Skip to main content

वीणा डार्लिंग ,

2 minutes

वीणा डार्लिंग ,

तू कैसी है मेरी जान ? अरे यार तू काय लिहिलय "मरुत दूत "? मला वाटलं कुणी गचकल कि काय . लडबडलो कि राव एकदम . काय असत हे मरुत दूत? … जाऊ दे च्यायला आपण आठवीत ३ दा फेल झालेला आणि मराठीत तर बोंब च आप्ली . काउंट पण करता नाय येणार (गणित तरी कुठ येत राव !) पण त्यानंतर आपण रट्टा मारून ४३% मिळवले हा
अरे डार्लिंग , काल आपण एक पाल मारली . तर असा मी झोपलेला बेड वर , आणि ती अशी वरती fan च्या पण वर … उलटी . तर आपल्याला भीती वाटली (हा वाटली तर वाटली च्यायला घाबरतो काय कुणाच्या बापाला ?)
तर इथं एक काठी आहे . तिच्य्ने आपण fan हलवला .(light गेलेली न… भेंडी बंद होता fan ) ती पळालि . आपण एकदम शूर झाला मग आणि अस्सा ती भिंती वरून पळताना चप्पल नि मारल तिला . लुडकलि कि राव (पण शेपटी राहिली वळवळत ) मग आपण बोलावला रूम साफ करणार्याला . त्यानं ती फेकून दिली . तू असायला हवी होती यार . केवढा brave आहे आपण तुला कळाला अस्ता .

एक कॅप घेतली काल . रेड आहे . "यो यो हनी सिंग " लिहिलय त्याच्यावर . अस्सा मस्त दिस्तो अर्रे आपण . एकदम राज बब्बर ! ( त्याची कुणीतरी lover होती म्हणे स्मिता का कुणीतरी , आपला कलिग बोल्लेला आपल्याला . पण ती खूप स्याड पिकचरात काम कर्ते ना. आपण नाय बघ्तला एकपण .)

मी आला तिकड कि आपण पिकचरला जावू . एकदम पोप्कॉर्ण वगैरे . थेटरात तू आणि आपण . कॉर्नर ची तिकीटं काढणार आपण क्क्काय !

तेरी याद आ रहेली है यार .
नवीन रींग टोन सेट केलाय " उंची है बिल्डींग लिफ्ट तेरी बंद है "

भूक लागली राव (मटन खिमा वास मारतोय जोरात mess मधून )

तुझा
प्र

Node read time
2 minutes

ऋषिकेश Wed, 11/02/2015 - 14:38

=))
आता हेच बाकी होतं! थोर आहे! :)

@अनुपः न बा नसावेत. ते पालींचा कथेतही मृत्यू घडवून आणू शकतीलसे वाटत नाही. उलट पालविरोधी गटातले कोणीतरी असेल :P

'न'वी बाजू Wed, 11/02/2015 - 17:42

In reply to by ऋषिकेश

@अनुपः न बा नसावेत. ते पालींचा कथेतही मृत्यू घडवून आणू शकतीलसे वाटत नाही.

हियर हियर!

पालप्रेमींची बदनामी थांबवा!!!!!!

नंदन Wed, 11/02/2015 - 15:23

मी आला तिकड कि आपण पिकचरला जावू . एकदम पोप्कॉर्ण वगैरे . थेटरात तू आणि आपण . कॉर्नर ची तिकीटं काढणार आपण क्क्काय !

वीणेला ही अशी 'no strings attached' ऑफर? ;)

मेघना भुस्कुटे Wed, 11/02/2015 - 16:04

अरे ए... आवरा. ये चल क्या रहेला हय?

बादवे, प्रमाणलेखनाची मारून ज्यानी कुणी इतकं सातत्यपूर्ण अशुद्ध लिहिलंय त्याला माझ्याकडून एक मुद्रितशोधकी + लेखकू नमस्कार. _/\_

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 16:58

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रमाणलेखनाची मारून

कोल्हटकरा धाव*
----------------
रामायणाशी मॅच व्हावं म्हणून. कोल्हटकर धावा असं लिहायचं होतं.

वृन्दा Wed, 11/02/2015 - 17:01

अरे कोणे ते?
ऐसीच सापडलं का रे तुम्हाला थेरं सॉरी प्रेम-परकर्णं करायला ;)
________
अरे ती वीणा इतकी भावूक, तरल मुलगी, तूच असा रेमेडोके कसा रे?
वीणा, मुली वेळेत सावध हो.

हो सकता है देखो ना, समझों मिट्टी को सोना
पल भर का हँसना हो जाए, जीवन भर का रोना

धर्मराजमुटके Wed, 11/02/2015 - 19:46

काय चाललय काय ? शेवटी पुस्तकी भाषेत प्रेम करणार्‍या वीणा ला रस्त्यावरचा टपोरी 'प्र' च भेटला काय ? प्रेमाचा अगदी 'टाईमपास' करुन टाकलास ग पोरी !

धर्मराजमुटके Wed, 11/02/2015 - 20:13

In reply to by वृन्दा

होय ! होय ! इतकीवर्षे मराठी, हिंदी सिनेमांनी इतके शिकवले पण आता वयोमानानुसार लक्षात राहत नाही. :)

चिमणराव Wed, 11/02/2015 - 19:47

ज्या पत्राचे विडंबन करण्याचा प्रयत्न या लेखिकेने (प्र -सदस्यकाळ ५तास ) केला आहे त्यांना पाल मारण्यासाठी पंख्याची उंची गाठायला जमले नाहीयै ते समजू शकतो परंतू लेखनाची खोली गाठता आली नाहीयै ही चिंतेची बाब आहे.
मुळात पुर्ण डिवचलेली वीणा (पी डी वीणा -सदस्यकाळ चार दिवस )ही लेखिका नसावी. तमिळ भाषा जाणकार कोणी वीणाधर पुरुष असावा (पीडी =धर तमिळमध्ये)शिवाय पत्रातील तरल भावना मांडण्याची वाक्यरचना चांगल्या लेखकाकडे अंगुलिनिर्देश करत आहे.

शहराजाद Wed, 11/02/2015 - 20:20

In reply to by चिमणराव

ही लेखिका नसावी. तमिळ भाषा जाणकार कोणी वीणाधर पुरुष असावा (पीडी =धर तमिळमध्ये)

हा टोला कोणाला बरे?

असो, आमचा अंदाज असा की, हा हाती धरलेला पुरुष नसावा. ही युक्तीच्या गोष्टी सांगणारी स्त्रीच (बहुदा तमिळ न जाणणारी) असावी.

चिमणराव Wed, 11/02/2015 - 22:20

दूरच्या रेल्वेप्रवासात अभ्यास असो वा नसो निरर्थक बोलणं महाबोअर नसतं.पत्रांचे मजकूर आणि ठणठणपाळ लेखक लेखिका दोन्हीही करमणूक करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

अवांतर -पालीचा विष्णूशी काय संबंध आहे? हा खरा छोटे छोटे प्रश्नसाठी आहे परंतू इथे विचारल्याशिवाय राहवत नाही. आणखी सिंहस्थाच्या निमित्ताने अमृतकुंभही आहेच .

वृन्दा Wed, 11/02/2015 - 22:56

In reply to by चिमणराव

पालीचा विष्णूशी काय संबंध आहे?

विष्णू "पाल"नकर्ता आहे.

ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ssssss बास करा त्या पालीची पब्लिशिटी!

चिमणराव Thu, 12/02/2015 - 04:29

खुद्द फ्र (प्र)पत्रकार डार्लिंगशी बोलताना पंख्यावरची पाल चपलेने मारतोय {आणि व्हॉटसापरूपी हंसातर्फे बहुधा वहिडिओही पाठवला असेल} चे डेअरिंगबाज वर्णन करतोय तर वाचक काय दुसरा विषय चघळणार? थोडं विषयांतर केलं. {वीणाधराच्या तमिळनाडुतल्या कांचिपुरम येथे विष्णूच्या देवळात सोन्याची पाल पाहण्यास तिकिट असतं}.