ओरल इन्शुलिन

आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे.

सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.

आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. ते व्यर्थ जाऊ नयेत म्हणून भारतातील सर्वात स्वस्त दुध विकलेच जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सरकार आमच्या साठी आहे कि परदेशी औषध कंपन्यांसाठी आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

माहिती कुठं मिळाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीबाजु मोड ऑन -

माहिती कुठं मिळाली?

Ignorance is bliss

ब्लिस मधे रहा की.. Wink

नवीबाजु मोड ऑफ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या वाफळलेल्या घोड्याच्या मलासाठी(स्टिमिंग हॉर्स शिट) काही संदर्भ आहे काय?
सुधारीत आवृत्ती - ह्या घोड्याच्या वाफळलेल्या मलासाठी(स्टिमिंग हॉर्स शिट) काही संदर्भ आहे काय? उगाच व्याकरणवाल्यांच्या पंच्याला हात नको.

त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.

अबब!!! आता उंट भ्रुणहत्या होणार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ कोटी उंट पाहिजेत हे खरे, पण उंटिणी नकोत असे कुठेही म्हटलेले नाही, तस्मात उंट जमातीचे २ कोटी सजीव पाहिजेत असेच म्हटले असावेसे वाटते. तस्मात उंटहत्या होणार नाहीसे वाटते.

(उंटावरचा शहाणा) बुरुस बिन तोमास अल वेय्न गॉथामी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रो-बिझनेस इज प्रो-पुअर हे ऐकले नै काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जालावर हे सापडले.

A small month-long study in people with Type 1 diabetes (which does not appear to have been formally published) suggested that drinking almost a pint of camel milk daily improved blood glucose levels, reducing the need for insulin.

As there have not been enough studies in humans yet, Diabetes UK does not recommend camel milk as a treatment for diabetes - an animal's milk contains nutrients that are tailored for its young

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रक्तात आगोदरच इन्शुलिन असलेल्या व्यक्तीला डायबेटिस होत नाही का? तसं असेल तर उंटिणीचे दूध वगैरे नागमोडी उपायांपेक्षा सरळ लहानपणी इन्शुलिनची लसच का टोचत नाहीत?

दुसरं असं की उंटिणीचं दूध स्वस्त असतं हा शोध कुठून लावला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही प्रतिक्रिया वाचून अंमळ गंमत वाटली.
तुम्हाला खरेच डायबेटिस म्हणजे काय माहिती नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गोड खाल्यामुळे होतो' हा प्रवाद वगळता व साखरेचे नियंत्रण करण्यात शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी पडतो व बाहेरुन इन्शुलिन टोचावे लागते व काही काळानंतर डोळे वगैरे इतर इंद्रियांना धोका पोचतो हे वगळता 'का होतो' याबाबत मलाही माहिती नाही. अधिक माहिती वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय हो खरंच माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इन्श्युलिन मला वाटतं साखर नियंत्रित करत असावं. मग लहानपणी फक्त टोचून काय उपयोग? रोज टोचावं लागतं बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म्म... तसंच असावं बहुदा. कुठल्याशा रहस्यकथेत इन्शुलिनचा विषासारखा वापर केल्याचं आठवलं. (म्ह. नॉन डायबेटिक व्यक्तीला भरपूर प्रमाणात इन्शुलिन टोचलं, मग ब्लड शुगर पार रसातळाला गेली आणि माणूस खपला, असं काहीसं.) राहीजी खुलासा करतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी? का बुवा? आणि ही युक्ती एकापेक्षा अधिक इंग्रजी रहस्यकथां/कादंबर्‍यांमधून वापरलेली आहे त्यामुळे नेमकी कथा आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वारी! मला सातीजी म्हणायचं होतं. मानसिक पावशेर टाकली असावी मी प्रतिसाद लिहिताना.

ही युक्ती एकापेक्षा अधिक इंग्रजी रहस्यकथां/कादंबर्‍यांमधून वापरलेली आहे

मला एक अगाथा ख्रिस्तीची कथा आठवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डिटेल लिहिते.
पण थोडक्यात इन्स्युलिन म्हणजे आपल्या स्वादुपिंडात तयार होणारे एक हार्मोन.
आपण जे खातो त्यातील कार्बोहायड्रेटस शेवटी ग्लुकोज या एका बिल्डींग ब्लॉक मध्ये रुपांतरित्व्होतात.
ही ग्लुकोज रक्तातून त्या त्या अवयवात शोषून घेणे, अतिरिक्त साखर स्टोअर करणे, योग्य वेळ येताच ती रक्तात सोडायला मदत करणे ही सगळी कामे इन्सुलिनमुळे किंवा इन्सुलिनच्या मदतीने होतात.
इन्सुलिनने पेशींचे दरवाजे उघडायला जेपहारेकरी पेशींवर असतात त्याना इन्सुलिन रिसेप्टर म्हणतात.

डायबेटिस म्हणजे या इन्सुलिनचा खरोखरीचा किंवा सापेक्ष अभाव.
खरोखरीच्या अभावात काही कारणाने स्वादुपिंड इन्सुलिन तयारच करत नाही - टाईप वन डायबेटिस

सापेक्ष अभावात तयार झालेले इन्सुलिन स्वादुपिंडाबाहेर येत नाही किंवा अलेच तर रिसेप्टर इतके उर्मट होतात की तुआचे ऐकत नाहीत किंवा रिसेप्टरच कमी होतात्/खराब होतात. या सार्याचे फलित म्हणजे तयार असलेले किंवा होऊ शकणारे इन्सुलिन शरीराला वापरता येत नाहीझ
-हा झाला टाईप टु डायबेटिस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या धाग्याची सुरुवात ह्या किंवा अशाच काही बातम्यांवरून झालेली दिसते. ह्या बातम्यांमागे काय स्रोत आहे ते स्पष्ट नाही.

ह्या विकीपानावरून असे दिसते की बिकानेरमधील National Research Centre for Camels (NRCC) ही संस्था प्रायोगिक उद्देशाने उंटाचे दूध जमा करते आणि वापरते. तसेच ह्या बातमीवरून 'अमुल'हि असे उत्पादन व्यापारी पातळीवर करण्याचा इरादा बाळगून आहे आणि कच्छमध्ये हे दूध काहींच्या वापरात आहे.

धागाकर्त्याला त्याची माहिती कोठे मिळाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0