मुल्ला नसीरुद्दीन

काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्‍या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे. त्यातच कधी अद्वैतचे आजी आजोबा खाउ खायला बोलवत, गोष्टी सांगत, पुस्तके वाचायला देत.

अकबर-बिरबल, तेनालीराम, मुल्ला नसीरुद्दीन, इसापनीती , पंचतंत्र, विक्रम्-वेताळ अशा साध्या साध्या कथातून रंजक पण संदेशयुक्त असे वैचारिक खाद्य डोक्याला मिळे.(तेव्हा फक्त रंजक म्हणूनच वाचले. त्याचे उपयुक्तता मूल्य आज जाणवते आहे, तेही विशेष्तः "self help"च्या नावाखाली दिवसाला डझनावारी निघणार्‍या पुस्तकांच्या जमान्यात.)
अशाच काही गोष्टी आठवतील तशा इथे देतोय. ह्या सर्व परंपरेने सांगितल्या गेलेल्या लोककथा आहेत :-
ह्याच्या बर्‍याच गोष्टीतून हे व्यक्तिमत्व कधी यडपट तर कधी वाक्चतुर, कधी लबाड्/धूर्त्/कावेबाज, कधी थेट जीवनावर खट्याळ भाष्य करनारे, कधी सूफी तत्वज्ञान मांडणारे दिसते. कधी सामान्याची ,दरिद्री माणसाची व्यथा मांडत R K Laxman ह्यांच्या common man च्या व्यंगचित्राचेच शब्द रूप वाटते.

गोष्ट १:-
कुठल्याही इतर ख्यातनाम विद्वानाप्रमाणे(सॉक्रेटिस्,कन्फ्युशिअस वगैरे) मुल्ल नसीरुदीन दरिद्री व कर्जबाजारी होताच. एकदा त्याच्याकडे राहिलेल्या थकबाकीला तो काहिच दाद देत नाही म्हणून एका सावकाराने त्याची एका काझीकडे/न्यायाधीकडे तक्रार केली. खटला सुरु झाल्यावर मुल्लाने प्रथम बोलायला सुरुवात केली.
मुल्ला:- "मी माझी गाय व घोडा विकून सदर सावकाराचे पैसे परत करण्यास तयार आहे. खटला मिटवावा."
सावकारः- "छे छे काझी साहेब. ह्या कफल्लक भिकार्याकडे गाय, घोडा काहिच नाही. धडधडित खोटे बोलतोय हा
ह्यायाकडे तर खायला पैसेही नाहित अन् नेसायला कपडेही नाहित."
मुल्ला:- "बघा. म्हणजे ह्याला ठावूक आहे की मजकडे खरोखरच पैसे नाहित. मी काही माझ्याकडे असूनही ह्यला देत
नाही असे नाही. तस्मात्, मला शिक्षा करूनही ह्यला काहीही मिलण्याची शक्यता नाही. बाहेर राहिलो तर
एखादेवेळेस काम धंदा करून पैसे देइन."

आणि मुल्ला सुटला!

गोष्ट२:-
एकदा दिल्लीच्या गजबलेल्या बाजारात साहेब पोचले. स्वस्थ बसलेल्या दुकानदाराकडे पाहून साहीब सुरु:-
मुल्ला:- तुमच्याकडे चामडे आहे काय?
दुकानदारः- हो. किती हवे?
मुल्ला:- नुसते ते घेउन काय करु? शिवायला दोरा व दाभण आहे काय?
दुकानदारः- हो तेही आहे. दोन्ही घ्या की आमच्याकडनच.
मुल्ला:- बस्स मग. आता फक्त दोन लहान खिळे मिळाले की पुरे.
दुकानदार(आशेने व अजिजीने) :- हो. हो. खिळे सुद्धा आहेत की. हे घ्या आत्ता देतो काढून.
मुल्ला:- एवढे सगळे आहे, तर रिकामा का बसला आहेस? जरा बूड हलवून उत्तम जोडे शिवत का बसत नाहिस? Smile

गोष्ट३:-
मुल्ला जी आपल्या झोपडीवजा घराबाहेर शिळ्यापोळीचे तुकडे टाकत असताना शेजार्‍याने कुतुहलाने विचारले:-
शेजारी:- "काय हुजूर काय हे काय चाल्लय?"
मुल्ला:- (स्थिर चित्त)"काही नाही. इकडे वाघ फिरकू नये म्हणून शिळ्या पोळिचे तुकडे टाकतोय."
शेजारी:- "अरे पण ह्या इलाख्यात कुठे वाघ आहेत?"
मुल्ला:- (विजयी स्वरात)"तेच तर म्हणतोय. बघ माझा इलाज कस्ला यशस्वी झालाय!"

गोष्ट ४:-
मुल्लाच्या दोन्ही बायका त्याला विचारत "आमच्यापैकी कुनावर तुझे अधिक प्रेम आहे?"
तो वैतागून जाई. एकदा त्याने एकांतात प्रत्येकीला एक एक माणिक दिले. व सांगितले की "दुसरीला सांगशील तर ती असूयेने तुझा मणी घेईल. तुलाच त्रास होइल."
ह्या भीतीने दोन्ही बायका कधीच एकमेकींना आपल्याकडे मणी आहे हे सांगू शकल्या नाहित.
पुन्हा जेव्हा कधी मुल्लाला "अधिक प्रिय कोण" हा प्रश्न त्या बायका विचारत, तेव्हा तो गंभीर होउन म्हणे:
"माझे खरे प्रेम जिच्यावर आहे तिला मी माणिक दिलेलाच आहे. पण दुसरीही इतकी समजूतदार आहे की ती पहिलीचा हेवा न करता हे मान्य करते व सुखासमाधानाने आमच्यासोबत राहते. तिचा हा मोठेपणा!"
दोन्ही बायका आपणच त्याच्या कशा लाडक्या व दुसरी समजूतदार आहे म्हणून ऐकून तरी घेते असा सहानूभूतीपूर्ण उसासा मनात टाकत मनोमन खुश होत!!

गोष्ट५:-
मुल्ला हे अतीव प्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्तिमत्व झाल्याने साहजिकच काहीजण त्याच्यावर जळतही असत, द्वेषही
करत.त्यात दरबारातले सरदार, काझी ही मंडळीही होती. एकदा मुल्ला रस्त्याने जाताना एका अनोळखी माणसाने त्याला फाडकन एक थोबाडित लगावली. व पुढच्याच क्षणी मुल्लाचा चेहरा निरखत तो माफी मागू लागला. "माफ करा साहेब.. मला वाटलं आपण दुसरेच कुणी आहात. चुकून लगावली."
मुल्ला मात्र ऐकेना. त्याने सरळ त्या माणसाला धरून काझीसमोर उभे केले. काझीचेच हे कारस्थान असल्याचे त्याच्या थोड्याच वेळात लक्षात आले. काझीने निवाडा दिला तो असा :-
"सदर माणसाने मुल्लाला केवळ चापट मारली आहे.कोनतीही इतर वित्तहानी वगैरे केलेली नाही. त्याबद्दल तो माफीही मागतो आहे.सबब, त्याने मुल्लाला रु१ दंड म्हणून द्यावा ; मग त्याला सोडण्यात येत आहे."
मुल्ला:- (मनातून वैतागून व वरवर गंभीरपणे):- "एखाद्याला थोबाडित मारल्यावर इतकी शिक्षा खरोखरच पुरेशी आहे
असे वाटते का?"
काझी:- "होय . नक्कीच.कारण त्याने माफिही मागितली आहे."
मुल्लाने तत्क्षणी खाडकन् सगळ्यांदेखत काझीला कानाखाली लगावली.वर "काझीजी,तुमची माफी मागतो " असे म्हटले व त्या अनोळखी माणसाकडून येणारा रुपया तुम्हीच ठेउन घ्या असेही सांगितले!!

अजूनही पुष्कळ किस्से आहेत. सवड झाल्यास आथवतील तसे टंकत जाईन.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

हा हा.. एकेक किस्से मस्त आहेत..
अजुन असतील तर नक्की द्या.. आधी वाचले नव्हते.

बाकी, पहिल्या परिच्छेदावरून वाटले मनोबा नॉस्टॅल्जिक होण्याचे पातक करतोय की काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुल्ला नसरुद्दीनने नोकरीसाठी अर्ज केला. त्यात त्याने स्वत: अनेक पात्रता लिहून दिल्या - मी विद्यापीठात पहिला आलेलो आहे, मला राष्‍ट्रीय बँकेचा अध्‍यक्ष व्हायला पाचारण करण्‍यात आले होते. मी नकार दिला कारण मला पैशात स्वारस्य नाही. मी एक प्रामाणिक, सडेतोड माणूस आहे. मला कसलीही आकांक्षा नाही, मला पगाराशी काही घेणंदेणं नाही; तुम्ही जे द्याल ते ठीकच असेल. मला काम करणेही खूप आवडते - आठवड्याला पासष्‍ट तास काम करतो मी !
मुलाखत घेणार्‍याने अचंबित होऊन त्याचा अर्ज पुन्हा उलटून पालटून पाहिला आणि विचारले, ''हे भगवान! म्हणजे तुझ्‍यात काहीच कमतरता नाही?''
नसरुद्दीन म्हणाला, आहे ना, मी नेहमी खोटे बोलतो!

मुल्लाचे वाट्टेल तेवढे विनोद आहेत इथे: http://www.oshojokes.net/mullanasruddinjokes/mulla_nasruddin_jokes_osho.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" अकबर-बिरबल, तेनालीराम, मुल्ला नसीरुद्दीन, इसापनीती , पंचतंत्र, विक्रम्-वेताळ अशा साध्या साध्या कथातून रंजक पण संदेशयुक्त असे वैचारिक खाद्य डोक्याला मिळे.(तेव्हा फक्त रंजक म्हणूनच वाचले. त्याचे उपयुक्तता मूल्य आज जाणवते आहे, तेही विशेष्तः "self help"च्या नावाखाली दिवसाला डझनावारी निघणार्‍या पुस्तकांच्या जमान्यात.)"

हे खूप खरे आहे.. आई आमच्या लहानपणी श्रावणात छोट्या छोट्या पुराण कथा वाचायची त्या आठवून आज ही बरीच उत्तरे सापडून जातात...

उपदेशाचे अवडंबर नाही कि विद्वत्तेचा अभिनिवेशपूर्ण पाढा नाही.. पण कसा सडेतोड आणि थेट आहे हा मुल्लाह.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

लहानपणच्या किंचित आठवणींपुढचे किस्से आवडले. ऋप्रमाणेच, अजून किस्से असतील जरूर लिही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेजारी:- "अरे पण ह्या इलाख्यात कुठे वाघ आहेत?"
मुल्ला:- (विजयी स्वरात)"तेच तर म्हणतोय. बघ माझा इलाज कस्ला यशस्वी झालाय!

नसलेल्या प्रश्नाबद्दल गदारोळ उठवून त्यावर आपण उपाय करत आहोत असं दाखवत रहायचं. नंतर काही वर्षांनी तो प्रश्न नाही हे लक्षात आलं की, आमच्याच प्रयत्नांनी गुण आला असं म्हणायचं, हे अनेक ठिकाणी चालतं. इतक्या साध्या कृतीतून मुल्लाने हे सांगितलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधे एकदा काहीतरी जगबुडी टळली होती त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीसेक वर्षाखाली सत्तरच्या दशकात अमेरिकेने पाठवलेले "स्काय लॅब" आपटणार म्हणून भारतातल्या खेड्यात घाबरगुंडी उडाली(नंतर ते दूर जाउन कुठेतरी समुद्रात पडले म्हणे. ते आपल्याच उपवासाच्या सामर्थ्याने आपण समुद्रात "ढकलले" आहे असा दावाही काही बाबा-बुवांनी केला.
१९४च्या आसपास शू-मेकर धूमकेतू पृथ्वीवर आपटणार अशी आवई उठली होती.
सध्या गूढतावाद्यांचे ताजे फ्याड म्हणजे १ जानेवारी २०१२ च्या आत पृथ्वी का पृथ्वीवरील समूळ मानवजात नष्ट वगैरे होणार आहे. का, तर म्हणे त्या माया-इंका पब्लिकनं त्याच्या पुढची कालगणना केलेली नाही. अर्थातच कशालाही कुठूनही सपोर्ट देणारे गूढतावादी विद्वान भारतीय व चायनीज दंतकथांतही हेच कसे सांगितले आहे ह्याचेही दाखले देताहेत. आता पृथ्वीचे वाट्टोळे झाले तर हे खरे, नाही झाले, तरी ह्यांच्या भक्तीने,पुण्ण्याने पृथ्वी वाचली असे म्हणत येनारे हे पुन्हा खरेच!!
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नसलेल्या प्रश्नाबद्दल गदारोळ उठवून त्यावर आपण उपाय करत आहोत असं दाखवत रहायचं. नंतर काही वर्षांनी तो प्रश्न नाही हे लक्षात आलं की, आमच्याच प्रयत्नांनी गुण आला असं म्हणायचं,

हात तिच्या! हे चाणक्यनीतीत आहे असं मला वाटत होतं आजपर्यंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सगळेच किस्से माझ्यासाठी नवीन आहेत. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त मजेदार किस्से आहेत. मुल्ला नसीरुद्दीन अगदी दिल्लीच्या गजबजलेल्या बाजारातही आला होता तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ, यकु,दिलतितली,विक्षिप्त बै,राजेश्,आडकित्ता,धनंजय्,चित्तरंजन आपण सर्वच वाचताय हे पाहून हुरुप येतोय.
जमेल तशी भर घालत राहिन.
यकु,
तुझा किस्सा व दिलेली लिंक भारीच. खुद्द विकिपेडियावरही बरेच किस्से सापडले.
सर्वाधिक आवडलेला हा:-
एकदा मुल्ला गाढवावर बरीचशी द्राक्षे भांडेच्या भांडे भरून चालला होता. गावच्या पोरांच्या नजरेला ते पडताच ती मागे लागली, "द्राक्षे द्या . द्राक्षे द्या" म्हणून हट्ट करू लगली.
मुल्लाने सर्वांना एक एक द्राक्ष मोठ्या उदारतेचा आव आणून दिले.
मुले म्हणाली "हात्तिच्या. इतक्या मोठे ढिगभर असूनही एकेकच देताय. छ्या."
मुल्ला :- "बाळांनो, ढिगभर खाल्ले काय आणी एकच खाल्ले काय, चव तीच लागणार आहे" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त किस्से आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा कुठल्या तरी कारणानं बसरा आणि बगदाद दरम्यानच्या व्यापारावर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची आयात-निर्यात होत नव्हती. मुल्ला नसरुद्दीन प्रत्येक सातव्या -आठव्या दिवशी गाढवावर गवताचा भारा लादून बसेरातून बगदाद हद्दीत जात असे. माणसांच्या जाण्या-येण्याला मनाई नव्हती. पण व्यापारी वस्तूंवर बंदी होती. सीमेवर तपासणी अधिकारी डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते. ते नसरुद्दीनची मोठ्या बारकाईने तपासणी करायचे. परंतु, त्याच्या गवताच्या भार्‍यातसुद्धा कुठली अवैध वस्तू मिळायची नाही. मुल्ला अगदी आरामात बगदादमध्ये प्रवेश करायचा आणि तीन- चार दिवसांनी तसाच गवताचा भारा गाधवावर लादून परतायचा. प्रत्येकवेळा त्याची बारकाईने तपासणी व्हायची. पण नेहमीप्रमाणे काही मिळायचे नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मात्र सूचना मिळायची की सीमेवर तस्करी होत आहे.
महिने-दोन महिने असा क्रम चालत राहिला. अधिकारी वैतागून गेले. एक दिवस बगदादहून बसेराकडे परतताना अधिकार्‍याने तपासणी केली. आणि म्हणाला," नसरुद्दीन, मी तुला माफ केलं समजं, पण खुदाचा वास्ता घेऊन खरं खरं सांग, तू तस्करी करतोयस ना ?" मुल्ला होकारार्थी मान डोलवत म्हणाला, " होय, मी तस्करी करतो."
" कुठल्या वस्तूंची?" अधिकारी.
" गाढवांची ! इकडून वयस्क काहीसे अशक्त गाढवं तिकडे घेऊन जातो आणि तिकडून जवान पण सशक्त गाढवं इकडे आणून चांगल्या किंमतीला विकतो. " असे म्हणून नसरुद्दीन आपल्याजवळच्या गाढवाला हाकत पुढे निघून गेला. अधिकारी पाहतच राहिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणीतरी मस्त श्रेणी द्या रे ह्या प्रतिसादाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख तर मस्त आहेच आणि त्यावरील प्रतिसादही.
पण मस्त ही श्रेणी कशी आणि कुठे द्यायची हे काही नीटसे ध्यानात आले नाही.
पुण्य हा काय प्रकार आहे, ते कोणाला मिळते? .. एक अवांतर पृच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा. मस्त किस्सा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0