Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

अजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का?

कंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.

इतक्यात लक्षच गेलं नाही.

चिमणराव Wed, 27/06/2018 - 07:17

१४वे, चाबुक जोरात चालतोय.

इथल्या प्रत्येकाला आपापल्या पालकांवर भरपूर प्रेम आहे हे लेखनातून जाणवतं. कितीही कडक/तिरपी भाषा वापरून त्यांचे संवाद घरी होत असले तरी एकमेकांना समजूनच असणार.

तिरशिंगराव Thu, 28/06/2018 - 10:32

'माझी आई आज मेली. किंवा कालही असेल, नक्की माहीत नाही',
हे प्रसिद्ध वाक्य बहुतेकांनी वाचलंच असेल. तेंव्हा, उगाच कोणाला नांवं ठेवायची, का त्याला कामूचा मान द्यायचा ?

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 17:06

In reply to by तिरशिंगराव

'माझी आई आज मेली. किंवा कालही असेल, नक्की माहीत नाही',

हे वाक्य बहुतेकांनी ऐकलं असणारच हे मान्य, पण "तिच्या मरण्याचा आनंद मी आज साजरा करावा कि कालच करायला पाहिजे होता नक्की माहित नाही" असं विधान ऐकवायला अदितीच लागते.

चिंतातुर जंतू Thu, 28/06/2018 - 17:30

In reply to by अजो१२३

हे वाक्य बहुतेकांनी ऐकलं असणारच हे मान्य, पण "तिच्या मरण्याचा आनंद मी आज साजरा करावा कि कालच करायला पाहिजे होता नक्की माहित नाही" असं विधान ऐकवायला अदितीच लागते.

आता हे खूपच अबसर्ड विनोदी होत चाललं आहे, कारण ह्या वाक्यांनी सुरू झालेल्या काम्यूच्या कादंबरीत ज्याची आई मेलेली आहे त्या मरसोवर तो आईच्या मृत्यूविषयी पुरेसा हळवा नसल्याचे, म्हणजेच असंवेदनशील असण्याचे आरोप होतात.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:14

In reply to by चिंतातुर जंतू

कादंबरीत ?? उद्या कादंबरीत एखादं महाभयंकर पात्र एका विशीश्ट पद्धतीनं वागलं म्हणजे तुम्ही तसं वागणार का? लेखकाचा कल्पनाविलास वेगळा आणि खरे कटुअन्य्भव वेगळे.

चिंतातुर जंतू Thu, 28/06/2018 - 18:17

In reply to by अजो१२३

उद्या कादंबरीत एखादं महाभयंकर पात्र एका विशीश्ट पद्धतीनं वागलं म्हणजे तुम्ही तसं वागणार का? लेखकाचा कल्पनाविलास वेगळा आणि खरे कटुअन्य्भव वेगळे.

एखादं चमकदार वाक्य तुमच्यापर्यंत पोचलं आहे पण कादंबरी पोचलेली नाही हे ह्या प्रतिक्रियेवरून उघड आहे. त्यामुळे मी आणखी काही म्हणत नाही.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:43

In reply to by चिंतातुर जंतू

मी "त्या" कादंबरीच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेला नाहीच. त्यामुळं असंबंधित कादंबरी मी वाचली नाही म्हणून खाली बसणं विचित्र आहे.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:32

In reply to by चिंतातुर जंतू

कादंबरीत ?? उद्या कादंबरीत एखादं महाभयंकर पात्र एका विशीश्ट पद्धतीनं वागलं म्हणजे तुम्ही तसं वागणार का? लेखकाचा कल्पनाविलास वेगळा आणि खरे कटुअन्य्भव वेगळे.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 16:28

In reply to by चिमणराव

काय संबंध? लोक आपली अस्वस्थ इ इ प्रतिमा बनवत असतील म्हणून योग्य प्रश्न विचारणं थांबवायचं का? जालावरच्या असल्या कोणत्या विक्षिप्त व्यक्तिच्या विक्षिप्त लिहिण्यानं अस्वस्थ होणारांपैकी असतो तर कामच झालं असतं. Unless the matter is directly connected to me, it doesn't affect me. Suppose (note I am writing suppose) someone is happy from death of parents or child or suppose one is even killing parents or child, how does that matter to me? Let me make a black joke - Aditi's parents are nobodies to me and I don't give damn whether they are alive or dead and if dead, timely or untimely. I am worried about the larger social principle- what should human reaction to death, especially of the one from the core family.

आदूबाळ Thu, 28/06/2018 - 18:27

In reply to by अजो१२३

काय संबंध? लोक आपली अस्वस्थ इ इ प्रतिमा बनवत असतील म्हणून योग्य प्रश्न विचारणं थांबवायचं का? जालावरच्या असल्या कोणत्या विक्षिप्त व्यक्तिच्या विक्षिप्त लिहिण्यानं अस्वस्थ होणारांपैकी असतो तर कामच झालं असतं.

आणि

I am worried...

बटाटा. बटाटाह.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:40

In reply to by आदूबाळ

अरूणजोशी , सकाळी, बायकोस - मला अजिबात भूक नाही.
अरुणजोशी, संध्याकाळी, बायकोस - मला प्रचंड भूक लागलेली आहे.
आदूबाळ, दुसऱ्या दिवशी, मित्रास - अरुण जोशी तद्दन खोटे बोलतात.

आदूबाळ Thu, 28/06/2018 - 19:19

In reply to by अजो१२३

तद्दन खोटं नाही. पण विसंगती आहेच.

एकाच विषयावर एकाच वेळी चर्चा करताना तुम्ही 'अस्वस्थ' होत नाही. पण 'वरीड' मात्र असता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 17:56

सकाळचे तीन वाजून चौदा मिनीटं झाली आहेत. आता ऐका 'देव डी' चित्रपटातलं एपिक गाणं - तेरा इमोसनल अत्याचार.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 19:53

In reply to by अजो१२३

आई-वडलांच्या अकाली मृत्युंमुळे लोक अनपेक्षितरीत्या विनोदी असतात, ही गोष्ट मला फार लहान वयातच दिसायला लागली. (घ्या, आणखी मृत्युविनोद!)

चिमणराव Thu, 28/06/2018 - 20:26

अजो, तुम्ही वेगळ्या प्रकारे व्यक्त होता, अदिती आणखी वेगळ्या पद्धतीने, मी आणखी निर्विकार अचरटपणे ( तशी माझी ख्याती आहेच.) आणि तसं करू शकण्याचं कारण मी माझ्यावर बरंच स्वातंत्र्य ओढवून घेतलेलं आहे.

चिमणराव Fri, 29/06/2018 - 09:17

रेस्टारोंचे दोन प्रकार असतात - उपलब्ध असणाय्रा चालू पदार्थांतून ( डिशेस) व्यक्त होणारी ( ही बहुतेक ओफिसांच्यासमोर लंचटाइममध्ये धंधा करतात,) आणि त्यादेशाबाहेरच्या काही पदार्थांतून व्यक्त होणारी इतर.( फोडणीचा भातही वेगळ्या नावाने असू शकतो रिझोटो)