Skip to main content

.

.

ऋषिकेश Mon, 20/04/2015 - 16:49

मला पहिल्या प्रवासापासूनच विमानाचा कधीच फोबिया आला नाही - अजुनही विमान म्हटलं की प्रचंड आकर्षक असं काही वाटतं आनि कधी एकदा आत जाऊन बसतोय असे काहिसे होते - मात्र भिती अजिबातच नाही. (मी दुचाकी/चारचाकी कार चालवायला किंवा त्यात वा बसमध्ये बसायला मात्र उतरत्या क्रमाने घाबरतो. दुचाकीवर सर्वोच्च भिती!)

हे असं कोणाला होतं का मलाच काही मानसिक आजार आहे काय?

=====
मात्र गेल्या २-४ वर्षांत बायकोला विमानांचा चांगलाच फोबिया आला आहे (अचानकच! त्याआधी ती ही विनाभिती फिरली आहे विमानांतून व सध्या वेळ आली तर घाबरून जीव मुठित घेऊन जाते). लेख अतिशय उपयुक्त आहे.

फक्त चाकं आत जातानाचा आवाज:

तशी ती व्हायलाच हवीत. हा आवाज यायलाच हवा.

हे किंवा

हेही होणारच.. व्हायलाच हवं. हा आवाज आला म्हणजे व्हील्स डिप्लॉय झाली. काळजीचं कारण नाही.

वगैरे वाक्य भिती वाढवायला कारणीभूत ठरू शकतात ;)
नेमका आवाज कुठला हे माहित नसेल की तो आवाज आला की नाही? नाही आला वाटतं! अरे बापरे चाकं आत गेलीच नाहीत की काय / बाहेर आलीच नाहित की काय? वगैरे प्रश्न उद्भवू शकतात.

गवि Mon, 20/04/2015 - 16:53

In reply to by ऋषिकेश

वगैरे वाक्य भिती वाढवायला कारणीभूत ठरू शकतात
नेमका आवाज कुठला हे माहित नसेल की तो आवाज आला की नाही? नाही आला वाटतं! अरे बापरे चाकं आत गेलीच नाहीत की काय / बाहेर आलीच नाहित की काय? वगैरे प्रश्न उद्भवू शकतात

पण ते येतातच.. लक्ष देऊन बसलेल्यांना तर शंभर टक्के. म्हणूनच उलट रिअ‍ॅश्युरन्ससाठी वापरावेत ;)

ऋषिकेश Mon, 20/04/2015 - 16:59

In reply to by गवि

अहो हो पण ते तुमचं लक्ष असतं + नेमका "तो" आवाज कोणता हे तुम्हाला ( व एका मित्रकृपेने मलाही) माहित आहे अशांची गोष्ट वेगळी.
भितीमुळे वगैरे आधीच बधीर झालेल्या आत्म्यांचे लक्ष प्रत्येक आवाजावर असते त्यामुळे क्षुल्लक आवाजही त्यांना ऐकू येतात. त्यापैकी "तो आवाज" कोणता हे न समजल्याने भिती वाटू शकेल असे वाटते (अर्थात जे घाबरतात त्यांना हवेत "असहाय" वाटते म्हणे!)

मला चाक आत गेल्याचा दरवेळी आवाज येतोच असे नाही (किंवा येतही असेल पण मी खालचे दृश्य अगदी काचेला नाक लाऊन बघण्यात अतीव गर्क असल्याने मेंदू तो इग्नोर करत असेल ही शक्यताही आहेच)

चाकं बाहेर आल्यावर आवाजासोबत शरीरालाही एक हलकासा जर्क म्हणा किंवा दिशाबद्ल/फ्लटरिंग जाणवू लागते त्यामुळे तो चुकल्याची शक्यता कमी आहे हे मान्य.

====

अंगूर या माझ्या परमप्रिय चित्रपटात एक प्रसंग आहे. त्यात उत्पल दत्त आपल्या पत्नीला सांगतो "इससे अच्छा हम हवाई जहाजसे जाते. मुझे तैरना नही आता, मुझे जहाजसे डर लगता है"
त्यांची पत्नी सांगते "मुझे उडने नही आता, इसिलिये मुझे हवाई जहाजसे डर लगता है" ;)

थोडक्यात काय भिती शाश्वत आहे! असा देऊ केलेला धीर वगैरे सब मिथ्या! :P

स्वरा Mon, 20/04/2015 - 19:31

In reply to by ऋषिकेश

मला पहिल्या प्रवासापासूनच विमानाचा कधीच फोबिया आला नाही - अजुनही विमान म्हटलं की प्रचंड आकर्षक असं काही वाटतं आनि कधी एकदा आत जाऊन बसतोय असे काहिसे होते - मात्र भिती अजिबातच नाही. (मी दुचाकी/चारचाकी कार चालवायला किंवा त्यात वा बसमध्ये बसायला मात्र उतरत्या क्रमाने घाबरतो. दुचाकीवर सर्वोच्च भिती!)
हे असं कोणाला होतं का मलाच काही मानसिक आजार आहे काय?

+१००!! मला पण डीट्टो!! विमानाचा कधीच फोबिया नाही. उलट ते रन्वे वरुन जोरात पळायला लागलं की मला एकदम शुमाकर झाल्यासारख वाटायला लागत. जेमतेम ५ फुटांची उंची असुनही ५.७ ltr गाडी चालवायला पण भिती अजिब्बात नाही वाटली कधी. पण दुचाकी म्हटल की हवाच जाते माझी. स्कुटर्स, बाईक्स...अ बीग नो नो! सायकल तर तौबा तौबा! सायकल वरुन पडण्याची विचीत्र भिती आहे मला...तसं ते पडून, हात मोडूनही झालेल आहेच.. मी आपली स्टेशनरी बाईकच चालवते बाबा!

बॅटमॅन Mon, 20/04/2015 - 16:52

अंमळ अवांतर होईल तरी लिहितोय. विमानात कैकदा दडे बसतात कानाला ते अत्यंत त्रासदायक असतात. एकदोनदा तर कानाचा पडदा फाटतो की काय इतपत दुखले होते. कागद फाटल्यासारखा टर्र आवाज होऊन मग दडा संपला तो भाग वेगळा, पण ड्यूरिंग द होल प्रोसेस, कानांची लैच लागली होती. तरी याबद्दल काय करावे?

गवि Mon, 20/04/2015 - 16:55

In reply to by बॅटमॅन

कानाच्या आतली हवा आणि बाहेरची विमानातली हवा यांच्या दाबात फरक झाल्याने दडे बसतात. हा फरक लँडिंगपूर्वी खाली जाताना झपझप वाढतो. तेव्हाच खरा त्रास आणि वेदना होऊ शकतात. त्या वेळी जागे राहून वेळीच जांभईची क्रिया करुन दडा काढत राहणे. दाबाचा फरक फार होऊ न देणे. घोटघोट पाणी पिणे, लाळ गिळणे अशा मार्गांनी हलकासा असतानाच दडा मोडला तर दु:खदायक लेव्हलपर्यंत पोहोचत नाही.

अतिशहाणा Mon, 20/04/2015 - 18:16

In reply to by गवि

लहान बाळांचा प्रवास वगैरे असेल तर कसे म्यानेज करतात. कुठल्याच प्रवासात मुले रडताना ऐकली नाहीत. मला मात्र कानाला दडे बसून कान फुटतो की काय असे वाटत होते. मुलांना ग्राईप वॉटर वगैरे पाजून झोपवतात काय?

बॅटमॅन Mon, 20/04/2015 - 18:40

In reply to by अतिशहाणा

कुठल्याच प्रवासात मुले रडताना ऐकली नाहीत.

आर यू शुअर? कैकदा मुले (खरेतर बाळे) रडताना ऐकली आहेत. दड्याचा त्रास नक्कीच होत असणारे बराच.

अतिशहाणा Mon, 20/04/2015 - 19:32

In reply to by बॅटमॅन

आर यू शुअर? कैकदा मुले (खरेतर बाळे) रडताना ऐकली आहेत. दड्याचा त्रास नक्कीच होत असणारे बराच.

रडताना अजिबात ऐकली असे नाही. पण मला एकदोनदा दड्यांचा प्रचंड त्रास झालाय. अगदी रडावेसे वाटले आहे. मात्र निदान हवी तेव्हा जांभई देण्याचा प्रयत्न वगैरे करुन हा त्रास मिटिगेट करायचा थोडा प्रयत्न करता येतो. मात्र त्या तुलनेत बाळांना कमी त्रास होतो की काय? ल्यांडिंग / डिसेंडिंग करताना जोरजोरात रडणारी बाळे ऐकल्याचे आठवत नाही.

ऋषिकेश Mon, 20/04/2015 - 17:02

In reply to by बॅटमॅन

लिक्विड पित रहावे. किंवा लाळ गिळत रहावी.
नाहितर जांभई, नाक दाबून नाकातून हवा सोडायचा प्रय्त्न वगैरे इक्वलायझर्स करता येतील. (हे शेवटचे आम्हाला स्कूबा डायविंगला शिकवले होते. डिसेंड करताना दर एखाद/अर्ध्या फुटाला हा उद्योग करावा लागतो नाहीतर पडदा फाटू शकतो. मी स्कुबाडाईव्हच्या डिसेंटडबद्दल बोलतोय, विमान प्रवाशांनी घाब्रु नये ;))

उदय. Mon, 20/04/2015 - 19:44

In reply to by बॅटमॅन

च्युईंग गम चघळत राहाणे. लहान बाळ असेल तर त्याला/तिला दुधाची बाटली चोखायला देणे. यामुळे दडे बसणे खूपच कमी होते.

धर्मराजमुटके Mon, 20/04/2015 - 17:01

खुपच छान लेख ! या सगळ्या तांत्रिक बाबतींची माहिती नसली तरी बर्‍याचदा विमान प्रवास करताना हे सगळ अनुभवलं असल्यामुळे जे जे उल्लेख केलेत ते ते नेहमीच होत असल्यामुळे ते सर्व नॉर्मलच आहे याची खात्री पटत गेली.

मात्र मला भिती वाटते ती वेगळ्याच गोष्टींची.
१. म्हणजे पायलट आणि को पायलट दोघेही विमान ड्युटी करुन थकलेयत आणि दोन दोन घोट पिऊन झोपी गेले तर ?
२. बर्‍याचदा 'घर का भेदी लंका ढाये' या न्यायाने ज्या 'क्रु मेंबर्सचा' सिक्युरीटी चेक होत नाही किंवा तितकासा कडक होत नाही त्यांच्याकडून चुकून विमानाला अपघात होण्याची शक्यता कितपत असते ? किंवा मुद्दाम अपघात करायचा ठरवला तर कसा रोखता येईल ?
३. विमानात दोन इंजिन आहेत पण पुरेसे इंधन भरले नसेल तर काय होईल ? किंवा जसी महामंडळाची एसटी खराब आहे हे माहित असूनही रस्त्यावर धावण्यासाठी बाहेर काढतात तसेच विमानाची उड्डाणपुर्व काटेकोर तपासणी झाली नसेल तरी, 'हॅ ! त्याला काय होतयं ? एवढी एक ट्रीप तर नक्की मारुन होईल'. असा विचार कोणी करत असेल तर काय ?

मला पडलेले हे प्रश्न नक्कीच बालीश (किंवा फुलीश) आहेत असे म्हणता येईल पण ते संपूर्णपणे नाकारता आले तर आनंदच वाटेल.

आणि आणखी एक : कधी कधी घाबरायचं ते पण सांगता का जरा प्लीज ? न:)

गवि Mon, 20/04/2015 - 17:18

In reply to by धर्मराजमुटके

१. म्हणजे पायलट आणि को पायलट दोघेही विमान ड्युटी करुन थकलेयत आणि दोन दोन घोट पिऊन झोपी गेले तर ?

ते थकणार नाहीत यासाठी त्यांचे ड्यूटी अवर्स अत्यंत कडक कायद्यांनी रेग्युलेट केलेले असतात. घरुन निघाल्या क्षणापासून ड्यूटीचे तास मोजायला सुरुवात होते. टेकऑफच्या वेळेपासून नव्हे. वेळ संपली की कितीही खर्चिक किंवा कठीण अडचण असो, कितीही वळसा पडत असो.. पण त्यांना बदलून दुसरे पायलट्स आणि कॅबिन क्रू आणावाच लागतो. शिवाय ते दोघे एकावेळी झोपी जातील इतकं ढिलं वातावरण कॉकपिटमधे नसतं. दर थोड्या मिनिटांनी रेडिओ संपर्क, कन्फर्मेशन्स, चेकपॉईंट्स वगैरे असतात. केबिन क्रू असतो.

२. बर्‍याचदा 'घर का भेदी लंका ढाये' या न्यायाने ज्या 'क्रु मेंबर्सचा' सिक्युरीटी चेक होत नाही किंवा तितकासा कडक होत नाही त्यांच्याकडून चुकून विमानाला अपघात होण्याची शक्यता कितपत असते ? किंवा मुद्दाम अपघात करायचा ठरवला तर कसा रोखता येईल ?

गेल्या कित्येक वर्षांपासून क्रूच्या प्रत्येक मेंबरचा डीटेल्ड सिक्युरिटी चेक होतो. पायलट्स, केबिन क्रू सर्वांचा होतो. मुद्दाम घातपात करायचा तर तो क्रू मेंबर पायलट्सपैकी एक असला पाहिजे आणि तो कॉकपिटमधे एकटा उरला पाहिजे. आता जर्मनविंग्ज घटनेनंतर भविष्यात तर ही शक्यता कणभरही नाही.

३. विमानात दोन इंजिन आहेत पण पुरेसे इंधन भरले नसेल तर काय होईल ? किंवा जसी महामंडळाची एसटी खराब आहे हे माहित असूनही रस्त्यावर धावण्यासाठी बाहेर काढतात तसेच विमानाची उड्डाणपुर्व काटेकोर तपासणी झाली नसेल तरी, 'हॅ ! त्याला काय होतयं ? एवढी एक ट्रीप तर नक्की मारुन होईल'. असा विचार कोणी करत असेल तर काय ?

पुरेसं इंधन न घेणं आत्ताच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे. त्यासाठीही अशा घटना घडल्यापासून स्टँडर्ड मल्टिपल लेव्हल चेक्स आलेले आहेत. तरीही इंधन संपलं तर ते संपायच्या बरंच आधी पायलट्सच्या लक्षात येईल. त्यानंतरही विमान कोणत्यातरी आल्टरनेट विमानतळावर नेणं शक्य असेल. विमानाचं इंधन पूर्ण संपलं तरी ते खाली न कोसळता त्याचं कंट्रोलेबल ग्लायडर बनेल अशी रचना असते. अशा स्थितीतही विमान महासागराच्या मध्यावर नसेल तर जवळच्या विमानतळापर्यंत तरंगत जाऊन उतरु शकतं. अगदी तासभरही वेळ मिळू शकतो ग्लाईडिंग नियंत्रित करुन.

धर्मराजमुटके Mon, 20/04/2015 - 17:19

In reply to by गवि

धन्यवाद बरं का !

अगदी तासभरही वेळ मिळू शकतो ग्लाईडिंग नियंत्रित करुन.

हे वाचून जीव भांड्यात पडला. आजकाल मुंबई विमानतळावर रस्त्यापेक्षा जास्त ट्रॅफीक असतो. सालं उड्डाण ४५ मिनिटांच आणि हवेतील प्रतिक्षा ३० मिनिटांची असं बर्‍याचदा झालयं माझ्या बाबतीत.

पैचान कौन Tue, 21/04/2015 - 03:27

In reply to by गवि

शिवाय ते दोघे एकावेळी झोपी जातील इतकं ढिलं वातावरण कॉकपिटमधे नसतं. दर थोड्या मिनिटांनी रेडिओ संपर्क, कन्फर्मेशन्स, चेकपॉईंट्स वगैरे असतात.

मिनीयापोलिसला विमान लॅण्ड होण्याऐवजी १५० मैल (२४० किमी) पुढे निघून गेले होते कारण दोघे वैमानिक काँप्युटरवर बिझी होते.

पुरेसं इंधन न घेणं आत्ताच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे.

ही शक्यता दुर्मिळ असली तरी अशक्य नाही. नुकतेच वाचलेले की कुणाचे तरी विमान इंधन संपल्याने पडले. हे कमर्शियल विमानात खूपदा होत नसेल, पण शक्यता नाकारता येत नाही.

अशा स्थितीतही विमान महासागराच्या मध्यावर नसेल तर जवळच्या विमानतळापर्यंत तरंगत जाऊन उतरु शकतं. अगदी तासभरही वेळ मिळू शकतो ग्लाईडिंग नियंत्रित करुन.

म्हणजे "मिरॅकल ऑन द हडसन" विशेष नाही तर तुमच्या मते.

विमानाची भिती वाटायचे मुख्य कारण म्हणजे विमानाला अपघात झाला तर आपण हमखास मरणार, असे आपल्याला वाटते. पण तरीही कारमध्ये अपघात होण्याची व मरणाची शक्यता खूपच जास्त असते. त्यामुळे निश्चिंत रहा, असे सांगणे ठीक आहे.

नितिन थत्ते Mon, 20/04/2015 - 17:02

खिडकीत नको हो... बिझी एअरपोर्टवर असलात तर आणखी मेलात.

आपलं विमान टेकऑफसाठी मेन रनवेच्या बाजूला येऊन थांबलंय. खिडकीतून तुम्हाला एका उतरण्यासाठी येणार्‍या विमानाचे दिवे दिसतायत. तुम्ही विचार करताय ... हे विमान उतरलं की तुमच्या विमानाला उडण्यासाठी रनवेवर सोडणार.

इतक्यात... हे काय ? तुमचं विमान रनवेवर जायला निघालं. तुम्ही मनात म्हणता "ह्म्म, ते उतरणारं विमान यायच्या आत आपलं विमान उडणार आहे." विमान रनवेवर जाणार आणि लगेच वेग घेणार.

पण आपलं विमान रनवेवर जाऊन उभंच राहिलंय. निघायचं नावच घेत नाहीये. आता तर मघाशी उतरण्यासाठी येणारं विमान आपल्या विमानाच्या मागच्या बाजूस आहे आणि ते दिसत नाहीये.

आता ते विमान येऊन आपल्या विमानावर आदळणार...............

ऋषिकेश Mon, 20/04/2015 - 17:05

In reply to by नितिन थत्ते

मला नेमकी हीच लिला बघायला प्रचंड मजा येते!
काय अचूक मॅनेजमेंट असते. एकदम क ड क समाल ठोकतो मी मनोमन!

अर्थात, त्यापेक्षा "अगबाई कित्ती छान मेथीये" असं म्हणंत मनात येईल तेव्हा गाडीचे नाक वळावणार्‍या काकवांशी किंवा "ए नाम्या!" असे हाकारून त्या नाम्याने बघायच्या आत रस्ता अर्धा पार केलेल्या - प्रत्येक-गाडी-आपल्याच-अंगावरून-गेली-पाहिजे-छाप - कॉलेज कुमाराचा सामना करणे कितीतरी आवघड आहे हे मान्य! आणि म्हणूनच त्याची भिती अधिक वाटते

गवि Mon, 20/04/2015 - 17:16

In reply to by नितिन थत्ते

एकाहून एक लोक्स आहेत आपल्याइथे..

थत्तेचाचा, तुम्हाला एव्हिओफोबिया नसून विंडोफोबिया आहे असं वाटतंय. ;)

आदूबाळ Mon, 20/04/2015 - 17:25

मला तर ईमानात लय मज्जा येते. भीती वाटली नाही बुवा.

ठार अवांतर - आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये रम/व्हिस्की/वाईन असे पर्याय असतात. बीयर का नसते? देशांतर्गत फ्लाईटमध्ये यापैकी काहीच का नसतं?

अतिशहाणा Mon, 20/04/2015 - 18:06

In reply to by आदूबाळ

ठार अवांतर - आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये रम/व्हिस्की/वाईन असे पर्याय असतात. बीयर का नसते?

कुठल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये बीअर मिळत नाही? मला वाटते सगळीकडेच मिळते. अल्कोहोल फ्री किंवा पेड इतकाच फरक असावा.

अजो१२३ Mon, 20/04/2015 - 18:38

In reply to by आदूबाळ

अवांतरासाठीचे विशेषण फारच आवडले.
-------------------------------------------
दुसर्‍या कोण्या धाग्यावर भेटले असते तर जास्त बरे झाले असते. असो.

तिरशिंगराव Mon, 20/04/2015 - 17:36

मला, वर सांगितलेल्यापैकी एकाही गोष्टीची कधी भीति वाटली नाही. पण टॉयलेट फोबिया जरुर आहे. आपल्याला जेंव्हा जावेसे वाटते तेंव्हाच नेमकी लाईन लागलेली असते. ती लाईन संपायच्या आत, सीटबेल्ट लावण्याची सूचना येते आणि एअर होस्टेस तिथून हाकलून देते. देसी प्रवासी जास्त दिसले की आंत गेल्यावर काय बघायला मिळेल, त्याची भीति असते. आंत जागा इतकी कमी असते की त्यापेक्षा कपड्यांची ट्रायल रुम बरी.

बॅटमॅन Mon, 20/04/2015 - 17:38

In reply to by तिरशिंगराव

सहमत, फोबिया नसला तरी असे कैकवेळेस झालेय खरे. एकदा आम्ही आत असताना कुणीतरी जोरजोरात दरवाजा ठोठावत होतं. शुद्ध मराठीत चार श्या घातल्या तेव्हा थांबलं ते. मायला, धड फारिग देखील होऊ देत नाही म्हणजे काय?

नगरीनिरंजन Mon, 20/04/2015 - 18:10

कसलं डोंबल्याचं मॉईश्चरायजर? इनमीन पाच तासाच्या प्रवासात त्वचा कोरडी ठक्क होऊन ओठ फाटायला लागतात. बाकी भीती अशी वाटली नाही पण टेकॉफ घेताना खिडकीतून बाहेर बघितल्यास हुरहुर वाटते की कदाचित जमिनीचा हा शेवटचा संपर्क.
सुरुवातीला एक-दोनदा खिडकीतून बघताना मजा वाटली पण आता कंटाळा येतो. सबवेच्या खालोखाल बोरिंग प्रवास म्हणजे विमानाचा प्रवास; पण आपण उडतो ही किती अमेझिंग गोष्ट आहे याचा विचार करता बोरिंग म्हणताना अपराधी वाटतं.

अतिशहाणा Mon, 20/04/2015 - 18:13

विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग करताना प्रचंड भीती वाटते. एकदोनदा दरदरुन घामही फुटला आहे. कोचीन विमानतळावर ल्यांडिंग करताना पाठीला दणकण हादरा बसलाय. तिथं ल्यांडिंग झाल्यावर लोकांनी उपरोधाने जोरजोरात टाळ्या वाजवल्या होत्या. (त्याच वर्षी मँगलोर की कुठल्याशा विमानतळावर मोठा अपघातही झाला होता). मागच्या वर्षी टेकऑफ करताना लुफ्तांझाच्या विमानात माझ्या समोरच्या सीटवर वरुन (भारतीय व्यक्तीची वजनदार) ब्याग पडली होती. नशीब कुणी बसलं नव्हतं अन्यथा कपाळमोक्ष अटळ होता. अगदी पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रचंड टर्ब्युलन्स होता. एकदोन जणांचे पाण्याचे/पेयांचे ग्लास उडून खाली पडले होते. कोलंबस बोटमध्ये बसल्यावर होतो तसा पोटात खड्डा पडल्याचा अनुभव तीनएक तास सतत येत होता.

त्यामुळे भीती वाटतेच. बसूनबसून पायात पेटके येतात. त्यामुळे दहा तासापेक्षा जास्त ड्रायविंग असेल तरच विमानाची निवड करतो. अन्यथा आपली गाडी बरी.

राजन बापट Mon, 20/04/2015 - 18:28

लेख माहितीपूर्ण आणि छान आहे. प्रतिसादसुद्धा उद्बोधक आहेत.

एव्हिओफोबिया हा अगदी अंगभूत असू शकतो किंवा "विमाने अधूनमधून पडतात" या बातम्यांमुळे/भानामुळे असू शकतो असा माझा समज आहे. अर्थातच या दोन्ही गोष्टी शेवटी मनातल्याच असल्या आणि एकाच गोष्टीबद्दल असल्या तरी सूक्ष्म फरक असलेल्या आहेत असं मला वाटतं.

म्हणजे असं की, अंगभूत फोबिया असलेले लोक फ्लाईट सिम्युलेटरमधेही घाबरतील/कधी जाणार नाहीत/गेले तर कसनुसे होतील. पण अंगभूत फोबिया नसलेली व्यक्ती पण "विमाने पडू शकतात" असा "बाह्य" स्वरूपाचा फोबिया - ज्यास पॅरानोईया असं कदाचित म्हणता येईल - तर अशी व्यक्ती सिम्युलेटरचा अनुभव मजेने घेऊ शकेल.

उपरोक्त वर्णन बरोबर आहे का ?

एव्हिओफोबिया हा क्लॉस्ट्रोफोबियाचा उपप्रकार सुद्धा असू शकेल असं वाटतं. म्हणजे असं की लिफ्टमधून जाण्याबद्दल फोबिया असणारे लोक हे कदाचित एव्हिओफोबिया असण्याच्या प्रवृत्ती दाखवणारे असू शकतात. थोडक्यात सांगायचं तर विमानं बंदिस्त असतात, ती प्रचंड वेगाने उडतात , ती पडू शकतात आणि त्यात प्रसंगी धक्के बसणं/कानाला दडे बसणं अशा शारिरीक स्वरूपाच्या गोष्टी घडतात या सार्‍याचं मिश्रण एअरोफोबियात होतं असं मला वाटतं.

अणि सर्वात शेवटी : बहुदा सप्टेंबर ११ किंवा गेल्या वर्षीच्या मलेशिअन फ्लाईट ३७० च्या प्रकारानंतर एव्हिओफोबियाच्या प्रमाणात - किमान तात्कालिक स्वरूपाची - वाढ होत असावी असा माझा अंदाज आहे.

मी Mon, 20/04/2015 - 18:32

ते फायनल टेकॉफ म्हणजे नशा(किक) आहे, कोकेन घेतल्यावर असं वाटत असणार असं पहिल्यांदा वाटलं होतं.

मिहिर Mon, 20/04/2015 - 18:37

लेख माहितीपूर्ण आहे, आवडला. प्रतिसादही माहितीपूर्ण.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/04/2015 - 18:43

लेख आवडला. एव्हिओफोबिया मुळात फार कमी असला तरीही आवडला. गविंचे विमान अपघातांचे लेख सुरुवातीला वाचायला लागल्यावर विमानप्रवासांची भीती वाटायची. आता 'कोडगेपणा' आलेला आहे. मात्र एयर पॉकेट्स आली की अजूनही भीती वाटते. टर्ब्युलंस आले की मी "आपण ट्रकमधून भारतातल्या खेड्यांत प्रवास करत आहोत" अशी कल्पना करून घेते; झोप आली असेल तर पुन्हा झोपही लागते.

अमेरिकेतल्या विमानप्रवासांची निराळीच भीती वाटते. गेल्या काही विमानप्रवासांमध्ये ठरवलेल्या प्रकारे आणि वेळी मी कधीही पोहोचले नाही. एकदा वादळामुळे भलत्याच छोट्या विमानतळावर आमचं विमान उतरवलं. रात्रीच्या जेवणाची वेळ. तीन विमानं तिथे उतरलेली. तिथे काहीतरी खायला होतं, पण विकायला माणूस नाही. मग रहा उपाशी. सगळेच लोक असे भुकेले, वैतागलेले. खिशात पैसे आहेत, समोर अन्न आहे पण खाता येत नाही. त्यामुळे आता विमानाने प्रवास करायचा असला की मी 'तहानलाडू-भूकलाडू' घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.

एकदा कधीतरी मुंबईहून दिल्लीला विमानाने निघाले होते. शेजारी बसलेला माणूस फार घाबरलेला वाटत होता. तो सगळ्यात शेवटी चढला, त्याने पट्टा बांधला आणि विमान जागचं हललं. याने हनुमानचालीसा म्हणायला सुरूवात केली. समोर सुरक्षितता-प्रात्यक्षिक सुरू असताना इकडे हनुमान चालीसा. त्याचं संपल्यावर त्याने आजूबाजूला बघितलं तर आमची नजरानजर झाली. मी हसून 'हाय' म्हटलं. भाऊ आणखी घाबरले आणि (बहुतेक दुसऱ्या कारणासाठी) हनुमानचालीसाचं दुसरं आवर्तन सुरू केलं.

अजो१२३ Mon, 20/04/2015 - 18:50

विमानप्रवास न आवडायचं एक कारण ऑफिसच्या कामाकरिता जो विमान प्रवास असतो त्याचं स्वरुप.
३.०० ए एम ला उठणे. ४.०० ए एम ला तयार होणे. ५.०० ए एम ला विमानतळावर पोहोचणे. ६.०० ए एमला उड्डाण. ९-१० ए एम ला दुसर्‍या शहरात पोचणे.
६.०० पी एम पर्यंत काम. ७.०० पी एम ला तिथल्या विमानतळावर. ८.०० पी एम ला उड्डाण. ११-१२ पी एम ला स्वशहरी विमानतळावर. १.०० ए एम दुसरे दिवशी घरी.

येताना, जातानाचा रस्त्यावरचा जाम नसल्यास ,दोन्ही वेळा हवेत जाम नसल्यास हे सग्ळं असं.
===============================================================================================
आणि या दरम्यान भेटणारे इतर सारे लोक फार फ्रेश दिसतात म्हणून अजूनच फ्रस्टेट होतं. असो. पण हे सगळं एव्हिओफोबियासाठी पुरेसं कारण आहे.

बॅटमॅन Mon, 20/04/2015 - 18:58

In reply to by अजो१२३

पण हे सगळं एव्हिओफोबियासाठी पुरेसं कारण आहे.

एव्हिओफोबियासाठी की avio-nausea साठी? वर्णन तरी avio-nausea चेच वाटते आहे म्हणून आपली विचारणा.

मिसळपाव Mon, 20/04/2015 - 21:01

तेव्हा विमानाचा कोणताही दरवाजा, इन्क्लुडिंग इमर्जन्सी एक्झिट्स, मर्त्य मानवाच्या शक्तीने अथवा बावळटपणाने फ्लाईट चालू असताना खुलणार नाहीत. काळजी नसावी.

ए भावसाहेब, तू एकदम मोठा रिलिफ दीला हां मला हे सांगून, मोठ्ठा रिलिफ.. पाणी प्यायला वगैरे ७७७ च्या मागच्या पँट्रीपाशी गेलं, की तिथे कधी लोकं रेस्टरूम रिकामी व्हायची प्रतिक्षा करत उभे असतात. आणि खरंच सांगतो, तेव्ह्ढ्यात त्यातला कोणी तिथेच असलेल्या दरवाजाच्या मोठ्या हँडलवर टेकेल, दार उघडेल झप्पकन् आणि त्या गणप्यापाठोपाठ बाहेर फेकला जाणारा दुसरा अभागी मी असेन म्हणून मी टरकून चटकन परत सीट वर येउन आधी बेल्ट लावून घेतो. :) आत्ता हसतोय ते सोडून दे !

अजून एक. तू टर्ब्युलन्सबद्दल, विमानाची कशी अनेक पट फोर्सेसमधे टिकायच्या क्षमतेची चाचणी केली जाते ते लिहिलयंस. पण मी कधी पाहिलंय की एव्हढं मोठ्ठं वाटणारं ७७७ विमान, अक्षरशः काड्याची पेटी खु़ळखुळवावी ना, त्याप्रमाणे हलत असतं. म्हणजे अगदि कुत्रं आंग झटकतं ना पाणी उडवायला अंगावरचं, तस्सं, त्याच फ्रीक्वेन्सीने. तर, विमानाची ईंडीविज्युअल सीट, अख्खा पंखा, एलेरॉन्स (आम्हाला पण थोड्या टर्म्स माहित्येत म्हंटलं!!), शेपटी, संपूर्ण ईंजिन असेंब्लि वगैरेची अशा प्रकारे चाचणी घेत असतील. पण संपूर्ण विमान सुद्धा? वेगळ्या शब्दात मुद्दा मांडायचा तर हे सगळे भाग एकमेकाना जोडल्यानंतरही व्यवस्थित रहातील याची चाचणी कशी करतात?

नंदन Tue, 21/04/2015 - 00:46

खास गविशैलीतला लेख आवडला.

सुरक्षित वाहनात मी बसलो आहे... आणि आता खाणंपिणं, मद्यबिद्य लवकरच समोर एका सुंदरीद्वारे पेष होणार आहे.

किंवा हा शेर आठवावा:
आएं कुछ अब्र, कुछ शराब आए।
उसके बाद आए, जो अज़ाब आए। :)

१. अब्र = ढग. विमानप्रवासात तसे हमखास येत असावेत.

'न'वी बाजू Tue, 21/04/2015 - 08:52

आमचा एव्हियो की एअरो की कसला तो फोबिया थोडा वेगळ्या प्रकारचा आहे.

बोले तो, अटलांटाहून समजा मुंबईला येण्यासाठी विमान पकडायचे आहे. विमानतळावर येईपर्यंत, ते चेकइन, सेक्युरिटी, वगैरे सोपस्कार होऊन पहिल्या विमानात बसेपर्यंत अत्यंत निश्चिंत असतो. नंतर मग यथावकाश विमान उडते, खाणे येते, अनेकदा पिणे येते, त्या सगळ्या गमतीजमतीत नाहीतर मग क्याटलक्लासातल्या त्या एवढुश्या जागेत समोरच्या रांगेतल्या पाशिंजराच्या गळ्यात छानपैकी तंगड्या टाकून झोपण्याच्या थ्रिलमध्ये अटलांटिकवरून उडण्याचे पुढचे सहासात तास अत्यंत छान जातात. युरोपची भूमी दिसू लागते. आणि मग पुढे प्यारिस, फ्रांकफुर्ट किंवा याम्ष्टर्ड्याम यांपैकी विमान बदलण्याचा जो कोठला पहिला थांबा असेल, तो यायला साधारणत: तास दीडतास शिल्लक असताना आमचा प्यानिक अट्याक सुरू होतो. आणि भारतातल्या सुट्टीची लांबी जितकी अधिक असेल, तिच्या वर्गाच्या प्रमाणात अट्याकची तीव्रता वाढते.

बोले तो, अटलांटाहून घराला कुलूप लावून निघताना घरातला ग्यास बंद केला होता का, ही शंका मनाला आख्ख्या प्रवासात सर्वप्रथम त्या क्षणी चाटते. शंका कसली, आपण नक्की तो ग्यास तसाच पेटता ठेवून आलेलो असणार, ही खात्री प्रत्येक उलटत्या क्षणानिशी बळावू लागते. बरे, समजा ग्यास खरोखरच चालू राहिलेला जरी असला, तरी त्याची आठवण व्हायला ही वेळ अत्यंत सोयिस्कर असते. कारण असे काही खरोखरच जरी होऊन ते लक्षात आले, तरी त्या वेळेस्तोवर त्याबद्दल काहीही करता येण्यासारखे नसते.

कम टू थिंक ऑफ इट, आजवर अटलांटाहून भारतात कित्येक वेळा आलो असेन, पण तेवढ्या वेळांत घरातला ग्यास एकदाही नीट बंद केल्याशिवाय आलेलो नाही. तसाच पेटता सोडण्याची तर बातच सोडा. पण तरीही दर वेळेस अटलांटिक ओलांडून युरोपात उतरण्यापूर्वी हा झटका हमखास येतोच येतो.

या असल्या फोबियासाठी काही इलाज आहे का हो तुमच्याकडे, गवि?

गवि Tue, 21/04/2015 - 09:51

In reply to by 'न'वी बाजू

या असल्या फोबियासाठी काही इलाज आहे का हो तुमच्याकडे, गवि?

कच्चे अन्न, कच्च्या भाज्या, कच्चे मांस खाणे. एखाददिवशी भाजायचेच झाल्यास बागेत शेकोटी लावून भाजणे.

गवि Tue, 21/04/2015 - 10:35

In reply to by नितिन थत्ते

फ्लाईटसाठी निघतानाच्या क्षणापर्यंत थोडेच शेकोटीवर शेकत बसणारेत? आणि राहिली पेटलेली तरी ती बागेत.. ऑपॉप विझेल कोळसे जळले की.

मन१ Tue, 21/04/2015 - 11:07

In reply to by अजो१२३

किंवा फार अधिक धास्ती वाटत असलेल्यांनी आपला ग्यास त्याच्या शिलिंडरसकट नेउन लॉकरमध्ये ठेवावा.
लॉकरचा बव्हंशी विमा उतरवलेला असतोच ब्यांकांनी. चिंता नसावी.
किंवा निघण्यापूर्वी एखाद्या आडदांड माणसाशी पुरेसे पंगे घ्यावेत. त्याला हाणामारीस उचकवावे.
त्याने धरुन मस्त लाथाबुक्क्यांनी तुडवला तर आख्ख्या प्रवासात होणार्‍या वेदनेसमोर ही चिंता खात्रीशीरपणे विस्मृतीत जाइल.
शिवाय ह्यांनी असे केल्यास अनेकानेक आंतरजाल सदस्यांना थोडा दिलासाही मिळेल.
त्यांच्या दुवा घेउन जाल.

गवि Tue, 21/04/2015 - 11:14

In reply to by ऋषिकेश

काय एकेक हायटेक आणि आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन्स आहेत.. वा..

आमची शेकोटी अगदीच अश्मयुगीन म्हणायची.. पण तोच उपाय सर्वात सुरक्षित आहे हे लक्षात ठेवा. जुनं ते सोनं.

मेघना भुस्कुटे Tue, 21/04/2015 - 12:12

विषयासाठी श्रेयाव्हेर: आदूबाळ यांचा हा प्रतिसाद

लेख आणि लेखाचा विषयही खास ’गवि’शैलीतला आहे. प्रतिसादही एकाचढ एक!

मला वेगळ्या फोबियाबद्दल विचारायचं आहे. मला सार्वजनिक वाहनातून जाताना ’आपल्याला आपला थांबा आल्याचं कळेल ना?’ / ’आपण आपला थांबा सोडून बावळटासारखे पुढे जाणार नाही ना?’ अशी भीती कायम वाटते. नवीन ठिकाणी जाताना, आणि जिथे वारंवार गेले आहे अशा ठिकाणी जातानाही. त्या भीतीपायी मी कित्येक वेळा एक थांबा अलीकडेच उतरले आहे.

अशी भीती कुणाला वाटते का?

अजो१२३ Tue, 21/04/2015 - 15:12

In reply to by मेघना भुस्कुटे

त्या भीतीपायी मी कित्येक वेळा एक थांबा अलीकडेच उतरले आहे.

मूळ प्रवासच एक थांबा पलिकडचा आखावा असे सुचवण्यात येत आहे.

अनु राव Tue, 21/04/2015 - 14:28

टेकऑफनंतर लगेच विमानाच्या इंजिनचा आवाज एकदम कमी झाला.. आणि त्याची ताकदही एकदम खचल्यासारखी भासली

ह्यानी मात्र नेह्मी पोटात गोळा येतो. विमान स्टॉल झाल्यासारखेच वाटते.

रेड बुल Tue, 21/04/2015 - 15:17

एव्हिओफोबिया..? सोडा आजकाल सगळ्याच गोष्टीची जरा जरा भिती वाटु लागालीय... वय झालयं, अन्य काही कारण नसावे.