Skip to main content

इतर

राहुल देव बर्मन

संगीतकार राहुल देव बर्मन ह्यांचा आज ७५वा जन्मदिवस आहे. आजही त्यांच्या संगीताची लोकप्रियता टिकून आहे. पाश्चात्य संगीतातले अनेक प्रकार हिंदी सिनेमात आणण्यापासून ते गुलज़ारांच्या मुक्तछंदातल्या म्हणता येतील अशा कवितांना चाली लावण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ही लोकप्रियता आहे. आपले पिता दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांच्याच क्षेत्रात काम करूनही त्यांच्या छायेत न राहता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत येणं हेदेखील त्यांचं कर्तृत्व म्हणता येईल. कित्येक चित्रपटांसाठी आपल्या पित्याला साहाय्य केल्यानंतर १९६१ साली 'छोटे नवाब'द्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली.

स्पर्धा का इतर?

बोलके बटाटे

तीन महिने घर बंद ठेवल्यानंतर कुलूप उघडून प्रवेश करताच समोर टेबलावर दोन बटाटे हात उंचावून माझे स्वागत करीत होते. मीही हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. माझे हात खाली आले तरी त्यांचे येईनात म्हटल्यावर बटाट्यांना बाहेर बाल्कनीत नेऊन प्रकाश दाखवला आणि त्यांची रवानगी एका रिकाम्या कुंडीत केली. ओल्या कचर्‍याचे झालेले खत त्यावर पसरले. दोन तीन दिवसातच त्या उंचावलेल्या हातांवर - कोंबांवर-हिरवे ठिपके दिसू लागले. वसंत ऋतूचे आगमन होतच होते आणि बघता बघता महिन्याभरात बटाट्याची २-३ फूट उंच झाडे/रोपे झाली. यंदा पाऊस तसा जास्तच होता. वादळी पाऊसही झाला.

स्पर्धा का इतर?

उत्तर-पूर्व भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले.
मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग्(सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता.

स्पर्धा का इतर?

लग्नासाठी शास्त्रीय वाद्य-संगीत

थोड्या दिवसात भावाचे लग्न आहे. कार्यालयात लावण्यासाठी शास्त्रीय संगीताची (वाद्य-संगीत) playlist बनवत आहे.

- उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची सनई (शास्त्र असतं ते!)
- पं हरिप्रसाद चौरासियांचा पहाडी
- पं राम नारायण यांचा मिश्र देस
- शाहिद परवेझ खान यांचा बागेश्री

पारंपरिक मध्यमवर्गीय ब्राह्मणी पद्धतीचं अगदी साधं लग्न आहे. तर तसे संगीत शोधत आहे. काही suggestions असल्यास सुचवावे. कार्यकारी मंडळ आभारी असेल!

स्पर्धा का इतर?

बर्ट हानस्ट्राचे ‘ग्लास’ आणि ‘झू’

बर्ट हानस्ट्रा या दिग्दर्शकाचे हे दोन्ही चित्रपट वृत्तचित्र (Documentary) या सदरात मोडतात. वृत्तचित्र हे चित्रपटाचे एक महत्त्वाचे रूप आहे. अशा प्रकारचे चित्रपट अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तयार केले जात होते. सर्वसाधारणपणे डॉक्युमेंटरीत सलगपणे कथा सांगितलेली नसते. असे चित्रपट एखाद्या सत्य घटनेचे चित्रण करणारे, किंवा व्यक्तीचे जीवनदर्शन घडविणारे, किंवा प्रचार करणारे असतात. परदेशांत या चित्रपटांकडे एक वेगळी विद्या म्हणून पाहिले जाते, त्यांचा अभ्यास होतो व अनेक चित्रपट लोकप्रियदेखील बनतात. मात्र भारतात त्यांना फारशी लोकप्रियता मिळालेली नाही.

स्पर्धा का इतर?

अकिरा कुरोसावा दिग्दर्शित चित्रपट ‘राशोमान’

Japan/1950/B&W/88 Min/Dir: Akira Kurosawa

एखादी कलाकृती मानवी जीवनाविषयी, नीती-अनीती, रूढी-परंपरांविषयी भाष्य करते, त्याला कालातीत मोल असते. तेव्हा ती कलाकृती अजरामर होते. ‘राशोमान’ हा चित्रपट, त्यातील कथानक-आशय आणि विषय मांडण्याची शैली इतकी चिरंजीवी आहे, सदा सतेज आहे की त्यामुळेच हा चित्रपट अजूनही ताजा वाटतो.

स्पर्धा का इतर?