भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही.

देशापुढील अनेक समस्यासह, भ्रष्टाचार, महागाईसारखे अनिर्णीत आणि अनियंत्रित प्रश्नांमुळे समाजात सतत रोष वाढत चालला आहे; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून झटपट पैसा मिळवण्याची स्पर्धा दिसून येत आहे. आर्थिक धोरणे पूर्वी सामाजिकतेवर आधारित होती, आता त्यांचे लक्ष्य बदलले आहे. सामाजिकतेऐवजी भांडवल उभारणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समतेच्या उद्देशाने आखण्यात येणा-या मोठमोठय़ा योजनांनासुद्धा भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने त्यांचे लाभ अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मोठय़ा संख्येने जागृत होणा-या समाजाला, तरुणवर्गाला या उणिवा आणि चलाखी चटक्न कळते. त्यामुळेच भ्रष्टाचारविरोधासारख्या मोहिमांत आता लक्षणीय सहभाग वाढू लागला आहे. येत्या काही वर्षातील राजकारणाला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. मात्र सरकारने केवळ कायदे करून भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही. कायदा हा सर्व समस्यांवर अक्सीर इलाज आहे, असा आपला गैरसमज हो ऊन बसला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करण्याचा आग्रह धरला जातो. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि आता जनलोकपाल कायद्याचा आग्रह धरला जात आहे. पण नैतिकता, नीतिमत्ता काय कायद्याने उत्पन्न होणारी चीज आहे काय ? याचा विचार व्हायला हवा आहे. बेरोजगार तरुणांना विनाव्यत्यय आणि चिरीमिरी न देता रोजगाराची कामे मिळू शकतील का?, पोलिस शिपाई-हवालदार आणि पालिका कर्मचा-यांच्या भ्रष्ट व्यवहारातून सामान्यांची सुटका होऊ शकेल का?, पैसे न मोजता मतदारांची रेशनकार्डे मिळतील का?, प्रामाणिकपणे स्वबळावर काम करू इच्छिणा-यांना सुलभपणे परवानगी, परवाने मिळतील का, असे अनंत प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहेत. अनुत्तरीत प्रश्नांच्या यादीला अंत नाही. या प्रश्नांना ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीत केलेल्या आंदोलनातूनसुद्धा उत्तरे मिळाली नाहीत. तसेच प्रत्येक चांगली गोष्ट कायद्यानेच होते हा एक भ्रम आहे. कायद्याविनादेखील समस्याविरहीत सुदृढ समाज निर्माण करायावयाचा झाल्यास प्रथम मूल्यांची रुजवण महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात घरा-घरातून व्हायला हवी.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वैयक्तिक नैतिकता अंगी बाणविल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणे दुरापस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे न संपणारे प्रश्न आहेत सर्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपेक्षित धागा आहे.

त्याची सुरुवात घरा-घरातून व्हायला हवी.


ही खरी ग्यानबाची मेख आहे.
जे काय भोवताली होतंय, त्याला मी, "मी" अन मीच रिस्पॉन्सिबल आहे, ही जाणीव जेंव्हा उपजेल, तेंव्हा आपण 'सुपरपॉवर' होऊ. तोपर्यंत, शिवाजी जन्मावा, पण शेजारच्या घरी. हीच आपली इच्छेच्छा! (सुपर्लेटीव्ह डिग्री ऑफ इच्छा)

प्रश्नासोबत उत्तर लिहिलेला धागा काढल्याबद्दल धन्यवाद!
(वाद घालण्यात धन्यता मानणारा, धन्य वादी)
आडकित्ता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फक्त आपली नैतिकता वाढवून चालणार नाही तर ज्यांची नैतिकता खालावली आहे त्यांचे कडे "ते चूकीचे करत आहेत" या दृष्टीने पहाता यावयास हवे. ते कसे होणार? उदाहरणच द्यायचे तर माझ्या नवर्‍याचा एक गुजराथी मित्र अतोनात काळ्या धंद्यात बुडलेला होता. पण आमचा तो खूप चांगला "फॅमिली - फ्रेंड" होता. मग अशा लोकांना जर मित्र/ सामीजीक प्रतिष्ठा मिळते तर ते का म्हणून त्यांचे वागणे सुधारतील? आताच बातमी आली की त्याचे धंदे इतके खोलवर होते (जे आम्हाला माहीत नव्हते, शंका होती पण इतके सिव्हीअर असतील याची कल्पना नव्हती) की तो छोटा राजनच्या गँग मधील हवाला केस मधील मुख्य म्हणून पकडला गेला. आता हाच मित्र त्यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसला की आम्हाला सांगत असे की - प्लीज आजके दिन "नॉनव्हेज" खा के घर मत आना =)). म्हणजे जे लोक इतकं सोवळं पाळतात त्यांची स्वतःची पैशाबाबतची मूल्ये मात्र खालावलेली असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मग अशा लोकांना जर मित्र/ सामीजीक प्रतिष्ठा मिळते तर ते का म्हणून त्यांचे वागणे सुधारतील?


इथेच तर खरी गरज आहे ना आपली नैतिकता सुधारायची?
तुम्ही डोळे उघडायला तयार नाही आहात. कोण मित्र? कोणता समाज? जर नैतिक मित्र असतील तर तो माणूस कोणता सामाजिक दर्जा बाळगेल? २० वर्षांपूर्वी लाच मागायला बिचकणारा 'सदगृहस्थ' आज किती निर्लज्जपणे लाच मागतो? का?? कारण एकच. समाजाची सामायिक नैतिकता. ती कुठून येते? तर वैयक्तिक नैतिकतेतून. हा माणूस प्रतिष्ठित म्हणून कसा काय मिरवू शकतो? श्री४२० सिनेमा लागला होता तेंव्हा याला दगड मारले असते लोकांनी. फार जुना इतिहास नाहिये तो.

मी दारू पितो.
आजकाल घराघरांत याला 'ड्रींक्स घेणं' म्हणतात. २० वर्षांपूर्वी 'दारु पिऊन आलाय' म्हणून घरच्यांनी इतका गदारोळ केला असता, की माझी हिम्मत नसती झाली परत दारू प्यायची. आता बायको म्हणते, 'यांना नं.. वीकेण्ड्स्ला एक दोन ड्रिंक्स मीच घेऊ देते. बरं अस्तं नै पुरुषांना थॉडं रिलॅक्स झालेलं?..'
वैयक्तिक नैतिकता.
सापेक्ष.
तरीही अतीशय महत्वाची.
विचार करा.
.
इतरांची नैतिकता सुधारणे हा एक अत्यंत विकृत प्रकार आजकाल फोफावला आहे.
म्हणजे कसं?
की मी सांगितलं. अरे बाबाहो, सत्यनारायणाची पूजा घालता आहात. समोर माझी म्हातारी आजारी आहे. जरा तो लाऊडस्पिकर कमी आवाज करता का?
उत्तर काय येतं?
'ओ काका! तिकडे ते मशिदीत भोंगा लावतात. ते चालतं का तुम्हाला? चला, निघा हितनं. च्याय्ला! एकतर वर्गणी द्यायची बोंब! गबल्या, आवाज वाढव रे जरा. च्याय@#%#%%.. ओ काका! हला! जावा तिक्डं. त्यांना सांगा. जगला वाचलात तर हिक्डं या, आवाज कमी कर सांगाया.. '

Can you see what i am trying to say?? Maybe I am too incoherant.

स्वतःपासून सुधारणा करा. अमुक कुणी सांगितलं म्हणून नका करू..
या सगळ्या म्हणी अन वाक्प्रचार असतात ना?
ते मानवी अनुभवांचे 'सार' असते. Inculcation of human experiences. 'घरोघरी मातीच्या चुली' हे झालं फक्त उदाहरण. तसं, Charity begins at home.
आधी स्वतःला सुधारा. 'त्या'च्या कडे बोट दाखवून स्वतःची कमतरता झाकू नका. Your job is to try and improve YOURSELF. However much you try, you cant make a whit of change in any other person.

बघा विचार करून..
(अनैतिक) आडकित्ता

-----------------------------------
(>>म्हणजे जे लोक इतकं सोवळं पाळतात त्यांची स्वतःची पैशाबाबतची मूल्ये मात्र खालावलेली असतात.<< देव/सोवळं अन नैतिकता यांचा संबंध नाही. यावर भाष्यासाठी वेगळा धागा प्लीज! -(नास्तिक : आडकित्ता))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

असंगाशी संग प्राणाशी गाठ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतिक / अनैतिक ही सीमारेषा बरीच सापेक्ष आणि धूसर आहे.

मी व्हरमाँट ला होते तिथे एका दुकानात "स्फटीकाचा" गणपती होता. मी दर आठवड्याला जाऊन तिला विचारायचे - "किंमत कमी करणार?" आणि ती उत्तर द्यायची "मी तुला "डिस्काउंट देऊन , माझ्या अन्य गिर्‍हाइकांवर अन्याय करणार नाही.". नेमका त्या दुकानाचा जेव्हा वार्षिक सेल होता तेव्हा मी नवर्‍याकडे गेले होते आणि तो गणपती तेव्हा कमी किंमतीत घेऊ शकले नाही. परत विचारता - तेच उत्तर. अशा रीतीने तिच्या नैतिकतेच्या कल्पनांमधून मला तो गणपती मिळालाच नाही कारण आर्थात मला तितके पैसे त्यात घालायचे नव्हते.

स्वतःपासून सुरुवात करायची हे बरोबर आहे. या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. जसे ऑफीसात असताना केवळ काम करणे/नेट ब्राऊझ न करणे हे तरी मी करू शकते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्याला जे नैतिक वाटेल ते दुसर्‍याला वाटेलच असे नाही. पैसे घेणार्‍याला कदाचित ते नैतिक (?) वाटेल पण तेच जर तो देत असेल तर अनैतिक वाटेल. हे एक उदा.

बाकी कायद्याची जर कडक अंमलबजावणी झाली तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील..अन आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतिक काय ? आणि अनैतिक काय ? हे कोण आणि कसं ठरवणार हाही एक प्रश्नच आहे.

बहुतेक वेळा नैतिकता हा सोयीचा मामला असतो..

नैतिकता म्हणजे काय? ती कशी सांभाळायची हे 'मी' सांगेन .. ते इतरांनी ऐकावे..
पण मी जे सांगीन ते मलाही लागू होईलच असे नाही .. त्या वेळेस नैतिकतेचे नियम बदलु शकतात - असाच बहूतेक वेळेला पवित्रा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आधी भ्रष्टाचार म्हणजे काय ते एकदा निश्चित केले पाहिजे म्हणजे नीट चर्चा करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रष्टाचार म्हणजे काय याची व्याख्या करण्याचा हक्क आपल्याला नाही. तो केवळ टीम अण्णांकडे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेच म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भ्रष्टाचार व त्यासारख्या अडचणीं वर संघाची रोजची शाखा ह्या सारखा एक नक्कीच उपयुक्त मार्ग आहे. म्हणजे नित्य उपासना (देवाची नव्हे तर संस्कारची) हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.

अर्थात हा माझा वैयक्तिक विचार

(बघा म्हणजे)
पक्षी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही रोज शाखेत जाता?
वावा! छानच.

(बघा म्हणजे)

नक्की काय दाखवणार आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दुष्काळाबाबत... स्वारी स्वारी स्वारी! भ्रष्टाचाराबाबत इतकं छान विवेचन केलंया ऐनापुरेभाऊंनी, पण धागा मातूर उपेक्षितच राह्यलंया. असो, ज्याचं त्याचं नशीब ! भ्रष्टाचार ( पुण्य कमविण्यात) संपणारच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0