चित्रपट
आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'थर्टी नाइन स्टेप्स’
Thirty Nine Steps/Dir: Alfred Hitchcock/Britain/1935/100 minutes/B&W
प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांची मनं रिझविण्यासाठी चित्रपट व्यवसायाच्या अगदी प्रारंभीच्या काळापासून प्रयत्न केले जात होते. जेव्हा चित्रपट मुके होते तेव्हासुद्धा देहबोली, मूकाभिनय (व माकडचेष्टा!) करत प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात हे मूकचित्रपट घेऊन जात होते. मूकचित्रपटातील आशय समजून देण्यासाठी चित्रपटाच्या अधे-मधे वाक्यं लिहिलेले पाट्यासुद्धा झळकत होत्या. व हे वाक्य लिहिणेसुद्धा येरा गबाळाचे काम नव्हते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'थर्टी नाइन स्टेप्स’
- Log in or register to post comments
- 3494 views
आरं आरं आरं
आरं आरं आरं
बाबाओ, काय बघितलं मी कायचं समजून न रहायलं.. आरं आरं आरं
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about आरं आरं आरं
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3393 views
'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7217 views
दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव
सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5286 views
झुंड
झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागराजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about झुंड
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3117 views
झॅनॅक्स, क्लायमेट चेंज आणि डोन्ट लुक अप.
तुम्ही एकाच वेळी ब्राउझरच्या चार टॅब्ज खोलुन एकात वॉशिंग्टन पोस्ट, दुसर्यात एनवाय टाईम्स, तिसर्यात द गार्डीयन आणि चौथ्यात द व्हाईस/हफिंग्टन पोस्ट/स्क्रोल/ओपीइंडीया/लोकसत्ता/सनातन प्रभात/संध्यानंद वाचत असाल तर तुम्ही 'डोन्ट लुक अप' हा सिनेमा पाहिला असल्याची शक्यता ६० ट्क्क्यांहुन अधिक आहे. तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिलेला नसला तर तो सिनेमा पहाण्याची शक्यताही तशी मोठीच आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about झॅनॅक्स, क्लायमेट चेंज आणि डोन्ट लुक अप.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5337 views
अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया
अशोक राणे हे नाव जाणत्या मराठी चित्रपट रसिकांना नवीन नसावे. चित्रपट गुरु, विकास देसाई यांनी तर त्यांना सिनेमा ‘जगणारा’ माणूस म्हणून गौरविले आहे. एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता, चित्रपट समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे सदस्य, कधी ज्युरीचे अध्यक्ष, चित्रपट महोत्सवांचे आयोजक-संस्थापक-संचालक-सल्लागार, टीव्ही मालिकांचे लेखक, चित्रपट कथा लेखक, पटकथा लेखक, माहितीपटाचे दिग्दर्शक,….
- Read more about अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2733 views
रामप्रसाद की तेरहवी- जन पळभर म्हणतिल
मृत्यू म्हणजे काय? माणसाचे श्वसन थांबले, त्याची हृदयक्रिया थांबली आणि त्याच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला आणि थोड्या वेळाने तो मेंदूच मृत झाला की माणसाचे सगळे संपले, असेच आणि एवढेच आहे काय? विज्ञानाने शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि एक पिशवीभर क्षार असे शिकवले होते. म्हणजे मूलद्रव्यांतून जन्मलेल्या या शरीराचे परत मूलद्रव्यांत रूपांतर झाले की संपले. आत्माबित्मा सगळे झूट. मग त्या मृतदेहाचे दहन करा किंवा दफन. एक वर्तुळ पूर्ण झाले, एवढाच मृत्यूचा अर्थ. असेच ना? माती असशी मातीस मिळशी.. Ashes to ashes. Dust to dust. We are nothing, but dust and to dust we shall return. Amen…
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रामप्रसाद की तेरहवी- जन पळभर म्हणतिल
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2640 views
जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव
दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव
- 15 comments
- Log in or register to post comments
- 7032 views
सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा
ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा
- Log in or register to post comments
- 1563 views