Skip to main content

ही बातमी समजली का? - ११

भाग | | | | | | | | | १०

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

बातमी: 'हिनीयस' गुन्ह्यांपुरते सज्ञानतेचे वय १६ करण्यास कॅबिनेट तयार
याचे काय परिणाम होतील, हे सांगणे कठीण आहे.
अजून "हिनीयस"ची डेफिनेशन माहित नाही. पण तरीही त्यापुरते का होईना बालगुन्हेगारांना इतर सज्ञान गुन्हेगांइतकीच शिक्षा देणे किती योग्य आहे यावर तुमचे मत काय?

रमा Sun, 29/12/2013 - 01:30

ब्लॉगमधील आरोपांबद्दल काय म्हणावे ते कळत नाही. म्हणजे तशी बस्तुस्थिती 'असू शकते' हे तर खरेच आहे. पण ती तशीच आहे असे गृहीत धरून ती मीडियामध्ये आली नाही म्हणून खेद व्यक्त करावा की नाही याबद्दल साशंक आ>>>

मी पण

अवांतरः ज्या गाड्यांना धडक दिली त्याही अतिश्रीमंतांच्याच गाड्या असल्याने मीडियाला ष्टोरीत विंटरेस्ट वाटला नसेल (म्हणजे धनदांडग्यांकडून गरीबांना धडक/चिरडणे वगैरे हेडलाइन बनत नाही ना !!!).>>>

त्या ब्लॉग लेखिकेच्या मते धडक जरी गाड्यांची झाली असलि तरी त्यात रस्त्या/फुटपाथ वरचे ८ लोक जखमी आणि २ लोक दगावले आहेत. जर फक्त एकमेकांच्या गाड्यांचा चक्काचुर करण्याचा प्रश्न असता तर हे प्रकरण अजीबात गंभीर नसत पण तरीही मिडिया ने कदाचीत कव्हर केले असते कदाचीत अंबानी पुत्र असल्यामुळे कारण अश्या लोकांच्या अक्षरशः कुठल्याही कृत्याची बातमी होउ शकते.

पण रिलायन्स गृप त्यांच्या विरोधातल्या बातम्या (निदान) छापिल मिडियात येवु देत नाहि हे मी एका पत्रकाराकडुन काही वर्षांपुर्वी वेगळ्या संदर्भात ऐकल होत. त्यामुळे ब्लऑग लेखिकेच्या म्हणण्यात तथ्य असु शकेल अस मला वाटल.