गद्य
कोविड डायरी (दुसरा सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
महाभारतात यक्षाने धर्मराजाला शंभरएक प्रश्न विचारले होते आणि धर्मराजाने समर्पक उत्तरे देत आपल्या भावंडांना बेशुद्धावस्थेतून बाहेर काढले होते. माझ्यापुढे करोना नावाचा बाधित यक्ष प्रश्न विचारत होता आणि धर्मराज नसल्याने मी माझ्यापरीने उत्तरे देत होतो आणि मग वारंवार मूर्च्छितावस्थेत पण जात होतो. ही प्रश्नोत्तरे माझी वैयक्तिक होती आणि अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोविड डायरी (दुसरा सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
- Log in or register to post comments
- 5386 views
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
- Log in or register to post comments
- 4042 views
कोविड डायरी (पहिला सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
"५८ वर्षांचे वय घरच्यांसाठी जरी काळजीचे असले तरी मला कोविडसाठी काम करण्याची ही एक यथोचित संधी वाटली. आणि मी या लढाईत सामील झालो." - कोविड ड्यूटीच्या पहिल्या आठवड्याचे अनुभव सांगताहेत डॉ. तुषार पंचनदीकर
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोविड डायरी (पहिला सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
- Log in or register to post comments
- 7793 views
कोविड डायरी (भाग १) : डॉ . तुषार पंचनदीकर
डॉ . तुषार पंचनदीकर यांचा कोविड ड्यूटीचा अनुभव : कुठल्याही घटनेला पार्श्वभूमी असावी लागतेच असं नाही; पण मला जेव्हा १४ सप्टेंबर २०२०पासून कोविड ड्यूटी करावी लागणार असं कळलं तेव्हा नजिकचा भूतकाळ मनामध्ये नक्की तरळला. आणि एक झाकोळलेलं मन समोर आलं.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोविड डायरी (भाग १) : डॉ . तुषार पंचनदीकर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6404 views
स्टायपेंड देणारी पहिली नोकरी
स्टायपेंड देणारी पहिली नोकरी
(लेख, महाराष्ट्र टाइम्स : 17 मार्च २०२० ला छापून आला. )
एप्रिल १९७९ ला कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग,पुणे मधून बी इ मेक झालो आणि खडकीच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधे ट्रेनी इंजिनिअर म्हणून रुजू झालो, सहाशे रु. स्टायपेंडवर. तीच माझी पहिली नोकरी ! तिथल्या ८ वर्षाच्या नोकरीनंतर ,बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या , पण या पहिल्या नोकरीच्या आठवणी काही औरच आहेत, मनावर कायमच्या ठसलेल्या आहेत !
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about स्टायपेंड देणारी पहिली नोकरी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3773 views
आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )
खरंच ! आईच्या घराशी माझं फार जवळचं भावनिक नातं आहे. माझा जन्मच मुळी शनिवार पेठेतला, १९५६ सालचा , माझ्या मोठया भावाचा , विनोद रावांचा ( आता रिटायर्ड कंपनी सेक्रेटरी ) माझ्या आधी दोन वर्ष, माझी धाकटी बहिण, वीणा ( पेंडसे - फडके ) माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान, जी सध्या ' आई रिटायर होतेय ' मधे आईची भूमिका करत असते. शनिवार पेठेत म्हणजे ३७३, शनिवार : कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय यांना जोडणाऱ्या गल्लीत . सुयोगच्या पलिकडे अहिल्यादेवी.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3078 views
माझी पहिली सायकल
माझी पहिली सायकल ही ' फिलिप्स ' मेकची आणि ' मेड इन इंग्लंड ' होती आणि ती ही लेडीज सायकल होती , असं मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ; पण हे अगदी खरं आहे !..
त्याचं असं झालं की ,माझे वडिल हे म. न.पा मध्ये नोकरीला होते. त्यांची झाली बदली ऑक्ट्रॉय नाक्यावर बोपोडीला. ३७३, शनिवार पेठेतल्या आमच्या घरातून (आताची पेपर गल्ली ) , रोज बोपोडीला जायचं म्हणजे काहीतरी वाहनाची गरज होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये 'हुसेन ' नावाचा एक सहकारी होता. दोघे अगदी जिवलग मित्र बनले होते. हुसेनच्या भावाचा नव्या-जुन्या सायकल्सचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता रविवार पेठेत. पुणे तेंव्हा सायकलचं शहर होतं ..
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी पहिली सायकल
- 20 comments
- Log in or register to post comments
- 9320 views
करोना काळात कॅलिफोर्निया ते कोल्हापूर
करोनाचा उद्रेक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा
माझ्या मुलीच्या PhD प्रबंधाचे अंतिम सादरीकरण व पदवीदान समारंभासाठी आम्हीं मार्चमध्ये अमेरिकेत आलो. मेमध्ये पदवीदान समारंभानंतर परतायचे असा बेत होता. त्यानुसार २५ मेचे परतीचे तिकिट केले होते. पोहोचल्यानंतर आठ दिवसात करोना साथीने जोर धरला आणि सगळ्या जगाला वेढून टाकले. निरनिराळ्या सामाजिक माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांनी साथीचे उग्र स्वरूप समोर आले.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about करोना काळात कॅलिफोर्निया ते कोल्हापूर
- Log in or register to post comments
- 3831 views
कंट्री सॉन्ग्ज
अमेरिकेत कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) नोकरीमध्ये खूप खूप गावे/शहरे फिरायला मिळाले. खूपशा राज्यात बरीच वर्षे काढल्याने, तेथील राहणीमान समजायला मदत झाली. गावाकडचे आयुष्य आणि शहरातले आयुष्य यात बरीच तफावत असते हे लक्षात आले. उदाहरणार्थ - शहर फार इंडिफरेन्ट असते, कोणाचे कोणाच्या आयुष्यात लक्ष नसते. कामास काम, बाकी तुम्ही तुमचे राजे. on your own . याउलट गावात प्रत्येकाला प्रत्येकजण माहीत असतो. आपुलकी असते पण पायात पायही असल्यासारखे वाटते. तुम्हाला काय सूट होते, तुम्ही ठरवायचे. शहरात उंच टोलेजंग इमारती तर गावात टुमदार, प्रशस्त घरे, खूप मोकळे परसदार, आवार.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कंट्री सॉन्ग्ज
- 21 comments
- Log in or register to post comments
- 12919 views
कोव्हिड आला रे अंगणी - राजेंद्र कार्लेकर
मुंबईचे राजेंद्र कार्लेकर सांगताहेत आपले कोव्हिडचे अनुभव - १७ ऑगस्टला COVID-19करता रिपोर्ट काढला आणि वाटू लागलं की आपला नंबर लागणार. मी आणि बायको एकाच बोटीतील प्रवासी. दोघांनाही ताप होता आणि बायकोला वास येत नव्हता. घरात दोघंच असल्याने होम क्वारंटाईन होण्याची शक्यता होती. जरा बरं वाटलं. पाच महिन्यांनी ब्रेक मिळणार होता. आम्ही दोघेही बँकर असल्याने ऑफिस चालू होतंच गेले ५ महिने.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोव्हिड आला रे अंगणी - राजेंद्र कार्लेकर
- 3 comments
- Log in or register to post comments
- 8919 views