छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच
या पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ३ मार्च २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
स्पर्धा का इतर?
काच..
संध्याकाळी घरी येताना एका सिग्नलला थांबल्यावर एका विशिष्ट वेळी,साधारण ५.३० च्या सुमारास
बरोबर पाठीमागच्या खिडकीतुन पश्चिम दिशेतुन सूर्य मावळताना पडलेले सूर्यकिरण
आणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर हाताशी बराच वेळ असताना काढलेला फोटो.
फोटो स्त्रोतः आयफोन कॅमेरा.
धागा वर काढत आहे (२)
स्पर्धेसाठी नाही.
![]() |
From Oct 13, 2012 |
Camera: NIKON COOLPIX L120, Exposure Time: 1/160 s, ISO: 400, Flash used: No, FocalLength: 6.20 mm
निकाल देण्यासाठी उशीर झाला,
निकाल देण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. या स्पर्धेसाठी कमी फोटो आल्यामुळे निराशा झाली.
सायलीशी चर्चा करून हा निकाल जाहीर करत आहे -
३. मयुरा
२. बोका - या प्रकारचे फोटो काढताना पांढुरका भाग ओव्हरएक्सपोज होण्याची भीती असते. बोका यांनी ते टाळलेलं दिसतंय.
१. नंदन - दृश्य, प्रेक्षक आणि प्रेक्षकांची प्रतिमा दाखवणारं चित्र, त्यातले रंग सगळंच आवडलं.
नंदनने पुढचा विषय द्यावा.
आरसे-ssism
तांत्रिक माहिती:
Canon EOS Digital Rebel XSi
EF-S18-55mm f/3.5-5.6 IS
ƒ/3.5 23.0 mm 1/25 800 Flash (off, did not fire)