अस्फुट वावटळ... (चारोळी)

कल्पना छान, थोडी काटकसर आवडली असती
कल्पना छान, पण मला थोडी काटकसर आवडली असती.
असं बर्याचदा वाटतं
जरा ह्या देहाबाहेर जावं
आत घुसमटणारं वावटळ
मग तटस्थपणे निरखावं
लयही नेटकी होते.
टिप्पणी १: आमच्या घरच्या बोलीत [आणि मोल्सवर्थच्या शब्दकोशातही] "वावटळ" स्त्रीलिंगी शबद आहे. म्हणून "घुसमटणारी वावटळ" कानाला अधिक बरी वाटते. "घुसमटणारं" वावटळ असा नपुंसक प्रयोग करण्याचे काही विशेष कारण आहे काय?
टिप्पणी २: "वावटळ" म्हणजे गोल गरगरणार्या वार्याचे वादळ. (पण चक्रीवादळासारखे प्रचंड चक्र नाही, दृष्टिक्षेपात मावेल इतकाच मोठा गोल.) हा प्रकार तुम्ही निवडलेल्या चित्रात फारसा दिसत नाही. "वावटळ" म्हणूनही हे चित्र निवडण्यामागे काही विशेष विचार आहे का?
धन्यवाद...
धन्यवाद...
काटकसर आवडली... :)
काही शब्दांवर भर देण्यास विशेषणं वापरली आहेत... उदा. "अस्फुट" वावटळ... वगैरे...
टिप्पणी १ बद्दल : मला "वावटळ" हा शब्द बर्याच ठिकाणी नपुं.लिंगी वापरल्याचे आ॑ढळले आहे, तरी अजुन नीट शोध घेऊन correction करतो...
टिप्पणी २ बद्दल : सहमत आहे.. :) Actually हवी तशी Image मिळाली नाही... म्हणून हीच वापरली...
एकंदरीत तुमच्या सर्वच प्रतिक्रिया आवडल्या... याने माझ्या लेखनात improvement होण्यास नक्कीच मदत होईल...
पुनःश्च धन्यवाद... :)
छान आहे चारोळी. आणि त्यातली
छान आहे चारोळी. आणि त्यातली कल्पना सुद्धा.