निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?

निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी.

कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती?
किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले.
आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा.
कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय?

कोकणातील वाढत्या बेरोजगारी मागील कारणीमामांसा जाणून घेण्यास धागा काढण्यात आला आहे. ऐकीव माहिती मी वरती लिहीलेली आहेच. आपलेही मत जाणून घेण्यास उत्सुक.
चित्र यापेक्षा वेगळे असल्यास तेही स्पष्ट करा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

कोकणात बेरोजगारी आहे ह्याची आकडेवारी आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखाचा मतितार्थ
'माझ्या डोक्यात एक काहीतरी कल्पना आली. ती बरोबर आहे की नाही हे न तपासता मी एक दाण्णकन प्रश्न विचारणारा धागा टाकला. मी बहुधा त्या भागात एकदा बोटीने गेलो होतो तेव्हाचं निरीक्षण म्हणजे बोटीवर परप्रांतीय दिसले - तर त्याचा मासेमारीशी काहीतरी संबंध असणार, असावा असं म्हणून अजून एक वाक्य लिहिलं. कोकणात आंबे फणस असतात असं ऐकून असल्यामुळे कोकणी लोक जे उद्योग करतात त्यात या सगळ्या गोष्टी कुठेतरी येत असाव्यात... सगळंच ऐकीव आहे, जाणून घेण्याचीही इच्छा आहे. पण गूगल करण्याचे कष्ट कोण घेणार? तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी मिळून काम करून लिहा काहीतरी आणि निबंध लिहून मला ज्ञान द्या.'

राकुंचे किमान तीनचार तरी फुसके बार असतात. इथे आख्खा धागा दारू, वात, आणि वेष्टनाचा कागदही नसलेल्या लवंगी माळेतल्या फटाक्याप्रमाणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश घासकडवींशी सहमत. केरळ तर कोकणापेक्षा जास्त निसर्गरम्य आहे. पुरावा इथे, आणि इथे. मग केरळातले लोक आखातात नोकर्‍यांसाठी का जातात. केरळात नोकर्‍या का नैय्येत ? निसर्गरम्य असणं हे बेकारी कमी होण्यासाठी आवश्यकही नाही व पुरेसे ही नाही.

---

सुरवंट, तुमचे काही मत, काही डेटा द्याल की नाही ? काही युक्तीवाद कराल की नाही ?

---

( आता लगेच - पाश्चात्य मॅगेझिन ने केरळ ला टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरवलं म्हंजे लगेच टॉप झालं का ? दरवेळी आपल्याला पाश्चात्यांची एंडॉर्समेंट का लागते ? - असा प्रश्न विचारू नका म्हंजे मिळवली. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( आता लगेच - पाश्चात्य मॅगेझिन ने केरळ ला टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरवलं म्हंजे लगेच टॉप झालं का ? दरवेळी आपल्याला पाश्चात्यांची एंडॉर्समेंट का लागते ? - असा प्रश्न विचारू नका म्हंजे मिळवली. )

का बरे? तसा विकल्प त्यांजजवळ नसावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का बरे? तसा विकल्प त्यांजजवळ नसावा काय?

विकल्प आहेच व असतोच. व अभिव्यक्तीच्या अंतर्गत तो येतोच. परंतु तो विकल्प का निवडावा याचा निर्णय करायचा असेल तर "कंपेअर्ड टू व्हॉट" हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. त्याला उत्तर आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले.
एक कोंकणस्थ असून आणि वेळोवेळी कोंकणात जाऊनही मला कधी बेरोजगारी दिसली नाही.
उलट आमच्या बागेत काही काम करवून घ्यायचे असेल तर दोनशे अडीचशे रोज देऊनही हल्ली गडी/बाया माणसे मिळत नाहीत.

निसर्गरम्य असूनही कोंकणी माणूस पुण्यामुंबईला का धावतो हा प्रश्न म्हणजे भारतात रोजगार उपलब्ध असल्यावरही लोक अमेरिका/ ऑस्ट्रेलियाला का उडतात म्हणण्यासारखे आहे.
कोंकण म्हातार्‍यांचा देश झालाय म्हणताना आजकाल कित्येक उच्चभ्रू कॉलन्या मुले परदेशी गेल्याने म्हातार्‍यांच्या कॉलन्या झाल्यात म्हणण्यासारखे आहे.
Smile

यावर्षी आमच्या वर्गाची २५ वी रियुनियन होती. किमान ८० टक्के मुले अजूनही रत्नागिरीतच रहातायत आमच्य वर्गातली.
त्यातल्या प्रत्येकालाच चांगली नोकरी/ धंदा /घर /गाड्या सगळेच आहे.
अगदी दहावीत पन्नास टक्के मिळालेली कोंकणातल्या खेड्यात रहाणारी मुलेही अचाट प्रगती करून आहेत.

परप्रांतीय कुठे नसतात. आता मी जिथे रहाते तिथे मी सुद्धा परप्रांतीयच आहे.
'संधीच्या शोधात मायग्रेट होणे म्हणजे मूळगावी रोजगार उपलब्ध नसणे ' असेच नाही.
एक काळ असा होता जेव्हा 'सरकारी नोकरी' म्हणजेच 'खर रोजगार' आणि बाकी सगळे 'बेरोजगार ' असे समजले जायचे.
पण कोंकणात सध्या तशी परिस्थिती नाही.
बर्‍याच आणि विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी सध्या उपलब्ध आहेत.
ज्यांनी त्या संधी साधल्या त्यांना रोजगाराची कमतरता कधीच पडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावर्षी आमच्या वर्गाची २५ वी रियुनियन होती. किमान ८० टक्के मुले अजूनही रत्नागिरीतच रहातायत आमच्य वर्गातली.
त्यातल्या प्रत्येकालाच चांगली नोकरी/ धंदा /घर /गाड्या सगळेच आहे.

हेच म्हणायला आलो होतो. माझ्या पाहण्यातही ८०-८५% असाच आकडा आहे तिथेच स्थाईक असणार्यांचा. उलट देशावरच्या शहरातले ९०% सहविद्यार्थी शहर सोडून गेलेत.

९१ ची बॅच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो!
एक्क्याण्णवाचीच. पण सातवीची!
मी तुमच्यापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे.
Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला जी माहिती मिळाली त्यावरून सांगतो. अर्थात रायगड जिल्हयातले म्हणजे मुंबईला जवळ आस्लेले व गोव्याच्या जवळचे कोकण इथल्या परिस्थितीत फरक आहे.
आज अनेक ठिकाणी आंबे, नारळ उतरवायला स्थानिक लेबर मिळत नाही. मासेमारीचे तसेच. कष्टाची कामे करण्याचा कंटाळा. ही परिस्थिती उर्वरित राज्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे रोजगार नाहीत असे नाहीत, पण आताच्या युवकांना हवे त्या क्षेत्रातले नाहीत. हा भूक आहे, पण भाकरीची नाही पुरणपोळीची(च) आहे, असा थोडासा प्रकार आहे. त्यामुळे केरळी व बिहारी मजूर कोकणात दिसतात. अजून उर्वरीत राज्यात शेतीच्या कामासाठी दिसत नाहीत. पण हेच चालू राहिले तर तेही दिसेल. तसे थेट केरळमध्येही बिहारी मजूर पोहोचलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज अनेक ठिकाणी आंबे, नारळ उतरवायला स्थानिक लेबर मिळत नाही. मासेमारीचे तसेच. कष्टाची कामे करण्याचा कंटाळा. ही परिस्थिती उर्वरित राज्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे रोजगार नाहीत असे नाहीत, पण आताच्या युवकांना हवे त्या क्षेत्रातले नाहीत. हा भूक आहे, पण भाकरीची नाही पुरणपोळीची(च) आहे, असा थोडासा प्रकार आहे.

जर बिहारी मजूर तिथे जोमाने पोहोचले असतील तर त्याचा अर्थ केवळ हाच नाही की कोकणातल्या लोकांना कष्टाचा कंटाळा आहे. त्याचा अर्थ असाही असू शकतो की बिहारी मजूर (कोकणातल्या मजुरांच्या तुलनेत) अत्यंत कमी पगारावर काम करायला तयार आहेत. A glut of labor supply from Bihar/UP ... has crowded the locals out of the labor market to a great extent (if not entirely). कोकणातल्या लोकांना कष्टाचा कंटाळा आहे असं म्हणणं धाडसाचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर बिहारी मजूर तिथे जोमाने पोहोचले असतील तर त्याचा अर्थ केवळ हाच नाही की कोकणातल्या लोकांना कष्टाचा कंटाळा आहे. त्याचा अर्थ असाही असू शकतो की बिहारी मजूर (कोकणातल्या मजुरांच्या तुलनेत) अत्यंत कमी पगारावर काम करायला तयार आहेत

हो नाहीतर, हाम्रिकेत भारतीय घुसलेत म्हणजे हाम्रिकी लोक आळशी आहेत असा अर्थ निघेल.

पण राकु कोणताही अर्थ काढु शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो नाहीतर, हाम्रिकेत भारतीय घुसलेत म्हणजे हाम्रिकी लोक आळशी आहेत असा अर्थ निघेल.

मी नेमकं हेच लिहिणार होतो.

पण म्हंटलं त्याच्यावर स्वार होऊन लोक मंगळावर पोहोचायचे. मंगलयान प्रोजेक्ट अत्यंत स्वस्तात ..... जाऊदे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोकणातला माणूस स्वत:चा रोजगार जात असताना दुस-याला प्रवेश मिळू देत नाही. त्यामुळे ते स्वत:ची परंपरागत कामे करायला तयार नाहीत, म्हणूनच त्यांना तेथे प्रवेश अाहे हे लक्षात घ्यायला हवे. केरळमध्ये पोहोचलेले बिहारीही त्याचाच प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केरळ हे १००% साक्षर आहे. केरळमध्ये युनियन ची समस्या आहे असे ऐकलेले. या दोन्ही वाक्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केरळ हे १००% साक्षर आहे. केरळमध्ये युनियन ची समस्या आहे असे ऐकलेले. या दोन्ही वाक्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

* 'पगारी नोकरी असलेल्यांचे प्रमाण' हा एखाद्या प्रदेशातील रोजगारी मोजण्याच्या निकषांपैकी एक निकष धरायला काही हरकत नसावी. त्या दृष्टीने ही आकडेवारी पहा:
भारतातल्या ग्रामीण भागात (सरासरी) दहा टक्क्यांहून कमी घरांत पगारी नोकरदार मंडळी आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात हे प्रमाण १२ टक्क्यांहून किंचित कमी आहे. रायगड जिल्ह्याची आकडेवारी पाहिली, तर हे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या अधिक आहे. या जिल्ह्यातील (ग्रामीण भागात) घरात एक तरी पगारी नोकरदार असलेल्या घरांची टक्केवारी ३२ टक्क्यांहूनही अधिक आहे. महाराष्ट्रातला कुठलाच जिल्हा याच्या जवळपास नाही. दुसरी नंबर पुण्याचा आहे. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही हे प्रमाण अनुक्रमे २५, १४, १५ टक्के (म्हणजे राज्याच्या सरासरीहून अधिक) आहे.
अर्थात यावरून त्या प्रदेशातल्या बेरोजगारीची पूर्ण कल्पना येत नाही, तरी थोडाफार अंदाज करता येईल. शिवाय ही फक्त ग्रामीण भागातली आकडेवारी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोंकणातले लोक सहसा सरकारी कर्मचार्‍यांना खरी माहिती देतात असाही अनुभव आहे.
आता उदाहरणार्थ माझ्या सध्याच्या गावात गाडी/बंगले असलेल्या लोकांकडेही पर्मनंट नोकरी नाही किंवा जमीन नाही म्हणून बीपीएल/अंत्योदय कार्ड आहे.
याउलट कोंकणात अगदी 'टेंपरवारी' नोकरी असली तरी 'चांगली नोकरी आहे' असे सांगतात.
लपवाछपवी करत नाहीत असे एक निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोकणी लोक आपल्या घराच्या बाहेरचा परीसर आणि एकुणातच गाव स्वच्छ ठेवतात असे निरीक्षण आहे.
तसेच उगाच गावभर कुचाळक्या करत हिंडत नाहीत. त्यामुळे उगाच कुठे गर्दी वगैरे दिसत नाही. मस्त शांत वाटते.

अर्धी कोकणस्थ अनु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, नोकरी हा (बे)रोजगारी मापण्याचा एकमेव निकष नाही, हे मी म्हटलेच आहे. मी लिंकेत दिलेल्या वेबसाइटवर exclusion चे चौदा निकष आहेत. त्यात इन्कम टॅक्स भरणे, सरकारी नोकरी , पक्के घर याचबरोबर मालकीची motorized fishing boat असणे, घरात फ्रीज असणे, ट्रॅक्टर असणे असेही निकष आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0