दवबिंदु - पाकळ्यांवरचे
नमस्कार रसिकहो,
सदस्य झाल्यावरचे हे इथले पहिलेच प्रकाशन. बघा आवडतं का.








दोन कारणे
धन्यवाद धनंजय,
दोन्ही चित्रात घट्ट डेप्थ ऑफ फिल्ड, मग नववे चित्र आवडले आणि सातवे का नाही?
१) अपेक्षाभंग(?) शिर्षक पाहता अपेक्षा सुस्पष्ट व व्यापक दवबिंदुंची असावी, मात्र या प्रतिमेत अगदी कडेचे संघननीत सूक्ष्म दवबिंदु आहेत त्यामुळे तसेच गुलाबी पाकळीतुन उलगडणार्या पांढर्या रेषा अधिक प्रभावशाली भासू शकतात. थोडक्यात या चित्राला शिर्षक सुचवा असे सांगितेले असता आपण 'दवबिंदु' हे शिर्षक खचितच देणार नाही. मूळ विषयाला सुसंगत असला तरीही परिसर अधिक प्रभावी भासला असावा
२) नियमाच्या विपरीत चित्रणाचा प्रयत्न - सहसा जेव्हा डीओएफ अगदी नाजुक असते तेव्हा पूर्वभूमी स्पष्ट व पार्श्वभूमी धूसर असा साधारण संकेत आहे. सहसा अशाच पद्धतिची चित्रे पाहायची सवय डोळ्यंना असल्याने हे अपवादात्मक चित्र खटकले असावे.
पाकळीचा पोत, पांढर्या रेषा व एका कडेचे दवबिंदु एकाच प्रतलात घेऊन जरा वेगळे चित्र करायचा हा प्रयत्न होता, तसेच दवबिंदु हे त्या नाजुक पाकळीला सजविणारे असावेत असा विचार होता.
सखोल निरिक्षणाबद्दल आणि परिक्षणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, आस्वाद घेणार्या सर्वांना धन्यवाद.
साक्षी
झक्कास!
अन आभार!
हट्टानं भांडून कलादालन मागून घेतलं होतं या साईटी वर. इतके दिवस माझा एकट्याचाच धागा होता. तुम्ही अन मोडक साएब सोबतीला आलात त्यामुळे 'कशाला "मागून" घेतला?' असा प्रश्न पडलेला होता तो मिटला ;)