Skip to main content

दिनविशेष

मंगळ आणि गुरू युती

ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात. आज पहाटे गुरू आणि मंगळ एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक तृतियांश अंश कोन इतके जवळ आले. हे अंतर इतके लहान आहे की डोळ्यांनी पाहता गुरू आणि मंगळ हे एकच 'तारा' असल्याप्रमाणे भासतात.

फोटोत गुरूचे चार मोठे चंद्रही स्पष्ट दिसत आहे. मंगळापेक्षा गुरू सध्या जवळजवळ वीसपट प्रकाशमान आहे. गुरूचे चंद्र मंगळापेक्षाही कमी प्रकाशमान आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

आजचे दिनवैशिष्ट्य - ९

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

आजचे दिनवैशिष्ट्य - ८

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सातारचे छत्रपति?

आजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये पुढील उल्लेख आहे त्यावरून मला सुचणारे काही विचार येथे नोंदवीत आहे:

१८१९ : मराठ्यांची एकेकाळची राजधानी असणारा सातारचा किल्ला इंग्रजांनी काबीज केला.>

२० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले,

अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचा धाकटा भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

अशी परिस्थिति असतांना सातार्‍यातील तथाकथित छत्रपति घराणे आपली बेगडी बिरुदावलि मिरवत त्याचा राजकीय लाभ उठवत असतांना दिसते. छ.(?) उदयनराजे आणि छ.(?) शिवेन्द्रराजे हे राजेपणाचे किताब मिरवीत छत्रपतिपदाचा आपणास निसर्गदत्त अधिकार आहे असे मानतात. भोळसट जनताहि - त्यामध्ये छत्रपतींपुढे मुजरे करणारे बाबासाहेब पुरंदरेहि आले - ते मान्य करते आणि छत्रपतींचे छात्रतेज अजून कसे जाज्वल्य आहे ह्याचे गुणगान करतांना दिसते. सगळीच मौज आहे!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

आजचे दिनवैशिष्ट्य - ७

दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ध्वनी अनुदिनी - पुष्प - १ मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

नमस्कार,

ऐसी अक्षरेच्या सर्व वाचकांना मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागातर्फे सस्नेह नमस्कार.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स