Skip to main content

बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या

बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा

ह्यावर्षी असं नव्याने जाणवलं की थोडंसं प्लँनिंग आणि नगण्य कष्टात घरची पालेभाजी खाता येते. दर रविवारी २ ट्रे मध्ये हरभरा / मेथी पेरून आठवड्याला एक तरी पालेभाजी होतेच. शिवाय घरी लावलेल्या इतर भाज्यांचा पालापण पालेभाजी करण्यासाठी वापरता येतो. 

१. मेथी / हरभरा पातळ भाजी 
साहित्य:
हरभरा डाळ, शेंगदाणे, लसूण, तेल, मोहरी, हळद , तिखट -मीठ , (आमसुलं , गूळ - मेथी खूप कडू असेल तर), डाळीचं पीठ १ चमचा ( ऐच्छिक ) आणि मेथी/ हरभरा.
कृती : 

  1. पालेभाजी खुडून, स्वच्छ धुवून डाळ दाण्यांसहित कूकरमध्ये शिजवून घेणे. 
  2. हळद मोहरीची फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण परतणे.
  3. शिजलेली भाजी-डाळ-दाणे फोडणीत टाकणे. 
  4. फार चोथा -पाणी होतंय असं वाटलं तर एक चमचा डाळीचं पीठ पाण्यात कालवून लावणे. 
  5. चवीनुसार तिखट -मीठ घालणे. 
  6. मेथी खूप कडू असेल तर ह्यात आमसुलं आणि थोडा गूळ घालणे. 
  7. एक उकळी आली की भाजी झाली.

 1
2

२. मिश्र पाल्यांची भाजी 
साहित्य: 
तेल, लसूण, मिरची, मीठ, दाण्याचं कूट आणि बागेतल्या भाज्यांची पानं. ( हरभरा, मेथी, भोपळा, रताळं, बटाटा, वाल)
कृती:

  1. भाज्यांची पानं स्वच्छ धुवून गरजेप्रमाणे चिरून घेणे. 
  2. फोडणीत ठेचलेला लसूण आणि मिरची परतणे. 
  3. लगेचच वरून चिरलेल्या भाज्या घालून मीठ- दाण्याचं कूट शिंपडून झाकून ठेवणे.  
  4. मध्ये मध्ये झाकण उघडून एकसारखे परतणे. 
  5. पानांचा रंग बदलला की भाजी शिजली असं कळतं.

 
3