काही नाती, काही रात्री (भाग पहिला)
मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच. कॉफी संपली, त्याने आळस दिला आणि सुट्टा मारायला म्हणून निघाला. एकंदरच हे लग्नासाठी मुलगी शोधणे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलं होतं.
- Read more about काही नाती, काही रात्री (भाग पहिला)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6135 views
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!
“जनाब, मुंबई कि फ़ैशन और कश्मीर का मौसम, बदलने देर नही लगती”. आमच्या गाडीने जवाहर टनेल ओलांडला आणि काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला. तापमान ३० डिग्री वरून थेट १० डिग्री वर घसरलं होतं. काश्मीर मध्ये पोचल्याचा आनंद आमच्या चेह्ऱ्यावर पसरला आणि ड्रायवरने तो अचूक टिपला. जम्मू ते श्रीनगर प्रवास तसा लांबचा पण नेत्रसुखद. “ये हसीं वादियाँ , ये खुला आसमाँ ” अक्ख्या प्रवासभर मनात वाजत असतं. नेत्रसुखद प्रवास आणि गप्पिष्ट ड्रायवर यापेक्षा अजून काय हवं. त्यातून आम्ही मुंबईचे म्हणजे बच्चन आणि खान यांच्या गावचे. त्यामुळे त्याला आमचं अप्रूप जास्त. संभाषणाची गाडी वेगवेगळ्या रुळांवरून भरधाव जात होती.
- Read more about काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6887 views
.
Taxonomy upgrade extras
.
- Read more about .
- 63 comments
- Log in or register to post comments
- 56198 views
कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!
माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?
देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
- Read more about कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2652 views
संसद: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५ (उत्तरार्ध)
Taxonomy upgrade extras
आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरु होणार आहे. आज लोकसभा पुन्हा भरेल तर राज्यसभा २३ एप्रिल पासुन सुरु होणार आहे.
लोकसभेचे सत्र ८ मे पर्यंत सुरु राहील तर राज्यसभा १३ मे पर्यंत.
भुमिअधिग्रहण विधेयक परत एकदा जारी करण्यासाठी सरकारने राज्यसभेच्या सत्राची समाप्ती केली होती. त्यामुळे राज्यसभेसाठीचे हे नवीन अधिवेशन असणार आहे.
==
व्यवस्थापकः
या सत्राच्या उत्तरार्धासाठी प्रतिसादाचे रुपांतर वेगळ्या धाग्यात करत आहोत.
या सत्राच्या पुर्वार्धामधील कामकाजासाठी हा धागा बघता येईल
- Read more about संसद: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५ (उत्तरार्ध)
- 31 comments
- Log in or register to post comments
- 25846 views
कोर्ट
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about कोर्ट
- 28 comments
- Log in or register to post comments
- 14115 views
“कुणीच नाही.”
त्याच्या कुशीत तिने डोकं ठेवलं . मान तिरपी करून विचारलं, “कोण आहोत आपण एकमेकांचे”? तो म्हणाला, “कुणीच नाही.” ती हसली. डोळे मिटले आणि झोपेच्या आधीन झाली. त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांचा पट तरळला.
आपलं एकमेकांशी नातं काय हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अनेकदा केलेला. पण त्यात त्यांना कधी फारसं यश आलं नाही. त्याला नेहमी असं वाटायचं की नात्यांना नावं देऊन आपण व्यक्तींना एखाद्या बंधनात अडकवतो. आयुष्यात येणारे लोक फक्त आपली सोबत करतात आपण त्या सोबतीला नात्यांचं लेबल लावतो आणि मग हळूहळू सगळं complicate होऊन बसतं.
- Read more about “कुणीच नाही.”
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4117 views
माझा स्वभाव
भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
न खेळ मोडणे माझा स्वभाव
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
न दिवस मोजणे माझा स्वभाव
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
न आसू ढाळणे माझा स्वभाव
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
@@ मी मात्र@@ राजवर्धन
- Read more about माझा स्वभाव
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4879 views
30 मीटर व्यासाच्या दूरादर्श प्रकल्पात भारताचा सहभाग
आंतर्राष्ट्रीय सहभागाने अंतरिक्ष निरीक्षणासाठी एक विशाल दूरादर्श अमेरिकेतील हवाई राज्यामधील सर्वात उंच म्हणून गणल्या गेलेल्या मौना की (Mauna Kea) या पर्वतावर स्थापन करण्यासाठी एक प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. या दूरादर्शामधील अंतर्गोल आरशाचा व्यास 30 मीटर एवढा विशाल होणार असल्याकारणाने या प्रकल्पाचे नामाभिधान "30 मीटर दूरादर्श" (TMT) असे करण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की या दूरादर्शामधून शास्त्रज्ञाना 1300 कोटी (13 billion) प्रकाश वर्षे पूर्वीचे विश्व, बघणे शक्य होणार आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about 30 मीटर व्यासाच्या दूरादर्श प्रकल्पात भारताचा सहभाग
- 24 comments
- Log in or register to post comments
- 15311 views
अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ
गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ
- 296 comments
- Log in or register to post comments
- 177623 views