मी या शाळेत जाणार नाही
मी या शाळेत जाणार नाही
दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे मी केविलवाणा पाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो
या शाळेत अॅडमीशन का घेतले समजत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
आई तू एकदातरी सांग ना ग बाबांना
जुनी शाळाच चांगली बोल ग त्यांना
अभ्यास तेथेही करीन निट मी राहीन
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
- पाषाणभेद
>>> 'मै कभी बतलाता नही' या
>>> 'मै कभी बतलाता नही' या गाण्याचं स्वैर रूपांतर म्हणावं का?
नाही.
>>> 'आय हॅव माइल्स टु गो बिफोर आय स्लीप' ची छटा आहे...
इतक्या मोठ्या आवाक्याच्या कवितेशी तुलना केल्याने लाजल्यासारखे झालेय.
माझ्या शालेय जीवनात एका वर्षी शाळा बदलली गेली होती. आता चौथीतून पाचवीत गेल्यावर ती बदलावीच लागली असती कारण प्राथमिक शाळा चौथीपर्यंतच होती. त्या वेळेचा विचार केला अन ही कविता लिहिली. अर्थात मिठ मसाला पाणी टाकून ती वाढल्या गेली. (हे वाढवणे अगदी पाच सात मिनीटात झाले होते. म्हणून काही टायपो/ शब्दबदलही त्यात होते.)
कविता केल्यानंतर व प्रकाशित केल्यानंतर वाचल्यानंतर मग मात्र ही भावना सार्वत्रीक असू शकते असला साक्षात्कार झाला. लहान मुलाची खरोखर अशी अवस्था होवू शकते. मोठी माणसे घर बदलतांना रडतातसुद्धा. त्यात त्यांच्या भावना त्या घराशी, तेथील वातावरणाशी निगडीत असतात. त्यात झालेला बदल दु:खदायक असू शकतो. तीच भावना लहान मुलाची शाळा बदलल्यानंतर होवू शकते. त्याचे भावविश्व जुन्या शाळेशी तदरूप झालेले असते. बाहेरच्या जगाची कल्पना नसल्याने नव्या विश्वात तो गांगरून जातो. त्याच भावना मी कवितेत रेखाटायचा प्रयत्न केला आहे.
प्रतिसादकांचे व वाचकांचे धन्यवाद.
छान कविता/गीत आहे
छान कविता/गीत आहे..
मात्र नेहमीची तक्रार करतो.. रेकॉर्ड करा.. त्याशिवाय या गेय कवितांच्या ठेक्याचा अंदाज येत नाही