जुने सिनेमे... नव्या काळात

तसा चर्चाविषय शीर्षकातच उघड होतोय. त्याची प्रेरणा मुक्तसुनित यांनी तिथल्या चर्चेच्या संदर्भात दिलेला हा प्रतिसाद... त्यांची पूर्वपरवानगी न घेताच मी ती प्रेरणा उचलली आहे. या धाग्याला 'अलिकडे काय पाह्यलंत?' चा इंटरसेक्टिंग सेट समजण्यास हरकत नाही.

सध्या येणार्‍या हिंदी (तसंच इंग्रजी आणि मराठी) चित्रपटांचा दर्जा बघता मी जुने चित्रपट बघण्याचा सपाटा लावला आहे. मला कधी सत्यदर्शी, सामाजिक चित्रपट आवडतात तर कधी मनाला फक्त विरंगुळा देणारे मनोरंजक चित्रपट बघावेसे वाटतात. कोणता चित्रपट बघायचा हे ठरवलेलं नसेल तर मी जुन्या काळी हिट्ट झालेले किंवा गाणी बघून उत्सुकता वाटलेले चित्रपट शोधून बघते. हेतू एकच की एकेकाळी चित्रपट बहुसंख्य लोकांना आवडला होता म्हणजे त्यात थोडं तरी मनोरंजन-मूल्य असेल नाहीतर किमान गाणी ऐकून तरी समाधान मिळेल. थोडक्यात काय तर, 'राउडी राठोड' सारखे चित्रपट पाहून करमणूक तर सोडाच पण जी मनस्वी चिडचिड होते ती तरी नक्कीच होत नाही.

कालच देव आनंदचा 'ज्वेल थीफ' पाहिला, आवडला. तो काळ, तेव्हाची सामान्य जनतेची आवड, उपलब्ध तंत्रज्ञान यांचा विचार करता तो मला आताच्या काळातल्या अनेक चित्रपटांपेक्षा उजवा वाटला. त्यातली गाणी आणि स्टारकास्ट ही सर्वात मोठी जमेची बाजू असली तरी चित्रपटाचे कथानक, त्याचा वेग, त्यातले रहस्य, क्लायमॅक्स सगळंच खूप छान जमवलंय. प्रेक्षकांना अगदीच बाळबोध समजून रहस्य फक्त चित्रपटांच्या पात्रांपुरतीच मर्यादित आहेत असंही नाही आणि 'रेस' छाप दर १० मिनिटाला एक ट्विस्ट असंही नाही. एक रहस्य चित्रपटाच्या पूर्वार्धात तयार होते आणि उत्तरार्धात त्याची होणारी उकल अशी साधी-सरळ कथा आहे. आतापर्यंत तश्या कथानकाचे अनेक हिंदी/मराठी आणि काही इंग्रजी चित्रपट, मालिका बघतल्या असूनही काल हा चित्रपट बघताना मला तो पुरेसा मनोरंजक वाटला.

तसाच आणखी आवडलेला जुना चित्रपट म्हणजे 'कोहरा'. हा चित्रपट मी पाहिला 'ये नयन डरे डरे' या गाण्यामुळे चाळवल्या गेलेल्या उत्सुकतेमुळे! तो पाहिल्यानंतर मी स्वतःच्याच उत्सुकतेला शाबासकी दिली एवढा मला आवडला. योगायोगाने तोही एक रहस्यपटच निघाला पण इथे त्याचा विचार करण्याचा मुद्दा एवढाच की ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातूनही तो चित्रपट एवढा परिणामकारक होतो म्हणजे याच्या दिग्दर्शक आणि एकूणच टीमने त्यावर भरपूर कष्ट घेतले आहेत. पुढे कुठल्यातरी मराठी संस्थळावरच वाचलं की तो 'रेबेका' या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत आहे आणि कथानक एवढं तगडं असल्याने चित्रपट चांगलाच झाला. मी मात्र या मताशी जरा असहमत आहे. अनेक चांगल्या कादंबर्‍यांची चित्रपटांनी वाट लावलेली आपण पूर्वीपासून आतापर्यंत बघत आलोय.

कादंबरीतून चांगली कलाकृती बनलेला एक जुना इंग्रजी चित्रपट म्हणजे 'गॉन विथ द विंड'. ही भली मोठी कादंबरी वाचत असतानाच त्यावर आधारीत चित्रपट मला बघायला मिळाला. हा चित्रपटदेखील व्यावसायिक म्हणता येईल या गटातला असला तरी त्यातून पुरेपूर मनोरंजन तर होतेच शिवाय ज्या काळातलं कथानक आहे त्या काळात चित्रपट आपल्याला घेऊन जातो. तो बघून झाल्यावर मी उरलेली कादंबरीदेखील पूर्ण केली नाही. संपूर्ण कथानकाला फारसे महत्त्वाचे नसलेले बरेच प्रसंग चित्रपटात गाळले असले तरी चित्रपटाला एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघाताना कुठेही त्यांची उणीव भासत नाही. हा चित्रपट मी चार वेळा पाहिला आणि कादंबरीची सिक्वेल म्हणून वेगळ्या लिखिकेने लिहिलेली 'स्कारलेट' वाचून काढली. स्कारलेटवरही चित्रपट किंवा मालिका निघाली असावी म्हणून मी जालावर शोधाशोध केली असता जे काही सापडलं ते एकढं गंडलेलं होतं की ते पाहिलंही नाही आता त्याचे तपशीलसुद्धा आठवत नाहीत.

चित्रपट हे माध्यम परिणामकारक होण्याकरता निव्वळ चांगल्या कथेचीच गरज नाही तर त्या सोबतच एक सुंदर कलाकृती निर्माण करण्याकरता जीव ओतून काम करणारी टीम असायला हवी असं वाटतं. कथानक, गाणी कोठूनतरी कॉपी केलेले असले तरी माझी अजिबात हरकत नसते. मी वर दिलेल्या दोन्ही हिंदी चित्रपटांची प्रेरणा बाहेरचीच आहे (ज्वेल थीफ बद्दल खात्री नाही) पण त्याचं भारतीय रुपांतरण खूप छान जमलंय. परकीय कथानके, गाण्यांच्या चाली उचलताना त्याला भारतीय अभिरुचीला साजेसं बनवण्याची प्रतिभा तरी सो-कॉल्ड कलाकारांनी दाखवावी ही अपेक्षा अवाजवी असावी असं वाटत नाही. चित्रपटात अभिनय म्हणजे कोठल्यातरी युरोपिअन लोकेशनवर, लेटेस्ट फॅशनचे कपडे घालून हिंग्रजीतले संवाद वाचल्यासारखे म्हणणे नाही की धारावीच्या गल्लीतला किंवा एखाद्या वेश्यावस्तीतला एखादा अतिरंजित भडक प्रसंगही नाही. असो, थोडं विषयांतर झालं. तर, चित्रपट क्षेत्रात कुठल्या गोष्टी काळाच्या ओघात टिकाव धरतात आणि कुठल्या गोष्टींची लोकप्रियता क्षणभंगुर असते यावर चर्चा करायला आणि वाचायला आवडेल. तसेच तुम्हाला आवडलेल्या जुन्या काळी प्रदर्शित झालेल्या आणि नव्या चित्रपटांपेक्षा सरस वाटणार्‍या मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटांबद्दल वाचायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

जुने म्हणजे किती जुने? रेस १ हा रेस २ पेक्षा जुनाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चोरी चोरी'चा रिमेक म्हणून माहित असलेला 'दिल है के मानता नही' त्या काळात आवडला होता. 'चोरी चोरी'चा मूळ चित्रपट कोणता?

'Fatal attraction'चं रूपांतर 'प्यार तूने क्या किया' आणि 'Primal fear' चं रूपांतर 'दीवानगी' बर्‍यापैकी भारतीय होते असं वाटलं होतं. 'दीवानगी'मधे मूळ इंग्लिशपटाला पुढे दिलेली जोडही पक्की बॉलिवूडीच होती, पण उत्कंठापट म्हणून तो आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'दिल है के मानता नही' हा 'चोरी चोरी'ची पुनर्निर्मिती आहे हे माहीत नव्हते.
मला वाटले होते की 'It Happened One Night' ह्या १९३४ चा चित्रपटावरून बेतला आहे. 'चोरी चोरी' ची एका ओळीची कहाणी या चित्रपटाशी बरीच जुळते आहे. चोरी चोरी १९५६ साली आल्याने तो 'It happened ...' वरून घेतला असावा असे म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकीपिडीयावर थोडी जास्त वाक्य आहेत. तिथेच मूळ इंग्लिश चित्रपट आणि हिंदी रिमेकचा उल्लेखही सापडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही 'चोरी चोरी' ची प्रेरणा वगैरे म्हणूयात. तुम्ही काय आणि कोठून उचलता याला महत्त्व नाही, पण तुम्ही त्याचे काय करता हे महत्त्वाचे आहे या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. 'टेन लिटल निगर्स' एक कादंबरी म्हणून थोर आहे- किमान त्या काळात होती- पण तिच्यापेक्षाही तिचे शर्मिला गाडगिळांनी केलेले स्वैर रुपांतर 'पाषाण' कितीतरी भारी. 'गुमनाम' तर या सगळ्यांहून भारी.
बाकी पुन्हा कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पहिली दोन चार वाक्ये पाहून "मार्मिक", "माहितीपूर्ण " वगैरे श्रेणी देणार होतो.
'गुमनाम' तर या सगळ्यांहून भारी. बाकी पुन्हा कधीतरी.
हे वाक्य पाहून "उपरोधिक" अशी श्रेणी द्यावीशी वाटते आहे.
स्टाअरकास्ट, "हम काले हइं तो क्य हुव्वा" वगैरे वगैरे सगळं ठीक असलं तरी आख्ख्या "पाषाण"चा बॉलीवूडी कचरा केलाय; विशेषतः क्लायमॅक्सची तरी काशी केलेली आहे असं वाटत नाही का? व्यवसायाने "न्याय करण्याच्या इच्छेवर ठेवलेले घट्ट झाकण" आणि "गपगुमान राहून अल्लादपणे खून करणार्‍यांना आसपास पाहून होणारी जाणीव" ह्या दोन्हींत एकाचवेळी अडकून होणारा त्रास लक्षांशाने तरी चित्रपटात दिसतो का?
.
वरील विधान म्हणजे व्यक्ती आणि वल्ली आणि पु लं च्या इतर लिखाणाला चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी मालिकेतून जिवंत केलय; न्याय दिलाय असं म्हणण्यासारखं वाटत नाही का?
किंवा अमिताभच्या "डॉन" इतकाच शाहरुखचा "डॉन" आहे असे म्हटल्यास कसे?
.
पु लं नी स्वतः ती मालिका पाहिली असती तर त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट आला नसता का?
.
अगाथा ख्रिस्तीला गुमनाम आंग्ल भाषेत डब करुन दाखवला तर तिनं रहस्यकथा लिहिणं सोडून दिलं नसतं का? निदान "माझा ह्या कथेशी काहीही संबंध नाही" असा श्रेयअव्हेर तत्काळ केला नसता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेट अस अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

जुने म्हणजे १९७० च्या आधीचे, शक्यतो black and white असे समजुन मला आवडणारे काही चित्रपट सांगतेय.
प्यासा,
कागझ के फुल,
जागते रहो,
तिसरी कसम,
इत्तेफाक
बाकी गुरु दत्त, देव आनंद, दिलीप कुमार, राज कपुर यांचे सर्व चित्रपट एकदा पाहायला छानच वाटतात.
black and white चित्रपट शक्यतो १४० मिनिटांचे असतात आणि त्यातही ४ मिनीटांची किमान ७ ८ गाणी. पण काय अप्रतीम गाणी असतात.
इंग्रजीमधे राशोमन आणि ब्लोअप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावरचं धुम्मस हे मराठी नाटकही आवडलं. नाटक थोडं जास्तच आवडलं.
बादवे, चित्रपटाचं मूळ कुठल्या परकीय कथेत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धुम्मस बद्दल माहीत नाही आणि इत्तेफाक इन्स्पायर्ड आहे का ते ही माहीत नाही. बाकी तू वर सन्जोप रावांना दिलेल्या उपप्रतिसादातील भावनेशी सहमत आहे. फरक एवढाच की, अमिताभचा मला आवडलेला एकमेव चित्रपट डॉन असला तरीही मला शाहरुखचा डॉनही तितकाच आवडला Smile
ख्रिस्टीच्या अनएक्स्पेक्टेड गेस्ट वरुन बनलेला धुंद... अगागा काय वाट लावलीय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढे जुने होय! जुने म्हणजे माझी पहुंच फारतर सई परांजपेपर्यंतच! तिचे चित्रपट आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin मी साधारण
५० च्या आधीचे म्हणजे पुरातन
५० ते ७० जुने
७० ते ९० मध्यमवयीन आणि ९० नंतरचे नवीन
असं पकडलं. सई परांजपेचा कथा छान आहे. मध्यमवयीन चित्रपटांमधे शाम बेनेगल, नसीरउद्दीन शहा, अमोल पालेकर, फारुख शेख, ओमपुरी, अमरीशपुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील यांचे सर्व चित्रपट छान असावेत.
१२ अँग्री मेन वरुन इन्स्पायर्ड एक रुका हुआ फैसला, सत्यजीत रे चा शतरंज के खीलाडी मस्तच. अल्बर्ट पिँटो को गुस्सा क्योँ आता है ठीक आहे. सलाम बॉम्बे मस्त. जाने भी दो यारोँ च एवढं कौतुक होतं, पण मला त्यातला फक्त महाभारताचा सीन आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलीप प्रभावळकर्-स्मिता तळवलकर अभिनित चौकट राजा,श्रीदेवी-कमल हसन ह्यांचा सदमा.
फारुक शेख- नसीरुदीन शहा क्याम्पचे ८०च्या दशकातील काही सिनेमे.
राजेश खन्नाचा आनंद.
श्री ४२० चा शेवट आणि आख्खा नया दौर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चलती का नाम गाडी, गोलमाल, अंगूर ही तीन नावे नावे चटकन आठवून गेली.
आताच्या काळातही हे चित्रपट अनेकदा बघावेसे वाटतात. तांत्रिक प्रगती वगळ्ली तर बॉलिवूडपटांत विनोदी चित्रपटांची (आणि पुलंनंतर विनोदी साहित्याची) घसरण + वानवा चिंताजनक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. अनेक प्रतिसादांतून आमच्या पिढीली माहिती नसलेली चांगल्या जुन्या चित्रपटांची नावं कळत आहेत.

बहुदा माझ्या लिखाणातून मला अपेक्षित असलेला 'जुना काळ' म्हणजे नेमका कोणता हे स्पष्ट होत नाहीये. मला १९७०-७५ च्या आधीचा काळ अपेक्षित आहे. अर्थात त्यानंतरच्या काळातही काही सन्माननीय अपवाद असतीलच. त्यांचाही उल्लेख आवडेलच.

आणखी एक स्पष्टिकरण द्यावसं वाटतंय की जुने सर्वच चित्रपट चांगलेच असतात असा माझा हट्ट नाही. अर्थातच तेव्हाही रटाळ किंवा हुकलेले चित्रपट निघतच होते. परंतु त्यांच्या दरम्यान जे काही चांगले चित्रपट आलेत त्यांच्यावर सर्व कलाकारांनी दीर्घकाळ मेहनत घेवून शक्य तेवढं पर्फेक्शन आणण्याचा प्रयत्न केलेला रसिकांना लगेच जाणवतो.
त्याच्याशी तुलना करता आज ज्या चित्रपटांना आपण 'उत्तम', 'मूव्ही ऑफ द मिलेनियम' असे म्हणवून मिरवतो त्यांच्यावर एवढी मेहनत घेतलेली जाणवत नाही. किंबहुना बर्‍याच वेळा प्रेक्षकांना ग्राह्य धरल्यासारखं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

'मूव्ही ऑफ द मिलेनियम'चे रतीब दरवर्षी येतात तेव्हा काय ते समजतं की! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>तो 'रेबेका' या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत आहे आणि कथानक एवढं तगडं असल्याने चित्रपट चांगलाच झाला. <<

रिबेकाचं कथानक आणि कोहराचं कथानक यांत तुलना केली तर लक्षात येईल की 'कोहरा'मध्ये रहस्य फारच फुसकं केलं आहे आणि नायिकेचा भावनिक गुंतादेखील सोपा केला आहे.
रहस्यभेद सुरू
आपल्या नवऱ्यानं त्याच्या आधीच्या बायकोचा खून केला आहे, हे कळतं तेव्हा नायिकेचा विचित्र भावनिक गुंता होतो - नवऱ्याचं खुनी असणं पचवणं सोपं नाही; पण त्याचं पहिल्या बायकोवर प्रेम नसणं आणि आपल्यावर असणं हे तिला त्यामुळेच कळतं. कादंबरीभर नायिका स्वत:ला पहिल्या बायकोहून कनिष्ठ समजत असते. त्या पार्श्वभूमीवर हे रोचक आहे. पण तरीही कादंबरी पूर्णपणे सुखांत नाही. आपण खुनी आहोत ही जाणीव नवऱ्यालाही आयुष्यभर खुपत राहणार हे उघड आहे. त्या बरोबर उभं आयुष्य एका ठिकाणी घालवण्याचं स्थैर्य आपल्याला लाभणार नाही ही जाणीव नायिकेला अस्वस्थ करते.
रहस्यभेद समाप्त

सुरुवातीच्या काळात जे आपलंसं होईल असं वाटलं होतं ते निरागस सुख पुन्हा आपल्या वाट्याला कधीच येणार नाही ह्याची खंत "Last night I dreamt I went to Manderley again" या कादंबरीच्या पहिल्याच वाक्यापासून जाणवत राहते. त्याउलट हिंदी सिनेमा पलायनवादी आणि गोड सुखांत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी 'रेबेका' वाचलेली नसल्याने त्याबद्दल बोलू शकत नाही आणि त्यामुळेच चित्रपट - कादंबरीची तुलना करू शकत नाही. पण तुमच्या प्रतिक्रियेवरून वाटतंय की त्या कादंबरीवर आधारित हिंदी सिनेमा आणि मूळ कादंबरी यांच्या आशयात फारकत आहे.

सोपा भावनिक गुंता आणि विशेषतः सुखांत हे बदल भारतीय प्रेक्षकांच्या आवडीला लक्षात घेवून केले असण्याचीच शक्यता जास्त. व्यावसायिक चित्रपट म्हटल्यावर बहुसंख्यांची आवड समिकरणात घेणे भागच असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

कधीकधी रिमेक झालेला मूळ चित्रपट रिमेक करण्याच्या लायकीचा होता का? असा प्रश्न पडतो. उदा. डॉन, अग्निपथ

मूळ कथा बरीच बदलून घेतली असेल तर त्या चित्रपटास रिमेक म्हणावे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किती बदलली तर खूप बदलली असे म्हणता यावे ह्यावर शेकडो पाने वाद चालू शकतो.
how much is too much ह अकुठल्याही बाबत अगणित काळ चाललेला वाद आहे.
शोलेची कथा बदलत बदलत नेल्व्व की त्याचा DDLJ सुद्धा होउ शकतो.(कथेचे डार्विनियन तत्वानुसार इवोल्युशन का म्युटेशन काय ते करीत न्यायचे हव्या त्या पॉइंटपर्यंत् . हाकानाका)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रीमेक करायच्या लायकीचा नव्हता म्हणजे वाईट होता की ७८ सालचा असल्याने आता आउटडेटेड आहे म्हणून? शेवटचा अर्धा-पाऊण तास चंद्रा बारोट व सलीम जावेद यांनी (रागोव करतो तसे) कोणातरी साहाय्यकाला करायला सांगितल्यासारखा असला तरी बाकी दोन सव्वादोन तास उच्च चित्रपट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रीमेक करायचा तर कथा काहीतरी उच्च, पाथब्रेकिंग वगैरे असावी असे वाटते (अर्धसत्य, गेला बाजार दीवारसुद्धा). ते नसेल तर निदान संकल्पना अभिनव असावी किंवा निदान त्याकाळी तो चित्रपट उच्च वगैरे म्हणून (गुरुदत्त- प्यासा, कागज के फूल, साहब बीबी वगैरे)गाजलेला असावा.

तसं काही डॉन मध्ये नव्हतं. तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. (आम्ही त्याकाळी योग्य वयात असल्याने आम्हाला तेव्हा तो आवडला होता ही गोष्ट खरी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्या देवदास मधे काय होतं.. दोनदा रिमेक झाला की.. सैगल, दिलीपकुमार, शारुख.. तरी सूरज का सातवा घोडा, डेवडी नै पकडतय.
दोन्ही डॉननी गल्ला भरला आणि डॉन २ ने पण गल्ला भरला म्हणजे रीमेक व्हेल्यु असावी Smile मला तर तीन्ही चित्रपट आवडले बॉ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्यातले...म्हणजे अगदी कृष्णधवल काळातले...राजा गोसावी वगैरे असलेले चित्रपट दूरदर्शनवर पाहिलेले आहेत. तेव्हा (शाळेत असताना) आवडले होते...नावं आठवत नाहीत फारशी. 'लाखाची गोष्ट' नावाचा खूप आवडला होता. आता पाहिले तर बाळबोध वाटतील बहुतेक.
हिंदी मधला जुना...'हावडा ब्रिज' आठवतो...परत एकदा गेल्या एक-दोन वर्षात पाहिला होता.तेव्हाही ठीक वाटला. 'जागते रहो' आणि 'तीसरी कसम' हेही चांगले वाटले आता पाहूनही.
त्यानंतरचे सई परांजपेचे सिनेमा आवडलेले आहेतच. अमोल पालेकरचे सुद्धा...बरेच आहेत 'अजूनही' आवडतात असे म्हणता येतील असे.
मराठीत प्रशांत दामले, अशोक सराफ, वर्षा वगैरेंचे सुद्धा आवडतात काही. 'सवत माझी लाडकी', 'लपंडाव' लगेच आठवले.तरी आता पाहताना चिकित्सा जास्त होते.
इंग्लिश सिनेमा जुने/नवे, नव्या काळातच पाहिलेत. स्टॅनले क्युब्रिकचा 'डॉक्टर स्ट्रेंजलव' हा केव्हाही पहायला आवडतो. बरेच आहेत...पण ते तसेही आवड थोडी विकसित झाल्यावरच, निवडक पाहिलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार. या धाग्याच्या निमित्ताने माझी 'वॉचलिस्ट'च तयार झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

जुन्यांमध्ये 'चुपके चुपके' हा एक जबरदस्त धमाल सिनेमा आहे. आमच्याकडे 'अरे, बऱ्याच महिन्यात चुपके चुपके बघितला नाही' म्हणून बघितला जातो. निखळ मनोरंजन, पण तेही सगळे टंग इन चीक विनोद. धर्मेंद्र आणि अमिताभ अशी स्टारकास्ट असल्यावर मारामारीचा वगैरे वाटेल. पण त्यात दोघेही प्रोफेसर्स आहेत. आणि दोघेही आपला विनोदी अभिनय उत्तम करतात. गाणीही एक से एक. नक्की बघा. बघून जर कोणी या सिनेमाच्या प्रेमात पडलं नाही तर मिशी उतरवून द्यायला तयार आहे. (अशा कसमा खाता याव्यात म्हणून चिकटवण्यासाठी एक मिशी तयार ठेवतो, पण इथे तिची गरज पडणार नाही याची खात्री आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाही ऑल टाईम फेवरेट आहे. अभिनत, पटकथा, गाणी सगळंच मस्त! निखळ मनोरंजन कॅटेगरीतला सिनेमा आहे. त्यात ओम प्रकाशचा अभिनय सगळ्यात जास्त आवडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

चुपकेचुपके आणि इतरही हृषिकेश मुखर्जी छाप चित्रपट लय आवडतात (गोलमाल, खूबसुरत वगैरे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१००००००००००००००.

चुपके चुपके, त्यातही कायम सर्दी झाल्यागत आवाज असणारा तो ओमप्रकाश म्हंजे क्लास प्रकरण आहे एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला जुने सिनेमे फारसे आवडत नाहीत. फारच बालिश , भाबडे आणि काहीवेळा आतिभांपक वाटतात (काही अपवाद वगळता). पण मी असे म्हणताच लोक माझयाकडे हा दहशतवादी कुठून आला या नजरेने बघतात : ) आणि हो बरेच चित्रपट हॉलीवुड चित्रपतांवर् डल्ला मारुन बनले आहेत हा भाग अलाहिदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

जुने चित्रपट डोळ्यांपेक्षा कानांना जास्त भावतात !
अनारकली, नागिन, बैजू बावरा, स्व. राज कपूर यांचे सर्व चित्रपट..
लता, तलत, रफि अन किशोर...
बस, हे म्हणजेच जुने चित्रपट असे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0