तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?
Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -
१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.
२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं
३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.
४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा
५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.
६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला
७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे
८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.
९) मिलो न तुम तो हम घबराए
--
तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी
--
.
.
.
.
असंख्य
आवडणारी गाणी असंख्य आहेत तशीच नावडणारीही असंख्य आहेत. लक्ष्मी-प्यारेचा तोच तोच केरवा(जगांत दुसरे कुठले तालच नाहीयेत, अशी त्यांची समजूत असावी), राजेश रोशनची काही अपवाद वगळता सगळीच गाणी, अगदी जुन्या गायकांची खर्जातली (हगवण लागलेल्या आवाजातली) गाणी, नौशादच्या सुमधुर चालीतले अत्यंत विसंगत व लाऊड असे, मधले पीसेस, किशोरकुमारची अनेक रेकलेली गाणी, पट्टीच्या शास्त्रीय गायकांबरोबर मन्ना डे वा रफीने केलेल्या हास्यास्पद जुगलबंद्या,
लताबाईंना किंचाळायला लावलेली गाणी, का करु सजनी, या बडे गुलाम अली खाँसाहेब यांनी अजरामर केलेल्या ठुमरीचे येसुदासीय विडंबन, अण्णा तथा दि. ग्रेट सी. रामचंद्र यांनी अखेरच्या दिवसांत म्हटलेली,'हवे तुझे दरिशन मजला' सारखी भिकार गाणी आणि अशी अनेक. हे झाले जुन्याबद्दल.
आणि नवीन संगीतात केवळ ठेक्यालाच महत्व दिलेली, पुरुष गायक असूनही बडिवलेल्या आवाजात गायलेली अनेक गाणी ठार नावडती आहेत.
"मै गरीबोंका दिल, हुं वतन की
"मै गरीबोंका दिल, हुं वतन की जुबां"
पडद्यावर प्रेमनाथ आहे. गाणं कळंतच नाही. पण मारून मुटकून अर्थ लावायचाच झाला तर तो राजा होता व फडतूसांचा कैवारी व्हायचा यत्न करीत होता एवढं समजतं. हेमंतदांनी माफक गायलंय.
वर राघांनी "गरीब की सुनो वो तुम्हारी सुनेगा" चा उल्लेख केलेला आहे. त्याच्या बद्दलचा किस्सा आहे - मी सातवीत असताना रेल्वे स्टेशन वर मामाची वाट पाहत उभा होतो. मामा तिकिट काढायला गेला होता. तेवढ्यात एक भिकारी तिथे आला व हे गाणं म्हणायला लागला. मी त्याचं गाणं ऐकून घेतलं .... तो "तुम एक पैसा दो वो दस लाख देगा" असं म्हंटल्याबरोब्बर मी त्याला म्हंटलं की "अहो मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडनंच का घेत नाही ?". बस्स ते तेवढं मामाश्रींनी ऐकलं (तोपर्यंत ते तिकिट काढून घेऊन आले होते) आणी घरी गेल्यावर मातोश्रींच्या कानावर घातले.... "चिरंजीवांचे प्रताप". त्यानंतर मातोश्रींनी माझी यांत्रिक धुलाई केली होती.
आठवीत असताना - आमच्या घरासमोर आलेल्या स्ट्रीट सिंगर कम भिकार्याला मी त्याच्याच गाण्याची हुबेहूब नक्कल करून ऐकवली होती. "केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा". तो चिडून तरातरा निघून गेला होता.
"गरीब जानके हम को ना तुम मिटा देना" - हे रफी नं गायलेलं नितांत सुंदर गाणं. म्हंजे रफीचा आवाज व जॉनी वॉकर चे हावभाव एकदम आवडतात. ओपी नय्यर चं संगीत लाजवाब आहे. जांनिसार अख्तर ची शायरी अप्रतिम.
आठवीत असताना - आमच्या घरासमोर
आठवीत असताना - आमच्या घरासमोर आलेल्या स्ट्रीट सिंगर कम भिकार्याला मी त्याच्याच गाण्याची हुबेहूब नक्कल करून ऐकवली होती. "केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा". तो चिडून तरातरा निघून गेला होता.
तू लहानपणापासुनच गरीबांना त्रास द्यायचास का गब्बु ? =))
तुला गरीब शब्द असलेली गाणी आवडतातच कशी?
तू लहानपणापासुनच गरीबांना
तू लहानपणापासुनच गरीबांना त्रास द्यायचास का गब्बु ?
चौथीत असताना एकदा एका भिकार्याच्या हातातल्या पातेल्यात मी दगड मारला होता. त्याच्या भीक मागण्याच्या आरोळीची हुबेहूब नक्कल त्याला ऐकवली होती.
---
दॅट रिमाईंड्स मी - ते - तू हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा - हे गाणं मला अजिबात आवडत नाही. डेव्हिड च्या कंबरड्यात लाथ घालावी वाटते.
आश्चर्य आहे!
दॅट रिमाईंड्स मी - ते - तू हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा - हे गाणं मला अजिबात आवडत नाही.
का बुवा? 'तू हिंदूच बनशील, मुसलमान बनणार नाहीस!' असे बजावून सांगणारे गाणे (ऑफ ऑल द पीपल) तुम्हाला आवडू नये??? सेक्युलर चावला काय?
(शिवाय त्यापुढचे ते 'इन्सान की औलाद है इन्सान बनेगा', बोले तो... 'मुसलमान ही माणसे नसतात' असे (पोलिटिकल करेक्टनेसच्या तमाम प्रचलित संकेताना धाब्यावर बसवून) उघडउघड सूचित करणारे गाणे म्हणजे... ओह्ह्ह, द थिंग्ज़ द्याट पीपल कुड गेट अवे विथ इन द अच्छे ओल्ड दिन्स ऑफ योर...)
असे गाणे तुम्हाला आवडू नये म्हणजे आश्चर्य आहे. खुले खांग्रेजी दिसता!
(अवांतर: त्यात पुन्हा हे असले गाणे ऑफ ऑल द पीपल मुहम्मद रफीकडून म्हणवून घेतले आहे, ही आणखी एक गंमत.)
बायदवे बहारों फूल बरसाओ हे
बायदवे बहारों फूल बरसाओ हे इतका छानछान वगैरे आशय असलेलं गाणं असं मयताच्या चालीवर का बसवलं गेलं? ते ऐकताना जनाजे पे फूल बरसाओ म्हटल्यागत वाटतं भेंडी. म्हणजे उन्हाळा असल्यावर छान गार पाणी पिऊ म्हणून भांडे तोंडाला लावल्यावर गरमागरम मचूळ पाणी पिल्यास कसा के एल पी डी होतो तसे काहीसे.
मयताच्या चालीवर
गाणं असं मयताच्या चालीवर का बसवलं गेलं?
'बुगडी माझी सांडली गं' हे गाणं आवडतं का बॅटमन? तेही मयताच्या चालीवरच बसवलं आहे. दूरदर्शनवर राम कदम यांची मुलाखत झाली होती. सांगत्ये ऐका मधे ते असिस्टंट संगीतकार होते. बुगडीची कुठलीच चाल पसंत पडत नव्हती. शेवटी रामभाऊंनी जबाबदारी घेतली. त्यांच्या गांवी दलित, जवळचा माणूस मेल्यावर, 'बाबा माझा म्येला रं' असा आर्त टाहो फोडत. तीच सुरावट वापरुन त्यांनी बुगडी माझी ची चाल बसवली.
बांबू डालके
प्रेमभंगाची रडकी गाणी.
रोते रोते यु ही रात गुजर जाती है,
तडफ तडफ के इस दिल से,
and so on
तसेच
गावटी गाणी जत्रेत वाजणारी
लिंबू मला मारिला,
खंडेरायच्या लग्नाला नवरी नटली,
काळूबाई,येलूबाई,वगैरे वगैरे
बाकी बांबू डालके बारीक कुटना वगैरे गाणी फार आवडतात. =))
सर्कमस्टॅन्शियल नावडती गाणी -
सर्कमस्टॅन्शियल नावडती गाणी
- लग्नाच्या कॅसेट/सीडीवर ब्याकग्रौंडला वाजतात ती (फुललेरे टँग डँग टँग टँग डँग फुललेरे क्षणमा झे फुललेरे ... झुळुक्क्वार्याची आलीरेलेवून कोवळीसोनफुले ... वगैरे)
- ग्याद्रिंग (आज गोकुळातरंग...)
- स्पीकरांच्या भिंतींवर वाजवलेली कुठलीही गाणी (खूप लाऊड स्पीकरवर गाणी नीट वाजत नाहीत असं माझं नम्र मत आहे.)
- मुकेश
"होगा तुमसे प्यारा कौन... हम
"होगा तुमसे प्यारा कौन... हम को तो तुम से है... ए कंचन... (मग अचानक मुद्द्यावर येत) प्या आआआ र" वाला ना?
त्याची बाकीची गाणी आठवत नाहीयेत.
(अवांतरः त्या कंचनवाल्या सिनेमाचं नाव होतं "जमाने को दिखाना है". असलं नाव त्याकाळी सेन्सॉरसंमत कसं झालं? दोज मस्ट बी क्रेड्युलस डेज...)
मी तो सिनेमा सहा वेळा
मी तो सिनेमा सहा वेळा पाहिलाय. आवाज नै पायजे.
शैलेंद्रसिंगची गाणी म्हणजे ऋषिकपूरची सुरुवातीची गाणी.
---------------------------
ऋषिकपूरला कुणीतरी विचारले की बॉबी हा सिनेमा तुम्हाला लाँच करण्यासाठी काढला होता ना? तेव्हा त्याने "तेव्हाच्या प्रस्थापित हिरोंना द्यायला पैसे नव्हते म्हणून राजकपूर यांनी मला हिरो केले" असे उत्तर दिले होते. त्याचप्रमाणे मुकेश यांना द्यायला पैसे नसल्यामुळे शैलेंद्रसिंगला गायक बनवले असावे. नंतर 'ऋषिकपूरचा आवाज' म्हणून त्याला गाणी मिळाली.
" एक बुंद मुझे भी पिला दे
" एक बुंद मुझे भी पिला दे शराबी ..देख फिर होता है क्या"
यार..कोणीतरी आमच्या घराशेजारी रिक्षा लावून त्यात हे गाणे लावायचं ..कित्येक दुपारी हे फडतूस गाणे ऐकत गेल्या आहेत .. आम्हाला नाही बघायचं तू प्यायल्यावर काय होणार आहे ते.
हे एक भिकार गाणे ..
दुसरं ":शीशा हो या दिल हो"
तिसरं " भोली भाली लाडकी ..खोल तेरे दिल कि प्यारवाली खिडकी "
हे ममता कुलकर्णी कुठल्या angle नि भोली लडकी वाटते कुणास ठावूक..त्यात सगळी दुनियाभाराची फौज जमा करून हिडीस नाच ..
लावण्याची लायकी नाही पण वरील
लावण्याची लायकी नाही पण वरील बय्राच गाण्यांशी सहमत.बाकी ते टडटडटक्कटक्क वाजवत गाणं म्हणणारी भिकारी पोरं जोडपी दिसली की तुमsssssपरदेsssसी साथ्थ क्या---- गात हटतच नाहीत आणि खुसखुस थांबवून संतापतात त्यांच्यावर.एखादं चांगलं गाणं गाऊन खुश करून पैसे नक्की मिळतील.
आणि ते लुपमध्ये वाजणारे अतिभाविकांच्या दिवाण,सोफ्याखालून वाजणारे ओम नमम:शिवाय वगैरे---अरे ते थांबवा आणि चा आणा लवकर कडवट.तोही महागडा फुळकवणी पाजतात
शारदा नावाच्या गायिकेची गाणी
शारदा नावाच्या गायिकेची गाणी अशीच भीषण असतात, एक आठवते म्हणजे "दुनिया की सैर करलो".
शंकर जयकीशन वर अशी काय वेळ आली होती की ह्या बाईला गाणी देत असत.
----------
संशोधन म्हणुन जालावर ह्या बाई बद्दल बघायला गेले तर धक्कादायक माहीती मिळाली.
हीला फिल्म फेअर अॅवार्ड मिळाले आहे. १९६८-७१ सलग नॉमिनेश्न मिळाले आहे.
हे तर वाचण्या सारखेच आहे
It so happens that the coveted Filmfare award for best playback singer had only one category (either male or female) until 1966. "Titli Udi" song, however, was tied as best song with Mohd Rafi's song "Baharo Phool Barsao" which had never happened before. Sharda didn't win the award but from then on Filmfare started giving two awards for best playback singer: one for male singer and the other for female singer. Thus Sharda made history.
वाट बघतोय रीक्शावालाचिक्क
वाट बघतोय रीक्शावाला
चिक्क मोत्याची माळ
विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला
शांताबाय
नवरी नटली सुपारी फुटली
कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली ...
आवाज वाढच डी जे ... आयचा घो... (हे २ शब्द गाण्यातले नाहीत.. गाणं ऐकून असं म्हणावसं वाटतं)
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" फॉर आय = १ टू अगणित ..
वगैरे वगैरे बरीच..
साधारणपणे रस्त्यावरील गणपती मंडळांची (रस्त्यावर गणपती न बसवणारी मंडळं असतात का??? )आवडती असतात ती सगळी ..
अति हिट झालेली गाणी
काही अती हीट झालेली गाणी अजिबात आवडत नाहीत.
धडकन आणि मन सिनेमाची गाणी अशक्य डोक्यात जातात.
धडकनची विशेषतः
दिल ने य कहा हे दिलसे
तुम दिल की धडकन मे
ना ना करते प्यार हाय मै कर गई (तुझ्या 'ना ना' ची टांग)मन
मेरा मन क्यू तुम्हे चाहे
नशा ये प्यार का नशा है
काली नागिन के जैसे ब्लाब्लाब्ला...रिक्षा वापरणं तर बंदच केलं होत मी त्या़ काळात कारण रीक्षावाल्यांनी उत आणला होता हे गाणे वाजवून. हे सिनेमे आले तेव्हा मी कॉलेजात होतो. कॉलेजची प्रेमी युगलं (चोट खाई हूयी) रडायची वगैरे ती धडकन ची गाणी ऐकून. मला मात्र ती गाणी ऐकली की मी रिक्षावाला झालोय अशीच स्वप्नं पडायची आणि मजबुरी म्हणून रिक्षा चालवतोय ह्यापेक्षा मजबुरी म्हणून मलाही रिक्षेत ही गाणी वाजवावी लागताहेत ह्याचं जास्त वाईट वाटायचं, नशिब स्वप्नच होतं ते.
हा हा... या गाण्यांशी अगदी सहमत. धडकन आणि मन (तसेच त्या काळातील मोहब्बते) या चित्रपटांच्या गाण्यांनी अगदी वात आणला होता.
त्याहीपेक्षा हाईट म्हणजे धडकनची संवादांसहित अशी कॅसेटची एक वेगळी आवृत्ती मिळत असे. नुसरत फतेह अली खान च्या 'धडकन धडकन धडकन धडकन' वगैरे आळवणीच्या मध्येच गाणे थांबवून सुनील शेट्टीच्या आवाजात, 'तुम मेरी हो ये हो नही सकता और तुम किसी और की होगी हे मै होने नही दूँगा' किंवा 'कौन साला मरता है मेमसाब, और मर भी गया तो तुम्हारे सीने मे धडकूंगा धडकन बनकर' वगैरे अजरामर डायलॉगही ऐकावे लागत.
शेवटी रिक्षा-सिक्ससीटरने प्रवास बंद करुन बसचा प्रवास निवडला तर त्यावेळी पीसीएमटीचे रसिक ड्रायवर - कंडक्टर टेपरेकॉर्डर बसवून शुक्रतारा मंदवारा वगैरे गाणी सकाळीसकाळी ऐकवत असत.
न आवडलेली गाणी
वर बरीच नावडती गाणी आधीच आली आहेत. आशा भोसलेंची हिरवा-बरवा अल्बचमी गाणी डोक्यात गेली. आतिफ असलम ह्या गायकाची गाणी अजिबात आवडत नाहीत. चांगली आहेत खरंतर पण डोक्यात जातो. यशचोप्रा-जोहर कँपची गाणी (डीडीएलजेपासून धूमपर्यंत) सतत आदळत असल्याने कधीच आवडली नाहीत. हिमेशरेशमियाँची काही गाणी जनरली ऐकू शकतो पण त्याचं एक 'कुछ तो समझो ना' नावाचं गाणं एकदम इरिटेटिंग आहे. रिक्षावाला, पारु वगैरे चांगली आहेत पण शांताबाई गाणे काही झेपले नाही.
धागा आवडला. पण गाण्याचा विचार
धागा आवडला. पण गाण्याचा विचार करते आहे.
___
निगोडी कैसी जवानी है - https://www.youtube.com/watch?v=jiZucsVVCp8
हॉरिबल फॉर ऑब्व्हिअस रिझन्स :(
____
तेजोमय नादब्रह्म हे - http://www.aathavanitli-gani.com/Song/Tejomay_Nadabramha_He
गाणं आवडतं ना आवडतं तोच गीतकार - प्रवीण दवणे वाचलं अन मग ..... ;)
आहाहा काय मस्त गाणं आहे निगोडी कैसी जवानी है...!
नुकताच केबलचा जमाना सुरु झाला होता अन एटीएन वगैरे तत्सम चेनलवर आम्ही डोळ्यात प्राण आणून वाट पहायचो की केंव्हा एकदा हे गाणं लागतं ते. त्यावेळी मला नुकताच जुगार खेळायचा नाद लागला होता अन जिथे तो चालत असे त्या हॉल/खोलीत हे गाणं कॅसेटवर पुन्हा पुन्हा लावलं जात असे. हे गाणं ऐकत जुगार खेळणं म्हणजे निव्वळ नशा होती नशा... वूफ्फ्फ..! आय एम फिलींग नॉस्टेल्जीक.
अजून काही
१. तुम तो ठहरे परदेसी, साथ्थ काय निभाओगे
२. ले गयी दिल मेरा मनचली, खलीबली खलीबली खलीबली
३. वरती कोणीतरी पुरूष गायकांनी चिरक्या आवाजात म्हंटलेली गाणी - टोटली.
४. शांताबाई - डोक्यात बिक्यात गेले नाही पण मुळात त्या गाण्यात आवडण्यासारखे काय आहे तेच समजले नाही. डोक्यावरून गेले.
५. कोंबडी पळाली
६. नवीन पोपट, व मुद्दाम तसे आवाज काढून म्हंटलेली असंख्य गाणी
७. केवळ पंकज उदास गातोय म्हणून गजल समजली गेलेली गाणी
८. जिंदगी की ना टूटे लडी. ऐकायला व पाहायला दोन्ही भिकार. काय खाउन लोक गाणी हिट करायचे कळत नाही. (मात्र त्याच पिक्चर मधले लुई शमाशा मस्त आहे)
९. तुम जो मिल गये हो तो ये लगता है के जहाँ मिल गया - त्या हीरॉइन च्या पोजमुळे मला हे भुताचे गाणे आहे असे वाटायचे कित्येक दिवस
१०. कोलावेरी न आवडणार्यांमधे मलाही धरा. वाय दिस कोलावेरी कोलावेरी हे ते गाणे रचणार्यांनाच उद्देशून विचारायला पाहिजे.
सलमा आगा
ती नावडण्याएवढी तिचे चित्रपट वा गाणी पाहिली नाहीत. एक फक्त 'कसम पैदा करने वाले की' मधे ती काहीतरी "मै अपनी खूबसूरती के बल पे..." वगैरे बोलते तेव्हा फुटल्याने पुढचे वाक्य ऐकले नव्हते. मात्र ती ज्यांच्या डोक्यात जाते त्यांना आणखी त्रास करून घ्यायचा असेल तर तिचा आवाज, रती अग्निहोत्रीला तिच्यासारखा मेक अप करून, व डिस्को लाईट्स लावून एक अफलातून कोरस डान्स असलेले हे गाणे पाहावे
https://www.youtube.com/watch?v=yfE9UXdXCrQ
मेरा नाम सलमा/अल्ला जाने कौन बनेगा इस सल्मा का बल्मा.
हे एक
हे एक. ऐकायला श्रवणीय आहे. पण चित्रीकरण एकदम मजेदार. राजेन्द्रकुमार व सायरा बानो सारखे कलाकार असल्यावर उच्च अदाकारी ची ग्यारंटीच. पूर्वीच्या पिक्चर्सच्या जाहिरातीत जसा "ठासून भरलेला मसाला" हे एक क्वालिफिकेशन होते तसा यात ठासून भरलेला अभिनय आहे. जणू काही आपण सर्व प्रकारचा अभिनय करू शकतो हे एकाच गाण्यात सिद्ध करायचे आहे.
सायरा बानो व राजेन्द्रकुमार यांच्या या गाण्यात सेकंदासेकंदाला अभिनयाचे, नृत्याचे धडे मिळतात ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पाहा. पण आधी गाणे पाहा:
https://www.youtube.com/watch?v=LE_RHVhOWeU
हे काही Gems. पहिले आकडे गाण्याच्या क्लिप मधले मिनीट व सेकंद दाखवतात.
०:०१: सायरा एका झाडावरून दुसरीकडे जाते तेव्हा लहानपणी शिरापुरी खेळायचो ते उगाचच आठवले.
०:३९: मिथुनच्या सायकल च्या मागे लपण्याच्या तोडीचा सायरा चा झावळीमागे "लपण्याचा" सीन
०:४०: "येथे समोर दिसत नाही. कोठे गेली?" हीरॉइन्/हीरो तेथेच जवळपास असणार हे उघड असताना चेहर्यावर उगाचच काळजी दाखवणारे एक्स्प्रेशन्स असतात तसा चेहरा
०:४९: हीरॉइन समोर शोधत असताना मागून येणे हा अशा गाण्यांत अत्यंत आवश्यक असलेला सीन. सुमारे ३०-४० चौरस फुटांमधे दोघे फिरत असताना हे असे कन्फ्युजन कसे काय होते हे एक आश्चर्यच आहे.
०:५८: "दो दिलोंकी कश्ती" मधे ते दो दिल कोणते हा प्रश्न प्रेक्षकांना पडू नये म्हणून एकदा सायरा कडे व एकदा स्वतःकडे बोट. याला दोघांची माना डोलावून सहमती.
१:०७: हेअर कट् केल्यानंतर एक दोन दिवस कानामागच्या केसांत हात फिरवायचा आपण प्रयत्न करतो पण तेथे केस नसतात तसा एक सीन. "अरे हो, आज केस कापलेत नाही का!"
१:२०-१:३०: गरिबांचा दिलीपकुमार हे नाव सार्थ करणारे हातवारे
१:३८: एक पाय उचलून नटराज पोज मधे नमस्कार. यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
१:५८: स्प्रिन्ग लावलेल्या बाहुलीचा डान्स. राजेन्द्र कुमार करतो. सायरा नव्हे
२:०८: "देखते है तारे" म्हंटल्यावर कम्पल्सिवली आकाशाकडे बघायलाच हवे. तेव्हढ्यात आज दाढी केलीय का हे विसरल्यामुळे एकदा चेक
२:२२-२:३०: सायराबानो च्या डान्स पोजेस सुद्धा स्वतःच करून टाकणे
२:५५: मला डान्स करता येत नाही हे हावभाव करून सांगणे
३:०४: "पंछी" चा उल्लेख आल्यामुळे हाताने पंख हालवतानाचे हावभाव करायलाच हवेत. त्याशिवाय लोकांना कसे कळणार
३:२३: भजन
३:२९: बॉक्सिंग ची प्रॅक्टिस
३:४८: ज्याच्या मधून प्रतिभोत्तर राम गोपाल वर्माने क्लोज अप कसा असावाचे धडे घ्यावेत असा क्लोज अप. भरतनाट्यम-भुवया उडवण्याचाही एक प्रयत्न.
एकाच गाण्यात एवढा अभिनय ठासून भरला आहे असे सहसा नसावे. रिस्पेक्ट! तो शेवटी एक बंदूक घेउन उभा असलेला माणूस दिसतो, तो दिग्दर्शक असावा.
सो बॅड दॅट इट्स गुड :
सो बॅड दॅट इट्स गुड : कंटिन्युड् :
"सबसे बडा खिलाडी़" सिनेमातलं ममता कुलकर्णी आणि अक्षयकुमारचं गाणं. शब्द विसरलो. सडीकछाप.
"अंदाज़" नावाचा , '९० च्या दशकातला डेव्हीड धवनने काढलेला सिनेमा. त्यातली सगळी गाणी. दुर्गंधीयुक्त.
८३-९४ च्या आसपासचा "कैदी" नावाचा हिंदी (पण दाक्षिणात्य निर्मात्यांनी बनवलेला) सिनेमा. त्यातलं "बांगो बांगो बांगो/जो भी चाहो/वोही मांगो" हे गाणं.
सिनेमा विसरलो. पण अनुराधा पौडवालचं कर्कश्श "मैंने रब से तुझे मांग लिया" (बहुदा "कर्मा")
"सबसे बडा खिलाडी़"
"सबसे बडा खिलाडी़" सिनेमा
यातली गाणी सो बॅड इट्स गुडचा मापदंड आहेत.
- भोली भाली लडकी, खोल तेरे दिल की, प्यारवाली खिडकी, ईईईईई (ईई म्हणजे ईत्यादी नव्हे. खरंच गाण्यात ईईई असं म्हणातात. वर कोणीतरी याबद्दल इतर प्रेमळ उद्गार काढलेले आहेतच)
- जहर हय के प्यार हय तेरा चुम्मा, कयसा ये खुमार हय तेरा चुम्मा
- भरो .... टर डर डग टक .... मांग मेरी भरो
हे एक अतिशय संस्कारी गाणं आहे. मकु अकुला सिड्यूस करतानाही मांग भरल्याशिवाय मी सिड्यूस होणार नाही असं सांगते आहे.
अनुराधा पौडवालबद्दल: अगदी
अनुराधा पौडवालबद्दल: अगदी अगदी, त्रिवार अगदी. गुलाबजामचा उरलेला पाक (त्याच त्या भयाण गुलाबाच्या कृत्रिम वासासकट) पितो आहोत असं वाटतं.
आणि आता विषय निघालाच आहे, तर ती श्रेया घोसल. काय कर्कटकी आवाज आहे तिचा. पूर्वी दगडी पाटी असायची आठवते का? त्यावर एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे कर्कटक खरवडत नेलं तर जसा आवाज येईल, तसा काहीतरी पोत आहे तिच्या आवाजाचा. वास्तविक (असं वाटू नये, याला पुरेशी सबळ कारणं असली तरीही) काही अनाकलनीय कारणांनी संजय लीला भन्सालीच्या सिनेमांतली गाणी मला बरेचदा ऐकावी वाटतात. मग त्यात ह्या बाईचा आवाज आला की एकदम मुस्काटात बसल्यासारखं वाटायला लागतं. "करशील, परत करशील असली हिंमत? चल नीघ." असं डोक्यात वाजतं.
मस्त धागा आणि प्रतिसाद !!
माझ्या एकेकाळी डोक्यात जाणारं गाणं :
अगर तुम मिल जाओ , जमाना छोड देंगे हम . अत्यंत मूर्खपणाचं उदाहरण; ह्यातच पुढे असाही आहे कि तेरी सुरत न हो जिसमे वो शिशा तोड देंगे हम - काय म्हणजे. बाथरूममध्ये, इकडे तिकडे सगळीकडे काचांचा खच पडलाय असं डोळ्यासमोर यायचं . काहीही .
आणि ते दुरीईईईई सही जाये ना - त्याने फर्स्ट इयर मध्ये वात आणला होता. लोकांना आवडतो अतिफ अस्लम पण मला हे आणि अजून एक दोन गाण्यातलं त्याचं रेकणं सहन होत नाही .
बाकी हल्ली आमच्याकडे प्रत्येक रेडीओ स्टेशनवर अडेल बाई रडत असतात - ते हेल्लोच तर अजीर्ण झालंय . :(
सिद्धी हे ब्रिटनी आणि अडेल
सिद्धी हे ब्रिटनी आणि अडेल मॅश अप ऐकलयस का? एकदम छान आहे.
https://www.youtube.com/watch?v=fKyb3UXLXJg
जरा अवघड प्रश्न आहे ... आवडती
जरा अवघड प्रश्न आहे ... आवडती विचारल असतं तर तुमच्या लेखापेक्षा मोठ्ठी यादी दिली असती .
नावडत्यांची लिस्ट पण बर्यापैकी मोठी आहे ..
१) गरीबोंकी सुनो .. वो तुम्हारी सुनेगा
२) बाबुल की दुवाए लेती जा ...
३) जानेवालो जरा मुडके देखो मुझे
४) तुम गगन के चंद्रमा हो .. मै धरा की धूल हू
५) चल चल चल मेरे हाथी .. ओ मेरे साथी
६) तेरी मेहेरबानीया - तेरी कदरदानीया
७) तु मेरा जानु है
८) मै तो रस्तेसे जा रही थी - भेलपुरी खा रही थी
९) सरकाई लियो खटीया जाडा लगे
अजून बरीच आहेत .. :(
(१) बद्दल वर जिक्र केलेला
(१) बद्दल वर जिक्र केलेला आहेच.
(२) अगदीच रटाळ
(३) बर्यापैकी सहमत
(४) कुठल्याही आधुनिक स्त्री ला हे गाणं आवडणार नाही. तसेच मै तुलसी तेरे आंगन की. ही दोन्ही गाणी मी बायकोला चिडवण्यासाठी लावतो. पुढचा तासभर दिवाळीप्रमाणे फटाके वाजत राहतात.
(५) ठीकाय
(६) चांगल्यापैकी सहमत
(७) हे स्वरा चे सुद्धा नावडते आहे. आजकाल कुठे दिसत नाही स्वरा.
(८) व (९) ही भिकार आहेत याबद्दल सर्वसहमती असेल असा कयास आहे.
प्रचंड डोक्यात जाणारं गाणं:
प्रचंड डोक्यात जाणारं गाणं: तुझे अक्सा बीच घुमा दू आ चलती क्या