Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ७ : भारतीय शिल्पकला

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: भारतीय शिल्पकला

जगभर विख्यात असलेली भारतीय शिल्पकला शेकडो वर्षापासून अनेकांना भुरळ घालत आली आहे. मग ती शिल्पे हंप्पीची असो, खजुराहो ची असो. अनेक मोठ मोठी मंदिरे असो किंवा आपल्या गावी असलेले खंडोबा, भैरोबाचे छोटेखानी मंदिर. दगडाना बोलके करण्याची ही सुंदर कला आपण भारतभर कोठेही फिरताना आपल्याला नजरेस पडत असतेच. यामध्ये मानवनिर्मित मंदिरे, लेणी, गुफा, स्तंभ इत्यादीची आपण टिपलेली छायाचित्रे देणे अपेक्षित आहे.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २३ सप्टेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २४ सप्टेंबरच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.
चला तर मग! "भारतीय शिल्पकला" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - पाऊस आणि राजे यांनी टिपलेले विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?

ऋषिकेश Mon, 10/09/2012 - 14:49

In reply to by भडकमकर मास्तर

:) चुक सुधारली आहे

तुमच्याकडूनही "भारतीय शिल्पकला" या विषयाला वाहिलेल्या छायाचित्रांची वाट पाहतोय! :)

वाचक Tue, 11/09/2012 - 06:12

विषय सुंदर आहे, पण परदेशस्थ मंडळींसाठी काही सूट दिली जाईल का? कारण हातात कॅमेरा आल्यापासून परदेशात आहे, त्यामुळे भारतवारीतले काही फोटोज असतील तर शोधावे लागतील. कृपया विचार करावा ही विनंती.

सुनील Tue, 11/09/2012 - 06:52

अलिबागजवळ सासवणे नावाचे एक गाव आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार करमरकर यांचे ते गाव. त्यांच्या राहत्या घराचे आता "शिल्पालय" ह्या नावाने एका प्रदर्शनरुपी संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी तेथे जाण्याचा योग आला होता. तेव्हा काढलेली ही छायाचित्रे.

१) बसलेली म्हैस
२) आदिवासी मुलगा
३) कुत्रा आणि मुलगी

सर्व छायाचित्रांसाठी -

Camera: SONY
Model: DSC-H9
ISO: 100
Exposure: 1/250 sec
Aperture: 4.0
Focal Length: 5.2mm

मे २००९



अमुक Tue, 11/09/2012 - 08:39

In reply to by सुनील

पायाची कात्री करून हातान्नी गुडघे कवेत घेऊन बसलेल्या गड्याचे शिल्प टिपले आहे का तुम्ही ?
ते असेल तर बघायला आवडेल.

राजेश घासकडवी Tue, 11/09/2012 - 08:49

In reply to by सुनील

भारतीय शिल्पकला म्हटल्यावर अर्थातच मंदिरांतील आणि गुंफांमधील धार्मिक शिल्पंच डोळ्यासमोर येतात. तो वारसा महत्त्वाचा असला तरी आधुनिक कलाकारांच्या शिल्पांच्या नमुन्यांनी सुरूवात झालेली आवडली. आदिवासी मुलाचा पुतळा विशेष छान.

इरसाल म्हमईकर Tue, 11/09/2012 - 10:12

पोतराज आणि कडकलक्ष्मी :
'दार उघड बया आता दार उघड' असं आई मरिआईला आवाहन करत हातातल्या कोरड्यानं (चाबुक) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात दारी येणारा पोतराज. जटा वाढवून मोकळे सोडलेले केस किंवा कधी अंबाडा घातलेला, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र पांघरलेले आणि हातात 'कोरडा', गळ्यात मण्यांच्या माळा, कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आनि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांमध्ये भीतीचे ठिकाण ठरतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरिआईच्या नावाने दान मागतो.


पोतराजाबरोबर बहुतांशी त्याची जोडीदारीण म्हणजे पत्नीही असते. गुडघ्यापर्यंत नेसलेली नऊवारी साडी, हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हातामध्ये टिमकी अथवा मृदंगासारखे एखादे चर्मवाद्य घेवुन ते वाजवत, बेभान होवून नाचणार्‍या पोतराजाबरोबर तीही त्याची साथ देत असते. तीला कडकलक्ष्मी असेही म्हटले जाते. पोतराज आपल्या वैविद्ध्यपुर्ण नृत्याने आणि हातातल्या 'कोरड्याच्या' फटकाराने पोतराज देवीची अवकृपा तसेच संकटे, विपत्ती दूर करतो असे मानले जाते.

कॅमेरा : निकॉन डी ५०००
लेन्स : बेसिक १८-५५ लेन्स

आतिवास Tue, 11/09/2012 - 23:07

बंगळुरु शहरात थोडा वेळ हाताशी होता. 'महानंदी'चं देऊळ अवश्य पहा अशी शिफारस होती.
आणि मी गेले ते बरचं झालं. आतला अवाढव्य नंदी आवडलाच पण त्याआधी आवडलं लांबून दिसणारं हे दृष्य!

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.002 sec (1/401)
Aperture: f/5.6; Focal Length: 6.2 mm; ISO Speed: 80, Flash Used: No

जुलै महिन्यात मणिपूरमध्ये होते, काम संपल्यावर थोडा वेळ होता म्हणून काकचिंग (Kakching)मध्ये डोंगरावरचं महादेवाच देऊळ पहायला गेलो. ते देऊळ नेहमीसारखं होतं. पण देवळाच्या दुस-या टोकाला मला हे एक छोटसं मंदिर दिसलं. मी पहिल्यांदाच या मूर्ती पाहिल्या. त्याची गोष्ट माझ्या सोबत असणा-या मंडळींना (ते सगळे तिथलेच होते) सांगता आली नाही. आता शोधायला हवी.

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.009 sec (1/106)
Aperture: f/3.4; Focal Length: 9 mm; ISO Speed: 80; Flash Used: No

पाँडिचेरीच्या ग्रामीण भागात एका घरात जाताना डाव्या बाजूला नंदीच्या असंख्य (!! म्हणजे नेहमीपेक्षा जरा जास्तच!) मूर्ती दिसल्या. त्यांचीही गोष्ट माहिती नाही.

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.01 sec (1/102)
Aperture: f/4.2; Focal Length: 12.8 mm; ISO Speed: 512; Flash Used: No

वल्ली Fri, 14/09/2012 - 10:32

१. मोरगावजवळील लोणी भापकर ह्या लहानशा गावातील मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात असलेली ही यज्ञवराहाची प्राचीन मूर्ती.

२. पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील ही शिवपिंडीचा उर्ध्व आणि अधोगामी आरंभ आणि अंत शोधणार्‍या हंसरूपी ब्रह्मा आणि वराहरूपी विष्णू असलेले शिवलिंगाचे शिल्प

३. सातार्‍याजवळील पाटेश्वर मंदिरातील अग्नी-वृषाचे शिल्प
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
(ऋग्वेद - ४थे मंडल, सूक्त ५८.३)

कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस एक्स ११० आय एस.

रोचना Fri, 14/09/2012 - 14:12

बंगळूर जवळ होयसलांच्या 'सोमनाथपुरा' मंदिर. त्याच्या आवारातल्या खांबांकढे पाहत राहिलं की हे दगडी खांब शतकानुशतके भिंगरींसारखे गर्रगर्रगर्र फिरतच उभे आहेत की काय असं वाटू लागतं:

(कॅमेरा: कॅनन अए-१० पॉवरशॉट)

सांची स्तूप च्या आवारातील भूतकाळाच्या नाहिशा झालेल्या चेहर्‍यांसमोर हसमुख वर्तमान:

(लूमिक्स- एल-एक्स-३)

सांचीतलीच एक कोरीव कथा:

(लूमिक्स- एल-एक्स-३)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/09/2012 - 10:37

इतरांच्या कलाकृतीचं श्रेय आपण कसं घ्यायचं असा प्रश्न मला अनेकदा पडतो. इथे संदर्भ शिल्पांचा. संग्रहालयातली चित्रं, म्यूरल्स, फेस पेंटींग इत्यादी अनेक गोष्टी अशातल्याच. या निमित्ताने इतरांच्या कलाकृतीचे श्रेय आपल्याला काही प्रमाणात मिळवायचे असल्यास काय प्रकारचे फोटो काढावेत?
रोचना यांच्या पहिल्या फोटोत माणूस असल्यामुळे प्रमाणं समजतात, व्हॅल्यू अ‍ॅडिशन वाटते. काही ठिकाणी काळ्या दगडातल्या शिल्पांचे किंवा भगभगीत उजेडातही दगडी शिल्पांचे HDR फोटो काढणं हे पण आताच्या, digital photography खिशात मावण्याच्या दिवसात तसं मेकॅनिकल कामच. त्यात वेगळेपणा, अधिक काहीतरी, कूल पॉईंट्स कसे आणावेत?

मी Sat, 15/09/2012 - 15:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

महत्त्वाचा मुद्दा, माझ्या मते, इतरांच्या कलाकृतीचे फोटो काढताना स्वत:चा परिप्रेक्ष्य टाळून मूळ कलाकृती निरपेक्षपणे जाणवेल हे भान ठेवावे, अर्थात कलाकृतीची ओळख हा उद्देश नसल्यास कलाकृतीचे बोधन हा सापेक्ष मुद्दा होईल व त्यात कल्पनांचे असे किंवा असे मनोरे रचणे शक्य आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 17/09/2012 - 04:54

In reply to by मी

स्वतःचे परिप्रेक्ष्य काय असेल आणि त्याचा अर्थ कसा लावला जाईल याचा फार विचार करावा असं वाटत नाही. उदा, वाट या विषयासाठी मी काढलेला हा फोटो पहा:

या फोटोचा आतिवास यांनी लावलेला अर्थ:
हे चित्र पाहताना चंद्राची वाट अडवली गेली आहे असं वाटलं – आणि कधीकधी वाट शोधायला पुढे न जाता मागे पाउल घ्यावं लागतं ते जाणवून हसायला आलं. शिवाय एक वाट नव्याने निर्माण झाल्यासारखी पुढे जातानाही दिसते आहे. ती किती पुढे जाईल?
मला अभिप्रेत होता तो अर्थ फर्माच्या तत्त्वाचा होता. वार्‍यांची दिशा, धावपट्टीची दिशा आणि विमानाचे गंतव्य स्थान यांचा विचार करता वाकडी वाटही सरळ असू शकते असा अर्थ मला अपेक्षित होता. या फोटोतला चंद्र माझ्या दृष्टीने अँकर नसून अडगळ होता. प्रत्येकाने आपल्याला आवडेल असे अर्थ काढायला हरकत नसावी.

हे शब्दांत व्यक्त होणं झालं, असंच प्रतिमा वापरूनही करता येईल.

कल्पनांचे मनोरे रचताना वाईड-अँगल-लेन्स वापरूनही गंमत करता येईल. उदा ही प्रतिमा पहा. तुमच्या लिंकाही आवडल्या.; माहितीपूर्ण आहेत.

धनंजयचे पहिले दोन फोटो मला आवडले. त्यात regular pattern आहे. अशा प्रकारचे पॅटर्न्स मला आवडतात, विशेषतः दोन पॅटर्न्स एकमेकांवर आलेले (superposition) रोचक वाटतात.

मी Mon, 17/09/2012 - 09:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःचे परिप्रेक्ष्य काय असेल आणि त्याचा अर्थ कसा लावला जाईल याचा फार विचार करावा असं वाटत नाही. उदा, वाट या विषयासाठी मी काढलेला हा फोटो पहा:
या फोटोचा आतिवास यांनी लावलेला अर्थ:
हे चित्र पाहताना चंद्राची वाट अडवली गेली आहे असं वाटलं – आणि कधीकधी वाट शोधायला पुढे न जाता मागे पाउल घ्यावं लागतं ते जाणवून हसायला आलं. शिवाय एक वाट नव्याने निर्माण झाल्यासारखी पुढे जातानाही दिसते आहे. ती किती पुढे जाईल?
मला अभिप्रेत होता तो अर्थ फर्माच्या तत्त्वाचा होता. वार्‍यांची दिशा, धावपट्टीची दिशा आणि विमानाचे गंतव्य स्थान यांचा विचार करता वाकडी वाटही सरळ असू शकते असा अर्थ मला अपेक्षित होता. या फोटोतला चंद्र माझ्या दृष्टीने अँकर नसून अडगळ होता. प्रत्येकाने आपल्याला आवडेल असे अर्थ काढायला हरकत नसावी.

सहमत, कलाकृतीचे निरपेक्ष बोधन हा आस्वादाचा 'एक' भाग आहे, तसेच, त्यात स्वतःचा परिप्रेक्ष्य मांडणे हा 'दुसरा' भाग आहे. कलाकृती जर गम्य असेल(राजा रवि वर्माचे चित्र) तर त्याच्या अर्थबोधनाच्या कक्षा सीमित असतील, पण कलाकृती जर अमूर्त(उदा. जवळपास अमूर्त- तुमचा फोटो, किंवा पिकासोचे चित्र, पुर्ण अमूर्त - **František Kupka - fugue en deux couleurs) असेल तर अर्थबोधन हे अस्वादकावर अधिक अवलंबून असू शकते, फोटोग्राफरचा परिप्रेक्ष्य विषयाला/उद्देशाला मारक न ठरणे हिताचे.

तुमच्या लिंकेतील फोटो दिसला नाही, :(

** चित्र कॉपिराईटेड असावे.

विसुनाना Sat, 15/09/2012 - 12:24

ही भारतीयांची 'शी'ल्पकला म्हणता येईल काय? ;) ह.घ्या. (ह. घ्या. चा अर्थ हलकेच घ्या असा आहे हे नमूद करतो.)

पद्मनाभपुरम प्यॅलेसमधला फोटो.

अमुक Sun, 16/09/2012 - 06:48

In reply to by विसुनाना

प्रस्तुत वास्तुनमुन्याच्या आरेखनात बराच विचार केलेला दिसतो. शारीरिक जडणघडणीच्या कलाने केलेले बान्धकाम. हव्या त्या जागी खळगे आणि योग्य जागी आणि योग्य बाजूने उतार केलेले दिसतात. प्रवाही पदार्थ वाहून नेणे सोपे केले आहे. सुबकता येण्यासाठी चौकट गुळगुळीत केलेली असली तरी पायाच्या जागी खरखरीत पोत ठेवून व्यक्ती घसरणार नाही याची खबरदारी घेतलेली दिसते. बाजूची भिन्त पाण्ढरी ठेवण्यामागे मशकें सहज दिसावीत व जमल्यास 'हस्तक्षेप' करून नायनाट करता यावा ही दूरदृष्टी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्यन्तिक आणिबाणीच्या वेळी उपयोगात आणता येणारा, म्हणून हा वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना गणता येईल.

वाचक Sun, 16/09/2012 - 04:07

भारतातला एकमेव फोटो सापडला, तोच चढवतो आहे. गोड मानून घ्यावा.
(साधारण २ वर्षांपूर्वीचा आहे, पहिलाच कॅमेरा होता, म्हणून कॉम्पोझिशन वगैरे काही कळत नव्हते, अजूनही फार कळते अशातला भाग नाही पण निदान हा फोटो तरी वेगळा काढला असता.)

tanaji

कॅमेरा - panasonic lumix FZ-35

धनंजय Sun, 16/09/2012 - 19:40

लेपाक्षी मंदिराच्या आवारातील खांब

कॅमेरा : Canon PowerShot SX100 IS
अनावरण (एक्स्पोझर): 1/500 सेकंद
छिद्रमान (अ‍ॅपर्चर): f/4.0
आय.एस.ओ : ८०
चित्र जिंप २.८ प्रणालीने कृष्णधवल केलेले आहे आणि कातरलेले आहे.

धनंजय Sun, 16/09/2012 - 19:58

कपिलेश्वरी-फोंडा गोवा येथील कपिलेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार - चिर्‍यात कोरलेल्या खिडक्या

कॅमेरा :
अनावरण (एक्स्पोझर) : Canon PowerShot SX100 IS
छिद्रमान (अ‍ॅपर्चर) : f/4.0
आय.एस.ओ : ८०
चित्र जिंप २.८ प्रणालीने कृष्णधवल केलेले आहे आणि कातरलेले आहे.

धनंजय Sun, 16/09/2012 - 22:56

कोचि सेंट फ्रान्सिस चर्च : बाप्तिस्मा पात्रावरील लाकडी कोरीव कमान

कॅमेरा : Canon PowerShot SX100 IS
अनावरण (एक्स्पोझर): 1/8 सेकंद
छिद्रमान (अ‍ॅपर्चर): f/2.8
आय.एस.ओ : २००
चित्र जिंप २.८ प्रणालीने कातरलेले आहे, आणि प्रकाशमान अरेषीय (नॉनलिनियर) प्रमाणात बदललेले आहे.

चिंतातुर जंतू Mon, 17/09/2012 - 10:38

>>रोचना यांच्या पहिल्या फोटोत माणूस असल्यामुळे प्रमाणं समजतात, व्हॅल्यू अ‍ॅडिशन वाटते.

>>धनंजयचे पहिले दोन फोटो मला आवडले. त्यात regular pattern आहे. अशा प्रकारचे पॅटर्न्स मला आवडतात, विशेषतः दोन पॅटर्न्स एकमेकांवर आलेले (superposition) रोचक वाटतात.

सहमत. 'इतरांच्या कलाकृतीचे श्रेय आपल्याला काही प्रमाणात मिळवायचे असल्यास काय प्रकारचे फोटो काढावेत?' याचं उत्तर अशा फोटोंत आहे असं म्हणेन. याशिवाय कधीकधी शिल्पाची संदर्भचौकट फोटोला वेगळं परिमाण देते. उदाहरणार्थ, माओच्या एका पुतळ्याचा हा फोटो पाहा :

इरसाल म्हमईकर Mon, 17/09/2012 - 14:31

कोनार्कच्या सुर्यमंदीरातील 'भोग-मंडप"

भोग-मंडपाच्या सुरुवातीलाच असलेल्याच 'गंग'साम्राज्याच्या (बहुतेक) राजचिन्हाच्या दोन मुर्तींपैकी एक...
( यात सिंहाने आपल्या पायाखाली एका हत्तीला दाबुन धरलेले आहे)

भोग-मंडपाच्या शिल्लक स्तंभांमधून दिसणारा 'जगमोहन' या मुख्य वास्तुच्या प्रवेशद्वाराचा काही भाग..

Camera : Canon PowerShot A550 (7.1 MP)
Exposure :1/125 sec
Aperture:7.1
Focal Length :6mm

घनु Wed, 19/09/2012 - 12:33

पुण्यातील जाधवगड येथील काही शिल्पं :)

१.

२. जाधवगडावरील "आई" ह्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराशी असलेले हे शिल्प

अवंतर : ह्या शिल्पाखाली 'विठ्ठ्ल कामत' ह्यांचे विचार :

सहज Wed, 19/09/2012 - 17:22

लोणार सरोवर छाचिसौजन्य- नासा

तिरुमाला - आंध्र प्रदेश (छाचिसौजन्य- विकीमेडिया)

जबलपूर - बॅलान्सिंग रॉक (छाचिसौजन्य- विकीमेडिया)

अमुक Sun, 23/09/2012 - 18:21

साधारण १००० वर्षाम्पूर्वी 'होयसला' राजवटीत बान्धल्या गेलेल्या अनेक मन्दिराम्पैकी ही दोन मन्दिरे.
अत्यन्त कमी ठिकाणी आधार ठेवून केलेले सलग कोरीवकाम, काही पोकळ मूर्ती आणि घासून घासून धातूसारखी झिलई आणलेले गुळगुळीत खाम्ब ही वैशिष्ट्ये.

विनन्ती : कृपया ब्राउज़रची खिडकी महत्तम करून चित्रे पाहावीत.

प्रकाशचित्र १ - प्रवेशद्वारावरील कमान (बेलूर मन्दिर)

तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/60 sec
Aperture: 3.5
Focal Length: 20.7mm
-----------------------------------
प्रकाशचित्र २ - बेलूर मन्दिराचा अन्तर्भाग

तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/8 sec
Aperture: 2.7
Focal Length: 6mm
----------------------------------
प्रकाशचित्र - ३ नक्षीदार झरोके (हळेबिड मन्दिर)

तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/60 sec
Aperture: 3.5
Focal Length: 16mm
--------------------------------------------

खालील प्रकाशचित्रे स्पर्धेसाठी नाहीत.

अ. 'तुळतुळीत' खाम्ब (हळेबिड)

तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/8 sec
Aperture: 2.7
Focal Length: 6mm
----------------------------------------
आ. झरोके (हळेबिड)

तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/8 sec
Aperture: 3.2
Focal Length: 8.3mm
-------------------------
इ. हळेबिड मन्दिराच्या बाहेरील भिन्ती


तपशील :
Camera Model: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/60 sec
Aperture: 2.7
Focal Length: 6mm
----------------------------

सुनील Tue, 25/09/2012 - 02:33

स्पर्धेचा शेवट २३ सप्टेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २४ सप्टेंबरच्या सोमवारी विजेता घोषित होईल

राजे Wed, 26/09/2012 - 10:28

सर्वांनीच छान चित्रे येथे दिली आहेत त्या बद्दल सर्वात आधी सर्वांचे आभार. नेहमीप्रमाणे मी जरा उशीराच निकाल जाहीर करत आहे या बद्दल क्षमस्व ;)

एखाद्या छायाचित्राचे मुल्यमापन करून त्यातील प्रथम क्रमांकाचे निवड करणे यासाठी जी पात्रता लागते ते नक्कीच माझ्याकडे नाही हे मला माहीती आहे, फक्त योगायोगाने मागील स्पर्धेमध्ये श्री सर्वसाक्षी यांना मी खेचलेले चित्र आवडले म्हणून हा क्रमांक निवडण्याचा अधिकार यावेळी मला मिळाला एवढेच. त्यांचे आभार. चित्रांना मी प्रथम, द्वितिय व प्रथम क्रमांक मला आवडले व मी दिले या तत्त्वावर दिले आहेत, त्यांचे शास्त्रिय (?) पद्धतीने "का" उत्तर देणे मला तरी शक्य नाही आहे, त्यामुळे हा निकाल गोड मानून घ्यावा :)

तृतिय क्रमांक-
वल्ली यांनी दिलेले छायाचित्र "यज्ञवराहाची प्राचीन मूर्ती" खरचं सुंदर आहे, वराहमुर्तीवर केलेली नाजुक कलाकृती मनमोहून घेते यात वाद नसावा.

द्वितिय क्रमांक-
रोचना यांनी दिलेलेल्या तीन पैकी मला "सांचीतलीच एक कोरीव कथा" हे छायाचित्र खूप आवडलं. सुंदर कोरीव काम असलेले हे छायाचित्र एक वेगळाच आनंद देत आहे.

प्रथम क्रमांक- धनंजय यांची खेचलेले "लेपाक्षी मंदिराच्या आवारातील खांब"

लेपाक्षी मंदिर मी स्वतः पाहिलेले असल्यामुळे तेथील शिल्पकला किती उच्च दर्जाची आहे याची थोडीफार मला कल्पना आहे. १६ व्या शतकात निर्माण केलेल्या या मंदिराचे वैशिष्टच शिल्पकला आहे असे म्हणावे लागेल. मला वाटतं धनंजय यांनी खेचलेले खांब हे नाट्य मंडपाचे किंवा कल्याण मंडपाचे असावेत. लेपाक्षी मंदिर आपल्या भिंती चित्रांसाठी देखील तेवढेच प्रसिद्ध आहे.

"लेपाक्षी मंदिराच्या आवारातील खांब" हे विजयनगर साम्राज्यांत कलेला मिळालेले सर्वोच्च स्थान तोलून उभे आहेत असे मला हा फोटो पाहील्यावर वाटलं.

(धनंजय यांनी पुढील स्पर्धा चालू करावी ही विनंती)

धनंजय Thu, 27/09/2012 - 03:53

धन्यवाद राजे.

नवे आव्हान येथे दिलेले आहे. (नव्या आव्हानाचे बीज मला या आव्हानातच सुचले : शिल्प आणि पोत यांचा घनिष्ठ संबंध आहे.)

विरूपाक्ष मंदिराच्या आवाराला चोहूकडून बंदिस्त करणारी जी इमारत आहे, तिचे हे खांब आहेत. (गोमटेश्वराभवतीच्या अशा इमारतीला "सूत्रालय/सुत्ताले" म्हणतात, पण ती शैली वेगळी, काळ वेगळा...)

या चित्रात एक अर्धवट कथानक रेखाटले आहे. शिल्पांत खाली प्राण्यांवरती तोललेले खांब आहेत, खांबांची रांग छताला आधार देत आहे. पण रांगेतले खांब जवळजवळ समांतर असले, तरी काही खांब सामांतर्यापासून विचलित आहेत. त्या खांबांच्या पायथ्याशी असलेल्या प्राण्यांकडेही आपले विशेष लक्ष जाते. अशा काही क्लृप्ती वापरून बघणार्‍याची नजर थोडा अधिक वेळ गुंतवून ठेवली आहे. रेंगाळताना बघणारा आपणहून कथासंदर्भ तयार करतो. तो कदाचित अनुभवातला असेल, आपण बघितलेल्या वेगळ्याच कुठल्या देवळाचा असेल. स्वतःच्या दोलायमान मनःस्थितीचा संदर्भ असेल, किंवा उलटपक्षी स्वतःच्या बुलंद मनःस्थितीचा संदर्भ असेल...

चित्राचा रोख ठरवल्यानंतर कातरणे, कृष्णधवलता वगैरे निर्णय तसे सोपे होते. कातरणाच्या चौकोनाचे उंची:रुंदी गुणोत्तर (आस्पेक्ट रेशियो) ही बाब अनपेक्षितपणे महत्त्वाची ठरली. खांबांची रांग लांबच-लांब आहे, असा भास झाला पाहिजे, असा माझा हेतू होता. गुणोत्तर फार उभट घेतले तर खांबांची रांग फारशी लांब नसल्याचा भास होत होता. गुणोत्तर फार बसके घेतले, तर आवारातले पर्यटक, कथानकाला पोषक नसलेला इमारतीचा भाग... असे काहीबाही चित्रात येत होते, आणि पुन्हा खांबांची रांग फारशी लांब नसल्याचा भास होत होता. पण दोन्ही टोकांच्या मध्ये मला हवा तो भास करून देणारे कातरण मला सुदैवाने सापडले.

कपिलेश्वरीच्या चित्रातील रचनात्मक घटक म्हणजे चिर्‍याचा सूक्ष्म पोत, खिडकीच्या कोरलेल्या गजाचा मध्यम पोत आणि मजबूत कर्णात पडलेल्या सावलीचा मोठ्या आकाराचा पोत. हे तीन एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकांचे पोषण करतात.

(बाप्तिस्मापात्रावरील कोरीव लाकडाचे चित्र द्यायला नको होते. ते चित्र मुळात अगदीच कळकट होते, पण पोस्टप्रोसेसिंगमुळे थोडेसे जिवंत झाले. माझ्या पुढ्यात दोन्ही चित्रे असल्यामुळे "हे चित्र कित्तीकित्ती चांगले" असे सापेक्षतेने वाटून गेले असावे.)