दुखवट्याचा ठराव

ज्या बॅटिंगच्या जोरावर भारत टेस्ट क्रिकेटमधला अव्वल संघ बनला होता तिचा नुकताच मृत्यू झाला. तशी गेले बरेच महिने तिची तब्येत तोळामासाच होती. इंग्लंडच्या दौऱ्यावर एकाही इनिंगमध्ये तिला ३०० च्या पलिकडे जाता आलं नाही. त्यामुळे अर्थातच ०-४ असा मार खावा लागला. मध्ये वेस्ट इंडिज वगैरे लोकांबरोबर किंवा भारतातल्या भारतात खेळून तिला जरा बरा काळ आल्यासारखं वाटलं. प्रकृती सुधारते की काय अशी आशा वाटायला लागली.

पण ऑस्ट्रेलियाची हवा काही तिला मानवली नाही. इंग्लंडमध्ये ३०० गाठताना मारामार झाली तशी आता २०० चा पल्ला गाठतानाच तिची दमछाक झाली. आता तिची दशा बघवत नव्हती. पहिल्या दिवशी बॅटिंग असो की दुसऱ्या दिवशी, थोडीशी हळूहळू पुढे जाते न जाते तो फेफरं येऊन पडत होती. एखाद दोन तासांपुरता चेहऱ्यावर तजेला दिसायचा, डोळ्यात पूर्वीसारखी चमक दिसायची. आता उभारी धरून चालते की काय असा संशय येई येईपर्यंत कधी अर्धांगवायू, कधी पाठीत सणक तर कधी चक्कर येऊन पडायची.

आता सर्वांनीच तिला मृत घोषित केलेलं आहे. लोकं तिच्याविषयी नाही नाही ते बोलायला लागले आहेत.
'कॉमेंटेटर्सनी आता हिल्फेनहाउस टू लक्ष्मण, नो रन असं म्हणण्याऐवजी हिल्फेनहाउस टू लक्ष्मण, नो विकेट असं म्हणायला हवं.'
'भारतीय बॅट्समननी म्युच्युअल फंडांप्रमाणे डिस्क्लेमर द्यायला हवा पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी फ्यूचर परफॉर्मन्स'

शेवटी काय, रोज मरे त्याला कोण रडे. अति झालं आणि हसू आलं म्हणतात त्यातलीच ही गत.

तेव्हा आपण सगळे जण दोन मिनिटं शांतता पाळून तिला श्रद्धांजली अर्पण करूया, असा प्रस्ताव मी मांडतो.
(अर्थातच सचिन तेंडुलकरला यात धरलेलं नाही. इतर सगळे पंधरा वीस सरासरी वर ढासळत असताना साहेबांनी अठ्ठेचाळीसवर किल्ल्याचा एक बुरुज समर्थपणे लढवला आहे)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

आहे. दोन मिनिटे कळफलक न बडवता मूक श्रद्धांजली वाहिली गेली आहे.

अवांतर - स्पोर्टिंग टाईम्स ह्या ब्रिटिश वृत्तपत्राने १३० वर्षांपूर्वी घातलेल्या श्राद्धाची प्रत. दवणीय भाषेत बोलायचे तर ह्याच राखेतून अ‍ॅशेसच्या परंपरेच्या फिनिक्सने झेप घेतली Smile -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंदनच्या प्रतिसादाला मला विनोदी आणि माहितीपूर्ण अशा दोन श्रेण्या द्यायचा आहेत!!

नुस्तं दोन मिनिटच काय, जोपर्यंत या राखेतून भारतीय क्रिकेटचा फिनिक्स झेप घेत नाही तोवर क्रिकेट पाहणार नाही असा, "राम नाम सत्य है|" च्या गजरात, निश्चयही केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Tests are long, ODI's fleeting,
And our batsmen, stout and brave,
Still, like puzzled chumps, are beating
Funeral marches to the grave.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Beds are lovely, soft and deep;
and I have bones to massage deep.
why make runs, before I sleep?
असं बहुतेक बॅट्समन म्हणत असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गावस्कर आणि कपिलदेव रिटायर झाले तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या नावाने आंघोळ केली त्यामुळे आता २ मिनिटे शांतता वगैरे अजिबात पाळणार नाही. पाहिजे तर एक मेणबत्ती लावीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मरणशय्येवर पडण्याआधी २०११ च्या सुरुवातीला घराच्या अंगणात स्टरॉईड्स घेऊन बागडणार्‍या रुग्णाची लक्षणं आम्ही तेव्हाच ओळखली होती त्यामुळे आमची आंघोळ तेव्हाच झाली आहे.
बाकी 'देव' पावला म्हणजे देव एक चतुर्थांश उरला असा नवा अर्थ जारी करावा असे आम्ही आवाहन करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile आणि +१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी हा दुखवट्याचा ठराव मांडला तेव्हा तिसऱ्या टेस्ट मॅचची दुसरी इनिंग सुरू झाली नव्हती. तीतही ८८ ला ४ विकेट बघून त्यावर आणखीनच शिक्कामोर्तब झालं. या ऑस्ट्रेलियन बोलर्सना सांगायला हवं, की सोडून द्या राव. मरे हुए को क्या मारना?

सेहवाग, गंभीर, द्रविड, लक्ष्मण, कोहली आणि धोनी या सहा बॅट्समनच्या मिळून गेल्या तेहतीस पूर्ण इनिंगमध्ये ६७५ रन झाल्या. प्रत्येकाने आपली सरासरी राखली असती तर किमान १५०० व्हायला हव्या होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला फक्त तेँडुलकरशी मतलब आहे
त्याच्यासाठीच मी केवळ क्रिकेट बघते
तेँडुलकर खेळला बस पैसे व वेळ वसूल होतात
ढोणी सेहवाग वैग्रे लोकांशी मला कर्तव्य नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

ऐसाईच बोल्ताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हे, हे, तुम्हां लोकांचं टीम स्पिरीट! जाई आणि रमताराम सारख्या लोकांमुळेच भारत कधी पुढे जात नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्पिरीटचा सप्लाय इकडे पाठवून द्या, तेवढीच तुम्हाला मदत. क्काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तुम्हां लोकांचं स्पिरीट आणि तुम्हां लोकांचा सप्लाय. मी काय करणार यात?

असो. महाशतक ८७ धावांनी हुकलं म्हणे! १३ हा माझा व्यक्तिगत आवडता आकडा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ नंदन : छान दुवा.
@ पैसा : ब्यॅड कपिल देव
@ गुर्जी : आमच्याकडे दुखवटा शांतता पाळून नव्हे तर जोरजोरात रडून व्यक्त करतात. तुम्हांस प्रोफेशनल रडणारी हवी असल्यास सांगावा धाडावा.. माफक दरात सोय करणेत येइल :bigsmile:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुःख बुडवण्याच्या सोयीचे काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जायचं नाही तिकडची वाट कशाला पुसताय. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

जायचं नाहीये. न्यायचं आहे. पत्ता असावा अशावेळी. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"भिंत" द्रविडचा एक नवाच विक्रम आता पोतडीतून बाहेर आला. गेल्या दहा डावापैकी आठ डावात 'त्रिफळाचित' झाला आहे पठ्ठ्या. शिवाय अ‍ॅलन बॉर्डरचा आतापर्यंतचा ५३ वेळा 'त्रिफळाचित' झालेला फलंदाज हा 'विक्रम' राहुलबाबाने त्रिफळ्याची ५४ नंबरी खेळी करून मागे टाकला.

[समाधानाची बाब म्हणजे कुठेतरी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहोत.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदर व्यक्ती (ब्याटिंग) मेली आहे हे मान्य नसल्याने दुखवटा पाळला नाही.

प्रत्येकच संघ आपल्या घरात दादा असतो. कुठच्यातरी काळात तो दुसर्‍याच्या घरातही दादागिरी करू शकतो. पण बहुतेक काळात तो स्वतःच्या घरातच दादा असतो.

भारतातल्या फुटणार्‍या आणि स्पिनला साथ देणार्‍या खेळपट्ट्या या ऑस्ट्रेलियातल्या किंवा दक्षिण आफ्रिकेतल्या छातीपर्यंत चेंडू उसळणार्‍या खेळपट्ट्यांपेक्षा कमी स्पोर्टिंग असतात हे मान्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसं नाही, घरी वाघ आणि बाहेर शेळी असा आक्षेप नसून एकेकाळी वाघ आणि आता शेळी अशी तक्रार आहे. जवळपास हीच ब्याटिंग २००३ मध्ये याच खेळपट्ट्यांवर खेळत होती. सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण होतेच. (कोहलीच्या ऐवजी गांगुली होता, आणि गंभीरच्या ऐवजी आकाश चोप्रा होता.) तेव्हा यांच्यातल्या एकेकट्याने डबल सेंच्युऱ्या हाणल्या होत्या. तीनतीनशेच्या पार्टनरशिप्स झाल्या होत्या महाराजा... बरं त्यावेळची ऑस्ट्रेलियन बोलिंग काही कमीची नव्हती. मक्ग्रा, शेन वॉर्न, ब्रेट ली वगैरे दिग्गज होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण २०११ हे वर्ष फार वाईट गेलं. भीमण्णा गेले, देवसाब गेले, जगजीतसिंगजी गेले आणि आता भारतीय क्रिकेटनेही शेवटचा श्वास घेतला. या वाईटपणाचा हँगओव्हर २०१२ मध्येही जाता जात नाही. लिंबूपाणी घेतलं, काळी कॉफी घेतली, अ‍ॅस्पिरीनचा गोळ्या तर काल रात्रीच घेतल्या होत्या, पण अशक्तपणा, थकवा, तोंडाला कोरड, डोळ्यांवर झापड आणि डोक्यात 'वाँव वाँव...' असे आवाज...
तेंडुलकरची शंभरावी शंभरी टीव्हीवर बघावी, भारतीय संघाने टेस्ट सीरीज ड्रॉ करावी, वन डे सीरीज तीन-दोन अशी जिंकावी ... कायकाय स्वप्ने होती. स्वप्ने बघायचीच तर कद्रूपणा कशाला? जमीनीवर झोपून अडचण का? वचने किं दरिद्रता?
राजाभाऊ, सगळीच स्वप्ने काही खरी होत नाहीत. जे झाले त्याला पिरगाळून फेकून द्या. उद्याचा सूर्य नवा असेल. आणखी थोडी कॉफी घेता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

>>तेंडुलकरची शंभरावी शंभरी टीव्हीवर बघावी,

तेंडुलकरच्या आधी पेट्रोलची किंमत शंभरचा आकडा पार करील असं भविष्य आज एका जागतिक दर्जाच्या ज्योतिषाकडून ऐकलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा ! असेच होणार बहुतेक Smile

अमोल केळकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला इथे भेटा

स्वप्ने बघायचीच तर कद्रूपणा कशाला?

Smile अगदी असेच काहिसे पुलंचे वाक्य यथार्थ वाटल्यानेच स्वाक्षरीत लावले आहे

बाकी मुळ शोकप्रस्तावाला अनुमोदन नाही. होतं असं कधीकधी नेहमी त्याला काय करणार.. धावांचे फेरे घेता येत नसले तरी दैवाचे फेरे का कुणला चुकलेत.. नशीबच चालत नाही म्हटल्यावर ब्याट चालणारच कशी!
त्या कांगारुंनी इतकं मोहरुन जायला नको. आमच्याकडला पौषात म्याच ठेवलीत म्हणून! .भारतात या म्हणावं.. मग बघतो Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्रिकेट म्हणजे काय ते नक्की माहित नाही म्हणून काहीच बोलता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या देशात क्रिकेट आणि राजकारण या दोन विषयांवर बोलायला कोणत्याही क्वालिफिकेशनची गरज नसते असे कणेकरबाबांनी सांगितले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

यावेळी काय दिवे लावताहेत ते बघतो आहे. त्यांनी एक तीनशेनव्वदची पार्टनरशिप केली. आपल्या सगळ्यांच्या मिळून तेवढ्या रन्स झाल्या तरी नशीब.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरेच श्रद्धांजली द्यायला हवी आपल्या क्रिकेट संघाला.

आता सगळी मदार सचिनवर आहे

आजही ऑस्ट्रेलियाने ६०० धावांचा टप्पा ओलांडून डाव घोषित केला आहे.
त्यांना आपल्या मेलेल्या संघाच्या क्षमतेचा एव्हाना पूर्ण अंदाज आलेला दिसतो आहे.
त्याचीच परिणती म्हणून
भारतीय संघाने ७.२ ओव्हर्सच्या आतच ३१ धावांत २ गडी गमावले
सेहवाग १८ बॉल १८ धावा
द्रविड पुन्हा एकदा बोल्ड बाय हिल्फेन्हास

भारतीय क्रिकेटला माझीपण श्रद्धांजली... :^&^

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्रविड पुन्हा एकदा बोल्ड बाय हिल्फेन्हास

अरे तो आज कसा आऊट झाला रे.. किती दुर्दैवी असावं?! पण एकूण मेंटॅलिटीतच प्रॉब्लेम आहे! लेगस्टंपवरची हाफव्हॉली डिफेण्ड करायला जाऊन यॉर्कर करून घेतला राहुलनं पर्थ टेस्ट मध्ये! मिडविकेट बाऊंडरीशिवाय दुसर्‍या कोणत्याही जागी दिसण्याची लायकी नव्हती त्या डिलिव्हरीची! 'कोषगते द्विरेफे' झालेलं आहे सगळ्यांचंच.
आपापल्या घरी जो तो शेर असतो वगैरे सगळं खरंय पण म्हणून व्हिजिटिंग टीमनं शेळी व्हायलाच हवं का? पॅटिन्सन म्हणाला ते काही खोटं नाही, आपले बॅट्समन त्यांच्या बोलर्सना घाबरल्यासारखेच वाटतात. पुन्हा त्या कोहलीचं वॉर्नरला "It will be altogether a different story when you come to India!" असं म्हणणं म्हणजे कहरच आहे!

मी तसा प्रचंड आशावादी आहे, डाय-हार्ड सपोर्टर म्हणा हवंतर. पण खरंच आता पुरे म्हणायची पाळी आली आहे.

जाता जाता : मरणोन्मुख झालेल्या रिकी पॉण्टिंगला आपण पुनरुज्जीवित केलं आहे. तो टेस्ट्समध्ये चौदा हजारी (अन कदाचित पंधराही) मनसबदार होणार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता पौष संपल्याने ही म्याच डॉ होण्या इतपत चांगले ग्रह फिरले असतील का? का सागरने जी शुक्र-गुरु-चंद्र युती घडवून आणली आहे त्यामुळे पुन्हा सगळं फिस्कटेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ,

उद्या २६ जानेवारी आहे, तेव्हा अ‍ॅडलिडच्या खेळपट्टीवर "शुक्र आणि चंद्राची युती" "गुरु"च्या शुभदृष्टीमुळे सचिनचे महाशतक बघावयास मिळणार असे दिसते आहे. Smile

सचिन ने फक्त पहिला १ तास हा युतीला "गुरु" चे आशिर्वाद मिळेपर्यंत टिकून राहिले पाहिजे. ते जमले तर महाशतक नक्की Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाकीतांनासुद्धा "कंडिशन्स अप्लाय"? फाऊल फाऊल! एक काय ते सांगा, हो की नाही??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी मनोदेवता सांगते आहे की होय, उद्या महाशतक बघायला मिळणार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुझ्या मनोदेवते वगैरे पेक्षा युतीच पावरफुल ठरली की नाही? ३_१४ ताईंना (त्या अश्या फेरफारीत लै पावरफुल हैत असे ऐकुन आहे) थोडे ग्रह पुढे मागे करायची इनंती करतो आहे. निदान ड्रॉ तरी,..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही नाही. मी या कामांत अजिबात हुशार नाही. घाटपांडे काका अशी सेटींग करून देतात अशी शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑस्ट्रेलिया डे आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून तेरावा घातला नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातल्या त्यात एक गडी चांगला खेळत होता तोही आउट झाला. पण काळजी करण्याचं कारण नाही,
Fall of wickets 1-26 (Warner, 6.5 ov), 2-31 (Marsh, 9.6 ov), 3-84 (Cowan, 25.5 ov)
Fall of wickets 1-26 (Sehwag, 5.1 ov), 2-31 (Dravid, 6.6 ov), 3-78 (Tendulkar, 31.2 ov)

आपलंही हुबेहुब त्यांच्यासारखंच चाललेलं आहे, तेव्हा आपल्याही ६०० रन्स होतील...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे लिहून झालं आणि गंभीर आउट झाला. हे काहीतरी वेगळंच चाललं आहे. चौथ्या विकेटसाठी साडेतीनशे - चारशेची पार्टनरशिप व्हायला हवी होती....

काहीतरी घोटाळा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळजी नको. आपली दुसरी इनिंग आजच सुरु होईल, तेव्हा पुन्हा पडताळून पाहता येईल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३ विकेटी त्यांच्याच लायनीवर गेल्यानंतर चौथीपासून वेगळी लाईन पकडण्याची शक्यता फारच वाढते नै! काय गुर्जी, सांख्यिकी मी तुम्हाला शिकवायची का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतीय बॅट्समननी म्युच्युअल फंडांप्रमाणे डिस्क्लेमर द्यायला हवा पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी फ्यूचर परफॉर्मन्स -- हे मस्तच Smile

अमोल केळकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला इथे भेटा

आयला.... क्रिकेट पाहता अजून?
मी तर सोडलं जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हाच :bigsmile:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

१९८३ मधे क्रिकेट हे काय असतं हे समजण्याएवढी मी मोठी नव्हते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यांचे ग्रह उलट सुलट फिरले बहुतेक. २०११ अजून यांच्याकडे उगवलं नाही की काय. का हिरव्या लोकांच्या देशात गेल्यावर हाताने खेळण्याच्या 'फुट'बॉलच्या फ्यान होऊन 'हुं क्रिकेट इज सो ब्रिटिश, यू नो' असे तुच्छतादर्शक उद्गार काढून तिकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

१९८३ मधे क्रिकेट हे काय असतं हे समजण्याएवढी मी मोठी नव्हते.

२०११ मध्ये देखील कितपत आपण कितपत मोठ्या होता याबद्दलही शंकाच आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रमतारामः ई, ते हाताने खेळायचं जे काही प्रकरण आहे ते मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा आपली देशी कुस्ती किंवा भावंडांशी मारामारीच काय वाईट आहेत?

बाकी गुर्जींच्या व्यक्तिगत वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्या गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुतक संपले का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Sad आमच्याकडॅ ४० दिवस आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिंकलो एकदाचे :beer: :beer: :party:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिनचे शतकाबद्दल मनपूर्वक अभिनंदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.