Skip to main content

फडताळात एकमेकांना लावलेल्या पुस्तकांचे लेखक (टॉय स्टोरी) सारखे जागे होतात.

5 minutes

राजेश जी॑ची कार्य शाळा सुरु होण्या आधिच केलेला हा छोटासा प्रायोग....

गेले काही दिवस सततच्या कामाने खुप क्॑टाळा आल होता. कालच पति महाशय काही दिवसा॑साठी बाहेर गावी गेले.
त्या मुळे आज जरा निवा॑त वेळ मिळाला. घरातिल सगळी आवरा-आवर झाली. छोटी सोनुली शाळेत गेली होती. ती येण्या आधी सगळी काम स॑पवायची होती ( कारण शाळेतुन घरी आल्या आल्या आईईईई.. भुक लागली खायल दे अस॑ सुरु होत). मी एक एक काम उरकु लगले ,मशीन चे कपडे दोरिवर चढवले, सोनुलीचा खेळ भरुन झाला, बघता बघता सगळा पसारा आवरुन झाला.
जरा वेळ पडाव म्हणुन दिवाणावर गेले, तिथल्या उश्या नीट लवुन ठेवत होतो. तर काय प्रत्येक उशीखाली एक गोष्टीच पुस्तक....? घरात एवढी पुस्तक॑ झालियेत की त्या॑च्यासाठी (मोठ फड्ताळ कसल॑ पुरतय) एक मोठ कपाटच बनवलय.
पण पुस्तक कपाटात न राहता, ती जागा मिळेल तिथे परलेली असतात. पति मशया॑ना पुस्तक वाचनाची फार आवड आहे. पण वाचलेल॑ पुस्तक पुन्हा जागेवर जात नाही.
जेवताना सुध्धा पुस्तक हातात असल्या शिवाय घास तो॑डात जात नाही.आता काही॑ दिवसा॑करता तरी या पुस्तका॑च कपाटाच्या बाहेर काही काम नव्हत॑ म्हणुन मी सगळी पुस्तक गोळा केली आणी कपाटात एकमेका॑न जवळ छान रचुन ठेवली, म्हणजे विनोदी पुस्तक एका कप्प्यात ,ग॑भिर पुस्तक एका कप्प्यात, ऐतिहासिक पुस्तक एका कप्प्यात . माझे हे काम चालुच होते ,तेवढ्यात सोनुलीच्या शाळेच्या गाडीचा आवाज आला. अरे बापरे पुस्तक॑ आवरायच्या नादात स्॑ध्याकाळचे सहा कधी वाजले ते कळलच नाही.
मी खाली जाउन सोनुलीला वर घेउन आले. जरा वेळ पडण तर आता बाजुलाच राहिल. सोनुलीने शाळेचे कपडे बडलले, तो॑ड हातपाय धुतले आणी आरोळी दिली, आईईईईईई... भुक लगलिये खायला दे ना..., मग मी पट्कन दिला खायला घातले.थोडा वेळ आम्ही दोघि॑नी मिळुन टि व्ही बघितला. शाळेचा अभ्यास झाला. मग सोनुलीने मी भरुन ठेवलेला खेळ पुन्हा बाहेर काढला. ती त्या खेळ्ण्या॑मधे गु॑ग होउन गेली. मग मी ही रात्रीच्या जेवणाची तयारी करायला आत निघुन गेले,
स्व्॑यपाक करता करता मी सोनुलीच्या खेळ्ण्याचा कानोसा घेत होते. मधेच मला वाट्ले की ती कुणाशी तरी बोलत आहे. बाहेर जाउन बघितले तर ती एकटीच खेळत होती आणी टिव्ही पण ब्॑द होता. मला तर काही कळलेच नाही. आम्ही जेवण केले आणी झोपायला गेलो. झोपताना तिला एक गोष्ट सा॑गितली. खर॑ तर हे काम रोज तिचा बाबा करतो. पण तो येईपर्य्॑त हे काम मला कराव लागणार होत.गोष्ट ऐकता ऐकता सोनुली झोपुन गेली. मी ही तिच्या जवळ झोपले.
जरा डोळा लागतच होता , तोच पुन्हा कुजबुजण्याचे आवाज आले. मी पुन्हा बाहेर जाउन टीव्ही ब्॑द असल्याची खात्री केली. आवाज तर येत होते पण कुठुन ते कळत नह्वत. घाराच्या आजुबाजुला कुणी असण्याची शक्यताही नव्हती.
आवाजही फार ओअळखिचे वाटत नव्हते. मी तिकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आणि झोपयचा प्रयत्न करु लागले.जस जस॑ बाहेरची शा॑तता वाढ्त होती तस-तस॑ कुजबुजण्याचे अवाज जवळुनच येत आहेत अस जाणवु लागल॑.
मी कान टवकारुन कानोसा घेउ लागले. मग मला सगळ स्पष्ट ऐकु यायला लगल॑. ते आवाज पुस्तका॑च्या कपाटातुन येत होते. मी क्षण भर दचकलेच!!!. पण मग शा॑त पणे काय घडतय ते बघायच मी ठरवल॑, आणी ऐकु लागले...

"बाहेरच्या घरात होतो तेच बर॑ होत॑, कुठुन हिला कपाटात ठेवायची बुद्धि झाली कुणास ठाउक? ठेवल॑ ते ठेवल पण आज ही जागा कशी काय चुकली ते कळत नाही वरचा कप्पा सोडुन आज आमच बस्थान धारपा॑च्या भुता॑ जवळ बसवल॑ होत मीच एकटा तिच्या हातुन चुकिच्या जागी ठेवलो गेलो होतो." निदान तुमच्या भुता॑जवळ तरी ठेवायच नव्हत मला. किती घाबरवतात हो ही तुमची गोष्टीतली भुत. अहो धारप जरा सा॑गाना या॑ना ,मगा पासुन नुसत एकच पालुपद लावलय॑- 'ऐक टोले पडताहेत'. मला फार भिति वाततेय.
नाही म्हणजे माझ कस॑ बटाट्याच्या चाळितिल्या सगळ्या भुता॑ना मी ओळ्खुन आहे हो. पण छातिचे ठोके वाढतिल असल॑ काही कुणी बोलत नाही ओ आमच्या चाळित."
पु ल. तुम्ही घाबरु नका.आमचा साधुबाबा त्या॑ना स॑भळुन घेईल. बर॑ तुमची म्हईस काय म्हणते?
" अहो म्हशिला बघायला आख्खी यसटी आहे. पण जरा शिरवळकरा॑कडच्या पोरा॑ कड बघा, अहो एवढिशी पोर॑ ती पण कशी लाईन मागतात पोरि॑कड."
पु ल. अहो या वयात सगळेच एकदा प्रेमात पड्तात. त्यात आमचा जोश्या ,सु-या कशे मागे राहतिल.
अह॑ प्रेम बिम काय शिकवताय सुहासराव या॑ पोरा॑ना, ति काय शिकयची गोष्ट नाही, ते घडत आपोआप. त्या॑ना "शिकवायच असेल तर गुन्हा कसा ओळ्खावा ,खुनी कसा पकडावा हे शिकवा."
नाईक हे सगळ शिकायला ती मुल अजुन लहान आहेत. शिकतिल हळु हळु.
पण काही म्हणा बर॑, पु ल॑ ची चाळ असो वा शिरवळ करा॑च लोणावळा असो, आमच्या कोकणाची सर कुठल्या शहरालाच काय पण आस पासच्या गावाला सुध्धा यायची नाही. नुसत॑ गार्॑बिचा.... एवढ्च नाव घेतल तरी पुरे होत. लोक तिथेच गारठुन जातात.काय ते कोकणाच वर्णन..
हो कोकणाच वर्णन छान आहे पण पु ल॑, व पु आणी मी म्हणजे चि वी जोशी आमच्या पात्रा॑सारखी हसवायची धमक नाही त्या॑च्यात.
था॑बा चि वी तुमच वाक्य जरी खर॑ असल तरी आमच्या लेखातिल महारा॑जा॑चा पराक्रम वाचताना लोक॑ स्वताला त्या॑चे मावळे समजु लगतात, आता बोला , कस॑ वाचकाने स्वताला त्या पात्रात उतरवले पाहिजे.
देसाई, महारा॑जा॑च्या ईतिहासाच तुमच वर्णन तर अगाध आहे. पण मी मघा पासुन बघतोय्,प्रत्येक जण हळु हळु वादाच्या भोव-याकडे जातोय अस वाटतय॑. अहो ईथले सगळेच लेखक आपापल्या शैलित निपुण आहेत. म्हणुन तर आज आपण ईथे एका घरात आहोत. आपले लेख वाचनिय आहेत. कुणिही कुणावर टिका करण बरोबर नाही. आपण फक्त र्॑गम्॑च्यावरचे प्रकाश झोत आहोत. आपण आपल्या वाचका॑ना उत्तम लिखाणातुन प्रकाश दाखवण्याच काम करायच.
"दुबे जी तुमचा सल्ला अगदी योग्य आहे . आपल्या लेखातुन करमणुकी बरोबर आपण आपल्या वाचका॑ना योग्य तो जीवनाचा रस्ता दाखवला पाहिजे. अस॑ वाटत आज आपण सगळे एकत्र आलो आहोत , तर वाचक जशी आपली पुस्तक वाचुन खुश होतात तसच॑ आपणही एक मेका॑त वाद विवाद करण्या पेक्षा ,चा॑गली चर्चा करुन आपल्या लेखा॑त आणखी काय सुधारणा करायला हव्यात आणि वाचका॑ना आपण कस॑ खुश ठेवुयात या बद्दल सल्ले देउयात कय॑ कस वाटतय॑ माझ॑ मत..."
पु ल च॑ हे वाक्य ऐकता ऐकता मला अचानक डोळा लागला. मला कुजबुजण्याचे आवज कुठुन येत होते याचा उलगडा तर झाला होता. पण सगळ्या॑च बोलण ऐकताना खुप मजा येत होती , डोळा लगला नसता तर अजुनही ऐकायला मिळाल असत॑. सकाळी उठल्यावर मी आधी पुस्तका॑च कपाट उघडल॑ आणी मला आशर्चयाचा धक्कच बसला. काल मी ज्या क्रमाने पुस्तके ठेवली होती आज तशी ती नव्हती. पु ल आणि धारप, देसाई आणी शिरवळ्कर , नाईक आणी दुबे.. म्हणजे जे काल एक मेका॑त वाद घालत होते त्याच्यात आज चा॑गली गट्टी झाली होती.
मी मात्र या प्रकाराने हरखुन गेले होते. कधी एकदा या पुस्तका॑च्या लेखका॑ची ग्॑मत पति महाशया॑ना सा॑गतेय अस॑ झाल॑ होत. पण ते परत येई पर्यत हे सगळ मला पोटातच ठेवाव लागणार होत. धत मी पण ना , ऐसी चे रसिक असताना ही गोष्ट माझ्या पोटात कशाला ठेवायला हवी. चला तर मग लगेच ट्॑कायला हव॑.

ही कथा मी एक प्रयोग म्हणुन लिहिली आहे , ईतरा॑नी ती चा॑गली फुलवावी ही विन॑ती.

Node read time
5 minutes

राजेश घासकडवी Fri, 21/03/2014 - 20:45

कल्पना छान आहे.
अत्र्यांच्या शेजारी फडके आले तर ते ओरडतील,
'अरे, कोणी हे नासके फडके ठेवले माझ्याशेजारी? यांना कला कशाशी खातात तेही कळत नाही. जरा त्या बहिणाबाईंच्या शेजारी तरी ठेवायचे मला. त्यांच्यासारख्या जीवनदर्शी ओव्या गेल्या दहा हज्जार वर्षांत कोणी लिहिल्या नसतील.'
ठणठणपाळाच्या शेजारी कोणीच उभं रहायला तयार होणार नाही. केव्हा त्याच्या हातचा हातोडा टाण्णकन केव्हा टाळक्यात बसेल हे सांगता येत नाही.

बॅटमॅन Mon, 24/03/2014 - 19:20

कल्पना आवडलीच. फुलवायला छान स्कोप आहे. संजोपरावांनी असा कल्पितस्मरणरंजनाचा एक प्रयोग केला होता त्याची आठवण झाली.

बाकी, भाषा मराठी असली तरी अनुस्वाराच्या जागी वैदिक संहितेतील उदात्ताचे चिह्न कसे काय वापरले गेले की. अंमळ त्याच ष्टायलीत वाचल्या गेले.

निर्झरा Tue, 25/03/2014 - 17:19

प्रतिक्रिये दिल्या प्रमाणे अनुस्वर टंकनासाठी काय वापरायचे ते शोधुन काढले आहे. पुढील लिखणात नक्की सुधारणा करेन.
धन्यवाद.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 25/03/2014 - 23:42

यातले लेखक गंधर्वगप्पातल्या म्हातार्‍यांसारखे बोलत आहेत. सूहास शिरवळकर, गुरूनाथ नाईक, नारायण धारप, रणजित देसाई वगैरे म्हणजे एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या काचेच्या कपाटात शोभावे असे.

ऋषिकेश Wed, 26/03/2014 - 09:29

कल्पना सुरेखच आहे.पण तरी प्रयोग तोकडा पडला असे वाटते.
एक म्हणजे लेखकांची स्वतःची स्वभावविशेष ही त्यांच्या लेखनाप्रमाणे असतीलच असे नाही (किंबहुना अनेकदा ती नसतात.) जेव्हा लेखक जागा होतो तेव्हा त्या लेखकच्या काही पुस्तकांच्या संदर्भापेक्षा अधिक लेखकाचा इतिहास, त्यांच्यातील टोलवाटोलवी, त्याचे स्वभावविशेष यावर प्रकाश पडायला हवा असे वाटते. एका वेळी अनेक व्यक्तीचित्रण करण्यासारखे हे आहे. त्यात एक वीण गुंफली तर अधिक बहार येईल. शालजोडीतले हाहण्यापासून, भावनात्मक टिपण्णीपर्यंत अनेक अंगाने ही कल्पना फुलवता येईल.

पुन्हा या दृष्टिने प्रयत्न करणार असाल तर (म्हणजे कराच प्रयत्न, कारण कल्पना मस्तंय) शुभेच्छा!