Skip to main content

आई

मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई

.
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
.
तत्वांचे धारदार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
.
तुष्की नागपुरी

तुष्की नागपुरी Thu, 30/10/2014 - 13:02

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद ऋ, या कवितेत दृक प्रतिमा नाहीत, जसे ही कविता एखाद्या अंध मुलाने लिहिलेली असावी. डोळे बंद करून आई ची आठवण केली की वेगळ्याच आठवणी समोर येतात.

- तुषार

'न'वी बाजू Thu, 30/10/2014 - 14:01

In reply to by तुष्की नागपुरी

या कवितेत दृक प्रतिमा नाहीत, जसे ही कविता एखाद्या अंध मुलाने लिहिलेली असावी.

सांगितल्याबद्दल धन्यवाद. अन्यथा (नुसती कविता वाचून) आमच्या (किंवा कोणाच्याच) लक्षात आले नसते.

(बाकी, कविता वाचल्यावरची आमची इन्ष्टंट प्रतिक्रिया: "आईआईआईआईआईआई!")