Skip to main content

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:

१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही.
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.

|| जन्मली गीता ||

|| जन्मली गीता ||
पंचसहस्त्रावधी सन पूर्वी उजाडला मार्तंड
प्रत्यया सर्वश्रेष्ठ नीतिचे बोल संभाषण ||१||

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा दिवस होता
चाहूल लागली होती महाभयानक महाभारता ||२||

धनंजय अडला धर्म संकटी सापडला
निमित्त साधून धर्माध्यक्ष उपदेशला ||३||

कुरूक्षेत्रा समेत अनुभवले संजय अन धृतराष्ट्रा
थरारले ब्रम्ह वधे, मोक्ष तो 'ज्ञान-कर्म' ऎकता ||४||

धर्म कळवाया जनाला अवतरला तो अनंता
मुरली मुखातून मुरली स्वराने स्फुरली गीता ||५||
- श्रीकांत

'शोले'चा पर्यायी शेवट

शोले हा चित्रपट १९७५ साली आला. तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटगृहात, दूरचित्रवाणीवर, कॅसेटवर, डिस्कवर हा चित्रपट कितीदा पाहिला ह्याची मोजदाद नाही. ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा शेवटी ठाकूरने गब्बरला मारून टाकण्याआधी पोलीस येतात व ठाकूरला (चित्रपटांतील नेहमीचे) भावनिक आवाहन करून गब्बरला पकडून घेऊन जातात. आज मात्र सिने मस्तीनामक वाहिनीवर शोले पाहिला तेव्हा वेगळा शेवट दिसला. ठाकूर व गब्बरची शेवटची हाणामारी चालू असताना व गब्बर गलितगात्र झाला असताना ठाकूरला गब्बर ज्या दगडी खांबापुढे उभा असतो त्यातून बाहेर आलेली आडवी तीक्ष्ण सळी दिसते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व उर्जा, तेज, शक्ती शोषून घेतात.

न्यू एज शॉप

आज मनःशांती विकणार्‍या , सुगंधी द्रव्ये व सुगंधी उदबत्ती तसेच सुगंधी मेणबत्ती यांची खैरात करणार्‍या "न्यू एज" शॉप मध्ये गेले होते. मूलाधार चक्रा पासून ते सहस्त्रार चक्रापर्यंतच्या सर्व एकाक्षरी बीज-मंत्रांच्या लहानशा पताका विकायला होत्या. लं-वं-यं- ॐ म्हणाल त्या बीजमंत्रांच्या मेणबत्ती (त्त्या?) हाझीर होत्या. गणपती , लक्ष्मी या एव्हरग्रीन देवतांच्या मांडीस मांडी लावून विविध पोझमधले बुद्ध, कुआन यिन, अवलोकितेश्वरा, अमिताव आदि देवता बसल्या होत्या.

फोडणीचे खमंग डोसे

साहित्यः

१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
मिठ

फोडणीसाठी
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल

Abandoned २.०

पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय
१.
.fgf

.

२.
.fgf

.

३
.fgf

.

४

स्पर्धा का इतर?

हिवाळ्यातल्या संध्याकाळी स्नो वितळतांना

कविता म्हणजे
काय असावे
-प्रश्नचिन्हं नसलेला प्रश्न समजून
दुर्लक्ष करण्याजोगा प्रकार-
किंवा 'न समजू शकलेली कविता'
तर काय धागा असावा. हा प्रामाणिक
पूर्णविराम
तर शब्द असतांना
चिन्हांची काय गरज?
हा न समजलेला प्रश्न

'वरच्या दहा ओळी दुर्लक्ष करण्याजोग्या का नाहीत?' या विषयावर निबंध लिहायचा असल्यास
कवितेबद्दल विचार करतांना सूचलेले
किंवा साचलेले.