Skip to main content

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)

ललित लेखनाचा प्रकार

मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा, विषयक कथासूत्रांची तौलनिक चर्चा

Taxonomy upgrade extras

मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हे कथासूत्र अनेक भारतीय कथांमध्ये सामायिक दिसत, भारतीय जन मानसावर या कथासूत्रांचा मोठा प्रभाव राहीला आहे.

१) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक भारतीय कथांची यादी/सूची करून हवी आहे.

२) भारताबाहेर अशी कथासूत्रे आहेत का ?

३) या कथासूत्रांचा माता पित्यांचा मूलगा हा मुख्य टार्गेट असतो. (मुलगी टार्गेट असलेली कथानके आहेत का ? असतील तर कोणकोण-ती ?)

(पहिल्या तीन प्रश्नांची उत्तर विकिप्रकल्पातून वापरण्याचा मानस असल्यामुळे तेवढ्यापुरती प्रतिसाद अंश प्रताधिकारमुक्त समजले जातील)

फिरकी

23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला.
नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) .
तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.
8 मजल्यावर दुरूस्तीसाठी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या होत्या,मात्र याची जाणीव कोणालाही न्हवती.
इथे ही हत्या की आत्महत्या हा प्रश्न पडतो.

ललित लेखनाचा प्रकार

महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?

Taxonomy upgrade extras

महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षिप्त असला पाहीजे.

मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की

१) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ?

तुलनेचा तराजू

सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते.
तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत.
तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो.
तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही.
इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही. अशी तुलना लाभदायक ठरते.

ललित लेखनाचा प्रकार

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

ललित लेखनाचा प्रकार

वारपुराण

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार… कुणी शोधून काढले असतील माहित नाही, पण तो / ती महानच! अश्मयुगात रोजच उठून शिकार करून खाणाऱ्या, आणि अंधार पडला की काही दिसत नाही म्हणून झोपणाऱ्या "होमो सेपियन" ला अचानक एक दिवस दुसऱ्या दिवसापासून वेगळा आहे हा साक्षात्कार कसा झाला आणि ते दिवस एकदाच न येता परत परत येतात हे सुद्धा कसं कळलं माहित नाही. पण मला पृथ्वी गोल आहे हे एक वेळ पटणार नाही, पण एक सोमवार हा दुसऱ्या सोमवारासारखा असतो आणि एक मंगळवार दुसऱ्या बुधवारसारखा कधीही नसतो हे मात्र अगदी मनापासून मान्य आहे. तशी माझी "श्रद्धा" च आहे. श्रद्धेचा प्रश्न येतो तिथे काही सिद्ध करावं लागत नाही.

आणखी एक द्राक्ष

मधुराला भेटायचं असलं म्हणजे मला फार म्हणजे फारच टेन्शन येतं ब्वॉ. मला जितक्या मिनिटांचा उशीर होतो तितक्या अंशांनी तिच्या नजरेच्या तिरकसपणाचा कोन वाढत जातो. आणि मग 'अरे वा, नवीन घड्याळ वाट्टं!' वगैरे खवचट बोलणी सुरू होतात. मला वाटतं तिला असलं काहीतरी बोलून दाखवायला आवडतं. मला खात्री आहे की मनातल्या मनात ती 'समीरला उशीर व्हायला हवा' अशी प्रार्थना करते. आणि उशीर झाला की नक्की कुठचे खरमरीत शब्द वापरायचे याची उजळणी करते. जितका जास्त उशीर तितका तिला शब्दांना धार करायला वेळ मिळतो.

ललित लेखनाचा प्रकार

हिरोशिमा नंतर ७० वर्षे

६ ऑगस्ट २०१५ पासून ७० वर्षांपुर्वी १९४५ साली जपान च्या हिरोशिमा शहरावर (अमेरिकेच्या कपटी हेरी ट्रुमन या राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिल्यावर) 'little boy' हा Uranium आणि ९ ऑगस्ट रोजी 'fat man ' हा plutonium बॉम्ब नागासाकी शहरावर टाकला. विध्वंस जास्तीत जास्त व्हावा यासाठी little boy हा जमिनीच्या वर २,००० फुटावरच फुटेन असा time केला होता आणि अपेक्षेप्रमाणे प्रचंड विध्वंस झाला. याबद्दल बरेच वाचनात आले असेल सगळ्यांच्या.
पण आता ७० वर्षांनतर काय परिस्थिती आहे?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स