Skip to main content

या चमकदार अमेरिकेत

या चमकदार अमेरिकेत चमकदार स्टील बार्स खाली
चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात
घामाचे चमकदार बिंदू पांढऱ्या टॉवेलने पुसत
लिंबू पिळलेला चहा पिताना त्यांची नजर असते
आपल्या चमकदार दातांनी चमकदार लालभडक सफरचंदे
खाणाऱ्या पुरुषांवर, जे पांढऱ्या स्वच्छ टॉवेलच्या गाऊनमधून
कसलेल्या चमकदार मांड्या दाखवीत,
"पुरुषांच्या आरोग्या" वरची चमकदार
मासिके चाळत असतात. त्यांच्यासाठी
मेदाहारी आयुष्यवर्धक पेयांच्या चमकदार बाटल्या
शिस्तबद्ध शांततेत शेल्फांवर
वाट बघत असतात .
या चमकदार अमेरिकेत चमकदार स्टील बार्स खाली
चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात.
----

तिरशिंगराव Thu, 14/07/2016 - 11:47

लिंबू पिळलेला चहा पिताना त्यांची नजर असते

नजर चमकदार असते की लिंबु चमकदार? की आणखी काही चमकदार ?
कारण या ओळीला जरा अडखळायला झालं.

पिवळा डांबिस Fri, 15/07/2016 - 10:13

तुम्ही ग्वानटानामो बे मध्ये रहाता हे माहिती नव्हतं!
आमची सहानुभूती!!!!

अतिशहाणा Fri, 15/07/2016 - 19:47

शेवटचे कडवे वाचून चुकून 'पॉर्न ओके प्लीज' अंकातील कविता वाचताहोत की काय असे वाटले. चूभूद्याघ्या.

पिवळा डांबिस Sat, 16/07/2016 - 10:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात.

आणि जमल्यास फोटो ही!!!!!
;)
डांबिसी मन वढाय वढाय!
मालिबू बीच चा सीगल,
किती हाकला हाकला
तरी टोच निपलवर!!!!
:)