विकतचे दुखणे
कालच माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. गेल्या शुक्रवारीतिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.
पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरंएवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अॅडीक्टीव्ह असते.
सर्जरीला ३ तास लागले.पोटाला तसेच हिप्सना लहान छिद्रे पाडून चरबी खेचून घेतली जाते. अशी ३ लीटर चरबी काढली. ९८% चरबी + २% रक्त. आता रात्री झोपल्यानंतर हिप्सवर दाब पडून खूप रक्त जात होतं असे ती म्हणाली. तसेच काही आठवडे बरीच सूज रहाणार. मग २-३ महीन्यांनंतर शरीर पूर्ववत होईल. तोपर्यंत इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची
खर्च = $३५०० + औषधांचा, बँडेजचा खर्च, वारेमाप डोकेदुखी (विकतचे दुखणे) आणि एवढे होऊनही मला ती फार जाड वाटली नाही म्हणून कारण विचारले तर म्हणाली - पोट खूप होते. नंतर रूममेटकडून समजले की तिच्या धाकट्या बहीणीचे लग्न झाले पण तिचे होत नाही म्हणून खूपदा रडते.
खरे पाहता - अमेरीकेत, बॅकेत नोकरीला असलेली मुलगी. तिने जॉबवर लक्ष केंद्रीत करण्यास काहीच हरकत नव्हती. बरे सर्व प्रकारची मुले असतात. तिला अनुरूप मुलगा मिळालाही असता. मुली अशा "डेस्परेट" होऊन शरीराशी खेळ का करतात मला कळत नाही.
जी गोष्ट तिने जिम मध्ये जाऊन स्वप्रयत्नाने साध्य केली असती ती अशी पैसे फेकून, शरीराशी खेळ करून मिळविली तर वाईट मानसिक परीणाम होतच असेल.
मला तरी यात तिचा आणि "बाह्यसौंदर्याला" अवास्तव महत्व देणार्या समाजाचा दोष वाटतो.
समाजाला दोष का म्हणून
समाजाला दोष का म्हणून द्यायचा? समाजात चांगल्या तश्याच वाईट प्रवृत्ती असतातच. त्यातलं आपण काय घ्यायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायच ते आपल्याला ठरवता आलं पाहीजे. वरच्या उदाहरणात तुमच्या मैत्रिणीने पूर्ण चौकशी केली होती का? ह्या सर्जरीचे परिणाम, साईड इफेक्ट्स सगळं माहीत असूनही तिने सर्जरी करून घेतली असेल तर समाजाला दोष देऊन काय फायदा? सोशल प्रेशर एका मर्यादेपर्यंत ठीक, पण त्यानंतर स्वतःचे निर्णय स्वतःला घेता यायला हवे. तसा निर्णय घेण्यात तुमची मैत्रिण अयशस्वी ठरली आहे असे म्हणावे वाटते.
-अनामिक
योग्य निर्णय
योग्य निर्णय घेण्यात नक्कीच अयशस्वी ठरली आहे असे माझे मत आहे.
लग्नाला दिले जाणारे अवास्तव महत्व हेदेखील कारणीभूत आहेच. लग्न ही जीवनातील महत्त्वाची बाब आहेच आहे पण स्वावलंबन, सेल्फ्-एस्टीम , नोकरीमधील आनंद, आरोग्य, पैसा यादेखील अन्य बाबी तितक्याच महत्त्वाच्या असतात. पण एका विशिष्ठ वयानंतर मुलींवर लग्न करण्याविषयक घरातून खूप प्रेशर येते. जे की अनाठायी आहे असे वाटते. मुलगी स्वतः कमावते आहे हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे.
आपल्याला देवाने, दैवाने काय बहाल केले आहे याकडे जास्त लक्ष दिले तर असे नकारात्मक निर्णय टाळता येतील असे वाटते.
डायरेक्ट सर्जरी करण्याएवजी
डायरेक्ट सर्जरी करण्याएवजी व्यायाम जिम संतुलित आहार हे पर्याय आजमावून पाहायला हवे होते
यावरुन झीरो साईज फँडची आठवण झाली
.
डेस्परेट
डेस्परेट झाल्याचे तुम्ही एकदा म्हटल्यावर शहाणपणा बासनात गुंडाळून ठेवलेला आहे हे सोबत आलेच. परंतु, असे बघा- सर्वांनाच जीममध्ये जाऊन बारीक होता येत नाही. कधी अनुवांशिक जाडेपण, थायरॉइड वगैरे अनेक गोष्टींनीही जाडेपणा येऊ शकतो.
लग्नाला नको तितकं महत्व आहे
लग्नाला नको तितकं महत्व आहे आपल्या समाजात पण ती तर अमेरीकेत आहे तर मग इतका त्रास का करुन घेतेय? स्वत:चे सोशल सर्कल भारतीय सोडुन इतर लोकांबरोबरही ठेवले तर जास्त चांगले. बाकी जाड म्हणजे काय अगदी ओबीस आहे का? तिने डॉक्टरकडे जाउन अनुवंशिकता वगैरे तपासुन पाहीलीये का? तुम्ही इथे धागे काढण्यापेक्षा तिच्याशी बोलुन तिचा आत्मविश्वास वाढवा, तिला सपोर्ट करा. जिम जॉईन केली अन नियमीत व्यायाम करुन संतुलित आहार घेतला तर मन अन शरीर दोन्ही स्वस्थ राहते.
http://shilpasview.blogspot.com
>>लग्नाला नको तितकं महत्व आहे
पण भारतीय आहे ना. घरून दबाव आहे लग्न व्हावे याचा. त्यात धाकट्या बहीणीचे लग्न झाले आहे.
मला ओबीस वाटली नाही.डॉक्टरांकडे जाऊन अनुवांशिकता तपासून पाहीली आहे का माहीत नाही.
सामाजिक या विषयात हा धागा टाकला आहे.
दुसरं म्हणजे ती माझी मैत्रिण नसून माझ्या रूममेटची मैत्रिण आहे त्यामुळे मी एकदम ओळख वाढवू इच्छित नाही. I would rather respect my roommate's circle of friends & treat it seperately than mine. खूप तारेवरची कसरत असते एकमेकींच्या क्षेत्रात लुडबुडणे ही. Hope you understand.
मी माझ्या रुममेटला सांगीतले की तिला आपल्या रूमवर आण आपण तिच्या खाण्यापिण्याची , इतर (भावनिक) काळजी घेऊ.
बाडीस
उगाच!
नुसतं इतरांना चांगलं दिसावं म्हणून लायपोसक्शन्,प्लास्टिक सर्जरी करू नये असं माझंही वैयक्तिक मत आहे.
पण एखाद्या/एखादीसाठी सद्यस्थितीत बाय हूक ऑर क्रूक लग्न ठरणे आणि त्यासाठी बरं दिसणे हा जीवनमरणाचा प्रश्न ठरू शकतो हा अनुभव आहे.(स्वानुभव नाही हो)
आपल्या पाठच्या भावा/बहिणी किंवा बरोबरच्या मित्र्/मैत्रीणींचे लग्न होऊन किंवा ठरूनही आपलं न होणं हा एखाद्यासाठी खूपच मोठा बाका प्रसंग असू शकतो.
वरिल लेखात लायपोसक्शनचे दुष्परिणाम सांगण्यासाठी जे रक्तरंजित
वर्णन केलेय ते मात्र आवडले नाही, असा रक्त्स्राव,सूज,खर्च,छोटामोठा रिकवरी पिरीयड कुठल्याही सर्जरीनंतर असणारच.
>> लायपोसक्शनचे दुष्परिणाम
>> लायपोसक्शनचे दुष्परिणाम सांगण्यासाठी जे रक्तरंजित
वर्णन केलेय ते मात्र आवडले नाही, असा रक्त्स्राव,सूज,खर्च,छोटामोठा रिकवरी पिरीयड कुठल्याही सर्जरीनंतर असणारच. >>
हे वर्णन करण्याचे कारण आहे. सर्जरी करणार्या त्या संस्थेचे पँप्लेट मी चाळले आणि इतकी मोहक, भुरळ पाडणारी चित्रे (फोटो) त्यात होते म्हणजे - "Before" हे फोटो अगदी थुलथुलीत तर "After" हे फोटो फर्म, बांधेसूद. परत मुखपृष्ठावर इतकी नितळ, सुडौल, कमनिय तरुणी की विचारता सोय नाही. म्हणजे तो फोटो पाहूनच कोणालाही मोह व्हावा की आपल्याला असे शरीर मिळाले तर काय बहार येइल. पण त्यामागील हे इन्फेक्शन, रक्तस्त्राव, झोपेच्या गोळ्या, अवाढव्य खर्च करून विकत घेतलेले दुखणे हेच मला हायलाईट करावयाचे आहे. त्यामुळे नकारात्मक बाजू सांगणे भाग होते.
अवांतर (कोडींग वाल्यांसाठी)- " वालं बटण काम करत नाही.
धीर धरा!
अहो थोडा धीर धरा.
२-३ आठवड्यांनी चांगली दिसतेय का ती मुलगी ते बघून या.
जर दिसण्यात खरंच सकारात्मक बदल घडला असेल तर तिचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही.
अत्यंत योग्य
अत्यंत योग्य प्रतिसाद...
लठ्ठपणा व्यायाम आणि डाएटने जरूर कमी करता येतो, पण दुर्दैवाने तो कायम (लाईफटाईम) टिकवता येत नाही. सिगरेट सोडण्यासारखा तो प्रकार असतो.. (अनेकदा सिगरेट सोडली आहे म्हणतात तसं..
)
पुन्हापुन्हा नेटाने काहीकाळ व्यायाम आणि आहाराचे रुटीन पकडून ठेवून वजन जरा कमी येतं, पण तशीच लाईफस्टाईल कायम (जन्मभर) अॅडॉप्ट करणं जनरली लोकांना वाटतं त्यापेक्षा खूप खूप खूप कठीण आहे. अगदी या सर्जरीच्या सफरिंगपेक्षा खूप पट कठीण. सर्जरीची जखम आणि रक्त तातडीने दिसतं. डाएट आणि व्यायामाचा निग्रह पुन्हापुन्हा करुन आणि मोडून पुन्हापुन्हा जाड होण्यात होणारे शरीराचे आणि मनाचे हाल वर्षानुवर्षांच्या काळात होत राहिल्याने एकदम दिसत नाहीत एवढंच.
मॉर्बिड ओबेसिटी असेल तर सर्जरी करण्याचा इन्फॉर्म्ड डिसिजन चांगलाच. ती फार जाड नाही म्हणता तर मग या बाबतीत मात्र मत देणं अवघड आहे.
पराधीन आहे जगती.. वै.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
आता, दोष कुणाचाच नाही हे सांगून झाल्यावर पुढे बोलतो.
बेरिअॅट्रिक सर्जरी आजकाल भारतातही कॉमन झालिये. 'व्हॅनिटी' नावाचा एक प्रकार असतो, अन त्यासाठी माणूस काय वाट्टेल ते करायला तयार असतो. एस्पेसिअली बायका. The females of the species. पुरुषही आजकाल मार्केटिंगला बळी पडत फार मागे नाहीत, अन तसं म्हटलं तर पूर्वीही नव्हते, फक्त त्यांच्यात बायकां इतकी चिकाटि नसते.
याचाच दुसरा भाग / नाण्याची दुसरी बाजू 'मॅरेज मार्केट' असा आहे. (मी ५ पैशांची पैज मारतो, तुमच्या मैत्रिणीची बहिण मारवाडी/गुज्जू आहे. हरलो तर आनंद होईल.) म्हंजे त्या डॉ. ला पैसे कमवायचेत, अन हिला/हिच्या बापाला खर्च करायचेत.
महत्वाची गोष्टः तिचं ऑप्पी यशस्वी झालंय. औषधं वगैरे गरजेचीच आहेत. बाकी स्कर्ट वरचे डाग वगैरे स्त्रियांना तरी भीषण वाटू नयेत. *गायनॅक पोस्टिंगला असतांना प्रश्न पडायचा की ब्लड बँकेतून इथे डायरेक्ट नळ का लावीत नाहीत? Females are a more resilient specimens of human species, and can survive lot more bleeding than males. And have seen it too.* so, त्याचा फार जास्त लोड करून घेउ नका. फॅट एम्बॉल्लिझम इ. गूगलून पहा. हा या ऑपरेशनचा सगळ्यात कॉमन साईड इफेक्ट आहे. जिवानिशी वाचलिये ती!
बाकी शिल्पा ताईंच्या पोस्टीला तुम्ही छान संतुलीत उत्तर दिलंत, छान वाटलं वाचून. तुमचा धागा त्या उत्तराने जेन्युइन होतो.
पुन्हा एकदा व्हॅनिटी वर.
जर त्या मैत्रिणीने 'दिसण्यासाठी' अमुक रुपयांचा ड्रेस, तमुक रुपयांची पर्स, तितक्याची हेअर स्टाईल असं करत १०,००० $ खर्च केले असते, तर तुम्ही इथे लेख लिहीला असता का?
अगदी चष्मा नको म्हणून LASIK करून घेणारे ही असतातच ना? म्हणजे चप्पल आवडत नाही. नाल ठोकून घेऊ असला प्रकार!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
१नंबर
म्हणजे चप्पल आवडत नाही. नाल ठोकून घेऊ असला प्रकार!
या वाक्याला मी १२३४ पैकी १ नंबर देतेय. धन्यवाद.
डोळ्यांच्या लेझर ऑपरेशनबद्दल
डोळ्यांच्या लेझर ऑपरेशनबद्दल आम्ही काही समव्यावसायिक एकदा बोलत होतो. सगळेच भौतिकशास्त्राचे विद्यार्थी. एका मैत्रिणीचं वाक्य मला चांगलंच लक्षात राहिलं, "कुणा फिजिसिस्टने स्वत:च्या डोळ्यात लेझर मारून घेतल्याचं आठवत नाही." माझ्या भावावर याच वाक्याचा अगदी पॉझिटीव्ह फरक पडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला.
हे वाचून थोडी अंतर्मुख झाले.
हे वाचून थोडी अंतर्मुख झाले.
वरचे दात पुढे आहेत म्हणून मी विसाव्या वर्षी दाताला तारा लावून घेतल्या होत्या. लहानपणी योग्य वयात त्यावर इलाज सुरू होता पण तेव्हा डॉक्टरांनी "पुढचे सहा दात काढेन" अशी धमकी दिल्यावर मी तिथे पुन्हा कधी गेलेच नाही. नंतर कधीतरी काही मित्रमैत्रिणींनी सुचवलं म्हणून पुन्हा त्याच दंतवैद्याकडे गेले, त्यांनी मला एकेकाळी उगाच धमकी दिली हे पण त्यांना सांगितलं; त्याबद्दल थोडी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चाही झाली. पण त्या वयात अडीच-तीन वर्ष दातांना तार लावलेली होती. लेक्चर्स, प्रॅक्टीकल, ग्रंथालय यामुळे दिवसभर घराबाहेर असायचे. त्या काळात सगळीकडे टूथब्रश घेऊन फिरायचे. "नंतर तुझे दात चांगले दिसतील" असं तेव्हा सगळे समजावायचे, मला त्या 'समजुती'ची गरज होती असंही नाही. पुढे अनेक वर्ष सकाळी उठायच्या थोडं आधी दाताला ब्रेसेस लावल्या आहेत असं स्वप्न पडायचं, जाग आली की दात नॉर्मल आहेत हे लक्षात येऊन हायसं वाटायचं.
तेव्हा बरेच लोकं चिडवायचे, अर्थात मी पण काही कमी डांबरट नाही त्यामुळे मला फरक पडायचा नाही. वर मीच काहीतरी स्टीलचे दात असण्यावर स्वतःवरच विनोद करायचे. पुढे एक वर्षभर एका कॉलेजात शिकवायचे. सुरूवातीला दोन महिने त्या तारा होत्याच आणि चष्माही. मला तेव्हा त्या कॉलेजात "जस्सी" म्हणायचे, असं तारा काढल्यानंतर कोणीतरी आपणहूनच येऊन मला सांगितलं. इतर अनेकांना फोटोत असे कुरूप दात मुद्दाम दाखवून हसता येणार नाही याचीही मला जाणीव आहे.
जुने फोटो पाहिले की चेहेर्यात बदल झालेला जाणवतो. पण आता कधी कधी खरंच प्रश्न पडतो, मी का एवढा खर्च करून मोठं झाल्यावर दात मागे ढकलले? चार उपदाढा गेल्या, शिवाय एक दाढ तेव्हाच थोडी खराब झाली असं आता वाटतं. पण "was it really worth it?" हा प्रश्न आत्तापर्यंत सुटलेला नाही. मी अशीच आहे असं ठणकावून आपण स्वतःलाच का नाही सांगू शकत?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हं.
ते वयही तसं असतं.
स्वतःला प्रूव्ह करण्या साठी धडपड असते, त्यात माझ्या दिसण्याचा फार मोठ्ठा वाटा आहे असंही वाटत असतं. मागे वळून पाहताना मग "मी अशीच आहे असं ठणकावून आपण स्वतःलाच का नाही सांगू शकत?" हे म्हणू शकतो आपण. कारण तोपर्यंत आपण स्वतःला प्रूव्ह करून चुकलेलो असतो.
शेवटी, जे करून चुकलात, ते करूनच चुकला आहात ना? नका टेन्शन करू आदितीजी. एक गझल सांगतो
अब क्या सोचे क्या होना है
जो होगा अच्छा होगा
पहेले सोचा होता पागल
अब रोने से क्या होगा?
अवांतर-
इथे ऐका :
http://youtu.be/uaEdkNGZcDY
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
नुसरत आवडतो त्यामुळे
नुसरत आवडतो त्यामुळे चित्रफितीबद्दल धन्यवाद.
मला अजूनही आठवतं त्याप्रमाणे तेव्हा दिसणं हा एक मुद्दा असला तरी तो एकच मुद्दा नव्हता. जगावेगळं काही करण्याची इच्छा असा त्यात एक भाग होता. आणखी एक गौण मुद्दा होता की तेव्हा एका मित्राने, जो तेव्हा पंचेचाळीस-पन्नाशीचा असेल, प्रोत्साहन दिलं होतं. "तुला करायचंय तर तू करच. मी तिशीत तारा लावून घेतल्या होत्या. उगाच, या वयात काही फरक पडतो का हे पहायला!" काही माणसांचा आपल्यावर प्रभाव पडतो, त्यातला हा एक मित्र. त्यामुळे तारा काढल्यानंतर आपला चेहेरा सुंदर होईल असा विचार फार काही नसायचाही.
लहान वयात धमकी देणार्या त्याच दंतवैद्यांशी तोंडात तारा बसवताना एकदा एक संवाद झाला. तेव्हा ते म्हणाले, "हे मानवी शरीर आहे, यंत्र नाही." मला त्याचा अर्थ थोडा उशीरा समजायला लागला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संगम अल्बममधील मधली सगळी गाणीच फार आवडतात
तसच यातलं
दोस्तसे गम कहकर तो खूश हो, लेकीन तूम ये क्या जानो.
तूम दिलका रोना रोते थे, वो दीलमे हसता होगा... हे वाक्य या धाग्यावर सूट होतय की काय असं वाटतयं.
असो, सक्शन पध्दतीने हेमा मालीनी, रवीना टंडन यांनीही चरबी कमी केली होती अशा रूमर होत्या, मला स्वतःला यात काहीच चूक वाटत नाही. जर थोडासा त्रास संपूर्ण आयूष्यावर परीणाम करणारा असेल तर तो जरूर सोसावा असंच म्हणेन. नाहीतर यापूढील पीढी केवळ टेस्ट्यूब बेबी म्हणूनच जन्माला घालायची काय ?
यारसे.
यार से गम कहेकर तो खुश हो असं आहे ते.
सक्शन पद्धतीने 'चरबी उतरवणे' हा वाक्प्रचार जाम भन्नाट!
हेमाची करावी लागली असेल असं वाटत नाही. डान्सर आहे ती. या वयातही इतकं सुंदर नृत्य करते. संपूर्ण व्यायाम असतो त्यात. अन स्टॅमिनाही खूप लागतो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सहमत
सहमत
या एका वाक्यामुळं प्रतिसाद माहितीपूर्ण झाला आहे. 
:)
दाताला तार बसवताना "तार" तम्य बाळगावे हे उत्त्म
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"हे मानवी शरीर आहे, यंत्र नाही."
अगदी बरोबर.
हेच तारतम्य वैद्यांनी शिकावं लागतं नाही तर मग रस्त्यावरचा दरवडेखोर अन सर्जन : सारखेच.
दोघेही सुरी दाखवून दम देतात - चल पैसा निकाल. मै काट्नेवाला तेरेकू
असो.
हे या धाग्यावर अवांतर फार होतंय. धागा हायजॅक नको व्हायला.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
कठिण प्रश्न आहे
कठिण प्रश्न आहे.
तसा दाताला तारा लावणे वगैरे व्हॅनिटी मीसुद्धा केली आहे. सातवी-आठवी यत्तेत होतो बहुधा. आमच्या कॉलनीमधली बरीच मुले आणि मुली दातांना तारा लावून घेत होते.
सगळे दात ठीकठाक होण्यापूर्वी कंटाळा येऊन तारा काढून टाकल्या.
शरीरप्रदर्शन आणि लैंगिक-आकर्षक व्यक्तिमत्त्व ज्या व्यवसायात आवश्यक अवजार असते - म्हणजे पर्यटन, टीव्ही-सिनेमा, देहविक्रय, वगैरे, तशा व्यवसायात कॉस्मेटिक सर्जरीचा आर्थिक फायदा नक्कीच आहे.
लग्नाच्या बाजाराच्या बाहेर राहून शरीरसंबंधाची आस अनेक तात्पुरत्या संबंधांनी शमवायची असेल (खरेदी-विक्रीने नव्हे, तर सामाजिक व्यवहारात) तरी संपत्ती-सौष्ठव-यौवन या त्रयीचा फायदा असतो. ती सामग्री अधिक असली, तर अधिक व्यक्तींना, तसेच अधिक आकर्षक व्यक्तींना आकर्षित करता येते. कधी-कधी संपत्ती आणि यौवनाची किंचित उणीव असेल, ती अतिरिक्त सौष्ठवाने झाकता येते. मात्र फारच उणीव असेल, तर मात्र जमत नाही. (खूप संपत्तीने मात्र यौवन आणि सौष्ठवाची पुष्कळच उणीव झाकता येते.)
या सगळ्या फायदा-तोट्यांचा गुंतागुंतीचा ताळा करून मगच दुखणे विकत घ्यावे. यात एक तोटा असतो, की आपल्याला किती फायदा होणार आहे, याबाबत काही लोकांच्या अपेक्षा अवास्तव असू शकतील. कंटाळवाणे व्यक्तिमत्त्व असेल, तर दात नेटके केले तरी व्यक्तीचे स्मित आकर्षक होणार नाही. अवास्तव अपेक्षा ठेवून फायद्या-तोट्याचे गणित केले, तर विकतच्या दुखण्याची किंमत फारच जड होऊ शकते.
तुमच्या मै२त्रिणी*ने हिशोब ठीक केला नाही, असे सकृद्दर्शनी वाटते खरे. पण २-३ महिन्यांनंतर पुन्हा ताळा जमवून बघायला पाहिजे. (अ) जर खाणे+कमी व्यायाम या प्रकृतीमुळे पुन्हा वजन पूर्ववत वाढले, तर निश्चितच दुखणे महाग पडले. (आ) जर शस्त्रक्रियेचे दुखणे बरे झाले, शस्त्रक्रियेचे निमित्त करून मै२त्रिणीने व्यक्तिमत्त्व अधिक हसतमुख, आशावादी आणि आकर्षक केले, तर फायदा झाला.
*मै२त्रिण = मैत्रिणीची मैत्रीण
अवांतर आहे
माझा एका ग्रूपमधे आम्ही अशा मित्र-मैत्रिणींना चुलतमित्र किंवा मावसमैत्रीण म्हणतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मॅड!
चुलतमॅड आहात तुम्ही!
-Nile
:)
मला बिका३ आठवले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अजून महिन्याभराने ती कशी
अजून महिन्याभराने ती कशी दिसते ते सुद्धा लिहा. म्हणजे याबाबत काही मत तयार करता येईल.
चुकुन दुसरीकडंच पडला.
पण तिकडं श्रेणी मिळाल्याने आता इडिट करत नाही.
------------
मद्रासला नवा नवा गेलो होते. मेलं सगळं वातावरणच खारट तिथे!! एरवी शिकेकाईच्या साबणाच्या जाहिरातीत दाखवावी अशी नितळ त्वचा (शी:, स्कीन, स्कीन) होती हो माझी! पार सत्यनाश झाला त्या मद्रासमध्ये जाऊन! म्हणून मग तिथल्या एका डागदराकडे गेलो. त्यानं एका डर्मॉलॉजिस्टकडे धाडलं. त्या गाढवानं ५०० रु. मलमं दिली लावायला. (महिनाभर एक डोशा कमी खावा लागला जेवणात!) त्यातल्या एका मलमानं तोंड पार सोलवटून निघालं. लालेलाल, हात सुद्धा लावता येईना. म्हणून ते लावणं थांबवलं. पठ्ठ्याने लगेच सबस्टिट्यूट दिला (१५० रु चूलीत!) तर त्यानं असा काही डायरिया झाला की विचारू नका! बाथरूम शेजारी खूर्ची मांडून बसावं लागल तीन दिवस. (आणि वर पाण्याचा वाढलेला खर्च रुममेटांनी माझ्याच माथी मारला ते एक निराळंच.) बास, त्या दिवसापासून म्हण्लं माकड तर माकड, पण परत इकडी पायरी चढायची नाय!
-Nile
त्वचा व **रोगतज्ञाकडे
खरं सांग कशाकरता गेला होतास?
वाह्यात श्रेणीचा प्रतिसाद!
अहो गुप्त असतं तर इथं उघडं कशाला केलं असतं! चेहर्यावरती रॅशेस येउन चेहरा काळवंडला होता (जसं काय आम्ही लै गोरे) मग म्हणलं जरा क्रीमं वगैरे लावावी. कसलं काय, मेलं एखाद्याचं नशिब!!
-Nile
हाहाहा
लक्षणांवरून तो कशासाठी गेला आहे, हे कळत नाही का क्रेमर?
असहमत
हा हिशोब अगदीच वाईट नाही. ३ लीटर चरबी = ६ पौंड वजन = २१,००० कॅलरी.
दर आठवड्यातून चार वेळा जिममध्ये जाऊन दरवेळी सुमारे २०० कॅलऱ्या घालवल्या तर ६ महिने लागतील. एकदा जिममध्ये जाऊन यायचं म्हणजे सुमारे दोन तास मोकळे हवे. सहा महिने जिमचं भाडं एकंदरीत खर्चाच्या मानाने तसं नगण्य आहे. पण २१० तास!! नोकरी करणाऱ्यांना प्रवास, नोकरीचा वेळ, तयारी, इतर घरची कामं, जेवणखाण, बाजारहाट वगैरे वजा केलं तर सहा महिन्यांत सुमारे ५०० ते ७५० तास खरोखर आपल्याला हवं ते करायला मोकळे मिळतात. त्यातला सुमारे एक तृतीयांश वेळ फेकून द्यायचा? थोडक्यात तुम्ही ज्यासाठी अट्टाहास करून आनंद घेण्यासाठी नोकरीत धडपडता त्या स्वातंत्र्याच्या वेळेतला इतका वेळ आपल्याला न आवडणारी गोष्ट करायची म्हणजे आयुष्य कमी करण्यासारखं आहे. आता काही जणांना आवडत असेल व्यायाम करणं. काही जणांना जमतही असेल नियमाने जिममध्ये जाणं. पण अनेक लोकांना नाही आवडत. त्यामुळे कंटाळा होतो, आणि जमत नाही. तेव्हा ३५०० टाकले की एका झटक्यात काम तमाम, चार सहा दिवस दुखेल थोडं... हा हिशोब अगदीच वाईट नाही. तिने जर हे २१० तास नोकरीच्या कामासाठी लावले तर तिला अगदी ओव्हरटाइम नसेल मिळत तरी नोकरीत बढती नाही का मिळू शकणार?
वर बऱ्याच जणांनी बारीक होण्याची इच्छा ही समाजाने लादलेली आहे असं म्हटलं आहे. ते थोडं खरं असेलही. पण आंतरिक इच्छा आणि समाजाने लादलेल्या इच्छा वेगळ्या कशा काढता येतील हे मला नेहमीच कोडं पडलेलं आहे. आपण सुंदर, आकर्षक दिसावं ही इच्छा नैसर्गिक म्हणता येईल का? सौंदर्याच्या निकषांत बसणारा आकार हा टीव्हीने लादलेला आहे का? मग सडसडीत, उफाड्याच्या, बारीक कंबरेच्या, विशिष्ट आकाराच्या जवळ जाणाऱ्या स्त्रिया बाबा आदमच्या जमान्यापासून पुरषांना आवडत आलेल्या आहेत त्याचं काय? थोडक्यात मला म्हणायचं आहे की 'बिच्चारी! स्वतःवर समाजाने लादलेले निकष बाळगून स्वतःच्या शरीराचे कसे ग हाल करून घेतले तिने' असं म्हणणं म्हणजे आपला दृष्टीकोन लादणं ठरतं...
-१
या प्रतिसादातला एकूण पॉझिटीव्ह दृष्टीकोन आवडला तरी सगळंच समर्थन पटलेलं नाही. वेळ वाचतो हा भाग मान्य आहे किंवा बारीक होऊन आत्मविश्वास मिळत असेल तर तो भागही मान्य आहे.
पण
१. व्यायामाचे एकूणच होणारे फायदे हे शस्त्रक्रिया करून मिळत नाही. व्यायामामुळे एकूणच तब्येत सुधारते जे शस्त्रक्रिया करून जमणार नाही. चयापचयाची क्रिया एका दिवसाच्या शस्त्रक्रियेने सुधरणात नाही जी व्यायामामुळे नक्कीच सुधारते. यंत्रांच्या जमान्यात शारीरिक क्षमतेला फार महत्त्व नसलं तरीही निदान थोडीबहुत शारीरिक क्षमता असावी.
२. पुरूषांना अमुक एका प्रकारचं स्त्रीचं शरीर आवडतं म्हणून स्त्रियांची मोजमापं तशी असावीत हे मला पटत नाही. अगदी लग्नाच्या बाजाराचा विचार करताही नाही. "पुरूषप्रधान संस्कृतीत समाजाने लादलेले शारीरिक सौंदर्याचे निकष आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे स्वतःची ओळख, जाणीव याबद्दलही (लग्न होणं हा संदर्भ) असे निकष स्वतःला लावून आधी एकतर स्वतःलाच मानसिक त्रास करून घेते आणि त्यावर पैसे, आरोग्य, वेळ खर्च करते" म्हणून मला या सारिकाच्या मावसमैत्रिणीबद्दल वाईट वाटलं.
बार्बीच्या आकाराच्याच स्त्रिया पुरूषांना आकर्षक वाटतात असंही नाही. मानसिक जडणघडणीप्रमाणे स्त्रियांना विविध आकारांचे पुरूष आणि पुरूषांना विविध आकारांच्या स्त्रिया आवडतात असा निष्कर्ष असणारा एक कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता. (लिंक मागू नये.
) "सडसडीत, उफाड्याच्या, बारीक कंबरेच्या, (एकाच एका) विशिष्ट आकाराच्या जवळ जाणाऱ्या स्त्रिया बाबा आदमच्या जमान्यापासून पुरषांना आवडत आलेल्या" असतील तर एकूण मंगोल वंशाच्या (चिनी, कोरियन इत्यादी) भारतीय, कॉकेशन, आफ्रीकन स्त्रियाही का बुवा अनेकांना आकर्षक वाटतात? या सर्व वंशांच्या स्त्रियांच्या शारीर रचनांमधे बहुदा एकच समान दुवा आहे, त्या मानव-स्त्रिया आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लादणं, कंडेस्सेंडिंग वगैरे...
व्यायामाचे फायदे कोणीच नाकारत नाही. पण फायदे अनेक गोष्टींचे असतात. व प्रत्येकाला त्या फायद्यांचं मूल्य वेगवेगळं असतं. दिवसभर बारा तास बुद्धीबळ खेळणाऱ्या ग्रॅंडमास्टरला किंवा त्याहीपेक्षा ग्रॅंडमास्टर होऊ इच्छिणाऱ्याला त्याच्या दिवसातला दीड तास व्यायाम करण्यात फुकट गेल्यासारखा वाटू शकेल. शेवटी केवळ शरीराचीच घडण व्हावी, आयुष्य वाढावं, हेच 'योग्य' ध्येय असं कोणी ठरवलं? तरीही निदान थोडीबहुत शारीरिक क्षमता असावी.
असं म्हणता तेव्हा तुमचेच आदर्श इतरांवर लादणं होत नाही का? साधारण चालता फिरता येण्यापलिकडे क्षमता असण्याची नक्की गरज काय?
मला या सारिकाच्या मावसमैत्रिणीबद्दल वाईट वाटलं.
ही कंडेस्सेंडिक भूमिका पाहून मलाच वाईट वाटलं. मला एक सांगा, की आपलं शरीर स्त्रियांसाठी आकर्षक व्हावं म्हणून पुरुषदेखील तितकेच कष्ट घेतात. श्वार्झनेग्गर किंवा तुमचा तो अब्राहम, त्याला कोणी असं म्हणत नाही, की अरेरे हा बिचारा शरीर परफेक्ट रहाण्यासाठी चारचार तास रोज जिममध्ये घालवतो, प्रत्येक अन्नाचा कण मोजून खातो, बिचारा समाजाच्या प्रतिमा स्वतःवर लादून घेऊन जिवाचे हाल करतो. त्यापेक्षा बुद्धीबळ खेळला थोडा वेळ दररोज तर मेंदू तल्लख नाही का व्हायचा? स्त्रियांचीच अशी अतिरेकी कीव, तीसुद्धा इतर स्त्रियांनीच केलेली पाहून मला वाईट वाटलं.
मी जो विशिष्ट आकार म्हणालो तो बार्बीचा नव्हे. तो फॅशन डिझायनर्सना आवडतो. सरासरी पुरषांना नक्की कुठचे आकार मोहक वाटतात याचा अभ्यास झालेला आहे (लिंक देतो आहे). सौंदर्याचं मानसशास्त्र आणि जीवशास्त्र याची तोंडओळख या लेखात होईल. त्यात मुख्यत्वे सिमेट्री, वेस्ट टू हिप रेशो वगैरे गोष्टी येतात.
व्यायामाचे फायदे तर खूपच
व्यायामाचे फायदे तर खूपच आहेत. अंदरूनी चरबी अर्थात कोलेस्ट्रॉल कमी होणे, मेंदूत सकारात्मक संप्रेरके स्त्रवणे ज्यामुळे "फील गुड" असा मूड निर्माण होणे, स्वप्रतिमा उंचावणे हे काही माहीत असलेले फायदे. अजून विज्ञानाला माहीत नसणारे काही असूही शकतील.म्हणजे तुलनाच करायची झाली तर "२ मिनिटस मॅगी" = लिपोसक्शन तर सकाळ्ळ्पासून शिजवत ठेवलेली आणि तब्येतीने तयार होणारी हैद्राबादी बिर्याणी = व्यायाम.
बिर्याणी आणि नूडल्स
हे उदाहरण छान आहे. बिर्याणी करायला वेळ लागतो, पेशन्स लागतो. मला तीन सुंदर सिनेमे बघायचे असतील तर मी बिर्याणीच का खावी. शिवाय जर मला गेल्या चार वेळा बिर्याणी बिघडल्याचा अनुभव असेल तर मी काय करावं? बहुतेक लोक पहिल्याप्रथम व्यायाम, डाएट वगैरे करून बघतात. काहींना ते जमतं. खूप लोकांना नाही जमत. मग अन्नाशी असलेलं नातं बिघडतं. अनेक वेळा प्रयत्न करून फसल्याने आत्मसन्मान कमी होतो.
शरीरस्वास्थ्य, सौंदर्याची ओढ, समाजाची दृष्टी, आपल्याला असलेला वेळ, पैसा या सर्वांचं हे कठीण गणित आहे. ते विशिष्ट पद्धतीनेच सर्वांनी सोडवलं पाहिजे असा हट्ट चुकीचा वाटतो. बिर्याणी आवडणाऱ्यानी बिर्याणी खावी, ज्यांना ती जमत नाही त्यांनी नूडल्स खाव्यात. नूडल्स खाणाऱ्यांनीदेखील बिर्याणीच खावी असा आग्रह धरू नये.
मस्तच
मस्तच रे राज. पण हे दोन्ही खावून पोट मात्र सुटेल हो.
तुमचा प्रच्या
प्रकाटाआ
प्रकाटाआ
त्या मुलीत नी इतरांत फरक फक्त डिग्रीचा
नखे कापतो, केस कापतो मग चरबी कमी करण्याने काय फरक पडतो. थोडीफार वॅनिटी तर सगळ्यांकडेच आहे. त्या मुलीला स्वतःविषयी बरं वाटणार असेल तर त्यात समाजाचा काय गुन्हा? आता लायपोसक्शनमुळे लोक नावे ठेवतात म्हणून वाईट वाटायला लागण्याची वेळ आल्यास आजुबाजूच्या समाजाची चूक म्हणता येईल.
चूक
नखं न कापण्यामुळे स्वच्छता राखणं कठीण होऊन आरोग्याचे प्रश्न येतात. केसांच्या आरोग्यासाठीही केस कापावेत. नखं आणि केस या दोन्हींमधे रक्तवाहिन्या आणि नर्व्हज (मराठी?) नसल्यामुळे फारसा प्रश्नही येत नाही. पण चरबी वेगळी असते. व्यायामाने चरबी कमी करण्याचा विचार केला तर एवढा विचार होणार नाही. लायपोसक्शन केल्यामुळे (किंवा अनोरेक्सिया असता तरीही) चर्चा झडते आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिप्रतिउत्तर
लायपोसक्शन गुंतागुंतीचे आहे हे मान्य आहे. नखे व केस कापणे तितके गुंतागुंतीचे नाही. 'बिचारी मुलगी' असा सूर प्रस्तावात आणि प्रतिसादांत जाणवल्याने त्या मुलीचे वागणे जगावेगळे नाही हे अधोरेखित करण्यासाठी आपण 'त्यात काय निराळे' म्हणून स्विकारलेल्या पण तत्त्वतः लायपोसक्शनसारख्याच असलेल्या कृतींचा संदर्भ दिला. प्रस्तावातील मुलीने समजा व्यायाम, डाएट सगळे करून भागल्यानंतर निर्णय घेतला असेल तर? त्या मुलीची पूर्ण परिस्थिती माहीत नसतांना तिला समाजाने 'विक्टिमाइज' केले आहे असा दावा करणे मला खटकले. समाजात सौंदर्याविषयी असलेल्या कल्पनांमुळे काही लोकांना मनस्ताप होतो का? तर नक्कीच होतो. पण परिक्षेत नापास झाल्याने, चांगली नोकरी न पटकावल्यानेही मनस्ताप होतो. अपयश हे समाजाला न आवडणारे आउटकम आहे. या प्रसंगात तितक्या व्यापक अर्थाने समाजाला दोष दिलेला नाही.
काही लोकांच्या एकूण आरोग्याला चरबीमुळे धोका संभवतो. व्यायाम, आहारनियंत्रण करूनही वजन कमी होत नाही. अशा वेळी लायपोसक्शनचा अनेक लोकांना फायदा होऊ शकतो. अॅनॉरेक्सिया आणि लायपोसक्शन एकासारखेच नाही. अॅनॉरेक्सिक व्यक्तिला मानसिक आजार असण्याची शक्यता आहे, डॉक्टरकडे जाऊन चरबी काढून घेणार्या व्यक्तिचे मानसिक प्रश्न असतीलच असे नाही.
+१
पोटावरील अतिरीक्त चरबीमुळे मणक्यावर ताण येऊन पाठदुखी जडते, गुडघे दुखतात, चटचट अंग हलत नाही. अशावेळी लायपोसक्शन चा फायदा होत असावा.
नर्व्हज
नर्व्ह्ज = चेतातंतू, मज्जातंतू.
जंतू?
कोणते जंतू??
-Nile
निळे जंतू ;)
निळे जंतू
हाऊस!
लायपो केलेल्या मुली बद्दलचा हा हाऊसचा इपिसोड चांगला आहे.
http://www.tv-links.eu/tv-shows/House_347/season_5/episode_10/
बाकी धनंजय, घासकडवी आणि क्रेमर, या काका लोकांशी सहमत आहे.
-Nile
लायपोसक्शन नाही, तिने ते
लायपोसक्शन नाही, तिने ते गॅस्ट्रिक बायपास करून घेतलंय. जठराला खूप लहान करून टाकतात, किंवा त्याला बांधून ठेवतात जेणेकरून जेवताना पोट भरल्याची भावना लवकर यावी, अन वजन कमी व्हावं.
बादवे. मस्त एपिसोड आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
स्वारी हां,
वेट रिडक्शनचं ऑपरेशन केलं होतं त्यावरून लायपोच असेल असं वाटलं. (जळ्ळी मेली आम्हाला कशी माहिती असतील पन्नास वेगळी ऑपेरशनं!!) पण इकी वर कन्फर्म करुन पहायला हवं होतं. स्वारी. इपिसोड आवडला हे बरं झालं..
-Nile
साईड इफेक्ट
आप्रेशनांची नावं ठाऊक असणं हे डाक्टर असल्या चा साईड इफेक्ट हो!
नका लोड घेऊ.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
काही प्रश्न काही उत्तरे
लायपोसक्शनपेक्षा व्यायाम/आहार नियंत्रणाने केलेले वजनाचे नियम चांगले आहे का ?
अर्थातच. कुणीही हे मान्य करेलच.
वजनाच्या नियमनाच्या समस्येचा सामना करणार्या व्यक्ती लायपोसेक्शनच्या निर्णयाप्रत कधी येत असतील ?
सरसकट आणि सर्वाना लागू होईल अशी विधानं करणं शक्य नाही. तसा विदाही उपलब्ध नाही. पण असा अंदाज आहे की अशा व्यक्ती बर्यापैकी झगडत असणार. अनेक प्रकारचे डाएट्स , व्यायामाची निरनिराळी रेजिमेन्स लोक वापरून पहातात. लोकांचे मेटाबॉलिझम , त्यांची इच्छाशक्ती, त्यांना मिळणारा वेळ, त्यांच्या जाडपणाचे प्रमाण आणि त्याचं स्वरूप या सर्वांवर अर्थातच अशा उपायांची परिणामकारकता अवलंबून असते. या सर्वातला कुठला घटक जर उपकारक नसेल - आणि बहुदा इच्छाशक्तीचा अभाव हा बहुतांशाने दिसणारा घटकही असेल - तर हे उपाय चालत नाहीत. माणसं वर्षानुवर्षीच्या डिप्रेस्ड मनःस्थितीचा सामना करायच्या ऐवजी डेस्परेटली लायपो करत असणार.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
>>>> गोष्ट तिने जिम मध्ये
>>>> गोष्ट तिने जिम मध्ये जाऊन स्वप्रयत्नाने साध्य केली असती ती अशी पैसे फेकून, शरीराशी खेळ करून मिळविली तर वाईट मानसिक परीणाम होतच असेल.
जिम मधे जाउन वा "कष्ट"/व्यायाम वगैरे करुन/आहारविहाराचे पथ्य पाळून असा बदल दीर्घकाळात घडवता येतो, व तसे तिने केले असते तर त्यात वावगे नव्हते याशी सहमत.
>>>>मला तरी यात तिचा आणि "बाह्यसौंदर्याला" अवास्तव महत्व देणार्या समाजाचा दोष वाटतो.
बाह्यसौन्दर्य म्हणजे काय? सुदृढ शरिर राखणे वा राखत असल्याबद्दलच्या आईबापनवराबायकोनातेवाईक समाज इत्यादीन्च्या अपेक्षा असतील तर त्यात वावगे काय ते कळले नाही.
बाकी अस्ली विकतची दुखणी घेऊ नयेत याशी सहमत.
ब्रेक-पॉंइट
पुन्हा उगवणाऱ्या केसांना wax लाऊन उखडणे जर योग्य असेल तर हे देखील ठीकच म्हणावे लागेल, मुद्दा बहुदा ब्रेक-पॉंइटचा आहे, कोणी कुठे थांबावे हा प्रश्न मटेरीअलीस्टिक जगात कसा विचारावा? टेम्पटेशनला बळी पडून आस्वाद घेणे योग्य कि संयम राखून मी आहे त्यात आनंदी आहे हे मानणे योग्य?
तुमची मैत्रीण खरेच डेस्पो झाली असेल तर तिची कृती योग्यच म्हणावी लागेल, उगाच जीव वगैरे देण्यापेक्षा हे ठीक, ती डेस्पो होणं बहुदा चूक असावं.
सामाजिक दबाव
सारिकाच्या मैत्रिणीने करून घेतलेली शस्त्रक्रिया ही स्वतःच्या चांगल्या दिसण्याकरता आहे त्यामुळे तिच्यावर समाजाचा दबाव असून तिला 'बिचारी मुलगी' दाखवणं योग्य नाही असं बर्याचश्यांचं मत दिसतंय. पण हे त्रयस्थ व्यक्ती असताना किंवा त्या व्यक्तीच्या परिस्थितीत नसताना बोलणं सोपं आहे.
ती मैत्रीण मात्र अतिशय दबावात असण्याचीच शक्यता आहे. आजही धाकट्या बहिणीचे लग्न झाले आणि थोरली अजूनही अविवाहीत असणे ही गोष्ट त्या थोरलीकरता आणि तिच्या पालकांकरता समाजात अतिशय लाजीरवाणी (हो, हा शब्द जाणून बुजून वापरलाय) असते. माझी एक मैत्रिण याच दबावातून जात असल्याने मला त्याची पुरेशी कल्पना आहे.
त्या मुलीतच काहीतरी कमतरता किंवा दुर्गुण असावा असंच सगळ्यांना वाटतं. अश्या अविवाहीत मुलींबद्दल समाजात नको ती मतं प्रसारीत होतात, नाही-नाही ते उपटसुंभ येवून फुकटचे सल्ले देवून जातात. अश्यात जर ती मुलगी जरा जाड असेल तर लग्न न होण्याचं एकमेव कारण म्हणजे तिचं अनाकर्षक शरीर हेच ठरवलं जातं आणि कोणत्याही प्रकारे तिच्या शरीराला 'आकर्षक' बनवण्याची मोहीम सुरू होते.
मी जशी आहे तशी चांगलीच आहे असा कायम सकारात्मक विचार करणारी मुलगी किंवा आमची मुलगी गुणी असल्याने आम्ही तिच्यात बदल न करता तिला पसंत करणार्या मुलाची वाट बघू अशी विचारसरणी असणारे आई-वडील आजही खूप कमी आहेत. बहुतेक लोक 'मुलीचे लग्न ठरावीक वयात झालेच पाहिजे' या सामाजिक दबावाला बळी पडून 'डेस्प्रेट' होतात आणि अनेक चुकीचे निर्णय घेतात.
(चरबी कमी करण्याकरता व्यायाम करावा की शस्त्रक्रिया हा चर्चेचा विषय असावा असे वाटत नाही त्यामुळे त्यावरचे मत व्यक्त केलेले नाही. पण बाकी सगळ्यांनी त्यावर मत दिल्याने मीही मत देते. माझे मत व्यायामालाच असेन.)
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
बहुतांशी सहमत
लग्नाची वेळ आली की मध्यमबांध्याच्या मुलीही बारीक होण्यासाठी झटत असतात किंवा आपले वजन वाढू नये यासाठी प्रयत्नशील असतात. असे असेल तर जाड्या मुलींची काय परिस्थिती होत असेल याची कल्पना न केलेली बरी. गंमत म्हणजे, मुलगाही जाडा असेल तर त्याला किमान आपल्यापेक्षा बारीक बायको हवी असते. त्यामुळे जाड्या मुलाला, जाडी मुलगी मिळून जाईल असे सोपे गणित नसते.
दुर्दैवाने, हे सोपे नसते. किंबहुना, शक्यही नसते असे म्हणता येईल. मुली लग्न न होता तशाच राहिल्याचे दिसून येते. येणारे जाणारे त्यांना टोमणे मारतात ते वेगळेच. शिवाय, ठराविक वयात लग्न व्हायला हवे यामागे बराच दूर विचार असतो. तो अगदीच चुकीचा म्हणता येत नाही.
सदर मुलीलाही ज्या दबावातून जावे लागले असेल त्याची कल्पना करणे सहजशक्य आहे. लायपोसक्शनच्या शस्त्रक्रिया या आता काही टाबू नाहीत. त्यामुळे तिच्या निर्णयाला चुकीचे ठरवता येत नाही.
पूर्णपणे सहमत
वरच्या प्रतिक्रियेशी पूर्णपणे सहमत आहे.
चुकीचा निर्णय केवळ एवढ्यासाठी म्हणाले की सारिकाने म्हटलंय की तिला ती मैत्रिण फारशी जाड वाटली नव्हती आणि (मला वाटतं) जर कदाचित तिचं 'वेळेत' लग्न झालं असतं तर तिनं शस्त्रक्रियेचा विचारही केला नसता.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
चर्चेचा आढावा
चर्चाप्रस्तावकाने स्वतःची मतं मांडावी आणि चर्चाविषयाचा, इतर प्रतिसादकांच्या मतांचा समोरापात आढावा घ्यावा अशी संस्थळाच्या धोरणांमुळे अपेक्षा आहे म्हणून हा धागा.
एककल्ली विचार करूनच हा धागा मी काढला होता. ज्यावेळी धागा काढला त्यावेळी खरं तर १००% मी लायपो च्या विरोधात होते. पण नंतर जी चर्चा झाली त्यातून एक काहीसे संतुलित मत तयार होत गेले. पैकी -
मुसुंचा कयास "वर्षानुवर्षीच्या डिप्रेस्ड मनःस्थितीचा सामना करायच्या ऐवजी डेस्परेटली लायपो करत असणार" हे मला उल्लेखनिय वाटते. आणि मग लायपो चा फायदाच जास्त वाटू लागतो.
धनंजय यांनी मत मांडले की - "लग्नाच्या बाजाराच्या संपत्ती-सौष्ठव-यौवन या त्रयीचा फायदा असतो. ती सामग्री अधिक असली, तर अधिक व्यक्तींना, तसेच अधिक आकर्षक व्यक्तींना आकर्षित करता येते" हे खरच साधे समीकरण माझ्या ध्यानात आले नव्हते. मी नेहमी समाज "बाह्यसौंदर्याला" महत्व देतो असे मानत होते. पण या ३ गोष्टी कळीच्या आहेत.
जवळजवळ सर्वांनीच व्यायामालाच पुष्टी दिली आहे. अपवाद - घासकडवी यांचा. पण चर्चा एकसूरी झाली तर काय फायदा? त्यामुळे या वेगळ्या दृष्टीकोनाचे स्वागतच आहे.
अदिती ने वैयक्तीक अनुभव जो मांडला त्याबद्दल मी आभारी आहे. वैयक्तीक अनुभव मांडायला धाडसच हवे.
स्मिताने एक खूप छान उदाहरण विषद केले आहे ज्यामध्ये थोरलीचे लग्न व्हायचे आहे, धाकटीचे झाले आहे आणि लोकं पालकांना खूप कानकोंडं करतात.
आडकित्ता यांनी "फॅट एम्बोलिझम" ही जी टर्म सांगेतली त्याबद्दल थोडे वाचले. भयानक वाटले. हा जर लायपो चा मुख्य साईड इफेक्ट असेल तर लोकांनी लायपो करण्या आधी जरूर जरूर पुनर्विचार करावा.
ज्यांनी ज्यांनी या चर्चेत सहभाग घेतला तसेच हा धागा वचला/ वाचत आहेत त्या सर्वांचे आभार.
दुरूस्ती
मला वाटते घासकडवींनी व्यायामाला विरोध केलेला नाही तर लायपोचे समर्थन केले आहे. लायपो जर कुणाला विचारांती सोपे आणि फायदेशीर वाटत असेल तर त्यात वावगे ते काय असे त्यांना म्हणायचे आहे असे वाटले. त्यांनी व्यायमाचे फायदे नाकारलेले दिसले नाही.
-अनामिक
मानसिक निराशा...
लायपो प्रोसेस वाईट अजिबात नाही. उलट माझं तर असं म्हणणं आहे की तुमच्या मैत्रिणीला मानसिक निराशा अगदी वाईट थराला जाण्याआधी तीने हा निर्णय घेतला हे एका अर्थी बरचं झालं.(मानसिक निराशेचि टोक म्हणजे ब्युलेमिया (मराठी शब्द्?)आणि तत्सम आजार)
अजुन २-३ आठवडे थांबुन बघा, ह्या प्रक्रियेनंतर तिच्यामध्ये आत्मविश्वास बळावला आहे का,तो जर नसेल तर त्यासाठी प्रयत्न हवेत असं मला वाटतं.
प्रियाली,स्मिताशी सहमत. बर्याच वेळेला सगळे उपाय थकले, घरच्याच जवळच्या आप्तस्वकीयांकडुन बोलणी एकावी लागली की ह्या निर्यणापर्यंत मजल जात असावी.
लेखिकेने खर्च डॉलर मध्ये लिहिला आहे,म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये तरी पेशंट्ला हात लावण्या आधी सगळ्या परिणामांची सुस्पष्ट कल्पना दिली जाते, मानसिक तयारी करवुन घेतली जाते. तुमच्या मैत्रिणीच्या बाबतीत हे सोपस्कार झाले असावेत असं मानुया. पुढे तिचं मनोधैर्य राखुन, तब्येतीची काळजी घेणं आपल्या हातात नक्किच आहे.
---मयुरा.
स्कर्टवर रक्ताचे डाग सांडुन
स्कर्टवर रक्ताचे डाग सांडुन घेण्याआधी कथानायिकेने वंकु कुमार ह्यांची जिम पोरी जिम ही सुपरहिट्ट कविता वाचायला हवी होती.
वजन
नितिन गडकरी यांनी वजन कमी करायला कंची सर्जरी केली हो?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लायपो सर्जरी करण्यात काहीच
लायपो सर्जरी करण्यात काहीच गैर नाही. आयुष्यात नैराश्य वगैरे आलं असेल आणि यासारख्या उपायांनी शरिर आणि मनाचं आरोग्य सुधारण्यास थोडा हातभार लागत असेल तर ठीकच वाटतं.
आणि रूममेटच्या मैत्रिणीन ही सर्जरी लग्न ठरावं म्हणूनच केलीय हे तुमच्या रूममेटचं मत आहे की रूममेटला खरंच माहिती आहे? कारण जनरली सर्वसामान्यांपेक्षा जरा वेगळ्या सामाजिक परिस्थितीत ( अविवाहित, विनापत्य, नवरा/बायको दीर्घ काळासाठी दुसर्या ठिकाणी असणं इ.) असणार्या व्यक्तीची प्रत्येक कृती तशाच भिंगातून बघण्यात येते.
माझ्या ओळखीतल्या एका बाईंचा नवरा सौदी अरेबियामधे नोकरीला आहे, तो दर १० महिन्यांनी २ महिने सुट्टी घेउन येतो. या १० महिन्यांत त्या बाईंनी काहीही केलं म्हण्जे नविन साडी नेसली तरी 'अरेरे, बिचारी नवर्याची आठवण येत असेल' किंवा 'नवरा इथे नाही तरी कशी खुशीत असते बघा' अशा कमेंटस ऐकायला येतात. याच्या अगदी उलट म्हण्जे त्यांचा थोडा मूड ऑफ असेल तरी 'सारखं चेहरा पाडून बसायला काय झालं, आता नवरा काय मजा मरायला गेलाय का, हिच्या सुखासाठीच तर राबतोय' असंही ऐकलयं.
रूममेटच्या मते ही लायपो
रूममेटच्या मते ही लायपो करणारी मुलगी तीशीची आहे. तिची स्वतःचे लग्न व्हावे ही खूप इच्छा आहे. ती बरेचदा रडते वगैरे. धाकटी उजली आहे, ही बाकी आहे. याउप्पर मला माहीती नाही.
दोष
दोष समाजाचा नाही. जे सुंदर आहे त्याला लोक सुंदर म्हणणार आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करणार. बाह्यसौंदर्याला महत्त्व देऊ नये आणि फक्त "आतलं सौंदर्य" बघावं ही अपेक्षा थोडी अन्यायकारक आहे. सौंदर्याची लक्षणं टिपणं आणि तिकडे आकर्षित होणं हा शरीरधर्म आहे.
दोष त्या मुलीचाही नाही. ती बिचारी कमकुवत मनाची असेल. अन्यथा ज्या समाजात व्यक्तिस्वातंत्र्याला इतके महत्त्व आहे, खाजगी बाबतीत कोणी ढवळाढवळ करत नाही, बर्यापैकी स्त्री-पुरुष समानता आहे अशा समाजात तिशीतच लग्न होत नाही म्हणून तिला निराशा का यावी?
दोष असलाच तर तिच्या संगोपनात असावा. मुलांना चांगलंचुंगलं खायला-ल्यायला-शिकायला एवढंच देणं पुरेसं नाही. कदाचित तिला आहे ते स्वीकारायला आणि त्यात आनंदी राहायला तिच्या आईवडीलांनी शिकवलं नसावं, स्वत:वर प्रेम करायला शिकवलं नसावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरक्षीरविवेक बाणवला नसावा असा आपला माझा एक अंदाज.
समजा वर काहींनी म्हटल्याप्रमाणे "लग्न होत नाही" हे कारण नसून केवळ सुंदर दिसण्यासाठी तिने ही शस्त्रक्रिया करवून घेतली असेल तरी ते कमकुवत मनाचेच लक्षण आहे असे मला वाटते.
ती मुलगी अमेरिकेत नोकरी करते
ती मुलगी अमेरिकेत नोकरी करते / राहते पण मूळची भारतीय आहे
म्हणजे
तिने लग्न होत नाही म्हणून शस्त्रक्रिया करवली नाही असे म्हणायला बराच वाव आहे. कारण तिला तिच्याएवढाच किंवा तिच्यापेक्षा जास्त लठ्ठ भारतीय मुलगा मिळणे अवघड नाही, किंबहुना थोडासा लठ्ठपणा हा भारतीयांच्या लग्नात बहुतेकवेळा अडसर ठरत नाही.
तरीही अशी शस्त्रक्रिया करवणे म्हणजे मनाचा निग्रह करून व्यायाम करण्याएवढा खंबीरपणा नसल्याचेच द्योतक आहे आणि वरच्या माझ्या प्रतिसादातले मत अमेरिकेतल्या व अमेरिकेत असल्यासारख्या भारतीयांच्याही बाबतीत मी कायम ठेवीन.
मन खंबीर नाहीच आहे असं
मन खंबीर नाहीच आहे असं मानलं(कारण काहीही असो), आणि त्यामुळे कदाचित शारिरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्षही झालं असेल, दुष्टचक्र चालू असावं. या दुष्टचक्रातून कदाचित या शस्त्रक्रियेमुळे / त्यामुळे करावयाच्या असणार्या पथ्यामुळे आणि २-३ आठवड्यानंतर मिळणार्या रिझल्टबद्दल आशा पल्लवित झाल्यामुळे जर मानसिक / शारिरिक आरोग्यात सुधारणा होणार असेल तर तिचा निर्णय ठिक आहे असं वाटतं.
शरिरस्वास्थ्य राखण्यासाठी मनाचा निग्रह,व्यायाम, योग्य आहार ह्याला पर्याय नाही या मताशी अजिबात दुमत नाही..
विनासयास व लगेच
काही जण स्वतः पेक्षा दूसरे काय म्हणतात किंवा काय म्हणतील याकडे जास्त लक्ष देतात. त्याबरोबर त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या विनासयास व मगेच हव्या असतात. त्याचाच परिणाम आहे हा.