’मु-की’ लिपी

’एस रेग्नेट’. हे जर्मन भाषेतलं वाक्य आहे. कळला त्याचा अर्थ? अरेच्चा! नाही? बरं; ते वाचता तरी आलं का? हो ना? मग ठीक. आता ही दोन वाक्यं वाचा : 'बारीश हो रही है।’ आणि ’पाऊस पडतोय.’ आली वाचता? वा! आणि अर्थ? तोही कळला? छान! आता हे जपानी भाषेतलं वाक्य वाचा :

कळला अर्थ? नाही? वाचताही आलं नाही? अरे बापरे! काय राव! कधी म्हणता 'अर्थ कळतोय’; कधी म्हणता 'नाही’. काहीतरी एक ठरवा की!

बरं, बरं. आता मी चेष्टा थांबवते. आणि असं का होतंय ते सांगते.

जर्मन, हिंदी आणि मराठी वाक्यं वाचता आली, कारण ती ’देवनागरी’ या लिपीत लिहिलीत. ’देवनागरी’ कशी वाचायची, म्हणजे ’ए’, ’रे’, ’ट’ वगैरे अक्षरं तोंडाने कशी म्हणायची हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजेच, या अक्षरांचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला ठाऊक आहे. पण शेवटचं वाक्य जपानी लिपीत लिहिलंय. ही लिपी कशी वाचायची हे तुम्हाला शिकवलेलं नाही. म्हणून ते वाक्य तुम्हाला वाचता आलं नाही.

पण हिंदी, मराठी वाक्यांचा अर्थ कळला आणि जर्मन वाक्य वाचता येऊनही त्याचा अर्थ कळला नाही. असं का बरं? सोप्पंय! तुम्हाला ’पा’, ’ऊ’, ’स’ ही अक्षरं कशी उच्चारायची हे तर माहीत आहेच. शिवाय, त्यांपासून तयार होणाऱ्या ’पाऊस’ या उच्चाराचा अर्थही तुम्हाला ठाऊक आहे. हिंदी वाक्याचा अर्थही तुम्ही असाच ओळखलात. पण तुम्हाला ’रेग्नेट’चा अर्थ माहीत नसल्याने जर्मन वाक्याचा उच्चार कळूनही त्याचा अर्थ कळला नाही. हिंदीभाषिक मुलांनाही देवनागरी लिपी येते. त्यामुळे त्यांनाही वरची जर्मन, हिंदी आणि मराठी वाक्यं वाचता येतील. पण त्यांना अर्थ मात्र फक्त हिंदी वाक्याचाच सांगता येईल.

आता पुढे. वरच्या जर्मन आणि जपानी वाक्यांचा अर्थ हा, वरच्या मराठी आणि हिंदी वाक्यांसारखाच; म्हणजे ’पाऊस पडत आहे’ असाच आहे. आता तुम्हाला जर्मन वाक्याचा उच्चार आणि अर्थ दोन्ही कळले. पण जपानी वाक्याचा अर्थ कळला असला, तरी तुम्हाला त्या चिह्नांचा उच्चार कळलेला नाही. तो उच्चार तुम्हाला कळावा म्हणून आता देवनागरीत देते- ’आमे गा फुत्ते इमास.’

हां, आता ’आमच्या देवनागरी लिपीत सगळ्या भाषा लिहिता येतात, म्हणून आमची लिपी महान’ असा विचार करून लगेच ढगात जाऊ नका. रोमन लिपीतही सगळ्या भाषा लिहिता येतात. आपण नाही का SMSमध्ये रोमन लिपी वापरून मराठी किंवा हिंदी वाक्यं लिहित? 'paus padtoy', ’barish ho rahi hai' अशी ? कोणत्याही लिपीतून कोणतीही भाषा लिहिता येते. त्या बाबतीत देवनागरीचं काहीच वेगळेपण नाही.

आता आपण मुख्य विषयाकडे वळुया. आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरून आपल्याला काय दिसलं? तर उच्चार आणि अर्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या शब्दाचा उच्चार कळला, तरी त्याचा अर्थ कळेलच याची खात्री नाही. अर्थ कळण्यासाठी अमुक उच्चाराचा अर्थ तमुक होतो असं आपल्याला कोणीतरी शिकवावं लागतं. म्हणूनच तुम्हाला जर्मन वाक्याचा उच्चार कळला तरी मी सांगेपर्यंत अर्थ मात्र कळला नाही.

................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................

आता दुसरी एक गंमत पाहुया. डावीकडे दिलेले चित्र हे चित्र नसून, तो चिनी लिपीतला एक शब्द आहे. हा शब्द चिनी लिपीतून जसाच्या तसा उचलून जपानी लिपीत वापरला आहे. आता समजा आपण एक चिनी आणि एक जपानी अशा दोन माणसांना विचारलां की या शब्दाचा अर्थ काय?’. तर, ते दोघेही एकच अर्थ सांगतील. तो म्हणजे ’झाड’. आणि जर आपण त्यांना तो शब्द वाचून दाखवायला सांगितला, तर धमालच होईल. चिनी माणूस हा शब्द ’मु’ असा वाचेल आणि जपानी माणूस हाच शब्द ’की’ असा वाचेल.

आता झाली का पंचाईत? देवनागरीत लिहिलेल्या नव्या शब्दाचा उच्चार कळतो पण अर्थ नाही. आणि इथे तर उलट घडतंय. चिनी आणि जपानी या दोघांनाही या शब्दाचा अर्थ कळला तरी त्यांना एकमेकांच्या भाषेतला त्या शब्दाचा उच्चार माहीत नाहीये. असं का बरं घडत असेल? करा बरं विचार!

कठीण वाटतंय? बरं, आपण या कोड्याचे दोन भाग पाडुया. आधी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधुया - या शब्दाचा उच्चार चिनी आणि जपानी या दोन भाषांत वेगवेगळा आहे. हे घडूच कसं शकतं? सोप्पंय. इथे या शब्दाचा एकच एक असा उच्चार नाही. ’पा’ या अक्षरावरून आपल्याला उच्चार कळतो तो कशामुळे? तर ’पा’ चे ’प’ आणि त्याचा काना असे दोन तुकडे होतात. त्याचा उच्चार ’प+आ’ असा करायचा हे सर्व आपल्या माहीत असल्यामुळे.

..............................................................................................................................................................................................................................

........................................................
या शब्दाचेही आपण वेगवेगळ्या प्रकारे तुकडे करू शकतो. उदा.

...............................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................
कसेही तुकडे पाडले, तरी, त्यातल्या एका तुकड्याचा उच्चार ’म’ आणि उरलेल्या तुकड्याचा उच्चार ’उ’ म्हणून या शब्दाचा उच्चार ’मु’ असं सांगता येत नाही. किंवा एका तुकड्याचा उच्चार ’क’ आणि उरलेल्या तुकड्याचा उच्चार ’ई’ म्हणून या संबंध शब्दाचा उच्चार ’की’ असंही सांगता येत नाही. म्हणूनच या शब्दाचा एकच एक असा उच्चार नाही.

आता आपण कोड्याचा दुसरा भाग पाहू. दोन्ही भाषांमध्ये या शब्दाचा अर्थ एकच- ’झाड’. हे घडूच कसं शकतं? हेही सोप्पंय. देवनागरीत आपल्याला कागदावर जे लिहिलेलं दिसतं त्यावरून त्याचा उच्चार जसा कळतो, तसंच चिनी आणि जपानी लिपींत, कागदावर जे लिहिलेलं असतं त्यावरून त्याचा अर्थ कळतो.

हे नीट कळायला आपण आणखी एक उदाहरण घेऊ.

इथे डावीकडे दिलेला जपानी शब्द पहा. याचा उच्चार ’हायाशी’ असा काहीसा होतो. आता आपण ’पा’ हे अक्षर वाचलं, तसाच हाही शब्द वाचुया. या शब्दाचे दोन तुकडे होतायत; ते त्या शब्दाच्या खालीच दिले आहेत. हे दोन्ही तुकडे बरेचसे वरच्या 'मु' किंवा 'की' या शब्दासारखेच दिसतायत. म्हणजेच प्रत्येक तुकड्याचा अर्थ 'झाड’ झाला. आणि या तुकड्यांच्या अर्थांवरून 'हायाशी' या संबंध शब्दाचा अर्थ काढला, तर ’अनेक झाडे जिथे असतात ती जागा, म्हणजे जंगल’ असा निघतो. आहे की नाही मजा!

थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही शब्दाशीे तीन गोष्टींचा संबंध असतो. पहिली म्हणजे कागदावर दिसतं ते चिह्न. उदा. ’पाऊस’ असा लिहिलेला शब्द. दुसरी म्हणजे, आपण तोंडाने त्याचा करतो तो उच्चार. उदा. ’प+आ+ऊ+स’ असा उच्चार. आणि तिसरी म्हणजे आपल्या डोक्यात उमटणारा त्या शब्दाचा अर्थ. उदा. ’आकाशातून पडणारं पाणी’. आता आपण देवनागरी किंवा रोमन लिपी घेतली, तर आपल्या लक्षात येईल, की या लिपीतून कागदावर लिहिलेल्या चिह्नांशी जोडलेले आहेत, ते उच्चार. अर्थ नव्हे. आणि चिनी व जपानी लिपींतील चिह्नांशी जोडलेले आहेत ते अर्थ. उच्चार नव्हे.

ज्या लिपीतल्या चिह्नाशी उच्चार न जोडता अर्थ जोडलेला असतो, तिला ’चित्रलिपी’ असं म्हणतात. माझ्या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे चिनी पुरषांनी वापरलेल्या लिपीतील चिह्नांवरून अर्थ कळतो तर नु शुमधील चिह्नांवरून उच्चार कळतो. हाच दोन्हींतील महत्त्वाचा फरक आहे. चित्रलिपीबद्दल .............................................................................................. अधिक जाणून घेऊ पुढील लेखात.

-----------------------------------

'कलावृत्त'च्या ऑगस्टच्या अंकात पूर्वप्रकाशित

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

चित्रलिपी म्हणजे काय ते फारच सुंदर समजावून सांगितलं आहेस, वा! असं मला कुणी समजावून सांगितलं असतं, तर मी जपानी भाषेला फाट्यावर मारली नसती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भाषाविज्ञान शिकल्यावर भाषेचे अंतरंग इतक्या छानप्रकारे दिसू लागतात, की आपल्याला भाषा शिकवणे, भाषा शिकणे या नेहमीच्या प्रक्रियांमध्ये एक नवी दृष्टी प्राप्त होते आणि या प्रक्रिया अधिक सोप्या आणि अधिक आनंददायी होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

होय, असं ऐकलंय खरं. आता फुडल्या वर्षी! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्तं लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क्लास्सिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लेख. खूपच आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फार आवडला. पोरांना असले लेख वाचायला दिले तर त्यांच्या बर्‍याच कन्सेप्ट आर्रामात क्लीअर होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उद्बोधक लेख आवडला.
----
शंका :
चिनी पुरषांनी वापरलेल्या लिपीतील चिह्नांवरून अर्थ कळतो तर नु शुमधील चिह्नांवरून उच्चार कळतो. हाच दोन्हींतील महत्त्वाचा फरक आहे.
.............
१. 'नु शु'मधील चिह्नांचा उच्चार कळण्याची आवश्यकता कळली नाही. कारण शेवटी त्या भाषेतील लिखाण (भरतकाम) केवळ पाहून पुरुषांना तर काही कळता कामा नये पण स्त्रियांना कळले पाहिजे, हा उद्देश होता. 'नु शु' पुरुषांसमोर उच्चारल्यास पुरुषांना शंका आलीच असती. गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे ही लिपी शिकविताना बायका शिकवायचे चिह्न हातावर गिरवून एखादे गाणे गाऊन अर्थ स्पष्ट करीत. त्यात चिह्नाचा उच्चार नसला तरी चालू शकते, कारण अर्थ महत्त्वाचा.
२. चिह्नाचे उच्चार त्याकाळच्या चिनी चित्रलिपीतील उच्चारांशी कितपत जवळचे होते ? कारण जरी चिह्नाला उच्चार दिला गेला तरी त्या उच्चारांनी पुरुषांसमोर बोलणे म्हणजे धोकादायकच नाही का ? लिहा-वाचण्याबद्दलच्या शिक्षा पाहता बायका तसे बोलण्याचा धोका पत्करत असतील असे वाटते नाही. आणि पुरुष समोर नसताना तर नेहमीच्याच चिनी भाषेत त्या कागाळ्या, तक्रारी करी शकतातच. त्यासाठी सांकेतिक लिपीची वा सांकेतिक उच्चारांची गरज वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

शंकानिरसन :

लिपी आणि भाषा या दोन गोष्टींत काहीतरी गोंधळ होतोय असं वाटतं. 'नु शु' ही लिपी होती. पुरुष आणि बायका दोघेही एकच भाषा वापरायचे. म्हणजेच, 'झाड' या अर्थाने जर पुरुष 'मु' हा उच्चार वापरत असतील, तर स्त्रियाही तोच उच्चार वापरत असत. फरक होता तो फक्त लिखाणात. म्हणजे 'मु' साठी पुरुष जर वरच्या लेखात दाखवलेले चिह्न वापरत असतील, तर स्त्रिया काहीतरी वेगळे चिह्न वापरत. आणि स्त्रियांच्या चिह्नावरून 'झाड' हा अर्थ कळत नसे, तर चिह्नाच्या अमुक भागाचा उच्चार 'म्' असा होतो आणि तमुक भागाचा उच्चार 'उ' असा होतो; आणि 'उ' हा 'म्'च्या नंतर आहे, म्हणजे याचा उच्चार 'मु' हे सर्व कळत असे.

वेगळ्या शब्दात सांगायचं तर आपण दोघांनी मिळून एक सांकेतिक लिपी तयार केली आणि ती मराठी भाषेसाठी वापरायची ठरवली, तर आपल्याला मराठीतल्या उच्चारांसाठी देवनागरीतील अक्षरांहून वेगळी अक्षरं तयार करावी लागतील. किंवा देवनागरीत असलेलीच अक्षरे घेऊन ती नेहमीपेक्षा वेगळ्या उच्चारांसाठी वापरावी लागतील. उदा. आपण जर असं ठरवलं की सांकेतिक लिपीत 'म्' या उच्चारासाठी '&' हे चिह्न वापरायचं आणि 'ई' साठी '%' चिह्न वापरायचं, तर 'मी' हा मराठी शब्द आपल्या सांकेतिक लिपीत '&%' असा लिहिला जाईल. ही सांकेतिक लिपी ठाऊक नसलेल्या कोणालाही फक्त '&%' एवढेच पाहून ही चिह्नजोडी 'मी' अशी वाचायची हे कळणार नाही. आणि ते न कळल्याने अर्थही कळणार नाही.

याऊलट, जर आपण असं ठरवलं, की 'म्' या उच्चारासाठी 'द' हे चिह्न वापरायचं आणि 'ई' साठी काना वापरायचा, तर हाच शब्द आपल्या सांकेतिक लिपीत 'दा' असा दिसेल. हे त्या अज्ञानी बालकाला वाचता तर येईल, पण त्याचा अर्थ 'मी' असा होतो हे त्याला कळणार नाही.

'नु शु' ही नेहमीची भाषा लिहिण्यासाठी तयार केलेली एक सांकेतिक लिपी होती. तिचा वापर पुरुषांच्या नकळत लिखाणातून इतर मैत्रिणींशी संवाद साधणे आणि आपल्या गाण्यांचे डॉक्युमेंटेशन करणे हा होता. त्यामुळे त्लिहिण्यासाठी अशा साधनांचा वापर केला, की जेणेकरून मुळात पुरुषांच्या हाती ते लिखाण पडण्याचा संभव बराच कमी होईल. जर ते लिखाण त्यांच्या हाती पडलेच, तर ते लिखाण आहे याची शंका पुरुषांना येण्याची शक्यता त्याहून कमी. त्यातही, ते लिखाण आहे अशी त्यांना शंका आली, तरी पुरुषांच्या लिपीहून वेगळी लिपी असल्याने ते लिखाण वाचता येण्याची शक्यता तर खूप खूप कमी.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रलिपी ही शिकण्यासाठी खूप कठीण असते. कारण त्यात एकमेवाद्वितीय अशा चिह्नांची संख्या खूप मोठी असते. त्यामानाने उच्चाराधारित लिपी खूपच सोप्या असतात, कारण त्यात ५०, फार फार तर १०० चिह्ने असतात. त्यामुळे 'नु शु'चा नंतर लक्षात आलेला एक फायदा म्हणजे, तिचं सोपेपण. एका संशोधिकेने असे नोंदवले आहे, की गेल्या शतकात तिने या लिपीचा बराच अभ्यास केला व तिचे पुनुरुज्जीवन करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यादरम्यान भेटलेल्या दोन बायकांबद्दल तिने सांगितले आहे. एक बाई आधुनिक शिक्षणपद्धतीत शिकलेली होती. म्हणजेच तिला पुरुषांची लिपी येत होती. या शिकणाच्या आधारावर तिने काही काळ नोकरीही केली. असे असूनही तिला स्वतःच्या भावनांची अभिव्यक्ती करणारे लिखाण करणे जमले नव्हते. नु शु शिकल्यावर मात्र तिने बरेच काही लिहून काढले. दुसरी एक बाई पूर्णपणे निरक्षर होती. तिला नु शु शिकवल्यावर तीही लिखाण करू लागली. त्या दोघींची बोलून संशोधिकेच्या असे लक्षात आले, की नु शु उच्चाराधारित असल्याने चित्रलिपीहून अधिक सोपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

शंका फिटल्या. अनेक आभार.
---
जे तीन घटक (चिह्न, उच्चार आणि अर्थ) आणि त्यांच्या वेगवेगळ्या जोड्या , संगती लावून उदाहरणे दिली आहेत, त्यात एक पाठभेद राहिला.
एखाद्या उच्चारलेला शब्दाचा ध्वनी समान पण चिह्न आणि अर्थ मात्र वेगळी आहेत.
उदा. 'गोला' असा उच्चार एखाद्या हिंदी आणि ईतालीय भाषिकाला ऐकवला तर हिंदी भाषिक त्याचा अर्थ 'गोळा' आणि ईतालीय भाषिक त्याचा अर्थ 'गळा' (चिह्नांत : gola) असा सांगेल.
किंवा उच्चारी 'गाऊ' = मराठीत 'झोप' / 'गाणे क्रियापदाचे एक रूप' आणि चिनी भाषेत कुत्रा

अर्थात, हा पाठभेद या लेखासाठी तितका उपयुक्त नाही पण एक निपटीशिपटी म्हणून... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे 'छोटयांसाठी' ह्या सदरात का टाकले आहे? हे तर मोठयांंनाहि उद्बोधक आहे. शब्दाचे दृश्य स्वरूप, त्याचा अर्थ आणि त्याचा उच्चार ह्या तिनांपैकी कोणत्याहि दोघांचीच सांगड घालता येते हे तत्त्व मलातरी पहिल्यानेच येथे वाचून जाणवले.

लेखिकेस चिनी-जपानी अशा 'अगम्य' लिप्यांचे ज्ञान आहे हे पाहून माझ्या मनामध्ये बरेच वर्षे असलेली एक शंका विचारून घेतो. translate.google.com चा उपयोग करून मी खालील भाषान्तरे मिळविली:

English - Do not go there
simplified Chinese - 不要去那里
Traditional Chinese - 不要去那裡
Japanese - そこに行ってはいけない
Korean - 거기에 가지 마

ह्यांपैकी इंग्लिशची मला काहीच अडचण नाही. उच्चार, अर्थ आणि लेखन मला लगेच समजते. पुढच्या चार ओळींमध्ये मात्र मला संपूर्ण हार मानावी लागते. ह्याचे कारण अर्थातच असे आहे की त्या त्या भाषांचा काहीच अभ्यास मी केलेला नाही. पण माझी शंका त्याच्यापलीकडची आहे. लिपि येत नसूनहि मला असे वाटते की त्या लिपि रोमनच्या तुलनेने अधिक गुंतागुंतीच्या आहेत. प्रत्येक लिपीमध्ये हा अर्थ संक्रमित करण्यासाठी पेनला कागदावर जो प्रवास करावा लागेल तो रोमनच्या बाबतीत बराच कमी आणि अन्य लिपींमध्ये खूपच अधिक वाटतो. माझी ही शंका रास्त आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दाचे दृश्य स्वरूप, त्याचा अर्थ आणि त्याचा उच्चार ह्या तिनांपैकी कोणत्याहि दोघांचीच सांगड घालता येते हे तत्त्व मलातरी पहिल्यानेच येथे वाचून जाणवले.

ते तसं नाहीये. ही लेखमाला शाळकरी मुले या वाचकवर्गासाठी लिहिलेली असल्याने अर्थ, उच्चार आणि लेखन यांची गुंतागुंत पायरीपायरीनेच सोडवता येते आहे. त्यामुळे आत्ता मी चिह्नातील काही भाग उच्चारदर्शक आणि काही भाग अर्थदर्शक असणार्‍या चिह्नांविषयी या लेखात काही लिहिलेलं नाही. परंतु चिनी भाषांसाठी वापरण्यात येणार्‍या लिपीतील सर्वाधिक चिह्ने अशा कडबोळं पद्धतीची आहेत. केवळ अर्थ दाखवणारी चिह्ने त्यामानाने फारच कमी आहेत. यावर नंतरच्या एखाद्या लेखात लिहिण्याचा बेत आहे. परंतु, अर्थ, उच्चार आणि लेखन या तीन गोष्टी एकमेकांहून वेगवेगळ्या करता येतात हे दर्शवण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

लेखिकेस चिनी-जपानी अशा 'अगम्य' लिप्यांचे ज्ञान आहे

घोर गैरसमज! मला या लिपींचे ज्ञान नाही. मी या लिपींचा भाषावैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास वाचून या लेखात त्यातून मिळालेल्या उदाहरणांचा वापर केला आहे.

लिपि येत नसूनहि मला असे वाटते की त्या लिपि रोमनच्या तुलनेने अधिक गुंतागुंतीच्या आहेत. प्रत्येक लिपीमध्ये हा अर्थ संक्रमित करण्यासाठी पेनला कागदावर जो प्रवास करावा लागेल तो रोमनच्या बाबतीत बराच कमी आणि अन्य लिपींमध्ये खूपच अधिक वाटतो. माझी ही शंका रास्त आहे का?

याचे उत्तर मलाही 'हो' असेच वाटते आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसून या लिपींचे अज्ञान आणि रोमन व देवनागरी लिपींची सवय या दोन गोष्टींमुळे मला तसे वाटत असेल हेही शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

माहिती छानच आहे. एक सुचवणी :
लहान मुले तपशिलांच्या बाबतीत कधीकधी कमालीची काटेकोर असतात. लेखातील जर्मन वाक्य देवनागरीत लिहिले आहे. जे सांगायचे आहे, त्याकरिता ही गौण बाब आहे, खरी. परंतु बरीच मुले याबाबतीत अडकून पडतील - जर्मन देवनागरीत कसे लिहिले? जपानी मात्र वेगळे कसे लिहिले? जपानी पण देवनागरीतच द्यायला हवे ना?

मला वाटते, की देवनागरीतच लिहिलेली भाषा, परंतु त्यातही मराठी मुलांना अपरिचित असलेले शब्द वापरले, तर बरे होईल. उदहरणार्थ गोव्याच्या कोंकणीत "धादोस" म्हणजे "अतिशय आनंदी", "धन्य" वगैरे. किंवा "जनेल" म्हणजे खिडकी, वगैरे, मराठीभाषकांना अर्थ ओळखू येणे मुश्किलच. कोंकणीऐवजी नेपाली वगैरे भाषांत आणखी अनोळखी प्रतिशब्द सापडण्याची शक्यता आहे.

तर असा कुठला शब्द शोधावा : मराठीबाङ्ला जोडीत खूपच व्युत्पत्तिसाम्य आहे; परंतु मराठीकोंकणी प्रतिशब्दांत सहज कळणारे साम्य नाही. मग बाङ्ला शब्दाचे देवनागरी प्रतिलेखनही द्यावे. युक्तिवाद वरीलप्रमाणेच :
खुश : मराठी ध्वनी वाचता येतो, अर्थ कळतो
সুখ : बाङ्ला ध्वनी वाचता येत नाही, परंतु ऐकला तर अर्थ कळतो
धादोस : कोंकणी ध्वनी वाचता येतो, अर्थ कळत नाही
Smile : ध्वनी असा काही नाही, अर्थ मात्र कळतो "स्मितहास्य"

(आनंद करिता कान्जी चिन्ह): ध्वनी वाचता येत नाही, अर्थही कळत नाही. मग चिनी-मंत्री आणि जपानी उच्चार वेगळे कसे ते सांगावे. पण अर्थ एकच.

(बाकी पावसाकरिताचे चिन्ह दारा-खिडकीमधून बघितलेल्या पावसासारखे दिसते, नाही का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत उपयुक्त सुचवणी. धन्यवाद. लहान मुलांशी गप्पा मारण्याचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे असे बारकावे लक्षात येत नाहीत. यापुढे कधी या विषयावर लेखन करायची वेळ आली तर जर्मन भाषेच्या ऐवजी कोकणी भाषा वापरेन.

पाऊस : माहीत नाही. मला ही लिपी येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

"पाऊस" तुमच्या लेखात आहे (पहिले चित्र)

http://en.wiktionary.org/wiki/%E9%9B%A8

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, बरोबर. मी हे वाक्य जपानी भाषा येणार्‍या माझ्या एका मैत्रिणीकडून भाषांतरित करून आणि लिहून घेतले होते. नंतर त्यातल्या चिह्नांकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यामुळे लक्षात आले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

अतिशय रटाळ तासाला मी भारतातल्या कोणालातरी पत्र लिहित होते. शेजारी एक ब्रिटिश मित्र बसला होता. त्याने त्या पत्रावरून नजर टाकली आणि 'आहे'कडे बोट दाखवून हे क्रियापद आहे का, याचा अर्थ is, are, was, were पैकी काही आहे का असं विचारलं. नु शु डीकोड करणं शक्य झालंच नसेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय रटाळ तासाला मी भारतातल्या कोणालातरी पत्र लिहित होते. शेजारी एक ब्रिटिश मित्र बसला होता. त्याने त्या पत्रावरून नजर टाकली आणि 'आहे'कडे बोट दाखवून हे क्रियापद आहे का, याचा अर्थ is, are, was, were पैकी काही आहे का असं विचारलं.

मस्त! 'आहे' किती वेळा वापरलं जात आहे आणि कसं वापरलं जात आहे यावरून त्याने ते ओळखलं असेल.

नु शु डीकोड करणं शक्य झालंच नसेल का?

असं म्हणताना पुरुषांना ते लिखाण आहे हे कळून त्यांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असेल हे गृहितक आहे. नु शुबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाहीये आणि अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरं आहेत. काहींच्या मते पुरुषांना या लिपीची माहिती होती, पण आपण त्याकडे लक्ष द्यावं इतकी त्या लिखाणाची लायकी नाही असा विचार करून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रत्यक्षात काय झालं काय माहीत.

नु शुच्या बाबतीत बर्‍याच रोचक घटना घडलेल्या आहेत. मी कुठेतरी वाचलं होतं की गेल्या शतकात जपानने चीनचा ताबा घेतला होता त्या काळात पुढील घटना घडली- एक चिनी स्त्री प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिच्या हातातला रुमाल खाली पडला. त्यावर नु शुमध्ये भरतकाम केलं होतं. हा रुमाल एका जपानी सैनिकाला दिसला आणि त्याने असा अर्थ लावला की चिनी माणसांनी आपल्याला कळू न देता आपल्याविरुद्ध कटकारस्थानं करण्यासाठी सांकेतिक भाषा/लिपी तयार केली आहे. या भीतीने तिला गुप्तहेर ठरवण्यात आलं. नंतर या सैनिकांनी नु शुमधील बरंच साहित्य मिळवून जाळून टाकलं. हे कुठे वाचलं होतं ते नेमकं आठवत नसल्याने संदर्भ देता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मस्त! लेख खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख माझ्या वयाला आवडला.
प्रत्यक्षात टार्गेट ऑड्यन्स काये? १०-१२ वर्षांपेक्षा कमी असेल तर लेखन शैलीत बदल असावेत, तपशीलांची निवड अधिकच काटेकोर व विचारपूर्वक केलेली हवी व अधिक संवादात्मक असावी असे सुचवेन.

==
शिवाय चिनी लिपी ही अर्थाशी प्रामाणिक असते तसेच ध्वनीशीही असते असे ऐकून आहे. एकाच उच्चाराचा अर्थ बदलला की खुण बदलते. तसेच एकाच खुणेचा अर्थ उच्चारात वापरलेल्या ध्वनीने वेगळा ठरू शकतो. हे बरोबर आहे का? (उदा माहिती नाही. ही ऐकीव माहिती आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!