Skip to main content

शून्य

अथांग प्रवास
नको असण्याचा भास
गवसेल शून्य
तसा मिसळेल श्वास . . . १

दिवा उजेडास
जावे जरा आस-पास
स्वयं प्रकाशित
व्हावे शून्य शोधण्यास . . . २

दिसे गुण-दोष
घ्यावे सामावून त्यास
गळतील टोके
येई शून्य आकारास . . . ३

धरावे ढगास
काही लागेना हातास
येईल प्रचीती
कसे साधावे शून्यास . . . ४

सोडोनिया पाश
काही नसताना शेष
चालत राहावे
होई शून्य समावेश . . . ५

ऋषिकेश Tue, 28/10/2014 - 13:40

एकुणात शुन्य तुमचे आवडते दिसतेय :)

याही कवितेचे नाव शून्य आहे. त्यामुळे एकच धागा दोनदा प्रकाशित झाला की काय वाटले :)
तेव्हा योग्य वाटल्यास शीर्षक शुन्य-२ किंवा जसे योग्य वाटेल तसे बदलावे.

मिसळपाव Tue, 28/10/2014 - 19:45

हे शून्य जमलं नाहिये. 'बिगरी ते मॅट्रिक' मधे पुलनी म्हंटलंय की "आम्हाला कर्ता आला, कर्म आलं, फक्त ईंग्लिश आलं नाहि"! तत्सम, या रचनेत यमक आहे, नादमयता आहे पण कविता नाहिये ;-). 'शून्य' हे नाव काढून वाचून पाहिली पण तरीहि काहिहि हाताशी लागलं नाही. तुझी दुसरी 'शून्य' मात्र सुरेखच आहे.

ऋषिकेश म्हणतोय त्याप्रमाणे या कवितेचे नाव बदलावे.