छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट
येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: वाट
या विषयाचा अनेक प्रकारे अर्थ लावता येईल - जसे वाट पाहणे, वाट काढणे, वाट लावणे, वाट दाखवणे ... इत्यादी :-) असे आणखी अनेक अर्थ व्यक्त होतील याची खात्री आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २९ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व ३० जुलैच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो पुढील विषय देण्यात येईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निष्कर्ष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.
चला तर मग! "वाट" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!
नवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.
स्पर्धा का इतर?
वाट
वाट मंजे रस्ता असा सरळ सोट अर्थ घेतो आणि फोटो टाकतो आहे,पहिला फोटो महाबळेश्वर मधला आणि दुसरा अब्बे फॉल्स (abbey falls)कडे जाणारा रस्ता आहे ..
रिसाईझ करताना गडबड होती आहे.जमले तितके केलं पण तरी हि स्ट्रेच केल्या सारखे वाटतंय
mobile camera
model-W700
iso 100
expo time 1/60 sec
canon 550D
expo time 1/80 sec
iso 100
focal length 29mm
अवांतर - या धाग्यातले फोटो पण, वाट लागलेले फोटो म्हणून इथे टाकता येतील .:) ;)
दोन वाटा
"वाटेवरून जाताना लागलेली वाट"
फोटो भागमंडला, कूर्ग या परिसरात काढलेला आहे.
camera: Nikon D40X, लेन्सः १८-५५ एम एम
Orkut वर अपलोड केलेल्या फोटोची exif info कशी काढावी?
जमली काढायला तर टाकते.
"ती वाट तार्यांची"
camera: Nikon D40X, लेन्सः १८-५५ एम एम
आय एस ओ: ८००; फो. ले. ३० एम एम; एक्स्पोझरः १/५० से. ; फ्लॅश नाही;अॅपरचरः ४.५
वाटा
१. मृतांच्या शहरांतून (नेक्रोपोलिस) जाणारा रस्ता, पामुक्काले, तुर्कस्थान -
एक्स्झिव्ह माहिती
Camera Canon EOS Digital Rebel XSi
Canon EF-S 18-200mm lens
Exposure 0.004 sec (1/250)
Aperture f/10.0
Focal Length 18 mm
ISO Speed 100
२. कोलोरॅडो नदीने कोरून काढलेली नालाकृती वाट -
एक्स्झिव्ह माहिती
Camera Canon EOS Digital Rebel XSi
Canon EF-S 18-55mm f/3.5-5.6 IS SLR Lens
Exposure 0.006 sec (1/160)
Aperture f/8.0
Focal Length 18 mm
ISO Speed 100
एक्स्झिव्ह माहिती
Camera Canon PowerShot SD1300 IS
Exposure 0.005 sec (1/200)
Aperture f/10.0
Focal Length 8 mm
ISO Speed 80
स्पर्धेसाठी नसलेला फोटू -
४. वुपाट्की नॅशनल मॉन्युमेंट, अॅरिझोना
एक्स्झिव्ह माहिती
Camera Canon EOS Digital Rebel XSi
Canon EF-S 18-55mm f/3.5-5.6 IS SLR Lens
Exposure 0.005 sec (1/200)
Aperture f/11.0
Focal Length 49 mm
ISO Speed 200
चारही फोटो जसे-काढले-गेले-तसे. कातरणे वा इतर संस्कारांशिवाय.
घर , वाट
घर धाग्याप्रमाणे इथेही वेगळी वाट बघायला मिळेल अशी आशा..
पायवाट, शॉर्टकट ह्या वर आधारीत एक लेख मधे वाचनात आला. हॉलंडचा फोटोग्राफर Jan-Dirk van der Burg याने देशभर फिरुन लोक पायवाट्/शॉर्टकट कशी काढतात यावर आधारीत एक फोटोसंग्रह बनवला.
त्याचा एक लघुपट येथे
मेघालयातील झाडाच्या मुळापासुन बनवलेले पूल आठवले.
गार्डियन.को.युके संस्थळावरुन
युट्युब दुवा
१. पाण्याने काढलेली वाट.
१. पाण्याने काढलेली वाट. (वॉर्निंगः या फोटोतले आकार अश्लील वाटण्याची शक्यता आहे.)
कॅमेरा: कॅनन S3 IS, aperture: ३.२, exposure: १/६० sec, flash: होय
(विज्ञानाचा वर्ग सुरू) या गुहेचा भाग काही लाख वर्षांपूर्वी उथळ समुद्राखाली होता. भूगर्भातल्या हालचालींमुळे हा भाग समुद्रसपाटीच्या वर आला, पाणी हटलं, पण जमिनीखाली असणार्या गुहांमधे अशा प्रकारचे आकार सापडतात. गुहांमधे वरून पाणी ठिबकतं. या पाण्यात क्षार विरघळलेले असतात. टपकणार्या पाण्यातले क्षार जमत जातात. वरून खाली लटकणारे असे आकार दिसतातच, त्याशिवाय कधी phallic आकार जमिनीवर तयार होतात. काही ठिकाणी हे एकमेकांना चिकटतात आणि एकच एक खांब तयार होतो. उत्तर अमेरिका खंडात अशा प्रकारच्या गुहा (caverns) अनेक ठिकाणी दिसतात. (विज्ञानाचा वर्ग संपला.) हा फोटो इनर स्पेस कॅव्हर्न, जॉर्जटाऊन, टेक्सास, US इथला.
२. पाण्यावरून काढलेली वाटः
कॅमेरा: कॅनन S3 IS, aperture: ४.५, exposure: १/१६०० sec, flash: नाही
ठिकाणः ग्लेन कॅन्यन धरण, आरिझोना, US नंदनच्या दुसर्या फोटोतल्या नदीने वळण घेण्याआधी काही किलोमीटर. तिथे पोहोचलो तेव्हा सूर्य माथ्यावर नसल्यामुळे नंदनने काढला आहे तेवढा चांगला फोटो मला मिळाला नाही.
३. वाकडी तरीही सरळः
कॅमेरा: कॅनन S3 IS, aperture: ३.५, exposure: १/१०० sec, flash: नाही
ठिकाणः कोणतंही असू शकतं. हे इंग्लंडमधलं in the middle of nowhere असणार्या एका रस्त्यावरून
मोठ्या छायाचित्रांसाठी फोटोंवर क्लिक करावे. पहिल्या आणि तिसर्या चित्रावर काहीही संस्करण केलेले नाही. दुसर्याचा वरच्या बाजूचा अनावश्यक वाटणारा भाग काढून टाकला आहे.
वाट - वाटतो तितका सोपा विषय नाही बरे!
उत्तम विषय. आज सहज म्हणुन फार दिवसांनंतर इथे आलो आणि आलो ते बरे झाले असे वाटले. अनेकांनी सुरेख चित्र दिली अहेत. मीही माझ्या परीने द्यायचा प्रयत्न करतो
शिर्षक - 'सरसर गेला साप नव्हे.........'
मुंबई कैरो प्रवासातील आखाती भागावरुन उडताना नजरेला पडलेला वाळवंटातील एक रस्ता
तपशिल
निकॉन डी ६०/ सिग्मा ७०-३००
आय एस ओ २००
अॅपरचर १०
शटर स्पीड १/४००
फोकल लेंग्थ ५५मिमि
शिर्षक - 'वाट चाल'
- येऊरच्या जंगलात भटकताना दिसलेला, नुकताच पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत काटकीवर चढणारा हा पट्टेरी किडा
तपशिल
निकॉन डी ६०/ टॅमरॉन मॅक्रो १: १ - ९० मिमि
आय एस ओ ४००
अॅपरचर १६
शटर स्पीड १/६०
फोकल लेंग्थ ९० मिमि
शिर्षक - 'वाटेकडे डोळे लावुन बसलोय, वाट पाहत
स्थळ - येउरच्या जंगलातला सिग्नेचर स्पायडर
तपशिल
निकॉन डी ६०/ टॅमरॉन मॅक्रो १: १ - ९० मिमि
आय एस ओ ४००
अॅपरचर १०
शटर स्पीड १/६०
फोकल लेंग्थ ९०मिमि
"आपली आवड"
विसुनाना, मराठे, ऋषिकेश, मन्दार, राजे, ऋता, नंदन, राजेश घासकडवी, ३_१४ वि अदिती, झंप्या, स्मिता, मंदार, सर्वसाक्षी आणि श्रावण मोडक या चौदा सदस्यांनी दिलेल्या विषयावर प्रकाशचित्रे नोंदवली. नंदन आणि मी स्वत: असे दोघेजण स्पर्धेसाठी नसलेले प्रत्येकी एक प्रकाशचित्र घेऊन आलो. सहज यांनी दिलेले दुवे (मेघालय) अतिशय रोचक होते. एकूण ३० प्रकाशचित्रे इथं पाहायला मिळाली. या सर्वांनीच वेगवेगळी प्रकाशचित्रे पाहण्याची संधी दिली याबद्दल आभार.
मला प्रकाशचित्रातले काहीही कळत नाही हे एव्हाना इथल्या सुजाण वाचकांना कळलेलं असावं :-) पण एकूण या स्पर्धेचे स्वरूप ‘आपली आवड’ असे आहे. त्यामुळे मला आवडलेली प्रकाशचित्रे मी येथे निवडली आहेत.
मी ‘वाट’ हा विषय का दिला? – या प्रश्नाचं जसं काही उत्तर नाही तसंच अमुक प्रकाशचित्र मला जास्त का आवडलं याचंही काही उत्तर नाही- म्हणजे तार्किक उत्तर नाही. तसं तर ते पुस्तक का आवडलं, शहर का आवडलं, एखादी कविता का आवडली, एखादा चित्रपट का आवडला याचंही नसतं. निदान माझ्याकडे तरी नसतं. म्हणजे मला जागा, साहित्य, माणसं, कलाकृती इत्यादी गोष्टी आधी आवडतात आणि मग त्या ‘का आवडतात’ असं कोणी विचारलं की मी त्याचा कार्यकारणभाव शोधायला लागते. इथ तसं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही हे चांगलं आहे! तरीही मी ‘स्वगत’ थोडी मोठया आवाजात इथं बोलणार आहे. हे त्या त्या प्रकाशचित्राबद्दलचं माझं मत आहे – सादरकर्त्यांना तोच अर्थ किंवा हेतू अभिप्रेत असेल असं नाही याची नोंद घ्यावी. हे स्पष्टीकरण हास्यास्पद वाटू शकतं – हे ध्यानात घेतलेलं आहे आधीच!
तृतीय क्रमांक: विभागून
नंदन यांचे ‘मृतांच्या शहरातून जाणारा रस्ता’ हे प्रकाशचित्र.
इथ मला आवडली ते मृतांच्या शहरात पाषाणाच्या सान्निध्यात उमलणारी झाडं – मरणं-जगणं हे दोन्ही एकाच वाटेचा भाग आहेत याची जाणीव हे चित्र पाहताना मला (पुन्हा एकदा झाली). शिवाय इथं दूरवर एक दरवाजा दिसतो आहे – तो आत येण्याचा आहे की बाहेर जाण्याचा आहे, आत आलेल्याला बाहेर जाण्याची सोय आहे कां – असे काही प्रश्न माझ्या मनात या चित्राने निर्माण केले.
राजेश घासकडवी यांचे ‘माझा साडेचार वर्षांचा मुलगा आपली वाट शोधताना’ हे प्रकाशचित्र.
वाट अनेकदा विचार करून शोधावी लागते आणि वाट शोधण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर निरंतर चालू राहते याची जाणीव करुन देणारे हे प्रकाशचित्र. शिवाय वाट असतेच, ती शोधली की सापडतेही असा आशावाद जागवणारे चित्रण.
३_१४ अदिती यांचे ‘वाकडी तरीही सरळ’ हे प्रकाशचित्र.
हे चित्र पाहताना चंद्राची वाट अडवली गेली आहे असं वाटलं – आणि कधीकधी वाट शोधायला पुढे न जाता मागे पाउल घ्यावं लागतं ते जाणवून हसायला आलं. शिवाय एक वाट नव्याने निर्माण झाल्यासारखी पुढे जातानाही दिसते आहे. ती किती पुढे जाईल?
द्वितीय क्रमांक: विभागून
मराठे यांचे ‘ही वाट दूर जाते’ मला आवडले ते पाणी, झाडे, आकाश यांच्या सोबत ती वाट आहे म्हणून. ही वाट वळणावळणाची आहे आणि तिला शेवट आहे का नाही याबाबत मनात साशंकता रहावी असा कोन चित्रण करताना आला आहे. या वाटेवर दूरवर कोणीतरी दोन व्यक्ती उभ्या आहेत. त्या थोड्या अधिक स्पष्ट असत्या तर मला कदाचित हे चित्र आणखी आवडलं असतं असं वाटून गेलं – पण माझी अर्थातच खात्री नाही मला.
स्मिता यांचे 'रेल वाट' हे प्रकाशचित्र
नैसर्गिक साधनं आणि कृत्रिम साधनं यांचा एक अनोखा मेळ या प्रकाशचित्रात मला दिसला. रुळांच्या मधल्या ठसठशीत पट्टीने एका वाटेचे दोन भाग केल्याचा भास होतो. झाडांची हिरवाई, रुळांचा काळा रंग, विजेच्या आणि कुंपणाच्या खांबांचे रंग, खडीचा रंग, उंचावरून पाहणा-या डोंगरातल्या दगडांचा रंग हे फार चांगले व्यक्त होत आहेत इथं एकमेकांच्या सोबतीने असं वाटलं. शिवाय या वाटेवर आत्ता कोणीच नाही! त्यामुळे ही वाटच कोणाचीतरी वाट पाहते आहे का? – असा प्रश्न मनात आला.
सर्वसाक्षी यांचे ‘वाटेकडे डोळे लावून बसलोय वाट पहात’ हे प्रकाशचित्र.
‘सिग्नेचर स्पायडर’चा अविर्भाव आवडला एकदम. त्याची पोझ अचूक पकडली आहे. अनेक वाटांपैकी कोणती वाट निवडायची असा प्रश्न त्याच्यासमोर आहे कां नाही हे कळत नाही – कारण तो/ती अगदी निश्चयाने चालत आहे असं दिसतंय. जंगलात कीटक ‘दिसायला’ एक नजर लागते आणि ते ‘टिपायला’ कौशल्य लागतं – ते दोन्ही या प्रकाशचित्रांतून पुरेसं व्यक्त होत आहे.
श्रावण मोडक यांचे 'वांग मराठवाडी धरणातील पाणीसाठ्याचा निचरा करण्यासाठी काढलेली वाट' हे प्रकाशचित्र.
कातळांमधली हिरवाई आणि दोन रंगांचे पाणी यांची सोबत वेधक आहे. असलेल्या वाटेचा उपयोग करायचा आणि नसेल तिथं नवी वाट शोधायची ही पाण्याची प्रवृत्ती इथं चांगली व्यक्त झाली आहे. शिवाय प्रकाशचित्र एका उंचीवरुन काढलेले असल्याने या ठिकाणी पाणी जमा व्हायला अजून किती वाव आहे याचीही एक भीतीदायक जाणीव (ज्याचा आधार बिपिन कार्यकर्ते यांचा याच विषयावरचा धागा) होते.
प्रथम क्रमांक: ऋता यांचे ‘वाटेवरून जाताना लागलेली वाट’ हे प्रकाशचित्र
या प्रकाशचित्रात वाट, वाटेचा अवघडपणा, वाट निर्माण करण्याची माणसाची सामूहिक धडपड, त्यासाठीची साधनं.. असं बरच काही व्यक्त झालं आहे माझ्या मते. यात माणसं आहेत पण त्या माणसांचे चेहरे दिसत नाहीत हे मला जास्त आवडलं. हा प्रवास जणू काही प्रातिनिधिक आहे, निरंतर चालत राहणारा आहे असा संकेत त्यातून मिळतो. शिवाय ही वाट हिरव्या डोंगराच्या जवळ जाण्यासाठी चाललेली आहे – हेही मला आवडलं. साधन आणि साध्य यातला विरोधाभासही इथ व्यक्त होतो अस मला दिसलं.
ओव्हर टू ऋता.
बापरे ! आता खरं
बापरे ! आता खरं आव्हान...आतिवास यांनी फारच सुंदर टिप्पणी केली आहे छायाचित्रांबद्द्ल. त्रयस्थ नजरेतून छायाचित्र बघून एखाद्याच्या मनात आलेले विचार वाचायला खूप आवडलं.
पुढच्या पंध्रवड्यासाठी विषय आहे: सावली
प्रकाशामधे अडथळा आल्यामुळे पडलेली...आणि मायेची, प्रेमाची, दु:खाची सावली वगैरे...सर्व कल्पनांचं स्वागत.
सर्वांना शुभेछा !
पुढचा धागा सुरू करावा ही संपादकांना विनंती.
स्पर्धा तर संपली आहे,
स्पर्धा तर संपली आहे, स्पर्धेदरम्यान जरा इथ फिरकायला जमल नाही पन तरिही ही विषयाशी निगडित चित्र देतो आहे.
आवडली तर कळवा.
१. पाऊलवाट
Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.003 sec (1/400)
Aperture f/5.2
Focal Length 17.4 mm
ISO Speed 125
२. रानवाट
Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.006 sec (1/160)
Aperture f/4.5
Focal Length 13.2 mm
ISO Speed 125
Exposure Bias -1 EV
३. तळ्याकाठची वाट
Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.003 sec (1/320)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV
Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.002 sec (1/500)
Aperture f/5.2
Focal Length 17.4 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV
शेवटचे चित्र बघुन मागे
शेवटचे चित्र बघुन मागे कोणत्याशा चर्चे दरम्यान धनंजयने सांगितलेली क्लृप्ती "वाट इंग्रजी 'एस' (किंवा त्याची पडछाया - मिरर इमेज) आकारात असली की चित्रात उत्तम दिसते" हे आठवले.
पहिल्या चित्राचा विषय जर वाट असेल तर तो १/३ च्याही बाहेर गेल्याने काहिसा विरस होतो आहे असे वाटते. २, ३ छान पण कथानकात काहितरी मिसिंग वाटले. छायाचित्रांसंबंधी व्यक्त करतोय ती काहीशी निगेटिव्ह मते वैयक्तिक घेणार नाही ही आशा
असेच 'एस' असलेले एक चित्र डकवतो.. अर्थातच स्पर्धेसाठी नाही:
+१
४थे चित्र जास्त आवडले.
२ व ३ मधील त्रुटी अशी. चित्र बघताना नजर वाटेवरून "चालत-चालत" जाते. जिथे चित्रातली वाट संपते, तिथे "पोचल्या"सारखे वाटावे अशी कुठलीशी लक्षणीय आकृती हवी. ४थ्या चित्रातली लाल-नारंगी आकृती ही अशी आहे. (आकृती लक्षणीय असावी, इतकेच. ती कितीका क्षुल्लक असेना, त्याबाबत कथानक मनात आणण्याबाबत रसिक समर्थ असतो.) वाटेच्या शेवटी असा कुठला "न्यास" नाही, ही २, ३ बाबत त्रुटी आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
ऋषिकेश, धनंजय, आतिवास व अदिती प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ऋशिकेश यांनी म्हंटल्याप्रमाणे पहिल्या चित्राचा विषय (फोटो काढतेवेळी) वाट हा नव्हताच त्यामुळे वाटेला न्याय दिलेला दिसत नाही.
याउलट दुसरं चित्र माझ्या नेहमिच्या वावरातल होतं आणि वाट हाच मुख्य विषय होता, आणि शेवट माहित नसलेली वाट अस composition करन्याचा प्रयत्न होता.
आणि तिसर व चौथ चित्र म्हनजे माझ्या मते फक्त "good snaps" आहेत कारण मी दोनही ठिकाणी ५/१० मिनिटांपेक्षा जास्त नव्हतो पहिल्याच वेळेस ठरविलेल्या composition मधे जास्त फेरफार न करता final केलेली आहेत.
धनंजय यांचा मुद्दा लक्षात आला, भविष्यात उपयोगी ठरावा.
@ऋषिकेश: तुमची मतं वैयक्तिक घेन्याचा प्रश्नच नाही. उलट सगळ्या प्रतिक्रियांच स्वागतच आहे.
मस्त विषय.. मातब्बरांनी
मस्त विषय.. मातब्बरांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रतिक्षेत!
आता हाफिसात लागली आहे त्याला प्रोजेक्टची वाट म्हणतात.. मात्र त्याचा फटु कसा काढावा बरे? ;)