गन स्लिंगर म्हणूनही शोभणार नाही.. यावर विचार करायला लागेल.
अनंत म्हणून गिरीश कुलकर्णी..वादच नाही. हॉलिवूडी पर्याय-डेव्हिड डुकोव्हनी (कॅलिफ़ोर्निकेशनवाला)
मला नाही आवडत नारकरबोवा. कुणी
मला नाही आवडत नारकरबोवा. कुणी त्याचे (म्हणजे पाटलांचे) 'रणांगण' पाहिले आहे काय? त्यात तो सदाशिवरावभाऊ होता. स्टेजवरून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना प्रेक्षकांकडे पाठही होऊ नये, दमदार ड्वायलॉकला स्टार्टही मिळावी आणि स्टेजवरचे अंतरही कापले जावे - म्हणून तो जी काही विनोदी कसरत करत असे - की बस! नाटकातले गांभीर्य जाऊन मरणाचे हसायला आलेले आठवते.
प्राईड अॅन्ड प्रेज्युडीस
बादवे "प्राईड अॅन्ड प्रेज्युडीस" बद्दलही बोला की. खरंतर याचं बीबीसीने केलेलं कास्टिंग सर्वोत्तम होतं पण तरी...
पात्रे नी सुचवण्या सांगतो:
लिझी: तरूण् माधुरी
जेनः कॅटी
श्री.बेनेटः गिरिश बापट? (छ्या! भारदस्त, विवेकी "दिसणारा" अभिनेता कोणता आणायचा आता :( )
सौ.बेनेट: सध्या त्या "होणार सून मी" मधली हिरवाईनची आई आहे ना तीच - नाव नै माहित तीचं!
मेरी: ??
किटी: ??
लिडीया: स्पृहा?
बिंगले:
डार्सी: (छे! कॉलीन फर्थने हे काम केलंय आणि त्याच्या इतकं दुसरं कोणीच सुचत नै :( )
लिझीचा मामा: अतुल चरचुरे
कॉलिन्स: ?
लेडी कॅथरीन डा बर्गः रोहिणी हट्टंगडी? ;)
'तुंबाडचे खोत'बद्दल काय मत
'तुंबाडचे खोत'बद्दल काय मत आहे? मला ते पुस्तक भारी आवडतं. काय दणदणीत सिर्यल होईल त्यावर. का कुणी करत नाही, कुणास ठाऊक.
दादा खोताचं काम मी शरद पोंक्षेला देईन. पण त्याला थोडी बावडी कमवावी लागेल. गणेशशास्त्री विक्रम गोखले. ताई सीमा देशमुख. बजापा? कोण होऊ शकतं बजापा? छ्या. नाही बा सुचत कुणी. नरसू खोत? जुळे? गंगा?
अगदी हेच म्हणायला आले होते.
अगदी हेच म्हणायला आले होते. माझ्या आठवणीत यावर मालिका बनवायचा प्रयत्न झाला होता झी मराठी वर पण कास्ट इतके भिकार होते की थोड्या दिवसात ती बंद पडली( हो मालिकाच, ३ काय १० तासाच्या चित्रपटामध्ये पण बसणार नाही ती कथा.. पेंडसेंनी जवळ जवळ १७०० पानांची कादंबरी लिहिली आहे तिला न्याय द्यायचा तर किमान दिड दोन वर्षे दररोज चालेल इतके खाद्य आहे यात!
दादा खोत - शरद पोंक्षे - परफेक्ट
नरसू खोत- किशोर कदम?
नाना खोत - गिरिश कुलकर्णी
गणेश शास्त्री - विक्रम गोखले फार्फर म्हतारा झाला सो तो कटाप त्यापेक्षा तरूणपणीचे गणेश शास्त्री म्हणून अतुल कुलकर्णी नाहीतर मग सचिन खेडेकर?
ताई - शुभांगी गोखले तशी सीमा देश्मुख पण वाईट नाही
गंगा - उर्मिला कानिटकर किंवा प्रिया बापट
गुलाब - स्मिता तांबे
बजापा - तसा इकडे पण नटरंग इतके शरिर कमावलेला अतुल कुलकर्णी चालेल पण त्याला गणेश शास्त्रीकरता वापरले तर इकडे कोण बरे? ( तसा अंकुश चौधरी येतोय व्यक्तिमत्वासाठी पण त्याचा अभिनय - मला तितका सा नाही आवडत - फार च स्टिरिओटाइप आहे) समीर धर्माधिकारी?
जुळे - जितेंद्र जोशी
ओड्डल - सुबोध भावे?
अनंता - अनिकेत विश्वासराव
तारीचा हिरो कोण? संभाजीच ना? त्यासाठी - संतोष जुवेकर
अजून सुचले की अॅडवते
पण माझी खरेच इच्छा आहे यावर मालिका निघावी.
अगदी अगदी! माझीपण. यावर अजून
अगदी अगदी, माझीही फार इच्छा आहे. इतकी की, कुणी निर्मिती करायची ठरवली, तर मी थोडे शेअर्स विकत घेईन त्यात. :ड
नरसू खोत- किशोर कदम.......... किक लैच आवडतो मला. चालेल, चालेल!
नाना खोत - गिरिश कुलकर्णी........फुकट जाईल ग तो. कितीसा रोल आहे तो.
गणेश शास्त्री - विक्रम गोखले फार्फर म्हतारा झाला सो तो कटाप त्यापेक्षा तरूणपणीचे गणेश शास्त्री म्हणून अतुल कुलकर्णी नाहीतर मग सचिन खेडेकर?...... चालेल!
ताई - शुभांगी गोखले तशी सीमा देश्मुखपण वाईट नाही.
गंगा - उर्मिला कानिटकर किंवा प्रिया बापट....... हां, प्रिया बापट. नाहीतर तोवर केतकी माटेगावकरपण मोठी होईल, तीही चालेल!
गुलाब - स्मिता तांबे...................... पर्फेक्ट!
बजापा - तसा इकडे पण नटरंग इतके शरिर कमावलेला अतुल कुलकर्णी चालेल पण त्याला गणेश शास्त्रीकरता वापरले तर इकडे कोण बरे? ( तसा अंकुश चौधरी येतोय व्यक्तिमत्वासाठी पण त्याचा अभिनय - मला तितका सा नाही आवडत - फार च स्टिरिओटाइप आहे) समीर धर्माधिकारी?.......... स्वारी, अजिबात नापास. समीर धर्माधिकारी कसला अळणी आहे! बजापा म्हणून अतुल कुलकर्णीच हवा, नटरंगवाला. नाहीतर मग बावडी कमावलेला गिरीश कुलकर्णी. (त्याला भारीपैकी रोल हवाच होता!)
जुळे - जितेंद्र जोशी........ एक्सलंट फ्याण्टास्टिक डन!
ओड्डल - सुबोध भावे?.... म्हातारा वाटेल आता.
अनंता - अनिकेत विश्वासराव.......... चालेल.
तारीचा हिरो कोण? संभाजीच ना? त्यासाठी - संतोष जुवेकर......... हो, हाही पर्फेक्ट.
हृषीकेश जोशीला कुठला रोल देता येईल. तो एक मला फारच आवडणारा नट आहे.
शिवाजीराव बांडे - हृषीकेश
शिवाजीराव बांडे - हृषीकेश जोशी?
तारी, गोदावरी, गंगा - यासाठी केतकी माटेगावकर, उर्मिला कानिटकर, प्रिया बापट - कोणीही कुठेही चालेल.
विश्राम - उमेश कामत चालेल का? मला आवडतो बुवा तो!
जुलाली मिळत नाहीये गं - सुचव जरा कोणी तरी (सई ताम्हणकर नको - ती डोक्यात जाते हल्ली)!
अजून कोणते मुख्य पात्र राहिले?
हां, चालेल हृषीकेश जोशी
हां, चालेल हृषीकेश जोशी शिवाजीराव म्हणून.
विश्राम म्हणून उमेश कामत जरा मोठा नाही वाटणार? त्याला ओड्डल करायला माझी हरकत नाही. पण त्याला पेलेल की नाही कुणास ठाऊक.
आपा बेडेकरांचं काम मिलिंद फाटक चांगलं करेल. नाही?
विश्राम म्हणून तो 'विहीर'मधला मुलगा चालेल का? तो भारी आहे. त्याचं नाव विसरायला होतं मला कायम.
तारी म्हणून मुक्ती भारी वाटेल.
जुलाली कोण यार? मला 'राऊ'मधली अश्विनी भावे आठवली एकदम. तसं सुंदर नि त्या ताकदीचं कुणी नाहीच का आपल्याकडे? शिवाय ती बाई गिरीश कुलकर्णीसमोर रत्न वाटली पाहिजे एकदम.
शिवाय सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर, उत्तरा बावकर, लीना भागवत या थोर बायकांना काय कामं देशील?
***
लीना भागवत - भागी
वीणा जामकर - जनापाची कोण असते ते आयटम? हां, मानी
उत्तरा बावकर - गणेशशास्त्रींची बायको
लालन सारंग - नरसूची बायको - थेट म्हातारी चालेल ना? आधी तसाही तिचा काही उल्लेख नाहीच.
सोनाली कुलकर्णी - हिला काही रोल गावेना बा. वाईट वाटतंय मला फारच.
जनापा - 'देऊळ'मधे नाना पाटेकरच भाऊ कोण दाखवलाय तो? तो भारी होईल.
वा वा मजा येतेय!
दमामि
दमामिंच्या कथेतील , भोकवाडी बुद्रुकमधील पात्रे कोण होणार?
किद्मिदित किरकिरे गणा मास्तर, चतुर/इरसाल नाना चेंगट, बाबू पैलवान, धेरपोट्या हवालदार नि पोलिस पाटील....
भांडकुदळ बायको...
कोण कोण चांगली कामं करतील ग्रामीण बाजाच्या भूमिकेत?
.
.
.
डर्टी पिच्चर मराठीमध्ये काढला तर काय स्टारकास्ट कराल?
डी डी एल जे साथी आणि जो जिता...सआठी काय स्टार कास्ट असेल?
जो जीता मध्ये महागुरु प्रमुख भूमिकेत अर्थातच असतील.
अम्गूर पाहिला नाही :(
अम्गूर पाहिला नाही :(
ज्युलिअस सीझर आणि हॅम्लेट ह्या दोन्हींची रुपांतरणं शक्य असावीत.
.
शिवाय वुडहाउस, शॉ वगैरेंबद्दल ज्यांना आयदिया आहे, ते त्यांच्याबद्दल सांगू शकतील.
सगळ्या रहास्यकथा ह्या खरे तर शेरलॉक होम्सचीच नक्कल होत.
.
अॅगाथा ख्रिस्तीचे एक नाटक रुपांतरित होउन मरआथीत आले आहे,. विक्रम गोखले त्यात आहेत. नाव विसरलो.
गुमनाम? यक्क....
चुथडा केलाय चांगल्या संकल्प्नेचा.
हिरो-हिरोइन, दुष्ट व्हिलन, एक कॉमेडिअन असं सगळं बॉलीवूडीकरण केलय.
मूळ कथेत दुष्ट व्हिलन नाहिये. कॉमेदिअनही नाही,नाचगाणेही नाहित.
हिरो वगैरे थर्डक्लास पणा तर कुठेच नाही.
मनोजकुमार कधी तावडित गावलाच तर खोपच्यात घेउन त्याला घिब घिब करुन गुद्दे हाणायचे आहेत.
वुडहाउस देसीकरण मला अशक्य
वुडहाउस देसीकरण मला अशक्य वाटतय
+१
वुडहाऊस काय, पुलं काय सगळे शब्दांचे व पात्रांचे जादूगार.. त्यांची मजा वाचन/श्रवणातच यावी.
शिवाय त्यांची पात्रे इतकी ताकदीची आहेत की तस्सेच्या तस्से कास्टिंग अशक्य ठरावे.. कास्टिंग चुकले आणि बाकी मजा शब्दांची - भाषेची - मग चित्रपटात बघण्याजोगे उरतेच काय?
अनंत
'एम टी आयवा मारू' ह्याबद्दल तशी काहीही माहिती नाही.
अनंत च्या भूमिकेसाठी कुणी ऐसीकर गावला तर बघा.
जगभरातील विविध नमुने इथे उपलब्ध आहेत.
करुन टाका कास्टिंग इथच.
.
कट्ट्यावरील भाषेच्या कलाने पाहिल्यास शीर्षक अंमळ चावट आहे.