प्रत्यक्ष आणि रेकॉर्डेड कलामाध्यमे

व्यवस्थापकः मुळ धाग्यावर तो अवांतर नसला तरी या प्रतिसादाचे, त्यावर अधिक साकल्याने चर्चा व्हावी या उद्देशाने, वेगळ्या धाग्यात रुपांतर करत आहोत. मुळ लेखिका प्रस्तावात गरज भासल्यास अधिकची भर घालु शकतीलच / योग्य वाटेल तसे संपादित करू शकतीलच. नाटक व चित्रपटच नाही तर या निमित्ताने प्रत्यक्ष कलेचे सादरीकरण आणि रेकॉर्डेड सादरीकरणातील फायदे, तोटे, तुलना, फरक यावर साधकबाधक चर्चा घडावी हा उद्देश आहेच

काय माहित, मला नाटक हा प्रकार विशेष कधी भावला नाही. समोरचा कलावंत ओव्हरॅक्टींग करतोय असं सारखं वाटत राहतं.

प्रशांत दामले ची टिपिकल २-४ इनोदी नाटके बघून कंटाळले. मग एक्दा जरा गंभीर बघू म्हणून नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे, गिरिश ओक अशी तालेवार नावे असलेले नाटक (बहुदा देहभान असे नाव होते त्याचे!) बघितले. एरवी आवडणारी नीना कुळकर्णी फारर्फार डोक्यात गेली आणि त्यानंतर आज्तागायत विनोदी वा गंभीर नाटक बघण्याचे साहस परत केले नाही.

पण मला एक प्रश्न नेहमी पडतो आता नाटकाचा विषय निघालाच आहे तर विचारून घेते.

का म्हणून नाटकांचा इतका उदोउदो करायचा?

सिनेमा/सिरियल्स ला रिटेक्स असतात, इकडे सगळे लाइव्ह असते, शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत पोचले पाहिजे याची मेहेनत घ्यावी लागते म्हणून यात काम करणारे कलाकार महान इत्यादी इत्यादी मला (ब-यापैकी) मान्य आहे.

पण एक रसिक म्हणून मला काय जास्त मिळतेय?

१. एखाद्या दिवशी कलाकारचा मूड लागतो, नाटक प्रयोग जमून जातो तर एखाद्या दिवशी भट्टी नाही जमत! मग मी जर न जमलेल्या भट्टीच्या प्रयोगाला जाणारी कमनशिबी ठरले तर तितकेच तिकिटाचे पैसे देऊन माझ्यावर अन्याय नाही का? त्यापेक्षा ज्याय फक्त उत्तम वठलेले सीन एकदाच संकलित करून ठेवलेत असे चित्रित करून ठेवलेले नाटक बघणे उचित नाही का?

२. "शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत पोचले पाहिजे" या नादात पहिल्या काही रांगामध्ये बसलेल्या रसिकावर ओव्हरअ‍ॅक्टींग्चा बोजा (जास्त किमतीचे तिकिट काढून सुद्धा) पडतो असे व्यक्तिगत मत आहे.

३. रिपिटेटिव्ह तेच संवाद बोलून १००० वेळा त्याच नाटकाचे प्रयोग करणे हे कलावंतासाठी किती मोनोटोनस असेल?

४. शिवाय प्रत्येक प्रयोगासाठी फिरणे, दरवेळी तालीम - कित्ती हेक्टिक होत असेल?

जेव्हा चित्रीकरणाच्या सोयी नव्हत्या तेव्हा ठीक होते पण आता असताना पुर्वीच्या पद्धती चालू ठेवण्याचा अट्टाहास का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

असो. असो.
***

'या स्फुटाचा उद्देश नाटकाबद्दलची चर्चा नाहीये अहो!' असं खच्चून जोरात ओरडावंसं वाटलं, मग इथे ललित डकवल्याबद्दल स्वतःचाच राग आला आणि मग विरक्ती आली. म्हणून वरची उदासीन प्रतिक्रिया.

पण आता इथे लिहिलं आहे म्हणताना, आलिया....

तर - जिवंत माणसांनी जिवंत माणसांसमोर रोज नव्यानं 'प्रयोग' उर्फ 'खेळ' रंगवण्यातली अनिश्चितता, त्यांनी एकमेकांना दिलेल्या साद-प्रतिसादातून बदलत जाणारा-वाढत जाणारा-वा घसरणारा प्रयोगाचा दर्जा, आपल्या नजरेसमोर जन्म घेणारं-साकारणारं-वाढणारं 'काहीतरी'... हाच मुळात नाटक या गोष्टीचा प्राण आहे. तसं नसतं, तर चित्रीकरणाच्या सोई आल्यावर, नाटक खपलं असतं की. किंवा टीव्हीवर सिनेमा बघता यायला लागल्यावर थेटरांनी मान टाकली असती. किंवा मोबाईलवर सिनेमा पाहता यायला लागल्यावर टीव्ही गंडला असता...

त्या त्या माध्यमाचं एकमेवाद्वितीय सामर्थ्य आणि एकमेवाद्वितीय मर्यादा असतात. म्हणून तर -

असो. यावर काही वाद घालायचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहो मॅग्नाताई "या स्फुटाचा उद्देश नाटकाबद्दलची चर्चा नाहीये अहो!" हे नका मला पटवून देऊ! मला मान्य आहे आणि जे मूळ लेखातून तुम्हाला पोचवायचे होते ते पोचले मला, पहिला प्रतिसाद माझाच आहे!

हा मोठ्ठा प्रतिसाद, वाद घाल्ण्यासाठी टाकलेला नाहीये आणि तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही गोष्टीची चिरफाड पण केली नाहीये याची नोंद घ्यावी!

पण मज अज्ञ बालिकेस काही शंका येतात त्या लिहूच नयेत का, विशेष्तः जिथे त्या विषयाशी संबंधित काही आले आहे?

हवे असल्यास माझा प्रतिसाद मग मनातले छोटे मोठे प्रश्न मध्ये हलवावा, माझी हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

'मॅग्नातै' नामकरण आवडलं. फक्त मॅग्ना ऐवजी मॅग्मा अशी दुरुस्ती सुचवतो. अन्वर्थक इ. होईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्को रे बाबा, उगाच शेपूट जळेल माझे पळता पळता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सूर्य तुम्ही, सविता तुम्हांला काय मॅग्माची भीती Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाळण्यातले नाव नंतर "निशा" असे बदलल्याने आम्ही कुठेच काही उजेड पाडत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

जमे जोक पे धोका केलात की ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विडियो कॉन्फरन्सिंग उपलब्ध असताना वेळात वेळ काढून जवळच्या मित्राच्या लग्नाला का जायचं?
( "खाण्यासाठी/हादडण्यासाठी " हे हमखास यशस्वी उत्तर देउ नये प्लीझ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"खाण्यासाठी/हादडण्यासाठी " हे हमखास यशस्वी उत्तर देउ नये प्लीझ.

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् |
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्नं इतरेजना: ||

बिगर नातेवाईक लोकांना लग्नात काय अपेक्षित असते त्याचे उत्तर जुन्या काळीच दिल्या गेलेले आहे.

बाकी, तुझा प्रश्न अजून काही रोचक ट्विस्ट देऊनही विचारता येईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाण्यासाठी/हादडण्यासाठी - हे तर आहेच! Wink

पण फरक आहे, तो मित्र माझ्याशी बोलणार आहे( त्याला मी आले हे समजेल, त्याला आनंद होईल, त्याला आनंद झाला हे बघून मला आनंद होईल) , चार इतर लोक जमून आम्ही बाजूला बसून कुटाळक्या करणार आहोत हे कारण असते.

मी दुस-या कोणालाच ओळखत नाही, उत्सव्मूर्तीला माझ्याशी नजर्भेट करायला वेळ नाही असली लग्ने अटेन्ड करण्यापेक्षा मी नन्तर काढलेला व्हिडो बघेन!

असो, ललित वर प्रश्न विचारला म्हणून मला मारायला येऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

नाटक का पहायचं?
--ते सादर होतं म्हणून.

ते सादर करायचच कशाला ?
--रंगमंच आहे म्हणून.

रंगमंच बांधून ठेवलेतच कशाल ?
--त्यावर नाटकही सादर करता यावं म्हणून.

पुन्हा ते सादर करायचच कशाला ?
--रंगमंच आहे म्हणून.
.
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्यातल्या विचारांशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंतराआनंद यांनी मूळ लेखात ही प्रतिक्रिया दिली होती

जेव्हा चित्रीकरणाच्या सोयी नव्हत्या तेव्हा ठीक होते पण आता असताना पुर्वीच्या पद्धती चालू ठेवण्याचा अट्टाहास का?

ही पद्धत म्हणून नाही तर कला म्हणून चालू असतात. समोरचे कलावंत पुर्ण तीन तास दुसरं जगणं जगत असतात, त्यामुळे काहीही म्हटलं नाटकाचा ’जिवंतपणा‘ सिनेमात नाही

"हे काइण्ड ऑफ प्लासिबो इफेक्ट आहे, रसिकाला यात विषेश जास्त काही मिळत नाही असे अजूनही वाटते", असे नम्रपणे सूचित करून मी खाली बसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

धाग्यातील विचारांशी पूर्णपणे सहमत. मला नाटक हा प्रकार पूर्णपणे "नाटकी"च वाटत आलेला आहे. अगदी खास ज्येष्ठ इ इ कलाकारांची नाटके अन काम पाहूनही.

प्रशांत दामले, भरत जाधव आणि इतरही शंभर, पाचशे, हजार आदि प्रयोग करणार्‍या नटांच्या स्टेजवरच्या अभिनयात मला एक पाट्या टाकल्यासारखा भाव दिसतो.

म्हणजे आपलं वाक्य बोलताना चेहर्‍यावर प्रचंड भाव आणायचे आणि आपलं वाक्य संपलं की लगेच निर्विकार चेहरा, आणि जणू क्षणभर निवृत्तीच त्या प्रसंगातून.... म्हणजे "माझं झालं , आता तुझं.." अश्या प्रकारे.

असे सूक्ष्म निर्विकार पॉझेस जाणवतात आणि हे लोक कणभरही इन्व्हॉल्व नसून केवळ तोंडात बसलेले शब्द फेकत तास पूर्ण करत आहेत अशी भावना येते.

हा दोष माझाही असू शकेल, पण खरंच वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांत हेच जाणवतं. शिवाय नेपथ्याच्या मर्यादा म्हणून खूपच तडजोड, आदि भाग वेगळेच.

मुख्य भाग कृत्रिम आणि अतिशयोक्त अ‍ॅक्टिंग आणि त्याच्यामधे एकदम दिसून जाणारे निर्विकार पॉजेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला वेगळा धागा काढलाय तर मेघनाचा ललित धागा हायजॅक केल्याचे पातक लागत नाहीये तर मग बोलूनच घेते!

तुम्ही म्हटला ते तर आहेच शिवाय निदान कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यग्रूहातले खुर्च्या भरण्याचे प्रमाण बघितले त्यातही नाटक बघायला येणा-या पब्लिकमध्ये मध्यम्वयीन व सिनिअर सिटिझन्स चा भरणा अन विशी/पंचविशी मधल्या लोकांचा जवळ जवळ पूर्ण अभाव हे बघता ही हळू हळू मागे पडत जाणारी कला आहे असे प्रामाणिक्पणे वाटते.

एक वेळ अशी येईल की कलावंतांचे मानधन, बाकी खर्च आणि तिकिटातून होणारी कमाई याचा ताळमेळ बसणे बंद होईल आणि हा प्रकार बंद पडेल.

सध्या नाटके बघणा-या वर्गात खरेच त्यातील जिवंतपणा व इतर बाकीच्या माध्यमापेक्षा जास्त काही मिळते म्हणून जाणारे पब्लिक किती आणि नाटक बघणे हा "एलिट / हुच्चभ्रू" प्रकार समजला जातो म्हणून करणारे किती - ते वेगळेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

तुझे भाकीत माझ्या हयातीत तरी खोटे पडो अशी प्रार्थना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रभाव नक्की कमी होत जाणार.

सिनेमा प्रगत झाल्यावर शांबरिक खरोलिका वर्षानुवर्षे मेनस्ट्रीम राहू शकते का?

हे फक्त एक उदा.

offset DTP इ नंतर खिळेछपाई मेनस्ट्रीम राहील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हातातलं घड्याळ का वापरत असावेत सध्या?
मोबाइलमध्ये, भिंतीवर ,जिथं जिथं म्हणून स्क्रीन आहे ( केबल टीव्ही , लॅपटॉप्,डेस्कटॉप) सर्वत्र वेळच नव्हे तारिख्,वार सर्व सर्व तपशीलवार समजत असताना हातात घड्याळ घालायचं ते नेमकं कशासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लय भारी स्टायस्लिश दिसते म्हणून - लाईक अ ब्रेसलेट!

शिवाय मी स्क्रिन, भिंतीवरचे घड्याल डोळ्यासमोर सारखे घेऊन फिरत नाही.

मोबाईल मध्ये घड्याळ असते पण तो कधी कधी खिशात, पर्स मध्ये असतो आणि हात किंचित वर करून वेळ बघणे सर्वात सोप्पे आहे म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मनोबाने उत्तम लीड दिला आहे.

सूर्यघड्याळ ते पोर्टेबल वाळूघड्याळ यामधे असे एक ट्रान्स्झिशन झाले.

वाळूचे घड्याळ फारवेळा उलटसुलट करावे लागते म्हणून चावी देऊन भिंतीवर किमान एखाददोन दिवस सलग चालणारी घड्याळे इथे दुसरे झाले.

चावीचे घड्याळ ते क्वार्ट्झ कंपनांद्वारे सेलवर चालणारी घड्याळे -- तिसरे

अनेक सुटे भाग आणि लेबर सेंट्रिक अशी गियरचक्रे, काटे, स्प्रिंगा यांची घड्याळे ते भांडवलविरळ आणि मास प्रॉडक्शनच्या दृष्टीने जास्त फ्रेंडली इलेक्ट्रॉनिक घड्याळे हे चौथे ट्रान्स्झिशन..

असे होतच राहणार.

पुढेही एक छंद, षोक, अँटिक, एथ्निक किंवा एलीट अशा प्रकारची आवड म्हणून काही हँडमेड काट्याची रिस्टवॉचेस / पॉकेटवॉचेस, अस्तित्वात राहतीलच, पण ती मेनस्ट्रीम नसतील.

लेबर सेंट्रिक गोष्टी या महाग महाग होत जातात आणि त्यामुळे ऑब्सोलीट किंवा मर्यादित होतात.

हाताने विणलेले गालिचे, हातमागाचे कपडे, विरुद्ध पॉवरलूम.. प्रचंड कमी वेळात प्रचंड जास्त उत्पादन आणि रिपिटेटिव्ह श्रम कमी = आर्थिकदृष्ट्या जास्त लोकांना उपलब्ध आणि व्हायेबल उत्पादन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेतीचा कुणाचा अभ्यास्/माहिती आहे का ?
ट्रॅक्टर वगैरे आल्यावर बैलांचं काय झालं?
सामान ने आण करायला ट्रक-ट्रॅक्टर अणि माणसांना ये-जा करायला बस्-बाइक उपलब्ध झाल्यावर बैलांचं नेमकं काय केलं गेलं ?
सध्या भारतीय शेतकरी बैलाकडे पूर्वीसारखच खरा मित्र/शेतीतला पार्टनर म्हणून पाहतो की त्यात काही बदल झाला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाटक म्हणजे एका ठराविक अवकाशात उभे केलेले परके विश्व. चित्रपट वा अन्य माध्यमांत हे अवकाश तितके सिमीत नसते.
नाटक म्हणजे नुसता अभिनय नव्हे. एकुणच ही दोन वेगळी माध्यमे आहेत. आपल्याला सांगायची गोष्ट कोणत्या माध्यमांत अधिक चांगली मांडता येईल याचा विचार होणे गरजेचे असते.

मला नाटकेही आवडतात नी चित्रपटही दोन्हीची सौंदर्यस्थळे वेगळी आहेत आणि एकुणच माझ्या आवडींच्या स्पेक्ट्रमवर दोघेही महत्त्वाची परंतू वेगळी स्थाने पटकावून आहेत. आणि तसेही त्यांना एकाच खुर्चीसाठी भांडावे लागु नये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी मध्यमवर्गाच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर नाटकाला उच्चभ्रू प्रतिष्ठा होती आणि सिनेमाला ती नव्हती असा मोठा काळ होऊन गेला. ह्यामागे -

  • संगीत नाटकांचा वाटा मोठा होता असा माझा अंदाज आहे. त्या काळात नटूनथटून एखाद्या समारंभाला जावं तसं नाटकाला जाण्याची पद्धत आली. तशी प्रतिष्ठा सिनेमाला बहुधा 'हम आप के है कौन'च्या वेळेला आली.
  • शिवाय, एका प्रकाराच्या गांधीवादी समाजवादामध्ये सिनेमा हे माध्यम पोरकट मानलं गेलं आणि एका काळापर्यंत मराठी मध्यमवर्गात डाव्या-उजव्या-हिंदुत्ववादी-पुरोगामी सगळ्या बाजूंवर त्या विचारांचा प्रभाव होता.

पण ही कलाबाह्य कारणं झाली. आता धाग्यातली काही वाक्यं घेऊन त्यांना प्रतिसाद -

>> समोरचा कलावंत ओव्हरॅक्टींग करतोय असं सारखं वाटत राहतं. <<

मराठी मध्यमवर्गात लोकप्रिय असलेल्या विशिष्ट प्रकारच्या नाटकांत खरोखरच ओव्हरअ‍ॅक्टिंग केलं जातं. काशिनाथ घाणेकरांचा अभिनय, कानेटकरी, कोल्हटकरी वगैरे नाटकं आणि अगदी डॉ. लागूंनी अभिनय केलेली 'नटसम्राट'सारखी नाटकंसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. पुढे मग जयवंत दळवी (नाटककार म्हणून), चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक म्हणून), आणि आता अगदी 'छापा-काटा'पर्यंतच्या लोकप्रिय नाटकांत हेच दिसतं. पण म्हणून तो 'नाटक' ह्या कलाप्रकाराचा दोष ठरत नाही; ठरू नये. चंद्रकांत कुलकर्णींनीच एलकुंचवारांची नाटकं केली तेव्हा ती शैली टाळायचा किमान प्रयत्न तरी केला होता.

>> एखाद्या दिवशी कलाकारचा मूड लागतो, नाटक प्रयोग जमून जातो तर एखाद्या दिवशी भट्टी नाही जमत! मग मी जर न जमलेल्या भट्टीच्या प्रयोगाला जाणारी कमनशिबी ठरले तर तितकेच तिकिटाचे पैसे देऊन माझ्यावर अन्याय नाही का? त्यापेक्षा ज्याय फक्त उत्तम वठलेले सीन एकदाच संकलित करून ठेवलेत असे चित्रित करून ठेवलेले नाटक बघणे उचित नाही का? <<

  • एक तर जुगार खेळण्यात एक गंमत असते. शिवाय, प्रेमात पडण्यातसुद्धा गंमत असते. तसंच काहीसं इथेही होतं. मी कित्येक नाटकं पुन्हा (तीच तीच, वेगळ्या भाषांत, वेगळ्या संचांतसुद्धा) पाहिली आहेत. पण एखादाच प्रयोग असा काही काळजाचा लचका तोडतो की त्यासाठी पुन्हा पुन्हा तो धोका पत्करावासा वाटतो. शेवटी मामला 'किती पैसे मोजले आहेत' असा हिशेबी नसतो, तर प्रेमात पडण्यासारखा असतो.
  • दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या प्रेक्षकांसोबत नाटक पाहणं हासुद्धा वेगळा आणि छान अनुभव असतो. कोण कुठे दाद देतंय, कोण कशाला हसतंय, ह्यातून 'माझिया जातीचा भेटों मज कोणी' असा अनुभव येऊ शकतो. आणि गंमत म्हणजे नटांचंही असं होतं. समोरचा प्रेक्षक योग्य जागी दाद देत असेल, तर नटांना हुरूप येतो आणि प्रयोग अधिक रंगतो हा अनुभव अनेक नटांकडून मी ऐकला आहे आणि प्रत्यक्षही अनुभवला आहे. हाच मुद्दा संगीताची मैफल किंवा एखादं व्याख्यान ऐकतानाही वैध असतो.

>> "शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत पोचले पाहिजे" या नादात पहिल्या काही रांगामध्ये बसलेल्या रसिकावर ओव्हरअ‍ॅक्टींग्चा बोजा (जास्त किमतीचे तिकिट काढून सुद्धा) पडतो असे व्यक्तिगत मत आहे. <<

मी वर उल्लेख केलेली 'घाणेकरी' शैली अशी होती, पण आता तंत्रानुसार ह्यात फरक पडला आहे. उंदराच्या आकाराचे माईक्स आणि थिएटरमधली साउंड सिस्टीम अतिशय उच्च दर्जाची ध्वनिफेक देऊ शकतात. अगदी कुजबूजसुद्धा नीट ऐकू येऊ शकते. फक्त त्यासाठी तशी नाटकं निर्माण व्हायला हवीत (काही अल्प प्रमाणात ती होतातही.)

>> रिपिटेटिव्ह तेच संवाद बोलून १००० वेळा त्याच नाटकाचे प्रयोग करणे हे कलावंतासाठी किती मोनोटोनस असेल? <<

मी वर म्हटल्याप्रमाणे चांगल्या प्रेक्षकासमोर प्रयोग सादर करणं ही आनंदाची गोष्ट असते. इंगमार बर्गमनसारख्या प्रथितयश आणि जगविख्यात सिनेदिग्दर्शकाला आणि त्याच्या नटमंडळींना सातत्यानं थिएटरमध्येसुद्धा काम करत राहण्याची गरज भासली ती हे दोन अनुभव वेगळे असल्यामुळे. अन्यथा, केवळ सिनेमातून बर्गमनला जी जागतिक किर्ती लाभली ती नाटकांमुळे लाभणार नव्हती हे उघड होतं.

>> शिवाय प्रत्येक प्रयोगासाठी फिरणे, दरवेळी तालीम - कित्ती हेक्टिक होत असेल? <<

हे कष्टाचं काम अर्थात आहे. शिवाय, आजच्यासारखी सिनेमा, सीरियल, रिअ‍ॅलिटी शो, गणेशोत्सव आणि दहीहंडी वगैरे प्रलोभनं समोर असताना अनेक कलाकार नाटकांपासून दुरावतात हेसुद्धा खरं आहेच. पण शेवटी, ज्यांचं ह्या माध्यमावर प्रेम आहे असे कलाकार आणि प्रेक्षक थोडे तरी आहेत तोवर ते माध्यम जिवंत राहील अशी आशा आहे.

खरं सांगायचं तर महाराष्ट्रात आजमितीला नाटक हे माध्यम जितकं जिवंत आहे तितकं ते इतर प्रांतांत दिसत नाही. आणि अशी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कारणे ब-यापैकी पटली आहेत. सखोल प्रतिसादासाठी धन्यवाद!

तरीही "हा माझ्या चहाचा कप नाही" हे नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

प्रतिसाद (अपेक्षेप्रमाणेच) जपून ठेवावा असा.
मराठी मध्यमवर्गात लोकप्रिय असलेल्या विशिष्ट प्रकारच्या नाटकांत खरोखरच ओव्हरअ‍ॅक्टिंग केलं जातं. काशिनाथ घाणेकरांचा अभिनय, कानेटकरी, कोल्हटकरी वगैरे नाटकं आणि अगदी डॉ. लागूंनी अभिनय केलेली 'नटसम्राट'सारखी नाटकंसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. पुढे मग जयवंत दळवी (नाटककार म्हणून), चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक म्हणून), आणि आता अगदी 'छापा-काटा'पर्यंतच्या लोकप्रिय नाटकांत हेच दिसतं.
हो. पण तरीही पाहणं सोडवत नाही. कानेटकरी स्टाइलचीही आवडात नाहित किंवा हमखास यशस्वी अशी "एका लग्नाची गोष्ट" , "पती सगळे उचापती" सुद्धा नाहित.

.
.
.
उंदराच्या आकाराचे माईक्स आणि थिएटरमधली साउंड सिस्टीम अतिशय उच्च दर्जाची ध्वनिफेक देऊ शकतात. अगदी कुजबूजसुद्धा नीट ऐकू येऊ शकते. फक्त त्यासाठी तशी नाटकं निर्माण व्हायला हवीत (काही अल्प प्रमाणात ती होतातही.)

"अल्प प्रमाणात " म्हणालात; त्याबद्दल :-
अलिकडच्या काळात होउन गेलेले, उल्लेखनीय असे कोणते प्रयोग आहेत ?
सध्या प्रयोग होत असलेलं असं कोणतं चांगलं नाटक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> कानेटकरी स्टाइलचीही आवडात नाहित किंवा हमखास यशस्वी अशी "एका लग्नाची गोष्ट" , "पती सगळे उचापती" सुद्धा नाहित. <<

कानेटकरांच्या नाटकांविषयी मला प्रेम नाही, पण कानेटकरांची एक गंमत आहे. त्यांची भाषेवर पकड चांगली होती (म्हणजे अगदी गडकरींसारखी नाही अर्थात). त्यामुळे त्यांचे संवाद म्हणायला सांगितले तर आजचे अनेक यशस्वी आणि भलेभले मानले जाणारे कलाकार उघडे पडतील.

>> अलिकडच्या काळात होउन गेलेले, उल्लेखनीय असे कोणते प्रयोग आहेत ?
सध्या प्रयोग होत असलेलं असं कोणतं चांगलं नाटक आहे का? <<

सध्या सातत्यानं प्रयोग होत असलेलं एकही चांगलं नाटक माझ्या पाहण्यात नाही. अभिजीत झुंजाररावचं 'लेझीम खेळणारी पोरं' आणि 'अमेरिकेला पुरावा काय?'बद्दल चांगलं ऐकून आहे, पण पाहिलेलं नाही. सुदर्शनमध्ये 'रिंगण' उपक्रमाअंतर्गत महिन्यातून एकदा काही नवे प्रयोग सध्या चालू आहेत. पुढच्या शनिवारी-रविवारी नवं सादरीकरण असेल. जुगार खेळून पाहा. अधिक माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार!
फेसबुक इथून उघडत नाही. घरी जाउन नक्की पाहतो. np.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद वाचनखूण घालण्याच्या तोडीचा आहे हे खरंच. पण हा विषय काढल्याबद्दल आणि जंतूमहाशयांना हा प्रतिसाद लिहायला लावल्याबद्दल सविताचे खास आभार मानावे लागतील ते

पण एखादाच प्रयोग असा काही काळजाचा लचका तोडतो की

या वाक्यासाठी! जंतूंकडून काळजाचा लचका तोडला जाण्याची रसिली भाषा? सविता, माझ्याकडे तुला एक चहा लागू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चहा? फक्त चहा? छे छे छे!!

साक्षात मेघना (मॅग्ना / मॅग्मा) च्या ललित धाग्यावर असले प्रश्न उपस्थित करण्याचे साहस केल्याबद्दल फक्त चहा?

सोत्रिंकडून आलेल्या दोन चार रेशिप्या तरी करून दे की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बरं, मुली, भेटल्यावर ठरवू हो. तूर्तास फक्त कौतुकाचे दोन शब्द धाडते, त्यावर समाधान मानून घे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> जंतूंकडून काळजाचा लचका तोडला जाण्याची रसिली भाषा? <<

आमचंही काळीज चरबीयुक्त आणि गोड आहे; आम्हालासुद्धा आपलं म्हणा Wink पण खरं सांगायचं तर बारीवर सध्या ट्यार्पी खेचत असलेल्या त्याच त्या दळणांमधून वेगळे आणि जिव्हाळ्याचे विषय काढल्याबद्दल मेघनाताईंनी आणि सविताताईंनी अल्प प्रमाणात आमच्या काळजाला हात घातला. त्यामुळे हा प्रतिसाद त्यांना बहाल होता. आभार मानायचेच तर ते आपापलेच माना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसाद वाचून खूश होतच होते, पण

अल्प प्रमाणात

हे शब्द दाताखाली खडा यावा तसे आले. पण त्यामुळेच जंतू हे जंतूच असल्याची आणि ते पूर्णपणे शुद्धीत असल्याचीही खातरीही पटली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(अवांतर आहे, पण राहवत नाही...)

आमचंही काळीज चरबीयुक्त आणि गोड आहे; आम्हालासुद्धा आपलं म्हणा

इतकी नाट्यमधुर आणि सिनेरसाळ फळं खाल्ल्यावर दुसरं काय होणार? पण मगरींपासून सावधान रहा, आणि काळीज कुठेतरी गुलदस्त्यात ठेवून फिरत चला असा अनाहुत सल्ला देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गुलदस्त्यापासून सावधान रहा, आणि काळीज कुठेतरी मगरीपाशी ठेवून फिरत चला असा अनाहुत सल्ला".
कलियुग आहे. गुलदस्ते मगरीपेक्षा जास्त धोकादायक आहेत.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरच चिंजंचा प्रतिसाद अतोनात आवडला. खास खास खासच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तर जुगार खेळण्यात एक गंमत असते. शिवाय, प्रेमात पडण्यातसुद्धा गंमत असते. तसंच काहीसं इथेही होतं. मी कित्येक नाटकं पुन्हा (तीच तीच, वेगळ्या भाषांत, वेगळ्या संचांतसुद्धा) पाहिली आहेत. पण एखादाच प्रयोग असा काही काळजाचा लचका तोडतो की त्यासाठी पुन्हा पुन्हा तो धोका पत्करावासा वाटतो. शेवटी मामला 'किती पैसे मोजले आहेत' असा हिशेबी नसतो, तर प्रेमात पडण्यासारखा असतो.

अगदी मनातलं बोल्लात. यावरून एक लक्षात येत, की नाटक आणि सिनेमात चांगलं वाईट असं काहीच नसत, दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे त्यांचे गुण विशेष आहेत. मुळात ते बघायला येणार्‍या प्रेक्षकाची आवड, त्याचं त्या कलेवरच/कलाप्रकारावरचं प्रेमं आणि/किंवा त्या बद्द्लच स़खोल ज्ञान यामुळे त्याच्या मनात त्या कलाप्रकाराबद्दल मत तयार होत असतं.त्यामुळेच चिंज, तुम्हाला नाटक म्हणजे प्रेमात पड्ण्याची गोष्ट वाटते तर सविताताईंना पैशाचा हिशोब दिसतो.

जसं की गाण्याच्या बाबतीत होतं. जो माणूस भारतीय शास्त्रीय संगीत शिकला असेल, किंवा त्यातला कानसेन असेल, त्यालाच तास तासभर चालणारे बडे ख्याल आवडतील, इतर म्हणतील काय रटाळ रडगाण ऐकायचं आणि वरती त्याला पैसे पण मोजायचे. त्यापेक्शा घरी सिस्टीम वर हलकंफुलकं सुगम संगीत ऐकावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सई

परुषोत्तमची पहिल्या फेरीची नाटकं पहा असे सुचवतो, किंवा 'शांतेचं कार्ट' पाहिलं आहे काय?

किंवा

रेकॉर्डेड गाणं/संगीत आणि प्रत्यक्ष गाण्याचा कार्यक्रम ह्यातलं काय आवडतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिली फेरी ठीकच आहे. विजेत्या नाटकांचे तर दोन्-पाच का असेना तिकीट लावून प्रयोग होतात. तेसुद्धा पाहू शकतो.
पहिल्या फेरीत किंवा एकूणच पुरुषोत्तममध्ये जागा ओळखीपाळखीनं , जॅक लावून मिळवावी लागते. मिळणे सोपे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुरूषोत्तमची नाटके पाहिली आहेत. काही काही आवडली होती पण मुख्यतः आवडले होते ते तिथेले उत्साहाने भरलेले वातावरण, आरडाओरडा आणि घोषणा!

बाकी प्रोफेशनली सादर केलेले गाण्याचे कार्यक्रम कधी ऐकले नाहियेत. त्यामुळे सांगता येत नाही.

पण हौशी मंडळी गप्पाटप्पंच्या ग्रुप मध्ये किंवा फॅमिली फंक्शनला गातात तेव्हा बहुतेक वेळा मला तिथून पळून जावेसे वाटते, कारण

१. कदाचित माझी अपेक्षा खूप जास्त असते आणि डोक्यात मूळ गायकाने, वाद्यवॄंदा सकट गायलेले गाणे फिट्ट असते. पूर्ण वाद्यवॄंद सोबतीला नसताना त्या उच्च प्रतीचे गाणे जमणारी हौशी मंडळी फार विरळा असतात.

२. आपण लता/आशा आहोत अशा प्रकारे हावभावात गाणा-या लोकांना बघून मला खूप हसू येत असते आणि ते गाणा-याला ते दाखवून त्यांचा हिरमोड करायची माझी इच्छा नसते.

३. मला जर त्यांचे सादरीकरण विशेष आवडले नाही तर काय प्रतिक्रिया द्यावी हा यक्षप्रश्न असतो, उगाच बळेच खोटे बोलावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अर्थात महत्वाचे आहे. जिवंतपणा आणि उस्फूर्तपणा टीव्ही किंवा कोणत्याही माध्यमामध्ये येणार/येत नाही. तिथं असलेल्या वातावरणाचा थेट परिणाम होतो.
नाटकं लै जास्त पाहीली आहेत असं नाही. पण नृत्याचा कार्यक्रम स्क्रीनवर पहाणे आणि थेट पहाणे जमीन अस्मानाचा फरक आहे हे लगेच जाणवेल. बर्‍याचदा पुर्वी नृत्य म्हणल्यावर मी अजूबाजूला फेरफटका मारून यायचो. तीन-चार वर्षापुर्वी मल्लिका साराभाई या नर्तिका सवाईच्या शेवटच्या दिवशी आल्या होत्या. तेव्हा जरा बाजूला आलेलो असतांना, थोडावेळ नृत्य स्क्रीनवर पाहीलं आणि थोड्यावेळा नंतर मित्र म्हणाला म्हणून थेट पाहीलं. जमीन आस्मानाचा फरक जाणवत होता. त्यानंतर बर्‍याचदा ठरवून नृत्याचे कार्यक्रम पण पाहीलेत. काही महिन्यांपुर्वी सोनल मानसिंग यांचा पाहीला होता. कमाल आवडला होता.
.
इन शॉर्ट लाईव्ह आणि रेकॉर्डेडमध्ये फरक पडतो आणि खणखणीत फरक पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंतातुर जंतूंनी इतरांना थोडा वेळ बोलायला द्यावा आणि नंतर सावकाश प्रतिसाद द्यावा ही विनंती. कारण एकदा त्यांनी लिहिलं की मग इतरांना काही लिहिण्यासारखं उरतच नाही.

नाटक हे माध्यम अर्थातच लोकांपर्यंत पोचण्याच्या बाबतीत एफिशियंट नाही. पण म्हणून ते मरेल असं वाटत नाही. ऐशी वर्षांपूर्वी केवळ टेस्ट क्रिकेट खेळलं जायचं. तो सामना बघायला जाणं हे फारच थोड्या लोकांना परवडायचं. याचं कारण म्हणजे पाच दिवसांचा वेळ मोजण्याची तयारी असायला लागायची. आता इतर एफिशियंट प्रकारचं क्रिकेट प्रचंड फोफावलेलं आहे. तरीही टेस्ट मॅचेस जवळपास तितक्याच, किंबहुना जास्तच खेळल्या जातात. ते सामने बघण्यासाठी तळागाळातल्या वर्गापर्यंत काही ना काही सोयी झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटचं सौंदर्य, त्यातली चुरस, थरार हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या कमीआधिक्याने पोचतातच.

प्रत्यक्ष क्रिकेटची मॅच बघणं आणि टीव्हीवर बघणं, यातही फरक आहेच. भारताने विश्वचषक जिंकला, तेंडुलकरने २०० रन्स केल्या त्या क्षणी तिथे हजर असण्यात एक वेगळंच थ्रिल असतं. त्या क्षणी तसाच जल्लोष करणारे हजारो लोक असल्यामुळे ती स्टेडियमभर पसरलेली प्रेक्षकांची धुंदी अनुभवता येते. असे अनुभव खोलवर परिणाम करतात, आणि जन्मभर विसरले जात नाहीत. असे मोजके अनुभव मिळण्यासाठी अर्थातच बराच वेळ खर्च करावा लागतो. नाटकांचंही तसंच आहे. प्रत्यक्षात जे नाट्य सामावलेलं असतं ते रेकॉर्डेड माध्यमांत पकडता येईलच असं नाही. (सिनेमाची वेगळी बलस्थानं आहेत...)

वाईट प्रकारे केलेल्या नाटकांबद्दलच्या तक्रारींशी सहमत आहे. कदाचित हा जाणवणारा बटबटीतपणाही सिनेमासारख्या माध्यमांमुळे बदललेल्या अभिरुचीचा निदर्शक असू शकेल. त्याआधी तेच नाटकांचं व्याकरण होतं, त्यामुळे कदाचित अंगावर येत नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी मूळ लेखाबद्दल....

मी पूर्ण सहमत आहे. म्हणून मी नाटके सहसा पहात नाही.

>>प्रत्यक्ष क्रिकेटची मॅच बघणं आणि टीव्हीवर बघणं, यातही फरक आहेच. भारताने विश्वचषक जिंकला, तेंडुलकरने २०० रन्स केल्या त्या क्षणी तिथे हजर असण्यात एक वेगळंच थ्रिल असतं. त्या क्षणी तसाच जल्लोष करणारे हजारो लोक असल्यामुळे ती स्टेडियमभर पसरलेली प्रेक्षकांची धुंदी अनुभवता येते. असे अनुभव खोलवर परिणाम करतात, आणि जन्मभर विसरले जात नाहीत.

याविषयी साशंक आहे.
ज्याला क्रिकेट खेळाचा आनंद घ्यायचा आहे त्याने टीव्हीवरच मॅच पाहणे उत्तम. प्रत्यक्ष मैदानात चार कोनातून रीप्ले दिसत नाही (आता मैदानात मोठे स्क्रीन लावलेले असतात हे खरे). मैदानावर जाऊन मॅच बघण्यात प्रेक्षकांची धुंदी सोडून काही नाही. सध्याच्या सामन्यात जे प्रेक्षक मैदानात दिसतात ते हुल्लड/धमाल करण्यासाठी येतात.

गाण्याविषयी म्हणावे तर रेकॉर्डेड गाणे ऐकताना नेहमी तेच ऐकायला मिळते (कन्सिस्टन्सी). पण मग त्याच ताना, तेच आलाप.... प्रत्यक्ष कार्यक्रमात गायक नेहमी काहीतरी नवे गात असेल तर मजा येते. पण मैफल रंगली नाही तर ? ही रिस्क राहतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राजेशरावांशी सहमत आहे. क्रिकेटची म्याच , टेस्ट म्याच, मैदानावर बघताना खूप भारी वाटतं. रिप्ले वगैरे नसले तरी (आज्काल मैदानवर्पण रिप्ले दिसतात मोठ्या स्क्रीनवर). तिथला माहौल काही औरच असतो.
तेच गाण्याचं देखील भीमसेन जोशींची रोकॉर्ड ऐकणं आणि प्रतेक्ष मैफिलीत त्यांच्या समोर बसून ऐकणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धागा आणि प्रतिसाद उद्बोधक आहेत.

नाटकाच्या बाबत जाणवलेल्या अन्य काही बाबी म्हणजे अर्थातच अन्य माध्यमांचं त्यावर पडलेलं सावट आणि लोकांच्या आक्रसलेल्या अटेंशन स्पॅनचा प्रश्न. नाटकांमधली प्रयोगशीलता सातत्याने टिकवून ठेवणं, नवनवे प्रयोग करत राहाणं हे प्रकार काही लोक नेमानं करतात हे खरं आहे परंतु या प्रकाराला मिळणार्‍या लोकाश्रयाला सतत आव्हान मिळत आहे. अर्थात ही घटना आजची नाहीच. बालगंधर्व आणि दीनानाथ यांच्या काळापासून हे चालत आलेलं आहेच. मात्र सिनेमाच्या जोडीला आता इंटरनेट, टिव्हीचा वाढता प्रसार, स्ट्रीमिंग माध्यमावरचं बिंज् वॉचिंग्, क्रिकेटचं मनोरंजनकारक स्वरूप, व्हिडीओगेम्स आदि प्रकरणं गेल्या पाच दशकांमधे क्रमाक्रमाने अस्तित्त्वात आलेली आहेत ज्यांचा थेट परिणाम नाटक या माध्यमाच्या लोकाश्रयावर आणि पर्यायाने त्याच्या प्रयोगशीलतेवर होत राहातो आहे.

"नाटकातले संवाद नको तेव्हढे नाटकी वाटतात" हे मत सुद्धा माझ्यामते सिनेमा-टिव्हीच्या संस्कृतीवर ज्यांची जोपासना झाली त्याचाच एक परिणाम असावा, असं म्हणता येईल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वाईट प्रकारे केलेल्या नाटकांबद्दलच्या तक्रारींशी सहमत आहे. कदाचित हा जाणवणारा बटबटीतपणाही सिनेमासारख्या माध्यमांमुळे बदललेल्या अभिरुचीचा निदर्शक असू शकेल. त्याआधी तेच नाटकांचं व्याकरण होतं, त्यामुळे कदाचित अंगावर येत नसेल.

यालाच पुरवणी:
इथे रोल्स बदलले आहेत असे वाटते. मुळात मराठी नाटके ही पारंपरिकरित्या लाउडच आहेत. स्पष्ट (म्हणजे अनेकदा वाजवी/गरजेपेक्षा जास्त एनर्जी लाऊन म्हटलेले) संवाद नी ढोबळ अभिनय हा अनेक लोकप्रिय नटांचा युएस्पी म्हणता यावा. सुरूवातीला जेव्हा सिनेमा आला तेव्हा त्यात आलेली मंडळी ही नाटकांतूनच आलेली होती. दृकश्राव्य कलेच्या सादरीकरणाचा "भारतीय" म्हणता यावा असा - जो आता बटबटीत वाटूही शकेल - एक खास संस्कार त्यांच्यावर आधीच झाला होता. नी त्यामुळे सुरूवातीचे सिनेमे आणि त्यातील हावभाव बघितले तर तो प्रभाव स्पष्ट जाणवतो. अगदी सुरूवातीला मूकपट होते तेव्हा काहिशी रंजित अ‍ॅक्टिंग ही गरज होती, परंतू बोलपट आल्यानंतरही विदग्ध नायिका अशी नाटक्यातल्यासारखी पायर्‍यांवर झोकून देताना किंवा खांबाला/वेलींना टेकून अश्रू ढाळताना अनेकदा आढळते Wink

चित्रपट हळुहळू नाटकाच्या विळख्यातून बाहेर पडू लागला, तरी प्रभाव बर्‍यापैकी ओसरायला अर्धे शतक तरी जावे लागले (@चिंजं, करेक्ट मी प्लीज! - {चिंकमीप्लि}) त्यानंतरचा मोठा काळ बाहेरील चित्रपटांनी प्रभावित होऊन त्याची कॉपी + आपला (आता बटबटित वाटतो असाच) मालमसाला याचे मिश्रण करून बरेच सिनेमे आले हा प्रभावही ३०-४० वर्षांत ग्रॅ‍ज्युअली कमी होत गेला (पुन्हा चिंकमीप्लि). त्यानंतर गेल्या दशकभरात आपले स्वतंत्र प्रकारचे तरीही खास चित्रपटासाठी पटकथा लिहिले गेलेले (अजूनही पटकथालेखनाकडे दुर्लक्ष होते हे चिंजंचे पत असलेले मत चिंत्य) चित्रपट येऊ लागले आहेत आणि आता रोल रिव्हर्सल होऊ लागले आहे

दरम्यान चित्रपट हे नाटकांपेक्षा अधिक लोकप्रिय माध्यम बनले. नी आता बदलत्या चित्रपटांबरोबर,नाटकांमध्ये दिसणारे बदल व्हायला वेळ जावा लागेल. सध्या नाटकांची घटलेली लांबी, क्वचित कल्पक नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी आदींकडे दिलेले लक्ष आणि प्रचार/जाहिरातींत चित्रपटांचे अनुकरण सुरू झाले आहे. अजूनही अनेक अभिनेते मात्र रंगभूमी ते चित्रपट असाच प्रवास करत आहेत. पैकी हल्ली सिरीयल्स ते रंगभूमी असा वेगळ्या दिशेने प्रवास करणार्‍या नटांची जातकूळी वेगळी लक्षात येते. नाटकांतील संवादफेकीचा बटबटीतपणा कमी व्हायला अजून काहि वर्षे जातील असे वाटते

(खरंतर सगळाअ प्रतिसादच अनभ्यस्त आहे. जिथेजिथे चुकीची व/वा अपूर्ण माहिती आहे, कोणाही जाणकारांनी करेक्ट करावी)

या प्रतिसादाच्या चिकित्सेसाठी चिंजं,विसुनाना,भडकमकर मास्तर,संजोप राव,रमताराम,केतकी,अमृतवल्ली,उसंत सखू या नाट्यवेडाच्या व चित्रपटआवडीच्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर उभ्या असलेल्या रसिकांना आवाहन करतो. (ज्यांच्या आवडींची कल्पना आहे अशांची नावे घेतली आहे. अन्य सदस्यांची मते वेल्कच आहेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात मराठी नाटके ही पारंपरिकरित्या लाउडच आहेत.

सगळ्याच नाटकांना सरसकट शैलीदार लाउड अभिनय नाही शोभून दिसत. पण काही विषयांना, काही विशिष्ट प्रकारांना तो आणि तोच शोभून दिसतो. मुळात लाउड अभिनय म्हणजे काहीतरी सरसकट वाईट हेच मला मान्य नाही. ती अभिनयाची एक शैली आहे, बस. 'साठेचं काय करायचं?'मधली सलमा इतकी लाउड बोलली तर डोक्यात जाईल. पण 'सततची नाटकं'मधली लोपामुद्रा? तिनं एक विशिष्ट आवाज लावला, तरच ती लोपामुद्रा आहे हे ठसेल. ती सलमासारखी चहाचा कप हातात घेऊन कॅज्युअली अगस्तीशी बोलली तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळात लाउड अभिनय म्हणजे काहीतरी सरसकट वाईट हेच मला मान्य नाही

सरसकट लाऊड म्हणजे वाईट असे म्हणणे नाही - मात्र लाउड आहेच. गरज असताना प्रखर/प्रभावी अभिनय असला तर आवडतेही.
मात्र, बहुतांश मराठी नाटकांत मलाही गरजेहून अधिक लाउड संवादफेक, हातवारे बहुसंख्यजण करतात असेच वाटते. आता हरेक पात्राला एनर्जीची गरज किती व कुठे? हा पुन्हा सापेक्ष प्रकार - ती सापेक्षताच तर अशा चर्चांत मजा आणते Wink

अगदी ताजे उदा घेऊ. मी पाहिलेल्या छापा-काटामध्ये रिमाचा संयत अभिनय जितका आवडला होता त्यापुढे मुक्ताचा अभिनय कृत्रिम व भडक वाटला होता. एनर्जी रिमानेही भरपूरच लावली होती पण ती कुठे व कशी हे अगदीच शिकण्यासारखे होते. त्याउलट मुक्ताची एनर्जी एकाच पट्टीतील सरळधोपट वाटली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी पाहिलेल्या छापा-काटामध्ये रिमाचा संयत अभिनय जितका आवडला होता त्यापुढे मुक्ताचा अभिनय कृत्रिम व भडक वाटला होता.

घ्या! मला हे बरोब्बर उलट वाटलं होतं. घ्या - सापेक्षता! आता काय चर्चा करणार कप्पाळ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लाउड, सौम्य, नैसर्गिक, अंडरप्लेड असे काहीही असण्याविषयी मोठी हरकत नाही. पण मी वर म्हटलेला मुद्दा म्हणजे क्षणाक्षणाचे ते पॉझेस. एकदम अभिनय आणि मग इतर पात्राकडे वाक्य फेकून, आता तू बोल.. असं म्हणून आपण त्या प्रसंगातून जणू मनाने बाहेरच आहोत असा एक कोरा भाव मधल्या अवकाशात चेहर्‍यावर ठेवणे.. पुन्हा आपलं वाक्य आलं की उसळून अभिनय.

हे कुणालाच जाणवलं नाहीये का? शंभरपेक्षा जास्त प्रयोग झालेल्या बहुतेक सर्व नाटकांत सर्वच नटनट्यांच्या कामात मला हे दिसतं. ते नाटक जगतबिगत काही नाहीत मुळीच असं वाटतं. आणि तसं जगण्याची गरजही नाही.

दुसरा प्रॉब्लेम हा नाटक या फॉर्मॅटविषयीच आहे. स्टेज, मर्यादित नेपथ्याच्या संधी, प्रतीकात्मक वगैरे काहीतरी करुन वाहवा म्हणणे, एकाच खोलीचे फटाफट रुपांतर करुन दिवाणखान्याचे कोर्ट बनवणे अथवा पार्टिशन टाकून दोन वेगळी ठिकाणे दाखवणे, अथवा स्पॉट वापरुन बाकी सर्व झाकणे.. या पद्धती वापरल्या तरी ती एक जगलरी झाली. त्याउपर एकूण पार्श्वभूमीला मर्यादा येतातच. पुस्तकातला बहुतांश वाचकाच्या मनाचे नेपथ्य वापरणारा छापील मजकूर आणि सिनेमातले थेट स्पूनफीडिंग याच्या मधला नाटक हा एक टप्पा आहे.

प्रत्येक टप्प्याला महत्व असतेच. नाटक फालतू असून ते बंद व्हावेच अशी इच्छा मुळीच नाही, पण चित्रपट या माध्यमात अवसर नक्कीच खूप जास्त असतो आणि त्याला एकरकमी बराच खर्च आला तरी एकदाच बनवून त्याच्या कॉपीज हजारो ठिकाणी दाखवता येतात, मोठा प्रेक्षकवर्ग व्यापला जातो. सेट आणि कलाकारांना ट्रक, बसमधे घालून रात्ररात्र फिरणे, वेळीअवेळी खाणेपिणे आणि झोप / आरोग्य यांचा प्रचंड अ‍ॅब्यूस या गोष्टीही चर्चेत घेतल्या तर सर्वांगाने चर्चा होईल. या गोष्टी "नाटक" या माध्यमाचा अविभाज्य भाग आहेत. चित्रपटातही हे सर्व आहेच पण त्याचे रिपिटिशन इतके नाही. रोज रात्री नव्या गावात प्रयोग आणि रोज रात्री प्रवास आणि असे वरचेवर दौरे, नाटकाच्या पूर्ण लाईफसायकलपर्यंत असे सिनेमात नसावे.

..आणि नाटकाबाबत पुन्हापुन्हा एकच गोष्ट करण्याने येणारी अपरिहार्य कृत्रिमता चित्रपटात टाळता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाटक आणि चित्रपट ही एकमेकांसारखीच तरीही एकमेकांपेक्षा बर्‍याच मानकांवर वेगळी अशी माध्यमे आहेत. त्यांचे आपापले गुण अवगुण आहेत.
मात्र दोघांमध्ये एकाच रसिकाच्या मनात "हे आवडते की हे" असे दोघांपैकी एकच आवडु शकेल असे तुलनात्मक द्वंद्व निर्माण करेल इतके साधर्म्य आहे का? का त्या बर्‍यापैकी वेगळ्या प्रकारच्या कला नी अभिव्यक्ती आहेत? असे प्रश्न एकुणच ही चर्चा व वरचा गविंचा प्रतिसाद वाचुन पडले.

माझे मत वर दिलेच आहे. मला दोन्ही आवडु शकतील इतके ते वेगळे कलाप्रकार आहेत - दोन्ही आवडतातही!

पुस्तकातला बहुतांश वाचकाच्या मनाचे नेपथ्य वापरणारा छापील मजकूर आणि सिनेमातले थेट स्पूनफीडिंग याच्या मधला नाटक हा एक टप्पा आहे.
प्रत्येक टप्प्याला महत्व असतेच.

बेसिकली असे टप्पे अस्तित्त्वात आहेत का तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार निर्माण झालेले हे स्वतंत्र कलाप्रकार आहेत? माझ्या मते ते बर्‍यापैकी स्वतंत्र आहेत.
नाट्य आणि लेखन हे तर विविध प्रकारांत खूप पूर्वापार चालत आहे आहे. किंबहुना या दोन्हीत आधी काय विकसीत झाले? असा प्रश्न पडावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्षणाक्षणाच्या पॉजेसबद्दलः

अगदी क्वचित असा पाट्याटाकू अभिनय दिसतो. नाहीतर अगदी व्यावसायिक, यशस्वी नाटकांतूनही मी कधी हे असले वाटपाहू पॉजेस अनुभवलेले नाहीत.

नाटक जगण्याबद्दलः

चांगला अभिनय करण्यासाठी नाटक जगण्याफिगण्याची गरज नसते, याबद्दल लागूंसकट अनेकांनी लिहिलं आहे. ते नव्यानं चर्चायची गरज नसावी. पण नाटक 'जगणं' (श्या! काय हा मेलोङ्रॅमॅटिक शब्दप्रयोग!) आणि नाटकाबाहेर राहून आपले संवाद पाट्या टाकल्यासारखे म्हणणं - या दोन टोकांच्या मधे कितीतरी नट आणि नाटकं असतात की.

स्थळमर्यादेबद्दलः

मर्यादा हा कोणत्याही कलाप्रकाराचा विशेषच असतो. आपली मर्यादा ओलांडून जाण्यात त्या त्या कलाप्रकाराचं यश असतं. गती दर्शवणारं शिल्प, चित्रसदृश हालचाली गोठवणारा नटसंच, जिवंत भासणारा फोटो... वगैरे.

चित्रपट-नाटक तुलनेबद्दल:
चित्रपट अर्थातच टिकाऊ, स्थलकाल ओलांडणारं, आवाका असलेलं माध्यम आहे. पण नटांना ते अतिशय गैरसोईचं आणि कथावस्तूवरची पकड पूर्णपणे दिग्दर्शकाच्या हातात सोपवायला लावणारं माध्यम आहे, हेही आहेच की. प्रेक्षक म्हणून मला सिनेमा भव्यतेचा, नजरेचा आवाका व्यापून टाकणारा, कधी अतिसूक्ष्म जवळिकीचाही अनुभव देतो. पण समोर घडणारा जिवंत खेळ अनुभवण्याचा नाटकातला थरार - छे, त्याची कशाशी तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे माझं मत ऋषिकेशसारखं आहे - मला दोन्हीही हवेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऋ आणि मेघना, दोघांचेही प्रतिसाद उत्कृष्ट आहेत. नव्या प्रकारे विचार करायला लावणारे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंडोम वापरला तरी मजा येते, सुरक्षितता असते हे खरेच.
पण काहिंना "त्या क्षणी" थेट स्पर्शाची मजा अनुभवणे अधिक आवडू शकते.
आता नेमके हेच का आवडते, कंडोम विविध फ्लेवर्समध्ये , विविध प्रकारचे (अगदि सपाटपासून ते डॉटेडपर्यंतचे) उपलब्ध असतानाही थेट स्पर्शात वेगळी मजा ती काय,
असे प्रश्न असतील तर उत्तर देणे जाम कठीण जाते. आवड आपली आपली म्हणून सोडून द्यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अयायायायायाया..

मनोबा, आता प्रत्येक नाटकानंतर रक्ततपासणी करुन घेतली पाहिजे असे वाटणार.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंडोम-अतिशमनार्थ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकनाट्याच्या बाजाच्या ठिकाणी सगळच कसं लाउड असणं आवश्यक आहे.
अभिजात्/सटल् विरुद्ध लोकनाट्य/लाउड ही फाइट जुनीच आहे.
ढोलकी वरच्याच पट्टीत वाजत राहणार. मृदुंग घनगंभीर आवाज देणार.
(आता हेसुद्धा सरसकटीकरण होतय, पण इलाज नाही.)
आपापली शैली आहे म्हणायचं नि पुढे जायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्थात, लोकनाट्य, फार्स, वगनाट्य, पथनाट्य, गटनाट्य (घाशीराम पाहिले असल्यास त्याप्रकारचे) इत्यादी प्रकारांना बरीच एनर्जी लागते व ती अनेकदा योग्यही वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात नाटकाचा प्रत्येक शो हा एक "प्रयोग" असतो. दर वेळी तेच ते नाटक सादर करताना त्या प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करता येऊ शकणे हे फार भारी आहे! उदाहरणार्थ, आत्ता मागे कुसुम मनोहर लेले टीव्ही वर पाहताना कळलं की त्यातल्या नायक आणि खलनायकाच्या भूमिका गिरिष ओक आणि संजय मोने बर्‍यच वेळा अदलाबदल करुन घेत होते. मला आवडला हा प्रयोग!

अजून एक उदाहरण मी एवढ्यातच काही मित्र-मैत्रीणींना सांगीतलं, पुरुषोत्तम विजेतं नाटक आहे एक - देता का करंडक. त्यात फक्त २ लेव्हल्सचा (लेव्हल म्हणजे आयतकृती ठोकळा असतो एक) सेट होता. आणि साध्या जनरल लाईट मधे आख्खा एक तास तुफान हसवणारं नाटक झालं. म्हणजे प्रत्येक नाटकात वर गवी म्हणाले तशी जगलरी असतेच असं नाही. फिरोदिया करंडकसारख्या नाट्यप्रकारांत बेसिक कथेसोबत जातील असे असंख्य इतर कलाप्रकार करायला वाव असतो आणि कॉलेजची मुलं, ज्यांना व्यावसायीक रंगभूमीचा शून्य अनुभव असतो, ते इतक्या नव-नवीन कल्पना वापरतात की तो एकूण फील मजा आणतो.

चित्रपट आणि नाटक यांची तुलना व्यर्थ आहे, सो त्याबद्दल पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'देता का करंडक' एक नंबर नाटक आहे. लै भारी. मला वाटतं पुरुषोत्तम मधे गरवारे कॉलेजने केलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता सलग महिनाभर दर वीकेंडला पुरुषोत्तमचे विविध करंडक विजेते प्रयोग सादर होणारेत.
मी सिझन पास काढायला चाल्लोय उद्या.
कुणी येणारे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आय. एम. सी. सी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्यक्ष थेट्रात जाउन मी नाटक बघण्याचं कारण :-

ट्रॉय चित्रपटात अकिलिसच्या तोंडी पुढील संवाद आहे :-
“The gods envy us. They envy us because we’re mortal, because any moment may be our last. Everything is more beautiful because we’re doomed. You will never be lovelier than you are now. We will never be here again.”
.
.
.
final countdown ह्या गाण्यातही it will never be the same again अशी ओळ आहे.
हे आहे आता अगदि असच पुन्हा कधीही असणार नाही. आहे ते हे आहे ; ते एवढ्याच एका क्षणासाठी आहे आणि क्षणापुरतच आहे.
हो. ते नश्वर आहे. क्षणिक आहे. ते सान्त आहे. पण पण....
म्हणूनच मला त्याचं आकर्षण आहे. ते सान्त आहे म्हणूनच मला अत्यंत जवळचं,जिवंत,रसरशीत,प्रत्यक्ष वाटतं.
हे मला असच पुन्हा मिळणं अशक्य आहे.
हे आहे तोवर मला डोळेभरुन पाहून घेउ द्यात.
.
.
.
अपेक्षित :- आता मारा बोंबा मनोबा दवणीय लिहितो म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी प्रतिसाद दिले आहेतच तज्ञ लोकांनी. मला केवळ एका प्रश्नाला उत्तर द्यावे वाटते.

शिवाय प्रत्येक प्रयोगासाठी फिरणे, दरवेळी तालीम - कित्ती हेक्टिक होत असेल?

हल्ली तसेही नाटकाचे जास्त प्रयोग केवळ पुणे आणि मुंबई/ठाणे शहरांमधेच होतात. नाटकात काम करणारे बहुतेक सर्व कलाकार ह्याच शहरांमधे राहणारी असल्याने त्यांना म्हणावे तितके हेक्टीक होत नसावे. शिवाय पुणे-मुंबई/ठाणे अंतर फार नाही. महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधे प्रयोग अगदी अभावानेच किंवा ३-४ महिन्यातून एकदा होतात त्यामुळे तिथे जाणे कलाकारांना पण तेवढे हेक्टिक वाटत नसावे रादर फॉर अ चेंज ते ही एंजॉय करत असावे.

कदाचित अवांतर -
साधारण ४ वर्षांपूर्वी राहूल देशपांडेचं 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक आलं होतं तेव्हा पुण्यात पेपर मधे नाटकाची जाहिरात आल्या आल्या तिकिटे काढावी लागत, नाहीतर प्रयोगाला मुकावं लागायचं (तसं बर्‍याच नाटकांबद्दल होतं पुण्यात). त्याच दरम्यान नाशिक मधे ते नाटक आलं, मी नाशिक मधेच असल्याने नाटकाला जाण्याचे ठरवले. अगदी प्रयोगाच्या दिवशी सकाळी तिकीट काढायला गेलो असतांनाही अगदी व्यवस्थित समोरच्या रांगेतील तिकीटं मिळाली (हाच अनुभव 'आयुष्यावर बोलू काही' चे पुण्यात तुफान प्रयोग चालू असतांना मात्र त्याच कार्यक्रमाला नाशिकला रिकाम्या खुर्च्या पहाण्यात आल्या होत्या) . तेव्हा काळजी-कम-वाईट वाटलं की खरंच ही कला लोप पावते की काय. अर्थात पुण्या/मुंबई मधे हे चित्र तितकंस खरं नाही (पण महाराष्ट्र म्हणजे केवळ पुणे-मुंबई नव्हे, पण पुणे-मुंबई मुळे हे कला माध्यम जिवंत आहे हेही तितकंच खरय!). मी लहान असतांना नाशिकचीही नाट्यगृह तुडूंब भरलेली पाहिली आहेत, पण तसं चित्र अता नाही. शिवाय सविता म्हणाल्या प्रमाणे अगदी पुण्या/मुंबई मधेही 'तरूण वर्ग' फार अभावाने दिसतो नाटकाला. आणि बहुतांशी जो तरुण वर्ग दिसतो तो ह्या क्षेत्राशी निगडित असलेला असतो म्हणून दिसतो. पण हे कला माध्यम एवढ्यात मान टाकेल असं नक्कीच वाटत नाही- केवळ एका इच्छाशक्तीचा अंदाज Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूल धागा व त्यावरील प्रतिसाद वाचत असताना मनात आलेले काही विचार. (कदाचित चुकीचेही असू शकतील)
१. मुळात "चांगले" व "वाईट" नाटक प्रेक्षकसापेक्ष असले तरी नाट्य प्रयोगाच्या जमलेल्या भट्टीवरून (तो एखाद्याच प्रयोगासाठी किंवा काही मोजक्या प्रयोगासाठी जमला असेल) चांगले/वाईट ठरवता येईल.
२. प्रत्येक कलामाध्यमाची काही गुणवैशिष्ट्य असतात. त्यांची एक स्वतंत्र 'भाषा' असते. त्यामुळे ती 'भाषा' आपलेसे केल्याशिवाय त्या माध्यमाचा कलास्वाद घेता येत नाही. चित्रपटाची 'भाषा' वेगळी असते. त्याचप्रमाणे नाट्यास्वाद घेण्यासाठीसुद्धा काही तयारी लागत असावी. नाटक 'चांगले' ठरवण्याचेसुद्धा काही निकष असावेत.
३. माझ्या मते ६०-७० च्या दशकातील खाली उल्लेख केलेली नाटकं बघितलेले असल्यास इतक्या कडवटपणे नाट्य प्रकारावर हल्ला चढवला नसता.

  • शांतता, कोर्ट चालू आहे
  • घाशीराम कोतवाल
  • अशी पाखरे येती
  • जुलूस
  • उध्वस्त धर्मशाळा
  • काळ बेट, लाल बत्ती
  • होळी व सुलतान,
  • माता द्रौपदी
  • आधे अधूरे (मराठी)
  • वाऱ्यावरची वरात,
  • वटवट
  • असा मी, असा मी

(यादी वाढवता येईल. तु्र्तास एवढे पुरे)
* नाटकाचे चित्रीकरण करून चित्रपटासारखे त्याला सादर करणे कदापि योग्य वाटणार नाही. कारण नाटकाचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यासाठी असतात. या दोन्ही माध्यमाची बलस्थाने वेगवेगळी आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील यादीत वाऱ्यावरची वरात विसंगत वाटत आहे.
प्रश्न चांगला-वाईट असा नाही; पण ते विसंगत नक्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठी नाटकांमध्ये ओव्हरअॅक्टिंग असतं हे मी वर म्हटल्याप्रमाणे मला मान्यच आहे, पण अनेकांकडून हा मुद्दा ज्या प्रकारे आला आणि त्यासोबत जी उदाहरणं आली, ती पाहून एक मुद्दा मांडायची गरज भासली. तो असा -

खरं तर हा लाउड असण्याचा मुद्दा 'प्रत्यक्ष की रेकॉर्डेड'च्या संदर्भात पाहता, असलाच तर, नाटकांच्या बाजूचा आहे. तो कसा? जर लोकप्रिय हिंदी / मराठी सिनेमा पाहिला, तर त्यातला अभिनय आजही लाउड आणि कृतक् असतो. त्याहून वेगळा अभिनय भारतीय सिनेमात आणणारे अभिनेते कोण? तर ओम पुरी, नसीरुद्दीन शहा, पंकज कपूर, शबाना आझमी, बलराज साहनी वगैरे. ही मंडळी आली कुठून? तर एनएसडी / फिल्म इन्स्टिट्यूटसारख्या ठिकाणी अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन किंवा प्रत्यक्ष नाटकांमधून. ही नाटकं कोणती? तर मुंबईतली आणि इतर शहरांतली प्रायोगिक नाटकं. म्हणजे मुळात सिनेमाला कृतक् अभिनय शिकवला तोही नाटकांनी आणि सहज अभिनय शिकवला तोही (वेगळ्या प्रकारच्या) नाटकांनीच. अमरीश पुरी आणि कुलभूषण खरबंदा अशा नटांच्या बाबतीत तर लोकप्रिय हिंदी सिनेमात त्यांनी केलेला अभिनय आणि प्रायोगिक नाटकांत केलेला अभिनय ह्यांत जमीन-अस्मानाचा फरक होता. अगदी आजचे सौरभ शुक्ल, इर्फान खान, रजत कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय मिश्र ही सगळी मंडळी नाटक / एनएसडी पार्श्वभूमीची आहेत. थोड्याफार फरकानं हाच प्रकार मराठी अभिनेत्यांच्या बाबतीतही दिसतो - मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, अमोल पालेकर ते अतुल कुलकर्णी किंवा आजची मुक्ता बर्वे. नाटकाची गरज आणि भूमिकेची गरज ह्यानुसार ह्यातला प्रत्येक जण लाउड अभिनय करतो, पण त्यांचा चांगला अभिनयही (योग्य प्रकारच्या) नाटकांतून दिसतो. चित्रपटांच्या बाबतीतही हेच दिसतं. म्हणजे मुद्दा असा आहे की प्रशांत दामले / भरत जाधव वगैरेंच्या लाउड नाटकांवरून नाटक ह्या माध्यमाला नावं ठेवण्यात फारसा अर्थ नाही. खान मंडळी, अजय देवगण प्रभृतींचा १०० कोटी क्लबातला हिंदी सिनेमा किंवा आजचा गल्लाभरू मराठी सिनेमाही तसाच आहे. 'प्रत्यक्ष की रेकॉर्डेड'च्या संदर्भात मुद्दा असलाच, तर तो असा आहे, की चांगलं नाटक लाइव्ह पाहायचं झालं, तर तसं नाटक तुमच्या शहरात आलं पाहिजे; ह्याउलट चांगला सिनेमा टॉरंटवरून घरपोच मिळतो. ही मर्यादा मान्य आहेच; पण, ह्याउलट रेकॉर्डेड माध्यमाबाबत मुद्दा असाही आहे, की बराचसा चांगला सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा असतो; घरच्या टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर त्यातले अनेक बारकावे निसटतात आणि असे अनेक चांगले सिनेमेही तुमच्या शहरात कधीच दाखवले जाणार नसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'प्रेक्षकांच्या अस्तित्त्वाची जाण ठेवून सादर केलेला प्रयोग' आणि 'त्यांच अस्तित्त्व विसरून सादर केलेला प्रयोग' ह्या दोन प्रकारांमुळे सादरीकरणाच्या 'वास्तव' अनुभवात फरक पडणं शक्य आहे असं वाचलं आहे, त्याबद्दल काही सांगता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> 'प्रेक्षकांच्या अस्तित्त्वाची जाण ठेवून सादर केलेला प्रयोग' आणि 'त्यांच अस्तित्त्व विसरून सादर केलेला प्रयोग' ह्या दोन प्रकारांमुळे सादरीकरणाच्या 'वास्तव' अनुभवात फरक पडणं शक्य आहे असं वाचलं आहे, त्याबद्दल काही सांगता येईल काय? <<

'प्रेक्षकांच्या अस्तित्त्वाची जाण ठेवून सादर केलेला प्रयोग' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? आपल्या सर्व लोककला प्रेक्षकाचा सहभाग कल्पूनच सादर केल्या जातात. तमाशात उडवले जाणारे पटके असोत, की शास्त्रीय संगीतात रसिकांची दिलखुलास दाद असो, त्यांच्याशिवाय ती कला सादर करणं कलावंताला ओकंबोकं वाटतं. त्यामुळे दादा कोंडक्यांना किंवा निळू फुल्यांना वगात पाहणं आणि सिनेमात पाहणं हे दोन भिन्न अनुभव आहेत. सिनेमात ते चित्रचौकटीत बंदिस्त वाटतात, पण स्टेजवरचा त्यांचा वावर अद्भुत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'प्रेक्षकांच्या अस्तित्त्वाची जाण ठेवून सादर केलेला प्रयोग' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?

समोर प्रेक्षक आहेत हे स्टेजवरच्या पात्राच्या अभिनयातून समजलं तर वास्तविकता स्वाभाविकपणे कमी होणार उदा. संवाद म्हणताना प्रेक्षकांकडे पाठ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते, अर्थात ती स्टेजची मर्यादा आहे पण प्रत्यक्ष जीवनात कोणी असं बोलत नाही, माणसं एकमेकांकडे बघुन बोलतात, त्यामुळे हि कृत्रिमता आशयाला थोडीशी मारक ठरणार. त्याउलट जर प्रेक्षकाचं अस्तित्त्व विसरून जणू चौथी भिंतच तिथे आहे असं गृहित धरुन अभिनय करायचा प्रयत्न केल्यास अभिनय वास्तव होण्याची शक्यता अधिक असेल पण प्रेक्षकांना अनेक गोष्टी एकाच व्ह्यू अँगलमुळे चटकन समजणार नाहीत, असे प्रयोग होतात का?

त्यामुळे दादा कोंडक्यांना किंवा निळू फुल्यांना वगात पाहणं आणि सिनेमात पाहणं हे दोन भिन्न अनुभव आहेत. सिनेमात ते चित्रचौकटीत बंदिस्त वाटतात, पण स्टेजवरचा त्यांचा वावर अद्भुत होता.

हे अनुभवू शकलो नाही ह्याची खंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे प्रयोग होतात का?

सध्या चालू असलेल्या Mr & Mrs नाटकात कॅमेरे लावून त्यांचं पडद्यावर प्रक्षेपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयोग केला आहे. वेगळा अँगल दाखवता येत असावा त्यामुळे. मी नाटक पाहीलेलं नाही. ऋ आणि सोत्रींनी लिहिलंय त्या नाटकाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे प्रयोग होतात का?
............होय.
ब्रॅडली हेवर्डच्या द्विपात्री 'लेगिटिमेट हूई' या नाटकाचा सागर देशमुख यांनी 'मात्र रात्र' या नांवाने मराठीत अनुवाद केला आहे (साल २००७, कालावधी ३५-४० मि). दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी नेपथ्य म्हणून फक्त एक पलंग रंगमंचावर ठेवला. प्रायोगिक रंगभूमी असल्याने प्रेक्षक मांडी घालून बसत. प्रेक्षकांना पलंगाच्या अगदी पुढ्यात आणि थोडे भोवती बसण्याची मुभा होती. म्हणजे काही प्रेक्षक पलंगाच्या दर्शनी भागाच्याही मागे असत.

नाटकातील उल्लेखनीय कल्पना म्हणजे त्यातल्या नवरा बायकोचे (कलाकार : राधिका आपटे आणि सागर देशमुख) यांचे काही प्रसंग, संवाद पलंगावर झोपून असतानाचे असल्याने ते प्रेक्षकांना दिसण्यासाठी पलंगाच्या बरोबर वर एक कॅमेरा लावून त्याचे थेट प्रक्षेपण पलंगापाठी असलेल्या रंगमंचाच्या भिंतीवर केले जाई. मांडी घालून बसलेल्या प्रेक्षकांना अर्थातच त्यांचे हावभाव प्रत्यक्ष दिसत नसत पण पाठच्या पडद्यावर दिसत. यामुळे पाठीमागे द्विमित आणि पुढ्यात त्रिमित अश्या दोन पातळ्यांचा उपयोग दिग्दर्शकाला करता येतो, दृश्याविष्कारात अनेक प्रयोग करण्यास मुभा मिळते आणि त्यायोगे प्रेक्षकावर नेहमीपेक्षा वेगळा परिणाम साधण्यासाठी अनेक शक्यता निर्माण होतात. मराठी / भारतीय रंगभूमीवरचा हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका आपटेवर आमचा फार जीव. फटूबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.

संवाद पलंगावर झोपून असतानाचे असल्याने ते प्रेक्षकांना दिसण्यासाठी पलंगाच्या बरोबर वर एक कॅमेरा लावून त्याचे थेट प्रक्षेपण पलंगापाठी असलेल्या रंगमंचाच्या भिंतीवर केले जाई. मांडी घालून बसलेल्या प्रेक्षकांना अर्थातच त्यांचे हावभाव प्रत्यक्ष दिसत नसत पण पाठच्या पडद्यावर दिसत. यामुळे पाठीमागे द्विमित आणि पुढ्यात त्रिमित अश्या दोन पातळ्यांचा उपयोग दिग्दर्शकाला करता येतो, दृश्याविष्कारात अनेक प्रयोग करण्यास मुभा मिळते आणि त्यायोगे प्रेक्षकावर नेहमीपेक्षा वेगळा परिणाम साधण्यासाठी अनेक शक्यता निर्माण होतात.

अनुभव कसा होता हे सांगु शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव कसा होता हे सांगु शकाल काय?
...​
सर्वप्रथम मूळ प्रतिसादात, नाटकाच्या नांवात 'लेगिटिमेट' आहे ते 'लेजिटिमेट' असे वाचावे. माझा टंकनदोष.
-------
नाटकाचे सूत्र - (नुकतेच स्वत:ची खोली घेऊन राहायला लागलेले आणि त्यामुळे दोघांचे असे जग, स्वातंत्र्य आणि जवळीक अनुभवण्यासाठी आसुसलेले असे एक जोडपे आहे. ती एका बूटीकमध्ये काम करते तर तो एक लेखक आहे (बहुधा नाटककार). दिवस मावळल्यावर ती जेव्हा कामावरून घरी येते, तेव्हा ते दोघे रात्री एकमेकांशी जो संवाद साधतात त्या संवादातून उलगडत जाणार्‍या पंधरा-एक रात्रींचे चित्रण म्हणजे हे नाटक. त्या संवादांत शारीरिक जवळिकीपासून ते कुरबुरी/भांडणांपर्यंत बरेच काही घडत असताना, 'प्रेम म्हणजे नक्की काय ?' हा आदिम प्रश्न आणि त्या दोघांत प्रत्यक्षात असलेले नाते हे त्यांच्या प्रेमाच्या कल्पनांच्या किती जवळ जाते, ‌या दोन गोष्टींभोवती त्या रात्री लपेटल्या आहेत.)
-------
नाटकाचा अनुभव :
वरील नाट्यसूत्रानुसार त्या दोघांचे काही प्रसंग पलंगावर घडणे अपरिहार्य आहे. बोलले जाणारे अनेक संवाद सर्वसाधारण जोडप्यांतले नि घरातल्यासारखेच असल्याने प्रेक्षकाला प्रत्यक्ष बेडरूममध्ये समाविष्ट करणे पूरक ठरते (कलाकारांसाठी मात्र ते कठीण होत असावे). या वेगळ्या धाटणीमुळे नाटक सुरू होताना प्रेक्षकांत थोडी चलबिचल होत होती कारण हा प्रकार अनेकांसाठी सर्वस्वी नवा होता. पण थोड्याच वेळात दोघा कलाकारांच्या अभिनयामुळे (राधिका सरस) आपण प्रेक्षक आहोत हा विसर पडून, समोर दिसणारी गोष्ट आपल्याच घरात हे घडते आहे, इतपत जाणीव निर्माण त्यांत झाली (नाटक संपल्यावर दोघा/तिघांशी बोलताना हे लक्षात आले)‌. मी प्रेक्षकांत पुढून दुसर्‍या/तिसर्‍या रांगेत, पलंगाच्या उजव्या बाजूस होतो. पहिली रांग पलंगाच्या थोडी पलिकडे गेली होती. माझ्या जागेवरून दोन्ही कलाकारांचे हावभाव आणि मागे प्रक्षेपित केलेले दृश्य उत्तम दिसत होते. त्यांचे संवाद पाहताना जाणवलेली गोष्ट अशी, की आशयाच्या दृष्टीने पूरक असे पलंगावर झोपून म्हटलेले संवाद वा हावभाव जे एरवी नेहमीच्या रंगमंचीय व्यवस्थेत प्रेक्षकापर्यंत पोहोचविणे दुरापास्त झाले असते ते मागच्या प्रक्षेपित चित्रणामुळे सहजशक्य झाले. अश्या पहिल्या काही प्रसंगात, सुरुवातीस इकडे पाहू की तिकडे पाहू असे झाले पण अगदी थोडाच काळ. या प्रकाराला लागलीच सरावल्यावर माझे लक्ष आपोआप, खंड न पडता एका प्रसंगातून दुसर्‍या प्रसंगात आणि पडद्यापुढे आणि पडद्यावर विनासायास जाऊ लागले. माझ्या बाबतीत तरी दिग्दर्शकाचा प्रयोग यशस्वी झाला असे वाटते. हा प्रयोग एका दृष्टीने पाहता नाटक आणि चित्रपट या दोन माध्यमांना सांधणारा ठरतो. त्रिमित अवकाशातले नाट्य आणि द्विमित पटावरचे चित्रण यांची सरमिसळ बेमालूमपणे पूर्ण काळ होत राहते.

दुसरी लक्षवेधी गोष्ट अशी, की कॅमेरा अगदी थेट पलंगाच्या वर लावल्याने प्रक्षेपित दृश्यात ते दोघे अनेकदा उभे राहिलेले दिसतात कारण पलंगाचा थोडा विसर पडतो. सामान्यत: आपण पलंगावर झोपल्यावर आपल्या शरीराचा आकार वेगवेगळ्या अवस्थांत वेगवेगळ्या बाजूंनी कसा दिसत असेल, याची कल्पना आपल्याला फारशी नसते (आरशात स्वतःला एवढे निरखून फार लोक पाहत नसावेत असे गृहित धरतो आहे). त्यामुळे कलाकारांच्या एकत्रित आकृतीबंधांचा वापरही दिग्दर्शकाला करता आला. काही वेळा तो प्रथम थोडा विचित्र वाटे कारण आपल्या डोक्यात एका वेळी 'ते आडवे झोपले आहेत' हा विचार आणि 'ते उभे राहून असे अंगविक्षेप का करत आहेत' असे दोन वरकरणी असंबद्ध वाटणारे विचार चालू असतात. त्यामुळे ते माझ्यासाठी तरी अधिक खिळवून ठेवणारे होते. किंचित अवकाशाने त्या ताणाचीही सवय होत जाते नि नाट्यानुभवात खंड पडत नाही. एकूण, मला वेगळा दृश्यानुभव मिळाल्याने पुन्हा पाहावासा वाटायला लावणारा प्रयोग होता. (मला एकदाच पाहायला मिळाला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> संवाद म्हणताना प्रेक्षकांकडे पाठ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते, अर्थात ती स्टेजची मर्यादा आहे पण प्रत्यक्ष जीवनात कोणी असं बोलत नाही, माणसं एकमेकांकडे बघुन बोलतात, त्यामुळे हि कृत्रिमता आशयाला थोडीशी मारक ठरणार. त्याउलट जर प्रेक्षकाचं अस्तित्त्व विसरून जणू चौथी भिंतच तिथे आहे असं गृहित धरुन अभिनय करायचा प्रयत्न केल्यास अभिनय वास्तव होण्याची शक्यता अधिक असेल पण प्रेक्षकांना अनेक गोष्टी एकाच व्ह्यू अँगलमुळे चटकन समजणार नाहीत, असे प्रयोग होतात का? <<

वास्तववादाचा आग्रह धरणं म्हणजे एकाच विशिष्ट शैलीत अडकून बसल्यासारखं मला वाटतं. स्टेजवर इतक्या विविध गोष्टी करता येतात आणि केल्या जातात, की खरं तर ही केवळ मराठी मध्यमवर्गाच्या दिवाणखान्यात अडकून पडलेल्या चर्चानाटकांचीच अडचण आहे. नमुन्यादाखल हे पाहा -

मागे आरसा असल्यामुळे प्रेक्षकांना प्रेक्षक सतत दिसत राहतात. म्हणजे 'प्रेक्षकांच्या अस्तित्वाची जाणीव' हा मुद्दाच इथे वेगळ्या प्रकारे दिसतो.

किंवा हे पाहा -

अशा नाटकांचे दृश्यपरिणाम फार वेगळे असतात. त्यामुळे वास्तववादाची परिमाणं त्याला लावण्यात अर्थ नसतो. त्याऐवजी त्यातली नाट्यमयता आणि दृश्यात्मकता त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते हे लक्षात घ्यावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शिवाय ते प्रेक्षकघर आणि मंचं यांचं रिंगण बदलून बदलून केलेले प्रयोग, हलतं-बदलतं नाट्यरिंगण, समीपनाट्य, प्रेक्षकांच्यात घुसलेला मंच वगैरे वगैरे... यांत कुठे पाठीची अडचण येते?

नि हे सगळं अगदी तद्दन प्रयोगशील आणि सामान्य प्रेक्षकाला अनुपलब्ध मानलं, तरी व्यावसायिक मुख्यधारेतल्या नाटकांतही 'प्रेक्षकांना पाठ दाखवायची नाही' हे सूत्र जुनंच झालं की आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इथे तुमच्या प्रतिसादामुळे मुळ संवादाला वेगळे वळण मिळत आहे, त्या वळणावर जाण्यापूर्वी- साधारण मुख्य धारेतली व्यवसायिक नाटकं वास्तववादी नसतात आणि तो पायंडा प्रेक्षकाच्या अस्तित्त्वाची जाणिव ठेवल्यामुळे पडला आहे असे मी म्हणत होतो, तसे न करता सादरीकरणाचा प्रयोग कोणी केला आहे काय?

आता वळण घेत -धागा लेखिकेचा असलेला किंवा साधारण कला-अनभिज्ञ माणसाचा आक्षेप ह्या कृत्रीमतेलाच असतो मग त्या कृत्रीमतेच्या अंतर्गत ओव्हरअ‍ॅक्टिंग ते तुम्ही म्हणता ती नाट्यमयता वगैरे सगळेच घोडे असतात, वास्तववाद हा प्रेक्षकाचा स्वतःचा परिप्रेक्ष्य असतो असे सादरीकरण असणारी नाटकं प्रायोगिक स्तरावरच जन्म घेऊन मरत असावीत.

नि हे सगळं अगदी तद्दन प्रयोगशील आणि सामान्य प्रेक्षकाला अनुपलब्ध मानलं, तरी व्यावसायिक मुख्यधारेतल्या नाटकांतही 'प्रेक्षकांना पाठ दाखवायची नाही' हे सूत्र जुनंच झालं की आता.

वर्षापूर्वी कट्यार चा प्रयोग पाहिला होता, त्या अनुभवावर तरी असं म्हणवत नाही. मुळात नेपथ्यच तीन भिंती उपलब्ध असल्यासारख्रे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> वास्तववाद हा प्रेक्षकाचा स्वतःचा परिप्रेक्ष्य असतो असे सादरीकरण असणारी नाटकं प्रायोगिक स्तरावरच जन्म घेऊन मरत असावीत. <<

मराठी मध्यमवर्गाच्या परिप्रेक्ष्यात ह्याला पुरेसा आधार नाही. वास्तववादी नसलेली अनेक नाटकं गाजली आणि लोकप्रियही झाली. उदा : घाशीराम कोतवाल, तीन पैशाचा तमाशा, हयवदन, तुघलक, बेगम बर्वे, महानिर्वाण, वगैरे. आजही, वर उल्लेख केलेलं 'मात्र रात्र' किंवा तत्सम नाटकं पुण्यात सुदर्शनसारख्या समीप रंगमंचावर (शनिवार पेठ, पुणे - ४११०३० इथे) गर्दी खेचतात. दर वर्षी पुण्यात (कोथरूड - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह) विनोद दोशी नाट्य महोत्सव सादर होतो. त्यात देशभरातली नाटकं सादर होतात. सर्व दिवस भरपूर गर्दी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

" न " नाटक बघायला गेलेल्या 'न' प्रेक्षकाने अगदी रविवार सकाळच्या रिकाम्या रस्त्यावरचीसुद्धा मौज बघू नये असे पु.ल.म्हणाले होते .
कदाचित त्याने जास्त मनोरंजन होणे शक्य आहे म्हणे .
" माझीया भाउजींना रीत कळेना " () नामक नाटक पहाताना असाच अनुभव काही नागपूरकरांना आला.विनोदी नाटक असावे कारण कलाकार:प्रशांत दामले , कविता मेढेकर
दुपारी बारा वाजताच्या प्रयोगाला हॉलमध्ये पडदा उघडलेला होता पण आत वेगळेच नाट्य सुरु होते. अनिल टी कंपनीचा मॅनेजर प्रेक्षकांशी थेट स्टेजवरून बोलू लागला . कहर म्हणजे त्याचे बोलणे नीट ऐकू यावे म्हणून कुणीतरी त्याच्या हातात माईक पण दिला .( अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो ! )
तो म्हणाला , " तुम्ही तिकीट काढून नाटकाला आलात काय ? मग तुमची फसवणूक झालेली आहे . आम्ही सहा महिन्यांपूर्वी हॉल बुक केला आहे . एक वाजता आमच्या लॉटरीच्या सोडतीचा कार्यक्रम आहे . आमचे निमंत्रित तुमचे नाटक होऊ देणार नाही .आम्हाला १२ वाजता हॉल ताब्यात देणार होते . असे म्हणताच लग्गेच उठून प्रेक्षक निमूट घरी जातील थरथर कापत असे त्याला वाटले असावे .प्रेक्षक गोंधळ घालू लागले .
नाटकातले कलावंत अवाक होऊन हा तमाशा पहात होते . नाटकाचे आयोजक आले आणि त्यांनी म्हटले हा बुकिंग करणार्या कर्मचार्याने घातलेला गोंधळ आहे . आपण सामोपचाराने मिटवू या . त्या दोघांचे आधी बोलणे झालेले असूनही टी कंपनी वाल्याने हा फुक्कट तमाशा केला .
( त्याला कुणी नाटकात काम देता का काम ??)
मग नाटक सुरु झाले आणि २ वाजता संपले .

अनिल टी कंपनीवालयाचे नाटक जास्त रंजक झाले म्हणे .
चुकून आदल्या दिवशीच प्रयोग पहाणारे लोक या मनोरंजनाला मुकल्याने हळहळत बसल्याचे कळते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एकदम नाना पुंजे आणि त्याचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आठवला. हीही प्रंप्रा नाट्यकलेइतकीच जुनी दिसतीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(वर अनेक प्रतिसादकांनी कित्येक मुद्दे उत्तम प्रकारे मांडलेले आहेत. माझ्या मनातलेच काही मुद्दे मला जमले असते त्यापेक्षा खूपच चांगले मांडलेले आहेत. त्याला या छोट्या मुद्द्यांची पुरवणी.
----
सिनेमा<->नाटक यांच्यातली तुलना कॅमेराचित्रण<->हस्तचित्रकला तुलनेशी काहीशी समांतर आहे. ती अशी :
----
पूर्वीच्या काळी चित्रकलेच्या अनेक हेतूंपैकी एक हा : दृश्याचा स्थिर पुनःप्रत्यय, आलेख. अर्थात चित्रकलेच्या काहीच शाखा "हुबेहूब" दर्शन घडवणार्‍या होत्या. अगदी प्राचीन काळापासून शैलीदार आणि मानसिक भावनांच्या पैलूंना गडद करणार्‍या कृती, हे हेतूसुद्धा बरेच पुढे सरले. (प्राचीन शैलीबद्धतेची साखळी म्हणजे गुंफाचित्रातील शैलींपासून आजकालच्या वारली शैलीबद्ध चित्रकलेपर्यंत.)

कॅमेराचित्रणाचे तंत्र जसे विकसित झाले तसे हुबेहूब दर्शन घडवण्याचा हस्तचित्रकलेचा हेतू मागे पडला, दुय्यम झाला. आणि अन्य हेतूंकरिता बनवलेली चित्रे ही प्राथमिक झाली. कॅमेराचित्रणाची कला सुद्धा विकसित होत गेली, तशी ती वास्तवचित्रणापेक्षा अधिक व्यक्तिगत (भावनिक) परिप्रेक्ष्याचे दर्शन करण्याकडे झुकू लागली. परंतु तंत्राच्या रुळांमुळे ही परिप्रेक्ष्ये दाखवणार्‍या कॅमेराशैली हस्तचित्रकलेपेक्षा वेगळ्या आहेत.
----
समांतर :
पूर्वीच्या काळी साक्षात् नाट्यकलेच्या अनेक हेतूंपैकी एक हा : घटनांचा चल पुनःप्रत्यय, आलेख. अर्थात साक्षात् नाट्यकलेच्या काही शाखाच "हुबेहूब" दर्शन घडवणार्‍या होत्या. अगदी प्राचीन काळापासून शैलीदार आणि मानसिक भावनांच्या पैलूंना गडद करणार्‍या कृती, हे हेतूसुद्धा बरेच पुढे सरले. (प्राचीन शैलीबद्धतेची साखळी म्हणजे ऋग्वेदातील छंदोबद्ध संवादसूक्तांपासून आजकालच्या भरतनाट्यापर्यंत.)

चलकॅमेराचित्रणाचे तंत्र जसे विकसित झाले तसे हुबेहूब दर्शन घडवण्याचा साक्षात् नाट्यकलेचा हेतू मागे पडला, दुय्यम झाला. आणि अन्य हेतूंकरिता सादर केलेल्या नाट्यकृती प्राथमिक झाल्या. चलकॅमेराचित्रणाची कला सुद्धा विकसित होत गेली, तशी ती वास्तवचित्रणापेक्षा अधिक व्यक्तिगत (भावनिक) परिप्रेक्ष्याचे दर्शन करण्याकडे झुकू लागली. परंतु तंत्राच्या रुळांमुळे ही परिप्रेक्ष्ये दाखवणार्‍या सिनेमाशैली साक्षात् नाट्यकलेपेक्षा वेगळ्या आहेत.
---

सिनेमा वास्तव अनुभवापासून दूर जातो, परिप्रेक्ष्याचे अतिवास्तव चित्रण करतो, ते क्लोझअप, कट-एडिटिंग वगैरे तंत्रांनी. नाटकातील तंत्रे वेगळी, म्हणजे फक्त मर्यादितच, असे नव्हे. साक्षात् नाटक करताना प्रेक्षकांचे सुस्कारे, हास्य वगैरे ऐकून वेगळा अभिनय देतात. (यामुळे अभिनय करताना तोचतोचपणा जाणवत नाही, असे नटांच्या मुलाखतीत मी ऐकलेले आहे.) शिवाय एका प्रकारचे त्रिमिती नेपथ्य आणि दिग्दर्शन हे साक्षात् नाट्यात जसे वापरले जाऊ शकते, तसे सिनेमात (सध्या) वापरले जाऊ शकत नाही. गोलाकार (प्रेक्षक चहूबाजूला) रंगमंचात हे खूपच उघड आहे, पण थोडा विचार करता साध्या रंगमंचाच्या बाबतीत सुद्धा ही बाब प्रकर्षाने जाणवते.

आणखी एक गंमत म्हणजे (दिग्दर्शकाला बहुधा हवेच असते, म्हणून दिसते) की नाटकात प्रेक्षक हवे असल्यास बोलणार्‍या पात्राच्या चेहर्‍यापेक्षा वेगळ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे कित्येकदा एक नटी मोठ्या भावूकतेने काही बोलत असते, पण त्याच वेळी ऐकलेल्या गोष्टींचा मनावर होणारा परिणाम ऐकणारा नट वठवत असतो. क्वचित सिनेमात आलटूनपालटून फोकस बदलून किंवा वेगवेगळे क्लोझ-अप सॉट आलटूनपालटून हे दाखवले जाते. परंतु नाटकाच्या माध्यमात प्रेक्षकाकडे हे अनुभवण्याचे स्वातंत्र्य पूर्णवेळ असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाटक लाइव असतं लाइव - आहात कुठे?
रेकॉर्डेडमध्ये तर ते bloopers वगैरे असतात पण तेवढंच. किंवा मग चुका बघायला सिनेमात नाच-गाण्यातले एक्स्ट्रा शोधावे लागतात. नाटकात हे सगळं तिथेच असतं.
नाटकाचं तसं नाही -लोक तिथे प्रत्यक्ष काहीतरी करत असतात - चुका होतात. मुख्य पात्र बोलत असताना बाकिच्यांचे चेहेरे बघा: एखादा ठोकळा मिळतोच. नाटकात दर वेळी नवी चूक होऊ शकते: नट शिंकतात, खोकतात, विसरतात, धडपडतात. शिवाय प्रेक्षक वेफर्स खाउन आणि मोबाईल वाजवून वैविध्य आणतात ते वेगळंच.
ह्यासाठी तरी नाटकं बघाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0