Skip to main content

फसवणूक

परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ...

आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .

पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे .

मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी. पण काही डॉक्टर्स फक्त पैशासाठी आणि आपल्या हॉस्पिटल्स च्या यशाची टक्केवारी वाढावी म्हणून चक्क दुसर्‍या एखाद्या धडधाकट व स्पर्म काऊंट चांगला असणार्‍या पुरुषाचे बीज वापरतात . अशाने भले जोडप्याला अपत्यप्राप्तीचा आनंद (?) मिळत असेलही , पण धार्मिक ,आध्यात्मिक आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील घोर फसवणूक आहे . कारण यातून निपजणारी संतती मूळ पुरुषाच्या डीएनए शी विपरीत असते.... साहजिकच त्याचे संस्कार ,संसृती आणि वंश निराळा असतो. म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच !

या विषयाबद्दल जनजागृती होवून असे गैरप्रकार करणार्‍या डॉक्टर्स वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

तर्कतीर्थ Sat, 14/12/2013 - 11:20

असे होत असणार याची शंका मला पण होती. पण कारवाई होणं मला कठीण वाटते. कारण डॉ. सर्वप्रकारे त्यांना सुरक्षित ठेवतात.

समजा फसवणुक झाली हे सिद्ध झालं तर त्या अपत्याचं काय करायचं?

मन Sat, 14/12/2013 - 13:08

खरोखर असे होत असेल तर अवघड आहे.
साहजिकच त्याचे संस्कार ,संसृती आणि वंश निराळा असतो. म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच !
ह्याऐवजी म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच इतकच वाक्य पुरलं असतं.
उरलेल्या वाक्यावर बरीच चर्चा होउ शकते.
डॉक्टर खरच अस्ले धंदे करत असतील तर तो एक घाणेरडा प्रकार आहेच, गुन्हा असायलाच हवा.
पण संस्कृती आणि संस्कार हे वम्शापेक्षा अत्यंत वेगळे असतात हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

आफ्रिकेतील काळ्याला भारतीय घरात वाढवले सलग दोन तीन दशके तर काळ्याच्या घरात दोन तीन दशके वाढलेल्या सावळ्या भारतीय मुलापेक्षा त्याची वागणूक व विचरसरणी सहस्र पटींनी अधिक भारतीय असेल. कारण? संस्कार! संस्कृती.
स्म्स्कार आणि संस्कृती हे सॉफ्टवेअर आहे. काळे-सावळे-पांधरे देह हे हार्डवेअर आहेत.
तुम्ही कशातही काहीही इंप्लांट करु शकता.
(काही अल्प जेनेटिक फरक राहतीलच एखाद दोन पिढ्या, पण मिश्र वर्णात , दोन तीन पिढ्यात तेही धुतले जातील.
उदा:- भारतात मागील काही शतके मूलचे अ‍ॅबिसिनियामधील काळे आफ्रिकन हबशी(जंजिर्याच्या सिद्दीचे जातभाई) हे त्यांची मूळची जनुकीय शक्ती गमवून बसलेत.
मूळ हबशांमध्ये मलेरियाविरुद्ध रोगप्रतिकारक्षमता जबरदस्त आहे. पण ती ह्या हबश्यांत लोप पावलेली दिसते ४-५ शतकांच्या मिश्रवर्णामुळे. अशी बरीच उदाहरने असतील.
जागा आणि वेळ ह्यांच्या कमतरतेने इथे उद्धृत करु शकत नाही.)
.
.
होत असलेला प्रकार निंद्य, अनितिक आणि गुन्हेगारी रुपाचा आहे, ह्यात संशय नाही.

Nile Sun, 15/12/2013 - 01:16

यात थोडे सत्य असावे पण बहुतेक एकाचे दहा प्रकार असावा अशी शंका आहे.

आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .

मेडिकल रिपोर्ट देत नाहीत का? लोक सेकंड ओपिनियन घेत नाहित का? आयव्हिएफ वगैरे बाबत माहिती काढत नाहित का?

पण काही डॉक्टर्स फक्त पैशासाठी आणि आपल्या हॉस्पिटल्स च्या यशाची टक्केवारी वाढावी म्हणून चक्क दुसर्‍या एखाद्या धडधाकट व स्पर्म काऊंट चांगला असणार्‍या पुरुषाचे बीज वापरतात .

प्रक्रिया करण्यापूर्वी काही कागदोपत्री नसतं का? पुढे जाऊन हे उघडकीस आले तर डॉक्टर सहित इस्पितळावर कायदेशीर कारवाई का होणार नाही?

नितिन थत्ते Mon, 16/12/2013 - 09:58

In reply to by मन

पुरुषाचे स्पर्म्स पुरेसे + चांगले नाहीत हे जोडप्याला ठाऊक असते. पुरुषाचा आत्मसन्मान टिक(व)ण्यासाठी + कुटुंबाकडून स्वीकार व्हावा म्हणून दुसर्‍याचा स्पर्म वापरून गर्भधारणा केली जात असेल व मूल या पुरुषाचेच आहे असे कुटुंबीयांना सांगितले जात असेल.

जोडपे आणि डॉक्टर यात समान सहभागी.

(कुसुम मनोहर लेले मोडमध्ये सुद्धा मुले झाल्याचे दाखवले जाते असे ऐकले आहे).

ऋषिकेश Mon, 16/12/2013 - 09:47

नै कळ्ळे! म्हजे डॉक्टस IVF करण्याआधी असे सांगतात का की हे करतेवेळी नवर्‍याचाच स्पर्म वापराला जाईल. तसा अधिकृत करार असेल तरच त्यास फसवणूक म्हणता यावे - म्हणता येईलच. आणि हे सिद्ध करणेही तितकेसे कठीण नसावे. (तसे नसल्यास आपलाच स्पर्म वापरणे गरजेचे वाटत असल्यास तसा करार करण्यासंबंधी लोकजागृतीची गरज आहे)

अन्यथा:

मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी.

वगैरे मते ही पुन्हा अतिशय सापेक्ष आहेत.