Skip to main content

राम .. राम .. राम ..

राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे

कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले

राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू

कानावर बातमी
कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा

राम . राम.
जप चालू

राम .
सिलेंडरची टंचाई

मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !

.

रमाबाई कुरसुंदीकर Fri, 28/09/2012 - 21:38

दासबोध वाच रे विदेशा!
(दासबोध वाचून आता इंटरनेटवर आलेली) रमाबाई

आडकित्ता Sun, 30/09/2012 - 21:28

हे राम म्हटले तरी कॉन्स्पिरसी थिअरीत वेगळे बोलल्याची कुजबुज चालते,
अन हिंदीत शिवी हासडली तर हरभजनची इंग्लिश मंकी मुळे सुटका होते.

तात्पर्य.
कलियुग आहे. अमुक गोष्ट जिव्हारी लागली, तर शिवी हासडून मोकळे व्हा. ;)