Skip to main content

खडक

उभा आहे
उगान उगे

पलीकडची प्रतिबिंबे
कधीतरी येतील
वाहात वाहात
लाटांबरोबर
माझ्याकडे

आणि मग
माझेही होईल
पाणी पाणी

राजेश घासकडवी Thu, 22/03/2012 - 20:57

ऐसी अक्षरेवर स्वागत.

छोटेखानी, पण छान कविता. लाटांबरोबर वहात येणारी प्रतिबिंबं ही कल्पना आवडली.
उभा आहे उगान उगे यात युगं आणि उगाच या दोन्ही शब्दांचा अर्थ आणण्याचा प्रयत्नही आवडला. (टायपो नसावा अशी खात्री वाटते आहे)

Nile Fri, 23/03/2012 - 19:42

In reply to by राजेश घासकडवी

उभा आहे उगान उगे यात युगं आणि उगाच या दोन्ही शब्दांचा अर्थ आणण्याचा प्रयत्नही आवडला.

च्यायला, या कवींच्या!! असं आहे होय!

धनंजय Mon, 26/03/2012 - 04:05

छान. "उगान उगे" बाबत अजून विचार करतो आहे. "खडक" नावाचुआ निर्देशामुळे कविता समजायला सोय झाली.