'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग ३
याआधीचा भागः-२
व्यवस्थापकः अश्या लहान प्रश्नांसाठी माहितीसाठी हे सदर ऐसीवर सुरू असतं. वाचकांच्या सोयीसाठी या धाग्याचे रुपांतर त्या सदराच्या पुढिल भागात करत आहोत
========
मला Japanese interior design याबद्दल माहीती हवी आहे.
कमीत कमी सामान आणि जागेचा अधिक वापर अशाप्रकारच्या design चा कुणाचा अभ्यास असेल तर कळवावे.
हा धागा 'माहीती' मध्ये टाकायला हवा होता का?पण मला माहिती द्यायची नसून माहिती घ्यायची आहे. त्यामुळे चर्चामध्ये टाकलाय.
सौंदर्य हि रीलेतीव कल्पना
सौंदर्य हि रीलेतीव कल्पना आहे. जे मला सुंदर वाटेल ते तुम्हाला वाटेलच अस नाही. उदाहरणार्थ मला जापनीज पद्धतीचे घर आवडते कारण ते साधे असते तर तुम्हला स्पानिश पद्धतीचे झगमगटी संगमरवरी घर आवडू शकते.
जे कष्टातून बाहेर आलेले असते तेच खरे सौंदर्य उदाहरणार्थ हिरा हा कोळश्यापासून तयार झालेला असतो.
बाकी "पेशवे" हा काय प्रकार आहे हे माहित नाही. शनिवार वाडा नामक बस स्टोप पुण्यात कुठेतरी आहे असे एकून आहे.
पेशवे म्हणजे पुण्यात कोणीतरी
पेशवे म्हणजे पुण्यात कोणीतरी किंग होते एवढे माहित आहे. बाकी कुठला पेशवा कधी आणि काय केल नाना फडवनिस आणि पहिला विश्वास, दुसरा विश्वास एवढी नाव माहिती आहेत .क्रोनोलोजीकल ओर्डर माहिती नाही. शनिवार वाड्या मध्ये नक्की पडलेल्या गोष्टी तिकीट देऊन का पहायच्या म्हणून बाहेरूनच परत आलो होतो. अटकेपार झेंडे वगैरे लावले असतील माहित नाही. तंजावरला गेलेलो एकदा व्यंकोजी बद्दल माहिती आहे. पेशव्यान्बद्दल खास काही माहिती नाही. जे माहिती आहे ते वादग्रस्त आहे त्याची इथे वाच्यता करत नाही.
वारंवार येणाऱ्या नैसर्गिक
वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती ला टिकून राहण्यासाठी तिथल्या घरांची रचना वेगळी असते. स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल तर त्या जास्ती स्वतंत्र असतात अस वाटत. सगळ घर संभाळण, काम करणे, मुलांना सांभाळणे, नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाने. या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रिया महत्वाचा भाग निभावतात.
सोर्सेस- पाहिलेल्या जापनीज फिल्म्स आणि एका मित्राचा जपान प्रवासाचा अनुभव.
कुतुहल रिपु माझे नावरे आवरीता
>> स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल तर त्या जास्ती स्वतंत्र असतात अस वाटत. सगळ घर संभाळण, काम करणे, मुलांना सांभाळणे, नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाने. या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रिया महत्वाचा भाग निभावतात.
सोर्सेस- पाहिलेल्या जापनीज फिल्म्स आणि एका मित्राचा जपान प्रवासाचा अनुभव.
नक्की कोणत्या काळातल्या आणि कोणत्या प्रकारच्या फिल्म्सबद्दलचं हे निरीक्षण आहे? म्हणजे कुरोसावा-ओझू-मिझोगुची-ओशिमा-कोबायाशी-नारुसे-इचिकावा इ. की कुणी तरी आताचे दिग्दर्शक? आणि कोणत्या काळातला जपान त्यात दिसतो - समकालीन की युद्धोत्तर (१९४५) की सामुराई पीरिअड वगैरे?
सगळ घर संभाळण, काम करणे,
सगळ घर संभाळण, काम करणे, मुलांना सांभाळणे, नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाने. या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रिया महत्वाचा भाग निभावतात.
हे काम कोणत्या काळातल्या आणि कोणत्या समाजातल्या स्त्रिया करत नव्हत्या/नाहीत?
मला टोक्योतल्या काही स्त्रिया फारच आवडल्या. कारण हे पहा - Tokyo women call for 'sex strike' over sexist gubernatorial candidate
धारिष्ट्य असेल-नसेल आणि
धारिष्ट्य असेल-नसेल आणि सोशिकता हा गुण असणं-नसणं, त्याबद्दल नंतर बोलू. पण नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाणार नाहीत तर काय त्या टाळणार का काय? त्यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती टाळण्याइतपत शक्ती, बुद्धी असते असं म्हणताय का काय?
---
खालच्या प्रतिसादात 'कठीण समय येता' या शीर्षकाच्या लेखाचा उल्लेख केलाय तो एका भारतीय स्त्रीनेच लिहीलाय बरं.
la Source De Femmes
>> सगळ घर संभाळण, काम करणे, मुलांना सांभाळणे, नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे
>> Tokyo women call for 'sex strike' over sexist gubernatorial candidate
यांवरुन मला la Source De Femmes हा सिनेमा अपरिहार्यपणे आठवला. तो बघा असा सांगण्याचा मोह ही आवरेना.
निरिक्षणे
माझी बायको जपानमध्ये होती तेव्हा तिने केलेले निरिक्षण मांडतो आहे. ते प्रातिनिधिक आहे किंवा कसे याची कल्पना नाही, परंतु धक्कादायक जरूर आहे:
-- जपानमध्ये एकुणच अविवाहित महिलांची संख्या भरपूर आहे कारण लग्न झाल्यावर अगदी क्वचित नोकरी करता येते. शक्यतो लग्न झाल्यावर स्त्रीला पूर्ण गुहकर्तव्यदक्ष असावे लागते.
-- त्यामुळे आधुनिक पिढीतील बहुतांश मुली अविवाहित राहणे पसंत करत आहेत, तिथे कुटुंब संस्था बर्यापैकी कोलमडली आहे. ज्यांना मातृत्त्वाची आस आहे अशा अनेक मुली स्पर्म बँकेच्या मदतीने सिंगल मदर होणे पत्करत आहेत. अर्थातच अनेक पुरूषही जबरदस्तीने अविवाहित आहेत.
-- डिव्होर्सचे व पुनर्विवाहाचे प्रमाण प्रचंड आहे किंबहुना तेथील स्थानिक शैक्षणिक पुस्तकात जन्म, शिक्षण, लग्न, डिव्होर्स, रिटायर्मेंट/सन्यास व मरण अशा स्टेजेस दिल्या आहेत.
-- कौटुंबिक हिंसेचे प्रमाण बर्यापैकी असावे. माझ्या बायकोला ऑफिसातून निघायला उशीर होत असे कारण तेथील बहुतांश कर्मचारी उशीरापर्यंत काम करतात व क्लायंट निघाल्याशिवाय निघणे त्यांना अपमानास्पद वाटे. नंतर ते एकदर दारू प्यायला पबमध्ये जातात किंवा मग व्हिडीयो गेम्सकडे किंवा गेयशांकडे. थेट घरी जाणारा जापनिझ पुरूष एक तर नवविवाहित असतो किंवा बायकोचे नुकतेच पिरीएड्स येऊन गेले असतात असे चेष्टेने म्हटले जाते (ही माहिती माझ्या एका मित्राला त्याच्या जापनीझ कलीगने दिली आहे. खरे खोटे माहित नाही).रात्री उशीराच्या ट्रेनने गेल्यावर काही मध्यमवयीन बायका पुरूषांना स्टेशनवर रिसिव्ह करायला येतात असे दिसे. कारण त्यांचे पुरूष भरपूर पिऊन येत असत, त्यापैकी काही पुरूष स्टेशनवरच बायकांना मारत.
-- सामान्यतः बुद्धीनेही ते अत्यंत अॅवरेज वा बिलो अॅवरेज आहेत. मात्र तो बॅकलॉग ते अत्यंत हार्डवर्क आणि पर्फेक्शनच्या पराकोटीने भरून काढतात.
-- मागे भुकंप झाला तेव्हा माझा एक मित्र तिथे होते. बिल्डिंग हलु लागली तेव्हा मित्र घाबरून उभा राहिला. तरी सगळा स्टाफ शांत बसून होता. तेथील 'डीआराअर' ने सुचना देईपर्यंत सगळे शांत होते. मग सुचना आल्यावर जणु बागेत फिरावे तितक्या शांतपणे एका रांगेत एमर्जन्सी एक्झिट मधुन बाहेर पडले. सांगायची गोष्ट 'वरच्यांचा आदेश' त्यांच्यासाठी देवाच्या आदेशासारखा आहे. त्याआधी काम करत नाही आणि त्यानंतर काम केल्याशिवाय राहत नाहीत. स्वतःची बुद्धी वापरून काहि सुधारणा वगैरे करण्याचा विचारही त्यांना आगाऊपणा वाटेल.
मान खाली घालून दिवसभर मनापासून काबाडकष्ट करत राहणारा, अतिशय 'सिन्सियर' दिसणारा समाज रात्री घरांत पूर्ण वेगळा असेल असे जाणवत राहते.
फक्त
नवीन माहिती/निरीक्षण .
सारेच नवीन.
फक्त एक दोन गोश्टीच आधीपासून ऐकण्यात होत्या.
उदा :-
ते अत्यंत हार्डवर्क आणि पर्फेक्शनच्या पराकोटीने
आणि
सांगायची गोष्ट 'वरच्यांचा आदेश' त्यांच्यासाठी देवाच्या आदेशासारखा आहे. त्याआधी काम करत नाही आणि त्यानंतर काम केल्याशिवाय राहत नाहीत.
कमीत कमी सामान आणि जागेचा
स्पेस सेव्हिंग फर्निचर असं तूनळून बघा. बरेच परदेशी व्हिडियो मिळतील, पण त्यावरून प्रेरणा घेऊन पुण्यात हत्ती गणपतीजवळ एक गृहस्थ असं फर्निचर बनवतात. त्याची किंमत जरा जास्त असते.