..

धन्यवाद......

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

लोकांना असेही जगायला लागते हेच विषण्ण करणारे आहे.
आम्ही सर्व ठिकाणी पुरे पडू शकत नाही. मात्र जिथे जसे शक्य असेल तिथे मदतीचाच हात पुढे केला पाहिजे हे नक्की.
१) मी (अर्थात माझ्या परिस्थितीत) तुमच्या जागी अस्तो तर सरळ त्या बाईला, मुलिन्सहित कामावर बोलावले असते.
२) मुली बरोबर आल्यात तर पेशण्टकडे दुर्लक्ष होऊ शकेल ही व्यावहारिक कुशन्का मी मनातुन उडवुन लावली अस्ती. (कारण समजा माझी पत्नी सासूचे आजारपण उरकते आहे अन त्याच वेळेस आमची लहान अपत्ये देखिल आहेत तर ही शन्का पत्नीबाबत आली अस्ती का? नाही ना? तेवढा विश्वास टाकावा, विश्वास टाकला तर मिळतो)
३) दारुड्या नवर्‍याच्या कान्गाव्याची/गुन्डागर्दीची भिती मी बाळगली नसती, उलट शक्य ते सर्व उपाय त्यावर करुन ठेवले अस्ते. समजा ती बाई वा तिचा नवरा यांचा संबंधच आलेला नाही असे गृहित धरु, तरीही, माझ्या अपरोक्ष,कुणीही तिर्‍हाईत चोर/दरोडेखोर्/दारुडा तसाही माझ्या घरात घुसू शकतोच की! मग काय मी पण माझ्या बायकापोरान्ना कुलुप लावुन बन्दिस्त ठेवत नाहीना? आला तर स्वतः वा अन्य (ठकाकडून) कुणाकडून दोन कानाखाली चढवायची व्यवस्था खर तर कायमस्वरुपीच केलेली असावयास हवी असे माझे मत.
४) व्यावहारिक फायद्यातोट्याचे विचार करीत बसले तर आयुष्यात कधीच कुणालाच कसलीच मदत होणार नाही हे निश्चित. त्यामुळे अशा प्रश्नात मी केवळ भौतिक गरजान्पुरता विचार करुन बाकी व्यवहार बाजुला ठेवणेच पसंत करतो. नशिबाने लिम्बी देखिल याच विचारसरणीची असल्याने अशा विषयावर आमच्यात मतभेद होत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२. आणि ३. हे मुद्दे तसे बिनतोड आहेत. फक्त घरी एकटा असलेला पेशंट स्वतः उठून दारही उघडू शकत नसण्याच्या अवस्थेत असताना (अति व्हल्नरेबल) पुनर्विचार करायला भाग पाडतात. आत पेशंट एकटा पडला तर दार फोडून आत यावे लागेल अशा स्थितीत तुम्ही कितपत रिस्क घ्याल राडेबाजी होण्याबाबत?

एरवी स्वतः कोणाला कानाखाली चढवणे असा प्रकार मी उपस्थित असताना गृहीतच आहे हो. पण मी स्वतः उपस्थित नसताना सदैव कोणीतरी माझ्यावतीने ते काम करत असेल तर घरी आणखी कोणाची ड्यूटी लावण्याचीतरी काय गरज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< एरवी स्वतः कोणाला कानाखाली चढवणे असा प्रकार मी उपस्थित असताना गृहीतच आहे हो. पण मी स्वतः उपस्थित नसताना सदैव कोणीतरी माझ्यावतीने ते काम करत असेल तर घरी आणखी कोणाची ड्यूटी लावण्याचीतरी काय गरज? >>

म्हणजे तुमच्या वसाहतीत चौकीदार वगैरे यांची योजना असेलच की. ते सुरक्षिततेकरिता आणि परिचारिका ही रुग्णसेवेकरीता असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुमचे मुद्दे बरोबर आहेत, म्हणुनच मी "माझ्या परिस्थितीत" असे म्हणले.

मी जवळ उपलब्ध फेरीवाले/स्टॉलवाले/हातगाडिवाले/रीक्षावाले अशा सगळ्यान्शी "मैत्रीपूर्ण" संबंध ठेवले आहेत. मुले घर ते शाळा असे पायी वा सायकलने जाता येता देखिल त्यान्चे वर नीट लक्ष ठेवणारी "यंत्रणा" उभे करणे तसे अवघड नसते. वेळ लागतो, पण एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे रहायचे म्हणल्यावर हे करुन ठेवावेच लागते. यात आणि जन्गलात रहाताना घराला कम्पाऊण्ड करण्यात फरक काहीही नाही. फक्त तिथे वन्य श्वापदे/प्राण्यान्चा सामना करण्यास बरोबर श्वानादिक प्राणी सोबतीला घेतलेले असतील. इथे शहरात मानवी श्वापदे/प्राण्यान्चा सामना करण्यास तोडीस तोड मानवी प्राणीच सोबतीला घ्यावे लागतील.

[>>>> पण मी स्वतः उपस्थित नसताना सदैव कोणीतरी माझ्यावतीने ते काम करत असेल तर घरी आणखी कोणाची ड्यूटी लावण्याचीतरी काय गरज? <<<
त्या बाईन्ची ड्युटी लावली आहे हे गृहित धरुन वरील सर्व विश्लेषन मी केवळ त्या बाईचा "दारुडा नवरा" येऊन त्याने दन्गा केला तर काय, या सूत्रास धरुन सान्गितले आहे. ]

असो.
तुम्हाला आल्या प्रसंगातुन निभावण्याकरता शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक पर्याय आहे, पण तो व्यवहार्य कितपत याची शंका आहेच.

दोन्ही मुलींना तुम्ही तुमच्या घरात ठेवून घेऊ शकता. मोठी मुलगी लहानीकडे लक्षही देऊ शकते शिवाय त्यांच्या आईचेही अधूनमधून त्यांच्याकडे लक्ष राहीलच.
अर्थात हा पर्याय तुमच्या घरातल्या सर्वांनाच रूचावयास हवा शिवाय त्यांच्या खाण्यापिण्याचीही जबाबदारी उचलावयास हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

"ग्रेट पिपल अल्वेज थिन्क अलाईक" अशी काहीशी इन्ग्रजी म्हण आहे, बरोबर लागू पडते ना आपल्याबाबतीत? Blum 3 मी देखिल तेच सुचवलय बघा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला देखील हा पर्याय बरा वाटतो. तात्पुरता का होईना त्या मुलींना आईचा सहवास, माया मिळेल. मग परत जेव्हा ती बाई नवे काम शोधेल तेव्हा परत कष्ट आहेतच त्या चिमुकल्यांच्या मागे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याही मनात पहिला विचार वर limbutimbu आणि घंटासूर यांनी व्यक्त केलेलाच आला.
माणुसकी म्हणून तोच पर्याय सगळ्यात बरा वाटतो. पण तसे केल्याने तुम्ही दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला गेला नाही म्हणजे मिळवले.

बाकी १५ दिवसांचा पगार देवून घरी पाठवणे योग्य नाही असे वाटते. नर्सच्या घरची पार्श्वभूमी बघता त्या पैश्याचा सदुपयोग होईल असे वाटत नाही. तसे न झाल्यासही ती घरी राहून (दुसरे काम न घेता) मुलींची काळजी घेईलच याचीही खात्री नाही.

पण मग त्या मुलींचा प्रश्न कायमचा सुटणार नाहीच... त्यांना या लहान वयात नंतर तसंच आईविना दिवसभर एकटं रहायचं असेल तर आईची सवय पंधरा दिवस तरी लावावी का?
मन कठोर करून का असेना पण या प्रश्नाचं उत्तर नाही असं देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अगदी हेच म्हणायचे आहे. तसंही दारूडा नवरा कधीही येउन राडा करूच शकतो, त्यात मुली घरी एकट्या किंवा त्यांच्या आइबरोबर तुमच्याकडे असण्यानं काहीही फरक पडणार नाही.

१५ दिवसांसाठी अशी सोय करून कदाचित त्यांची सवय,इंडिपेंडन्स डिस्टर्ब होउ शक्ते, नवरा निरूद्योगी असल्याने कधीकधी मनाची नाही तरी जनाच्या लाजेखातर मुलींची काळजी घेत असेल तर तेही अजिबातच बंद होउ शकेल (अर्थात ही फक्त भाबडी आशा आहे).
नवर्‍याला समुपदेशनाची गरज आहे, तो तयार असेल तर त्याला व्यसनमुक्ती केंद्र / समुपदेशन वगैरे साठी जी फी लागेल ती देता येइल, नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन करता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिला आत्ता तुम्ही केलेली कुठलीही मदत काही अंशी तिचा त्रास आणि बऱ्याच अंशी तूमची टोचणी कमी करेल, तिला कायम-स्वरूपी मदत करण्यासाठी खालील गोष्टी करता येउ शकतील.

1. तिच्या मुलांचा पाळणाघराचा खर्च, तुम्ही एकट्याने, अजून कोणाला गोळा करून, करू शकलात तर उत्तम. (मर्यादीत काळासाठी)

2. तिला कायमचे घर-कामावर ठेऊन घेणे, त्यामुळे तुम्ही तिला वेळो वेळी मदत करू शकाल किन्वा समूपदेशन करू शकाल.

हे पर्याय किती व्यवहार्य आहेत हे ज्याचे त्यानी ठरवावे, अन्यथा तिच्या आयुष्यातील जाणीवपुर्वक/यदृच्छेने घडलेल्या गोष्टींची तुम्ही जबाबदारी घ्यावी (किती) हाही प्रश्न आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहसा अश्या आयाबाई/काम्वाल्या बायका 'आजारी' पडतात / अपरिहार्य कामासाठी गावी जातात, तेव्हा त्यांना किमान ७०% पगारवाढ हवी असते, इतकेच मी स्वानुभवावरुन सांगु शकतो. या व्यक्ती फारश्या मॉरल नसतात तसेच यांना राग पटक्न येतो. तसेच यांची लॉबी असते, एका बाईला तुम्ही काढुन टाकलंत तर दुसरी बाई मिळणं फार कठीण होतं, याचं कारण हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सहसा अश्या आयाबाई/काम्वाल्या बायका 'आजारी' पडतात / अपरिहार्य कामासाठी गावी जातात, तेव्हा त्यांना किमान ७०% पगारवाढ हवी असते, इतकेच मी स्वानुभवावरुन सांगु शकतो. या व्यक्ती फारश्या मॉरल नसतात तसेच यांना राग पटक्न येतो. तसेच यांची लॉबी असते, एका बाईला तुम्ही काढुन टाकलंत तर दुसरी बाई मिळणं फार कठीण होतं, याचं कारण हेच.

सहसा इन्क्रिमेंटची लेटर मिळाल्यावर कर्मचारी राजीनामे देतात तेव्हा त्यांना किमान __ पगारवाढ हवी असते. हे कर्मचारी फारसे मॉरल व लॉयल नसतात तसेच यांना बॉसचा राग पटकन येतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

श्री.गवि ~

ज्या कौटुंबिक स्थितीतून तुम्ही आणि सौ. सध्या जात आहात त्यातून मी स्वतः गेलो असल्याने तुमच्यासमोर असलेल्या मानसिक द्वंद्वाचे चित्र मी पुरेपूर नजरेसमोर आणू शकतो. माझी आई त्या पॅरिलिसीसमधून उठू शकली नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की ज्या तीन आयांना मी (एकी पाठोपाठ एक या रितीने) सेवेसाठी ठेवले होते त्यातील क्रमांक दोन या व्यक्तीने आम्हाला अपेक्षित असलेली सेवा दिली होती. क्र. १ आणि ३ यानी आलेल्या दिवसापासून "मी हे करणार नाही, ते करणार नाही" सम नन्नाचाच पाढा वाचला होता. खोलवर चौकशी करता समजले की या दोघीनाही आजुबाजूच्या अपार्टमेन्ट्समध्ये भरपूर म्हणावी अशी कामे उपलब्ध होती. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सेवादात्याला अवास्तव महत्व आल्याचे जाणवत गेले. [तिसरीच्या अरेरावीच्या बाबतीत तर मी इतका हतबल झालो की, शेवटी एक निर्णय घेतला 'इनफ' आणि स्वतः दोन महिने रजा घेऊन आईची जितकी जमेल तितकी सेवा केली...तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत. मी फार मोठी सेवा केली असे बिलकुल म्हणणार नाही, पण स्वानुभवाने सांगतो पहिले दोन-तीन दिवस विचित्र वाटते...नंतर सर्वकाही अंगवळणी पडतेच पडते.]

आता क्रमांक २ बाबत : अगदी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे नव्हे तर त्यापेक्षा काहीशी वेगळी स्थिती या आयाची होती. नवरा गेला होता पण सासू व दीर होते. दीरमहाराजांना मटक्याचे जबरदस्त व्यसन. एकच अपत्य पण ते ५-६ वर्षाचे असल्याने बाई त्या मुलाला आमच्या घरात घेऊनच येत आणि तो मुलगाही आमच्या घरातील अन्य मुलामुलीसमवेत टीव्ही वा टेरेसवर जाऊन खेळ करीत असे. दोघांचेही दुपारचे जेवण आमच्याकडेच असल्याने तोही प्रश्न नव्हता. प्रश्न होता तो तिच्या 'अ‍ॅडव्हान्स' पैसे मागण्याच्या वृत्तीचा. म्हणजे सेवेबद्दल जी काही रक्कम ठरली होती ती त्या बाईने अगदी पहिल्या आठवड्याच अ‍ॅडव्हान्सच्या नावाखाली उचलली आणि संपविलीदेखील. पुढच्या आठवड्यात तर "आम्हाला साहेब, उचल लागणारच. घरात दुसरे कुणी मिळवत नाही. दीरही पैसे आण म्हणून मारहाण करतो. सासू मध्ये पडत नाही, माझ्या मुलाला खावून टाकलंस असंच सारखं बडबडत बसलेली असते. म्हणून पुढच्या महिन्याच्या पगारातील रक्कम आत्ताच द्या." मी सुन्न, घरातील सुन्न. कारण तिला आईच्या सेवेसाठी ठेवले (तिच्या सेवेबद्दल अजिबात तक्रार नव्हती) ते महिन्याच्या पगारबोलीवर पण एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच तिची उचल तब्बल तीन महिन्याची झाली. शेवटी 'आर्थिक' असहमती या एकाच कारणावरून नाईलाजास्तव क्रमांक २ च्या आयाला निरोप द्यावा लागला. पण त्याचे तिला फार वाईट वाटल्याचे दिसले नाही, कारण परत तेच. तिला शेजारच्या अपार्टमेन्टमध्ये त्याच सायंकाळी धुण्याभांड्यासाठी बोलावणे आले.

त्यामुळे तुम्ही म्हणता "ती बाई इथून रजा मिळाली तर घरीच बसेल का? की आणखी कामच शोधेल?" अशी परिस्थिती कामवाल्या बाईंबाबत सध्यातरी उठत नसावा. कारण ती बाई काम शोधणारच (असल्यांचे ऐदी व्यसनी नवरे बायकोला घरी बसू देत नाहीतच ही वस्तुस्थिती आहे) आणि ते तिला मिळेलच अशीच शहरातील परिस्थिती आहे.

प्रश्न आहे तो मुलींच्या संगोपनाचा. पण अशी परिस्थिती अशा अटेन्ड्न्ट वा आयासम काम करणार्‍या स्रियांच्याच बाबतीत संभवते असे नसून अगदी बॅन्क आणि शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रियांच्या वाट्यालाही आलेली आहे. एक उदाहरण आहे माझ्याकडे, पण ते इथे अप्रस्तुत होईल म्हणून देणे टाळतो.

तुमच्या मातोश्री लवकरात लवकर त्या आजारातून उठून चांगल्या हिंडत्याफिरत्या होऊ देत ही सदिच्छा.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री अशोक पाटील,

सविस्तर प्रतिसादाबद्दल आणि सदिच्छांबद्दल धन्यवाद. ते उदाहरण (बँक /शिक्षण क्षेत्रातले) इथे दिल्यास अप्रस्तुत होईल असं अजिबात वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं माझी निकड भागत असती आणि तिचा संसार चालत असता तर मी फार विचार केला नसता. ४ वर्षाच्या मुलीने २ वर्षांच्या मुलीला सांभाळणे अतिशय खेदजनक आहे परंतु त्यातून त्यांच्या रोजच्या अन्नाची सोय होत असेल तर :-((दुर्दैवाने) ठीक वाटते. Sad विशेषतः, ४ वर्षाच्या मुलांनाच भरवण्याची गरज असते. ती दोन वर्षाच्या पोरीला काय भरवणार? Sad आणि घास कोंबला आणि त्या बाळाच्या घशात अडकला तर? अरेरे! विचार न केलेला बरा. Sad

घंटासूर म्हणाले तसे तुम्ही त्या मुलींना तुमच्या घरी बोलावू शकता. जर त्या व्यवस्थित राहत असतील तर प्रश्नच मिटला, नसतील तर मग पुढला मार्ग काढता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात आधी मी काय केलं असतं हे सांगतो.

काम देताना मुलाखतीत मला काय अपेक्षित आहे, अन नोकरी मागणारा/री ते करू शकतो, माझ्या वेळा(टाईमिंग्स) पाळू शकतो, व पगारा बाबत दोघे सहमतीस पोहोचले आहेत हे बघणार. त्यानंतर ते काम होते की नाही फक्त इतके अन इतकेच बघणार. फाssर दया आली तर जाउन त्या दारूड्या नवर्‍याला २ कानाखाली देऊन घर सांभाळायला भाग पाडीन. बाकी काहीही करणार नाही.

आता या वागण्याचं विशलेषण.

सिंपथी(Sympathy) अन एंपथी(Empathy) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सिंपथी म्हणजे सहानुभूती. अन एंपथी म्हणजे सह-अनुभूती. (थोSडा अर्थछटेचा फरक आहे. दया येणे: सिंपथी. अन अती दया येऊन त्या व्यक्ती ऐवजी तिची दु:खे स्वतःच भोगण्याचा प्रयत्न करणे : एंपथी. असे ढोबळपणे म्हणता येईल.)

तिच्या आयुष्यात वा घरी असणारे प्रॉब्लेम्स तुम्ही उत्पन्न केलेले नाहीत. ते सोडविण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. ऐच्छिक मदत जरूर करा. पण कृपा करून, केवळ ती व्यक्ती तुमचे घरी काम करते आहे म्हणून गिल्टी वाटून घेऊ नका. समजा तुमच्या हापिसात तुम्ही कुणास नोकरीवर ठेवता आहात. अन त्या नोकरास तुम्ही देत असलेल्या पगारात त्याची/तिची मुले पाळणाघरात ठेवता येत नाहीत, तर ती तुमची जबाबदारी कशी? त्या मुलांना हापिसात घेऊन यायला देणार का? तुम्ही हापिस चालविणार की नोकर रिलीफ चॅरिटी?

बघा बुवा. माझा विचार निष्ठूर वाटेल, पण असाच विचार करावा लागतो. अन्यथा आजपर्यंत मी उपचार केलेल्या प्रत्येक गंभीर/असाध्य/दुर्धर रुग्णाशी एंपथी घेऊन माझे मानसिक संतुलन कधीच गेले असते. सिंपथीवरच काम भागवावे लागते, अन सिंपथी-एंपथी मधली सीमा आपल्या मनात स्पष्ट ठरवून ठेवावी लागते. हे पचायला अवघड, अन करायला अजूनच अवघड. पण मानसिक संतुलन टिकविण्यासाठी आवश्यक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्वतःच्या ओळखीने (असतील तर) तिच्या मुलींसाठी जवळचे पाळणाघर शोधून देणे, पाळणाघरचालकाला परिस्थितीची कल्पना देणे आणि जमल्यास पोलीसात ओळख असेल तर तिच्या नवर्‍याचा बंदोबस्त तिची संमती असेल तर करणे याशिवाय अन्य मदत एक मध्यमवर्गीय माणूस काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांनी खूप इन्व्हॉल्व होऊन प्रतिक्रिया दिल्यात त्याचा आनंद होतोय. कालच ही आपली चर्चा झाल्यावर मी तिच्या मुलींना कामावर आणण्याचे सुचवले आणि हरकत नसल्याचे सांगितले. पण सुदैवाने मधल्या काळात तिच्या घरी तिची बहीण बाळंतपणाला काही महिने आली आहे. ती लहान मुलींना सांभाळते आहे. अर्थात तिचे दिवस पूर्ण होत येतील तसतसं तिला ते कठीण होणार आणि डिलिव्हरीच्या वेळी तिलाच सांभाळायची जबाबदारी हिच्यावर.. ते एक अ‍ॅडिशनल.

असो याला अंत नाही. सध्या सोय झालीय म्हणून आम्ही सगळेच आनंदात आहोत. वन डे अ‍ॅट अ टाईम हेच खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पोस्टमधे उल्लेख केलेली आया (बाई) आम्ही सर्वतोपरी सहकार्य दाखवल्यानंतर काहीवेळा लहान मुलीला घेऊन घरी आलीसुद्धा.. गोड आहे मुलगी.

मात्र काल ती घरी नसताना नवरा अतिरिक्त दारु पिऊन आला आणि त्याने त्या सोबतीला राहिलेल्या गर्भारशी बहिणीला मारहाण केली. स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीला ती रडू लागल्याने इतक्या जोरात कानाखाली मारले की थप्पड पडल्यानंतर मुलगी एकदम गुंगीतच गेली आणि राहिली.. ती दोन दिवस झोपेतच आहे. तिला ताप चढला आहे. त्या मनुष्याला मुलींविषयी तिडीक आहे, मुलगा न झाल्याने..

त्यातच या बाईच्या घरमालकाने भाडे थकल्याने आणि कदाचित या तमाशामुळे त्याच रात्री तिला घराबाहेर काढले आहे..

आता तिला भरपगारी रजा दिली आहे आणि वरुन आर्थिक मदत दिली आहे. नवर्‍याचा याक्षणी पत्ता नाही.. पण तो कधीही येऊन मारहाण करु शकतो.

अशा स्थितीत तिच्या लहान मुलींना आणि गर्भवती बहिणीला (तिचा नवरा परागंदा आहे) सुरक्षित स्थळी त्यांच्या आजोळी पाठवण्याची सोय करण्याचा सल्ला आणि आर्थिक मदत दिली आहे.. आणि त्याप्रमाणे सध्यातरी त्या लहानग्या पोरी आजीकडे सुरक्षित स्थळी पोचल्या आहेत.

आणखी काय करणार??! Sad

इथे सगळे इन्व्हॉल्व झाले होते म्हणून अपडेट करावासा वाटला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्यावर सगळी संकटं एकावेळीच का येतात असं वाटून गेलं. त्या स्त्रीवर आलेली वेळ बघून अतिशय वाईट वाटले. पण अश्या परिस्थितीत तुम्ही केलेली मदत तिला उपयोगी ठरेल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

हा फार थोडा भाग झाला..

ज्या आजीकडे सुरक्षित स्थळ म्हणून गेलेत तिथे नुकताच त्या आजीच्या नवर्‍याने तिच्या डोक्यात सुरी मारली होती आणि हाणामारीत आई आणि मुली या दोन वर्षांच्या लहानगीवर पडून तिचे कॉलरबोन तुटून बाहेर आले. ती छोटी अजूनही त्यातून रिकव्हर झालेली नाही..

प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीच नाही. पोलीसात गेले तर गावचे पोलीस घरातला मामला घरात मिटवायला सांगतात.

शिवाय आता याक्षणी या बाईचे घरही गेलेच आहे... आता दुसरे शोधण्यापासून तयारी.. पुन्हा नवीन जागा मिळालीच तरी तो येईलच परत....

जाऊदे.. किती दुर्दैवाचे दशावतार त्याला सीमा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या २ वर्षाच्या जीवाने काय काय ते सहन करावं! तुमच्या गरजेमुळे त्या स्त्रिच्या कुटुंबाबद्दल ही माहिती मिळाली. आपल्या समाजात असे आणखी किती जीव सोसत असतील याची कल्पना करवत नाही.
तरी आपल्या आजारी मातोश्रींना याबाबत सांगू नका. त्यांची मनस्थिती बिघडणं बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

ही असली जाजमाखालची नको ती दृष्ये जाजमाखालीच बरी. उगाच आपल्या सुखवस्तु डोक्याला ताप. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो.

कुणाचं 'भोगणं' (सफरिंग) पाहण्याचा व्हॉयुरिस्टीक आक्रस्ताळेपणा इतका का वाढलाय आजकाल?
कोणतीही टिआर्पीवाली सिरियल पहा. मग रिअ‍ॅलिटी शो असो की फ्यामिली ड्रामा.
कुणी दु:ख भोगत असेल तर कुणी सुख तर कुणी आणखी कुणाला. जीभ बाहेर काढून ल्याहा ल्याहा करीत असलेल्या कुत्र्यासारखे टीव्हीसमोर बसलेले घराघरातले दर्शक (हा एक अत्याचार अजून. दर्शक नाही हो. प्रेक्षक.) काय दर्शवतात??

सुखवस्तू डोक्याला ताप म्हणून नाही.

माझ्या वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे मी. की या सिच्युएशनला काय करीन. अन हे जे अपडेट आहे, त्यात नक्कीच त्या दारूड्या नवर्‍याची वाट लावीन. उगं नेटावर टाईप करून माझा नाकर्तेपणा लपविणार नाही. काहीच नाही करता आलं, (दंडाचा घेर कमी पडल्याने) तर एक पोलीस नावाचा दंड असतो. ठाण्यात तक्रार नोंदवा. इथे ४ पैसे फेकायची ताकत आहे, तिथे त्या शिपायास चहापाणी द्या, तो त्याचा दंड अन दांडा वापरून त्या दारूड्याला अक्कल नक्की शिकवेल. गावचे पोलीस मिटवायला सांगतात कारण त्यांना एकतर दम द्यावा लागतो किंवा लाच. (ते स.नो. अन उकंपा प्लीज नोटच)

असो.
माझा आक्रस्ताळेपणा पुरे आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उगं नेटावर टाईप करून माझा नाकर्तेपणा लपविणार नाही.

>>>>

Sorry Shaktimaan.. Chook jhali..

Eka simple sharing kade baghnyacha tumcha drushtikon great aahe..

Ya thikani punha ashi chook honaar naahi.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दादा,
तुम्हाला हिणवण्याचा इरादा खरंच नव्हता.
पण अपडेट वाचून राहवलं नाही.
जे करायचं ना, ते मनापासून करून टाकावं. पुढचामागचा विचार न करता. जो होगा, अच्छा होगा. ठिकेय. माझं चुकलं. तुम्हाला खरंच दुखवायचं नव्हतं. पण मला नाही सहन होत कुणाचं दु:ख पहाणं. तसले पिक्चर पण पूर्ण पहावत नाहीत माझ्याच्याने.
वरचा प्रकाटाआ करता येईना. माफ करा.
माफी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ठीक आहे हो.. जे व्हायचं ते झालं.. जाऊदे आता...

मनापासून प्रतिसाद लिहिलात आणि दिलगिरी वाटली हे बास आहे.

तरीही आता परत हे आणि असं लिहिण्याची इच्छा नाही..

धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही करुणामय परिस्थिती आहे भारतीय समाजाची!!
आपण त्यांना मदत केलीत हे वाचुन बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> त्या स्त्रीवर आलेली वेळ बघून अतिशय वाईट वाटले
+१. आणि तुम्हाला वेळ नाहि म्हणून तिला ठेवले आणि हेतु कितीही चांगला असला तरी शेवटी नसत्या भानगडीत (मनस्तापात) अडकल्याने तुमच्याबद्दलही वाईट वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय लिहावं हेच शेवटपर्यंट ठरू शकलं नाही. आयूष्यात असं दूदैव वाट्याला येणं क्रुर आहे, म्हणूनच सर्वप्रथम परमेश्वर त्या स्त्रिला परीस्थीतीशी झगडण्याची शक्ती, इछ्चा व अनूकूलता भरभरून देओ हीच प्रार्थना.

तसच हे उघड आहे की सदरील अन्याय व दूर्दैव हे केवळ स्त्रिजन्म मिळाला म्हणूनच त्या व्यक्तीला अशा प्रकारे भोगावा लागत आहे. लेखकाने चार पांढपेशा लोकांसमोर ही गोश्ट आणायचे काम केले ते नक्किच आवश्यक वाटते. ए.सी. ऑफीसमधून अंतरजालावर स्त्रिमूक्तिच्या बेगड्या कल्पनांना भारून लूटूपूटूच्या उड्या मारणार्‍यांचा सूळसूळाट आहे हे जरी खरं असलं तरी कोणी सच्चे समाजसेवक, एन.जि.ओ. वगैरेशी नगडीत व्यक्तीही इथ असाव्यात असं वाटत, या प्रकरणात ते लक्ष घालतील अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0