Skip to main content

डॉक्टर आणि समीक्षक

एकाच्या हातात कात्री
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.

डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.

समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.

*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात. शिवाय ऐसीअक्षरे वर खंदे समीक्षक आहेतच.

साती Thu, 24/07/2014 - 14:06

गंमत तेव्हा होते जेव्हा
डॉक्टर होतात समीक्षक
या त्या धाग्यावर
फिरतात होऊन अधिक्षक
लेखणी त्यांची कात्रीसारखी
कर्रा कर्रा चालवतात
लेखकसुद्धा पेशंटसारखे
ठणाठणा बोंबलतात

शब्दार्थ-
अधिक्षक- इन्स्पेक्टर
कर्रा कर्रा- जोर काढून दात ओठ खाऊन करा करा

तिरशिंगराव Thu, 24/07/2014 - 19:46

In reply to by साती

आणखीनच होते गंमत
जेंव्हा शास्त्रज्ञ होतात लेखक
भाषातज्ञ होतात समीक्षक
विचारवंत होतात प्रतिसादक
भांडवलशहा होतात खोचक
सर्वच झाले लेखक
तर व्हायचे कोणी वाचक ?

बॅटमॅन Thu, 24/07/2014 - 19:53

In reply to by तिरशिंगराव

अन्खिन्च होते गमंत
जेव्ह शस्त्र्न्द्य होत्त लेख्क
भष्तज्ञ हओअतत समिशक
विचर्व्त्न परतिसद्क
भन्द्वलश खओच्क
सर्अव्च झल लख्क
त्र व्ह्य्चे क्नि वचक?

बॅटमॅन Thu, 24/07/2014 - 14:41

पटाईतकाका,

मुक्तपीठ नामक प्रकार आपणांस माहिती नाहीसे दिसते. त्यावरील समीक्षकांच्या तुलनेत ऐसीवरच्यांना खंदे समीक्षक म्हणणं रोचक वगैरे वाटलं. ;)