या चमकदार अमेरिकेत
मिलिन्द
या चमकदार अमेरिकेत चमकदार स्टील बार्स खाली
चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात
घामाचे चमकदार बिंदू पांढऱ्या टॉवेलने पुसत
लिंबू पिळलेला चहा पिताना त्यांची नजर असते
आपल्या चमकदार दातांनी चमकदार लालभडक सफरचंदे
खाणाऱ्या पुरुषांवर, जे पांढऱ्या स्वच्छ टॉवेलच्या गाऊनमधून
कसलेल्या चमकदार मांड्या दाखवीत,
"पुरुषांच्या आरोग्या" वरची चमकदार
मासिके चाळत असतात. त्यांच्यासाठी
मेदाहारी आयुष्यवर्धक पेयांच्या चमकदार बाटल्या
शिस्तबद्ध शांततेत शेल्फांवर
वाट बघत असतात .
या चमकदार अमेरिकेत चमकदार स्टील बार्स खाली
चमकदार अमेरिकन बायका व्यायाम करतात.
----
चमकदार
लिंबू पिळलेला चहा पिताना त्यांची नजर असते
नजर चमकदार असते की लिंबु चमकदार? की आणखी काही चमकदार ?
कारण या ओळीला जरा अडखळायला झालं.