Skip to main content

विज्ञान कथा: शापित श्वास!

पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते.

विज्ञान कथा: "अपूर्ण स्वप्न"

शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्‍या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो.

मातृभाषेची सेवा

आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.

शटरबंद

मला एखाद्याचा राग आला ना की खूप राग येतो. उगाच नाही आई मला चिडका बिब्बा म्हणते. पण आता मला पेअर फाकार्द या माणसाचा इतका राग आलाय की इतका राग मला कोणाचाही येत नाही. राजूदादा म्हणतो प्रत्येक गोष्टीचे पहिले तीन नंबर काढून ठेवावे म्हणजे ठरवायला सोप्प जात. पण काय ठरवायला सोप्प जात ते नाही सांगितलय. भाव खाण्यामध्ये राजूदादा फार आहे अगदी. मी भावखावू लोकांमध्ये त्याचा नंबर पहिला ठेवलाय. तरी माझ्या तीन आवडत्या आज्या ठरल्यात आणि तीन माणस ज्यांचा मला खूप राग येतो ते. एक म्हणजे रमाकाकू. कारण तिला मला सोडून पुण्याला चालली आहे. कायमची.

अंदाज करा - एक अज्ञात राशी

आपण गेल्यावेळी भारतातल्या सेलफोनच्या प्रमाणाविषयी काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या.
१. हे प्रमाण अत्यंत कमी असतं तेव्हा सुरूवातीला एक्स्पोनेन्शियल ग्रोथने किंवा चक्रवाढीने वाढतं. चक्रवाढ म्हणजे ती संख्या विशिष्ट पटीने वाढण्याचा काळ सारखा असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी राशी दरवर्षी सव्वापट होत राहाते. किंवा दर तीन वर्षांनी दुप्पट होते. असं असल्यास नवव्या वर्षी ती (तीन वर्षांनी दुप्पट) गुणिले (तीन वर्षांनी दुप्पट) गुणिले (तीन वर्षांनी दुप्पट) या रीतीने आठपट होईल.

प्रेमाचे हाय कू (?)


गुलाबी कळ्यांची
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी.


कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.

(

*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)


तिची शॉपिंग
त्याचा बटवा
आता उधार मागणार.

विविध प्रतले

Taxonomy upgrade extras

मनात काही प्रश्न उद्भवले, मोठे अन चर्चात्मक शक्यता (पोटेन्शिअल) असल्याने वेगळ्या धाग्यात देत आहे. व्यक्तीस ऑब्जेक्टीफाय(वस्तूकरण) कसे करता येत नाही याबद्दल हे विचार मनात आलेले आहेत.
___
एखादा स्वेटर, पेंटींग, पुस्तक, भाषण, स्तोत्र अन व्यक्ती यांच्यात दर्जात्मक फरक काय असतो? ही सारी चिन्हेच नाहीत का? चिन्हे का म्हणते आहे ते विषद करते. या सर्व एनटिटीज कशाकडे तरी निर्देश करतात अन तसा निर्देश जोवर होत नाही तोवर त्या अर्थहीन असतात. पण निर्देश करताच त्यांना अर्थ प्राप्त होतो.
____

आन्सर क्या चाहिये? : वर्कशॉप

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

एफीला आल्यावर जर मी वर्कशॉपबद्दल बोललो नाही तर करंटाच ठरेन मी. तेव्हा पुढच्या सगळ्या गोष्टींकडे जायच्या आधी जरा वर्कशॉपबद्दल बोलू काही.
.
वर्कशॉप हे प्रकरण बरचसं मोदींसारखं आहे. एकतर लोक त्याचे खंदे समर्थक तरी असतात किंवा कट्टर विरोधक तरी.

अॅश-ट्रे

उनकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड झालेल्या कॉफी मधून आणि भरत चाललेल्या अॅश-ट्रे मधून जाणवत राहतो. काहीच सुचत नसतं. विचारांची आवर्तनं मुक्तछंदात फिरत राहतात पण कागदावर उमटत नाहीत. वाफाळत्या कॉफीचं कधीच गोमूत्र झालेलं असतं. आता लिहायचंच या निश्चयाने एक कोरा करकरीत कागद ओढून तुम्ही सुरुवात तर करता पण विचार आणि शब्द हातात हात गुंफून येतच नाहीत. दिवसभर चाललेला त्यांचा लपाछपीचा खेळ तसाच चालू राहतो. तुम्ही वैतागता.