धुम्रपान चित्रपटजगत आणि समाजविघातक दांभिकपणा.

"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत".

ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे.
कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .

वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता

आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की.

यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापरतात, पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला .

आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत
व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही.

धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउदे.

अवांतर:
१. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा
२. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

चित्रपटात हिंसाचार दाखवणे हे सार्वजनिक हिंसाचारास प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. कारण चित्रपटात नायक हिंसाचार करताना बघणे हे अनेकांना डॅशिंग, अनुकरणीय वाटते. हे ठीक वाटतंय का ?

---

हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे.

आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात.

यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापरतात, पण तोही दांभिकपणा आहे.

दोन तिन वर्षांपूर्वी अशीच एक कोर्ट केस झाली होती. बहुतेक मलेशियामधे. व त्याबद्दलचे कव्हरेज वॉ. पो. मधे आले होते. त्यात त्यांनी आकडेवारे दिली होती की सिगरेट च्या पाकिटांवर कॅन्सरग्रस्तांची भयप्रद चित्रे लावण्याचा सिगरेट विकत घेण्याच्या वृत्तीवर परिणाम होऊन सिगरेट चे कन्झम्प्शन कमी होते. तेव्हा सगळ्याच बाजू दांभिक आहेत हे तुमचे मत तितकेसे पटणारे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते

सिगारेट फुंकणारा नायक

पण व्हाईसेस असले तर काय हरकत आहे. काहींना आवडतात Wink दर वेळेला सोज्ज्वळच नायक कशाला? आणि मुख्य म्हणजे जगात जे आहे त्याचे यथार्थ प्रतिबिंब कलेत पडले तर बिघडते कोठे?

तोही दांभिकपणा आहे.

उलट लोक सर्रास सिगरेट ओढत असतात हे लपवून ठेवणे हा दांभिकपणा आहे.

१- सिगरेट पिणे , न पिणे याबद्दल माझे काहीही मत नाही. ना मला ते ग्लॅमरस वाटतं ना भयंकर.
२- याचा अर्थ सिगरेट फुंकणारे सोज्ज्वळ नसतात किंवा न फुंकणारे असतात वगैरे काहीही म्हणायचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही म्हणतो तेच सौंदर्य किंवा आम्ही दाखवतो तीच कला (आणि तुमच्या त्या किळसवाणी गोष्टी) या विधानांना माझा ठाम विरोध आहे. अगदी प्रख्यात कलाकारांनी म्हटलं तरीही त्याला विरोधच करेन. ज्यांना जे दाखवायचं आहे ते दाखवू द्यावं. कोणाला भिकार मूल्यं असणारे सिनेमे बनवायचे असतील तर ते बनवू द्यावेत, कलाकार किंवा स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्या कोणाही सोम्यागोम्यांच्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर टाच आणू नये. प्रत्यक्षात धूम्रपानामुळे होणारी आरोग्यहानी टाळता येत नाही म्हणून कला (किंवा कलेच्या नावाखाली जे काही चालतं) त्यावर बंधनं आणून काहीही मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चर्चा भरकटवु द्यायची नाही आहे पण ह्याच सो कॉल्ड सिगारेट कंपन्यांनी क्रिकेट विश्वचषक व त्या लेवलच्या स्पर्धा स्पॉनर्सही केलेल्या आहेत. बेन्सेन अ‍ॅण्ड हेजेस, विल्स,रॉथमन्स व आय.टी.सी. बहुदा आय.टी.सी ने वर्ल्ड कप प्रायोजित केला होता. ह्या वेळी कुणी अशी बोंब मारली नाही. ना खेळाडुंनी ना सरकारनी ना प्रेक्षकांनी. थोडक्यात दांभिकपण सगळीकडे ठासुन भरलेला आहे. सो जस्ट चिल्ल. आणि फिक्र को धुए मे उडाते चलो....

रच्याकने बहुदा बनवाबनवी मध्ये सुप्रिया जेव्हा तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचे वर्णन करते तेव्हा एका हातात तो लायटरशी खेळत माझ्या दिशेने येईल असे काहीसे बोलत. म्हणजे प्रत्यक्ष म्हाग्रुंनाही सिगारेट पिण्याबद्दल काही आक्षेप नव्हता तिथे तुम्ही आम्ही कोण? (ह. घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दोनतीन दशकांत भारतात सरकारने अनेक प्रयत्न केलेले आहेत.
१. पूर्वी सिनेमाच्या आधी रीतसर सिगरेटच्या जाहिराती दाखवत असत. आता तशा जाहिरातींवर तर बंदी आहेच. उलट त्रास होईल इतक्या प्रमाणात धूम्रपानविरोधी संदेश असतात.
२. पूर्वी पाकिटावर संविधानिक चेतना म्हणून एक छोटंसं वाक्य छापलेलं असायचं. आता त्याऐवजी फुप्फुस कसं बिघडतं याचं ठळक चित्र असतं.
३. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसांमध्ये, कुठेही सिगरेट ओढण्यावर कायद्याने बंदी नव्हती. आता ती आहे.

या सगळ्याला दांभिकपणा म्हणवत नाही. मी त्यांना प्रामाणिक प्रयत्न म्हणेन. ते पुरेसे आहेत का? वर्ल्ड बॅंकच्या माहितीनुसार २००० साली भारतात १५ वर्षांवरील पुरुषांमध्ये स्मोकर्सचं प्रमाण ३६ टक्के होतं. २०१२ साली ते २३ टक्क्यांवर आलेलं आहे. ही बंधनं घातली नसती तर एव्हाना स्मोकर्सची संख्या प्रचंड वाढली असती. इंडोनेशियात असली बंधनं अत्यंत कमी होती त्यामुळे हे प्रमाण ५६ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांवर गेलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिगरेट ओढण्याचे प्रमाण कमी होणे यात लोकशिक्षणाबरोबरच एअरकंडिशन्ड ऑफिसे असण्याचाही वाटा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या मते दांभिकपणा फक्त तोच की ज्यामधे सरकार सिगरेट कंपन्यांना पाकिटावर भयप्रद चित्रं लावण्याची जबरदस्ती करते. आणि दुसर्‍या बाजूला हाच नियम वीडी उत्पादकांना लावते पण विडीकामगारांना लावत नाही. उलट विडीकामगाराचे "प्रश्न" ते विडीकामगार उपेक्षित, तळागाळातल्यांचे प्रश्न म्हणून ऐरणीवर आणून अनुदान, वैद्यकीय मदत वगैरे करते. हा परफेक्ट दांभिकपणा.

पुरावा इथे. आणि इथे. विडी उत्पादन करणारी कंपनी producer असेल तर विडी कामगार हे co-producer आहेत. जर विडी ओढणार्‍याच्या जीवनावर विडी ओढण्याचा भयानक परिणाम होत असेल तर त्या विडीकामगारांना सिरियसली निर्दयपणे ठोकून काढले पाहिजे. त्यांची कुटुंबे देशोधडीला लागतील असेच केले पाहिजे. ते योग्यच आहे. विडीउद्योगात ते सामील असल्याने ते सुद्धा विडीउद्योगातून मिळणार्‍या लाभाचे (वेतन) धनी आहेत. मग दुष्परिणामांचे ते धनी का नसावेत ?? सिगरेट बनवणारी कंपनी ही केवळ धनवान असल्यामुळे दोषी व विडीकामगार हा निर्धन, उपेक्षित, तळागाळातला असल्यामुळे तो सरकारपुरस्कृत कणव, अनुकंपा, मदत, अनुदान, विशेष स्नेह, सबसिड्या यांना पात्र ?? का म्हणून ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडी उत्पादन करणारी कंपनी producer असेल तर विडी कामगार हे co-producer आहेत.

आयला, गब्बरकडून असली अस्सल सोशालिस्ट मांडणी आल्याचं पाहून डोळे पाणावले. कॉम्रेड गब्बरला एक लाल सलाम!

सिगरेट बनवणारी कंपनी ही केवळ धनवान असल्यामुळे दोषी व विडीकामगार हा निर्धन, उपेक्षित, तळागाळातला असल्यामुळे तो सरकारपुरस्कृत कणव, अनुकंपा, मदत, अनुदान, विशेष स्नेह, सबसिड्या यांना पात्र ?? का म्हणून ??

अहो किती वेळा सांगायचं? प्रत्येक कामगाराकडे एक मत असतं. सिगरेट कंपनीच्या मालकाकडे फक्त एक मत असतं. लोकशाही राजवटीत सबसिड्या मिळवण्यासाठी ही मतांची स्पेशल करन्सी लागते. आता त्या मार्केटमध्ये उलाढाली होतात, त्याबद्दल किती वेळा तक्रार करणार तुम्ही? अॅक्सेप्ट इट अॅंड मूव्ह ऑन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, गब्बरकडून असली अस्सल सोशालिस्ट मांडणी आल्याचं पाहून डोळे पाणावले. कॉम्रेड गब्बरला एक लाल सलाम!

ही सोशॅलिस्ट मांडणी नाही. सोशॅलिस्ट मांडणीमधे सरकार (सेंट्रल प्लॅनिंग आले असते).

कामगार को-प्रोड्युसर आहे म्हंजे त्याला नफ्यात समान हिस्सा आहे असे नाही. तो कौशल्य, उत्पादकता, व सर्वात महत्वाचे अ‍ॅव्हेलेबिलिटी ऑफ सब्स्टिट्युट्स वर अवलंबून असतो. म्हंजे एक कामगार काढून दुसरा आणायचा हे किती सोपे व कठिण आहे त्यावर आधारित.

एक थोडे वेगळे उदाहरण. कुटुंबातल्या कामासाठी कामवाली (धुणी, भांडी) असते. कुटुंब हे प्रोडक्शन फंक्शन असले तरी व ती कामवाली बाई ही को-प्रोड्युसर असली तरी आईवडिलांइतके स्थान तिचे नसते.

--

अहो किती वेळा सांगायचं? प्रत्येक कामगाराकडे एक मत असतं. सिगरेट कंपनीच्या मालकाकडे फक्त एक मत असतं. लोकशाही राजवटीत सबसिड्या मिळवण्यासाठी ही मतांची स्पेशल करन्सी लागते. आता त्या मार्केटमध्ये उलाढाली होतात, त्याबद्दल किती वेळा तक्रार करणार तुम्ही? अॅक्सेप्ट इट अॅंड मूव्ह ऑन...

मुद्दा मान्य आहेच. सहर्ष.

पण मी दांभिकपणाच्या आरोपाबद्दल बोलत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आयला, गब्बरकडून असली अस्सल सोशालिस्ट मांडणी आल्याचं पाहून डोळे पाणावले. कॉम्रेड गब्बरला एक लाल सलाम!

आयला मी मण शॉकलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बासुंदी,रबडीच्या डब्यावर " जास्ती खाणे अपायकारक ठरू शकते.हगरट लागू शकते " लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख उपहासात्मक शैलीत लिहीलेला विनोदी लेख असेल तर
विनोद फारच वरच्या दर्जाचा आहे.
मात्र हा लेख जर गंभीर पणे लिहीलेला असेल तर
ही बाब मात्र फारच गंभीर आहे.
सध्या मला ठरवता येत नाही की हे दोन्हीपैकी नक्की काय आहे.
प्रतिसाद वाचुन ठरवु म्हटल तर आणखीनच कन्फ्युज्ड झालो.
काही फारच विनोदी तर काही फारच गंभीर प्रतिसाद आहेत.
मला कळतं हा आत्मविश्वास दिवसोंदिवस ढळत चालला आहे.
मी भ्यायलोय

जाता जाता चांगल्या काळचे राजे श्री मल्या यांना एकदा त्यांच्या चमकदार जीवनशैलीविषयी विचारणा करण्यात आली होती. की तुम्ही का इतक सतत स्वतःला चमकवत असतात ?
त्यांनी उत्तर दिले होते की. भारतात दारु च्या डायरेक्ट जाहीरातीला बंदी आहे. ( इनडायरेक्ट जाहीरातीला बंदी नाही असे कदाचित करणारा भारत जगातला एकमेव देश असावा आणि त्यामुळे दारुची इनडायरेक्ट जाहीरात बनवायला जाहीरातदारांच्या कल्पनाशक्तीला खुप म्हणजे खुपच चालना मिळते.)
तर मल्या म्हणाले होते दारुच्या जाहीरातीला बंदी आहे म्हणुन मी स्वतःच एक जाहीरात बनलोय. मी स्वतःच माझ्या कंपनीला दारुला प्रमोट करतो. माझ चालण वागण बोलण पेहराव ही एक जाहीरातच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धूम्रपानामुळे संभवणार्‍या धोक्यांबद्द्ल जमेल त्या मध्यमातून सरकार लोकांना विचार करायला प्रवृत्त करतं- या पलिकडे निर्णय ज्यानी त्यानी घ्यावा. घासकडवींनी उल्लेख केलेले बदल झालेले आहेत आणि ते स्वागतार्हच आहेत. पॅसिव स्मोकिंग भारतात तरी फार कमी होतं हे चांगलं आहे.
चित्रपटांवर बंधनं आणून फार साध्य होईलसं वाटत नाही- धोक्याचा इशारा दिल्याने थोडा अडथळा येतो पण तरीही ते एकवेळ ठीक असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन तेंव्हा पडद्यावर कुठेही गांजा ओढणे आरोग्यास हानिकारक आहे अशी पाटी दिसली नाही हे बघुन सरकारच्या दांभिकपणाची प्रचंड चिड आली. आता गांजा ओढुन आरोग्य वाढते असे सुचवायचे आहे का सरकारला ? आँ ?

मला तर चित्रपटात हाणामारीची द्रुश्ये बघुन देखिल असे करणे लोकांच्या आरोग्यास गंभीर इजा पोचवणे आहे अशी पाटी का दिसत नाही म्हणून सरकारच्या दुट्टप्पीपणाचा प्रचंड राग येतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

+१००

या चित्राबरोबर पण (चित्राचा अर्धा भाग व्यापेल एवढी) वॉर्निंग छापायला लावली पाहिजे. किंवा हा फोटो सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यास बंदी केली पाहिजे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझे वडील स्वतः शंकर महाराज/गजानन महाराज यांच्या दर्शनाला आजही माझ्या सोबत कधिच येत नाहीत (कारण सिगारेट). आणी त्यावरुन माझे त्यांच्याशी तर्कयुध्द सुध्दा होते त्यावर ते मला इतकेच समजावत आलेत की तुम्ही संत आहात तर गुहेत जाउन ध्यान करा व्यसने करा पण जेंव्हा तुम्ही समाजात रहात असताना किमान लोकांसमोर यापासुन दुर राहुन चांगला आदर्शच दिला पाहिजे. व्यसनातुन रोग निर्माण होतात हे वास्तव आहे. आणी लोकांना याकारणांसाठी तुम्ही दुरुनही आधार वाटला नाही पाहिजे.

गेली २०+ वर्षे निर्व्यसनी असुनही माझ्या वडीलांना तोंडाचा कॅसर (वेळेत डिटेक्ट) झाला त्याचे ऑपरेशन वगैरे सर्व व्यवस्थित कोल्हापुरातिल एका चांगल्या डो़क्टरकडुन पार पडले आता सर्व ठीक आहे असे वाटत असताना अडीच महिन्यातच त्यापेक्षा मोठी गाठ तोंडात तयार झाली वडील अतिशय खचले. मुंबैला टाटामधे वेळेत नंबर लागणे शक्य न्हवते म्हणून पुण्यात ऑपरेशन करायचे ठरवले. मी शंकर महाराजांचा भक्त आहे. वडील पुण्यात आले असताना त्यांना जबरदस्तिने पद्मावतीला शंकर महाराजांच्या मठात दर्शनाला घेउन गेलो. डोके समाधिवर टेकायला लावले. आणी माझ्यापुरता निश्चिंत झालो.

दुसर्‍या दिवशी एका डॉक्टरांची भेट झाली( रवी कसबेकर), बहीणीचे मिस्टर वडीलांना घेउन तिथे गेले होते. माझ्या समोर आल्याबरोबर वडील म्हणाले अरे ज्या डो़क्टरांकडे आत्ता गेलो होतो त्यांच्याइथे शंकरमहाराजांचा भला मोठा फोटो लावलेला आहे. मि त्यांना इतकेच म्हणालो आता घाबरु नका महाराजांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे सर्व व्यवस्थीत होइलच. इतके होउनही वडील या सर्व प्रकाराने मनाने अतिशय खचलेले होते मला कॅंसरग्रस्तांच्या इछ्चामरणाबाबत माहिती हुडकायला लावुन अजुन मनस्ताप देतच होते. पुढे ऑपरेशन झाले. अनावश्यक खर्च टाळुन झाले. वडिलांना ऑपरेशनच्या रात्री स्वप्न पडले त्यामधे स्वामी समर्थ आले( शंकर महाराजांचे गुरु) त्यांनी वडीलांना एक थोबाडीत लगावली व दुखणं हे परमेश्वरचे देणे असते गपचुप सहन कर. इतकेच बोलुन अद्रुश्य झाले. मला हे ऐकुन आनंद झाला होता. पुढे वडीलांना रेडीएशन, किमो वगैरे मधे प्रचंड त्रास झाला. पण सुदैवाने अजुन तरी कँसरने तोंड परत वर काढलेले नाही. उद्याचे माहित नाही.

हे सर्व मी अशासाठी सांगीतले की विषय संतांचा जेंव्हा येतो तेंव्हा सोबत त्यांच्या चमत्काराचे अलौकीक वलयही असते जे सामान्य पब्लीक फिगरबाबत (राजकारणी , अभिनेते, खेळाडू) कधीच येत नाही. आणी अशा लोकांच्या हातातील सिगारेट, गांजा हे व्यसनांचे न्हवे तर त्यांच्या अलौकीकतेचे समर्थन करतात असे वैयक्तीक मत आहे. आजही शंकर महाराजांच्या मठात उदबत्तीसोबत सिगारेटची राख अंगारा म्हणून वापरली जाते. मी स्वतः तो अंगारा समजतो. आणी महाराजांबाबतच्या माझ्या धारणेला सिगारेट कँसरचे कारण बनते हे गोष्ट धक्का पोचवत नाही की मी स्वतः महाराज सिगारेट ओढत असत म्हणून मी सिगारेट ओढली पाहीजे असा भाव ठेवत नाही.

जे लोक नास्तिक आहेत त्यांना मात्र संतांच्या अशा चित्रांची अ‍ॅलर्जी असणे मला १००% मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अहो माझ्या मित्राच्या वडलांचीसुद्धा अशीच गोष्ट आहे. हा स्वतः कट्टर नास्तिक. मात्र त्याचे वडील संजय दत्तचे भक्त. त्यांनी संजयी गुरुवारांचं व्रत गेली तीस वर्षं चालवलेलं आहे. म्हणजे गुरुवारी संध्याकाळी संजय दत्तचा एक सिनेमा बघायचा म्हणजे बघायचाच. त्याच्या आडनावात दत्त आहे म्हणून पुढे त्या व्रतात एकदा दत्ताचं दर्शन घेणंही वाढवलं. वय शहात्तर वर्षं, पण तब्येत अगदी खणखणीत. सगळी व्यसनं करतात, दारू-सिगरेट तर ठीकच आहे, पण गांजा पितात, अधूनमधून इतरही काही ड्रग्जही चालतात. आणि या वयातही बायांचा शौक तर मिटलेलाच नाही. आधी तसं चोरीछुपे चालू असायचं पण बारा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची बायको वारली तेव्हापासून खुलेआम चालतं. मुलालाच शरम वाटते, कारण कधी बापाच्या घरी गेला तर त्यांच्या घरी रात्रीसाठी राहायला कोण असेल याची त्याला कल्पनाही करवत नाही. एकदा तर तीन पोरी खिदळत असलेल्या खिडकीतून दिसल्या तेव्हा तो आल्या पावलीच परत गेला. सांगायचं काय, तर म्हातारा शौकीन आहे.

याउलट माझा मित्र. पंचेचाळिसाव्या वर्षीच डायाबेटिस, हाय ब्लड प्रेशर, हार्टमध्ये कसली तरी सिस्टॉलिक का कायशी मरमर. सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. पण तरीही साधं एक मैल चाललं तरी पाणी मागायची पाळी येते. मध्ये एकदा डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरने घाबरवून सोडलं. अॅंजिओप्लास्टी का ग्राफी कायती करायला सांगितली. बापाला कळलं तेव्हा त्याने पोराचा कान पकडून आपल्या पूजेच्या खोलीत नेलं. संजूबाबाच्या तसबिरीपुढे लोटांगण घाल म्हटलं. हा काही ऐकेना. बापाने समजावून बघितलं, की तुला पाया नसेल पडायचं तर नको पडूस, पण एकदा त्याच्या तसबिरीसमोर उभा राहून गांजाचे दोन पफ मार, तुझे सगळे प्रॉब्लेम्स नष्ट होतील. बापाची कटकट टाळायला म्हणा, किंबा त्याच्या इष्टेटीतून आपलं नाव काढून टाकेल असं वाटल्याने म्हणा, त्याने मारल्या दोन फुंका. त्याला खरंच बरं वाटलं.

अॅंजिओ-कायती झाली. थोडे कॉंप्लिकेशन्स झाले खरे. त्यासाठी दोन दिवस नंतर आयसीयूत होता. पण दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं की सुनील दत्त - म्हणजे संजूबाबाचाही बाप, त्याच्या स्वप्नात आला. 'एक चतुर नार करके सिंगार' या गाण्याच्या दोन ओळी म्हणून झाल्यावर सुनीलदांनी त्याचं बखोट धरलं. आणि म्हणाले 'मुन्नाभाईने जो दवा दी है वो लेलो' असं म्हणून तो निघून गेला. त्यानंतर क्षणभर सर्किट येऊन डोळ्याने दम देऊन गेला. हे ऐकून बापाला प्रचंड आनंद झाला.

गेली काही वर्षं बाप आणि मुलगा संजयी गुरुवार करतात, आणि मस्त गांजा पितात. संजूबाबाच्या तेजोमय वलयामुळे अजूनतरी काही कॉंप्लिकेशनं झालेली नाहीत. माझा मित्र आता एकदम टेन्शनफ्री असतो आजकाल. त्यामुळे जे चाललंय ते ठीकच आहे.

नास्तिकांना या असल्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही याची खात्री आहे मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिकांना या असल्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही याची खात्री आहे मला.

नास्तिकांचा विश्वास कशावर बसावा बसु नये यावर मी फार विचार कधि करत नाही ( कारण माझ्या समोर ते विचार करु शकणार नाहीत याची मी लेखी खात्री देतो) पण त्यांचे आक्षेप मात्र मी नक्कि समजु शकतो. कारण मला नास्तिकांबाबत तिव्र सहानुभुती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खुप च छान आहे हे संजयी व्रत !! सोपे आणि फलदायक ... सगळ्यांनी प्रसार करावा ... आणि सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त्ती प्राप्त करावी.

त्यावर ते मला इतकेच समजावत आलेत की तुम्ही संत आहात तर गुहेत जाउन ध्यान करा व्यसने करा पण जेंव्हा तुम्ही समाजात रहात असताना किमान लोकांसमोर यापासुन दुर राहुन चांगला आदर्शच दिला पाहिजे. व्यसनातुन रोग निर्माण होतात हे वास्तव आहे. आणी लोकांना याकारणांसाठी तुम्ही दुरुनही आधार वाटला नाही पाहिजे.
@ रेड बुल , संतांबद्द्ल चे तुमच्या वडीलांचे मत तुम्हाला पटत कसे नाही याचे आश्चर्य वाटते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबांचे विचार चुक नाहित.

पण समाज संतांना त्यांच्या व्यसनांच्या सवयी सोबत का स्वीकारतो त्याचा उहापोह मी उर्वरित प्रतिसादात केला आहे. म्हणून मी आशा चित्राच्या विरोधात आहे आणि नाही सुध्दा.

बाकी कुठे कसलीच वार्निंग असू नये हे माझे वैयक्तिक मत आहे. इन्केस कोनाला समजले नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आस्तिकांबद्दल मला करूणाबिरूणा काही नाही. असल्या मठ्ठ संकल्पना डोक्यात बाळगून, वरतून त्याच्या समर्थनार्थ डोके वापरणार्‍यांचा अतीव तिरस्कार मात्र वाटतो.

असल्या विचारांना आक्रमकपणे हास्यास्पद बनविणे हेच गरजेचे आहे या डॉकिन्सच्या विचारांची आठवण इथे होते, हे नमूद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

असल्या विचारांना आक्रमकपणे हास्यास्पद बनविणे हेच गरजेचे आहे

याइतके अडाणचोट मत क्वचितच ऐकलेय. छान मनोरंजन झाले, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डॉकिन्सचं 'द गॉड डिल्यूजन' हे पुस्तक वाचावं, तसंच क्रिस्तोफर हिचिन्सची पुस्तकं वाचावीत अशी शिफारस करतो. क्वचितच ऐकलं असणं हा मतांच्या सत्यासत्यतेचा निकष ठरू शकत नाही. एके काळी 'पृथ्वी गोल आहे? असलं अडाणचोट मत क्वचितच ऐकलेलं आहे.' असंही म्हणणारे लोक होते. त्यांचंही मनोरंजन झालं. बहुधा ब्लिसमध्ये जगले ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिकधर्म टिकवून ठेवायचा असेल तर ख्रिश्चन नास्तिकांनी दुसरा देव किंवा पोप शोधला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डॉकिन्स पकाऊ आहे.

पकाऊंची बदनामी थांबवा!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या नास्तिकधर्मीची काळजी करू नये. तो गेल्या दोनतीन दशकांत चांगला फोफावतो आहे. आणि सध्याच्या माहितीविस्फोटांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांत आपला आवाज ऐकू येऊ द्यायचा असेल तर किंचाळून बोलावंच लागतं. उगीच का लोक ट्रंपच्या मागे जाताहेत, आणि उगीच का तुमचा नाजूकनार बर्नी सॅंडर्स मागे पडतोय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचाळून बोललं की नकारात्मक श्रेणी मिळतात ऐसीवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राघा एकेका दगडात चार चार्/पाच पाच पक्षी मारायचं कधी थांबविणार तुम्ही? ROFL
आमचा बर्नी नाजूकनार नाहीये. येऊ द्यात प्रेसिडेंटपदी मग इंगा दाखवेल सर्व धनिकांना. फक्त अधोरेखित शब्दाबद्दल शंका आहे. तेवढा क्षुल्लक तपशिल फाट्यावर मारला तर.... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयमाय स्वारी बरंका तुमच्या डॉकिन्सदेवाबद्दल उणे शब्द वापरल्याबद्दल.

(काफिर) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चालायचंच. सूर्यावर थुंकणारे लोक असतातच. आता खुद्द मोदींना शिव्या घालणारे लोक आहेत महाराजा. आसाराम बापूंसारख्या संतांवर बलात्काराचे आरोप होताहेत. त्यांच्यापुढे डॉकिन्स किस खेत की मूली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेडबुल तुमचाच का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सॉरी हां, तुम्हांलाही दुखवावे लागले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमचे नट क्रैक करणारा आड़कित्ता तुटुन जातो Wink

नास्तिकधर्म फोफावातो आहे असे वाटत नाही. इश्वराच्या शोधावर गिवप करणारे नास्तिक न्हवेत. अनेकांना हे लोक नास्तिक पकडावेसे वाटतात अन नास्तिकधर्म फोफावला या भ्रमाला बळि पडतात. मी एकच सांगतो Science can explain how not why. म्हणून अनेक मंदिराबाहेर दिवसे दिवस वाढतच असलेली गर्दी हेच सांगते की आम्ही आस्तिक आहोत आणि आमची संख्या वाढतच जाणार कारण आस्तिकता Why चे उत्तर द्यायला पुढे येते How साठी विज्ञान पायाशी पडले आहेच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

शेवटचे वाक्य सोडता, प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर महाराज पिंपळखुट्याचे का?
मित्राच्या वडिलांना एकावेळी एक तरी व्यसन लागतचं कायम आधी बरीच (दारु, सट्टा ई.) होती मग ती सोडुन पिंपळखुट्याच्या शंकर महाराजांच नंतर आसारामजी बाप्पुंच, पण आधीच्या व्यसनापेक्षा ही बरीच माईल्ड होती त्यामुळे ते कुटंब मात्र सुखावल. आसारामांना अटक झाली आता आधीची व्यसने परत लागली आणि कुटंबाची परत लागली. कुणाचीच श्रद्धा दुखवण्याचा हेतु नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कष्टदायक अनुभव आहे. व्यक्ति कोलमडुन पडू शकते.

अनिसं अंधश्रध्देची व्याख्या साधारण अशी मानते की श्रध्दा जिचा वापर श्रध्दाळु व्यक्तिच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक शोषणाला होतो ती अंधश्रध्दा होय. मला स्वताला हे पटते. त्यामुळे श्रध्देच्या जिवावर कोणी इश्वर हुडकू पहात असेल तर त्याचा तो हक्क मान्य करायची लवचिकता लोकांमधे नक्कीच हवी.

तुम्ही अनुभव सांगितला आहे यातून कोणतीही श्रध्दा दूखावली गेली आहे असे मला वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

+१
पण आता गजानान महाराजांच्या नविन मुर्त्या/फोटोतून चिलम काढून टाकण्यात आलेल्या आहेत.काही मंदीराल्या मुर्त्यापण बदल्ण्यात आलेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडेपण घातलेत का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिगारेटचे फायदे
शासनाला महसूल मिळतो
फुक्यांच्या कॅन्सर वा फुफुसांच्या आजारात वाढ होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे वैद्यकीय क्शेत्रातील लोकांच्या पोटापाण्याची सोय होते
अशि माणसे लवकर गचकण्याची शक्यता असते. त्यामुळे खायला काळ व भुईला भार झालेले लोकसंख्या कमी होते व देशाचा लोकसंख्या वाढ रोकण्याचे काम होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घरी चोरी होत नाही कारण खोकल्यामुळे माणूस रात्र रात्र जागा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिवाय सिगरेटच्या धुरामुळे डासबीस लोकांचा प्राब्ळम होत नाही तोही एक फायदा आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाला तुमी लोग काय चालाखी करून र्‍हायलाय ... ?

सिगरेट ओढणार्‍या लोकांना सिगरेट ओढण्याचे जे सुख मिळते ते कोणीच काऊंट करायला तयार नाही. धुराची वलयं काढणे व त्यात आपले तरबेजपण दाखवणे, पुरेश्या न ओढल्या गेलेल्या सिगरेटांची थोटकं साठवणे व कडकीच्या वेळी धुंडाळून वापरणे, सिगरेट च्या पाकिटाचे विविध खेळ खेळणे वगैरे वगैरे उपयोग आहेतच की. झालंच तर सिगरेट्स या युद्धकैद्यांनी करन्सी म्हणून पण वापरलेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते तर सर्वोच्च ठिकाणी आहे ओ. आम्ही आपले आनुषंगिक फायदे सांगतो आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिगरेटची थोटके (शक्यतो ज्वलंतावस्थेतच) जागोजागी टाकल्याने, सफाईकामगारांच्या रोजगाराच्या संधी वाढतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मोकींग तसेच पॅसिव्हस्मोकिंगद्वारे होणार्‍या मृत्यूंमुळे लोकसंख्यावाढ आटोक्यात रहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धूम्रपानामुळे नपुंसकत्व आल्याने हुंगाहुंगी करणे, फील्डिंग लावणे, बायांवर खर्च करणे, शॉपिंग करताना पर्स सांभाळणे इत्यादीपासून व एकंदरीतच बायांच्या झेंगटापासून कायमची सुटका होते. शिवाय तिशी-पस्तिशीतच काका दिसू लागल्याने नाईलाजाने का होईना मॅच्युरिटी येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते फायदे आहेत की कारण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

वस्तुतः वाईट कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, सज्जन नायक इत्यादी पात्रे सर्रास सिगरेट ओढ्ताना चित्रपटात दाखवल्यामुळे व्यसनाधीनता वाढत चालली आहे हे माझे मत आहे.
प्रत्येकाने आपले मत चर्चेत मांडावे.

याशिवाय चित्रपटात सिगरेट दाखवणे हा जाहिरातीचाच भाग आहे कारण जाहिरातीचे सर्व मार्ग आता बंद आहेत.
विचार करा बोक्स ओफिस्वर अनेक चित्रपट साफ कोसळुन सुद्धा निर्माते कर्ज बाजारी झाल्याचे किंवा रस्त्यावर आल्याचे माझ्या ऐकिवात नाही. याचे कारण ते सिगरेट दाख्वुन
पैसे कमवत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

एक चूक दुरुस्त करतो वरील प्रतिसादात : वाईट नाही तर कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

>> वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता <<

थलैवा - बस एक ही काफी है

तात्पर्य : दक्षिण भारत - म्हणजेच अर्धा भारत - तुमच्याशी सहमत नाही. QED

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या अंदाजाप्रमाणे मूळ मुद्दा सिग्रेट/दारू पिणे कितपत योग्य हा नसून त्याचं ग्लोरीफिकेशन हा असावा.लग्नाच्या बाजारात मुलांसाठी लाईट स्मोकिंग,सोशल ड्रिकिंग न करणे हे एक डिस्क्वालिफिकेशन होत चालले आहे(स्वानुभव).

नुकत्याच संपलेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे शेवटशेवटचे सामने मी टीव्हीवर पाहिले तेव्हा शेकडा ७० टक्के जाहीराती या दारूच्या आहेत असे आढळले. काही जाहिराती नेमक्या कशाच्या आहेत हे न कळल्यामुळे त्या दारूच्याच असाव्यात असा माझ्यापुरता समज मी करून घेतला. व्यसनांना बायकांचा विरोध असतो या गृहितकानुसार आजच्या आघाडीच्या हिरोईनी दारू,पान मसाला इ.इ.च्या जाहिराती करत असल्याचे पाहून महिला सबलीकरणाच्या दिशेने आपली किती वेगाने प्रगती चालू आहे याबद्दल परम संतोष जाहला.

या सेलीब्रेट्यांना व्यसनांचा प्रचार करण्यात अडचण का वाटत नसावी याचे कारण म्हणजे व्यसनांमुळे फुप्पुस-किडनी इ.इ.चे आजार होऊन डॉक्टरांची घरे भरता भरता हे देशोधडीला लागलेले नसतात;व्यसनांसाठी पैसे लागतात म्हणून घरातच चोर्‍या करणारे भुरटे नातेवाईक-मित्र यांना भेटलेले नसतात,सोबत काम करणारे अट्टल दारूडे-स्मोकर नसल्यामुळे त्यांच्या अंगाला,मूत्रविसर्जनानंतर टॉयलेटला कायम येणारा घाण वास,कधी पैसे मागतील हा धाक, एरवी कामला चांगले पण केवळ व्यसन करता यावे म्हणून पैसे खाणारे सरकारी/खासगी कर्मचारी असे गोड अनुभव कदाचित त्यांना येत नसावेत. उदा.पान मसाल्याची जाहिरात करणारी प्रियंका चोप्रा वास्तवात चोवीस तास तोच पान मसाला/गुटखा/खर्रा खाणार्‍यासोबत संसार करू शकेल का अशी शंका तिला कुणी विचारली की नाही याबद्दल माहीत नाही.

तरी घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे स्मोकिंगवाल्यांचा त्रास आता बराच कमी झाला आहे.मला आठवते पूर्वी रेल्वेडब्यातही अ‍ॅश ट्रे असायचे.
गंमत म्हणजे सिग्रेटी फुंकण्यात धन्यता मानणारे पॉवर प्लॅण्ट,कोल माईन्समध्ये प्रदूषण फार आहे म्हणून काम करायला तयार नसतात असाही अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

लग्नाच्या बाजारात मुलांसाठी लाईट स्मोकिंग,सोशल ड्रिकिंग न करणे हे एक डिस्क्वालिफिकेशन होत चालले आहे(स्वानुभव).

लग्नबाजारात तरी हे डिस्क्वालिफिकेशन आजिबात नाही इतके नक्की सांगू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस. डिस्क्वालिफिकेशन आजिबात नाही .

हेच म्हणते . फुकाड्या लोकांचा राग पण येत नाही आजकाल . वाईट वाटत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच बॅट्या? स्मोकिंग सुद्धा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस नक्कीच. स्मोकिंगसुद्धा. इनफॅक्ट एकवेळ दारू पिते/तो असे लिहितील पण फुंकते/तो असे लिहिणारे लैच्च कमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लग्नबाजारात तरी हे डिस्क्वालिफिकेशन आजिबात नाही इतके नक्की सांगू शकतो.

तुच म्हणतो आहेस बॅट्या डिस्क्वालिफिकेशन नाही म्हणुन

मी पण तेच म्हणते आहे. स्मोकिंग करणे हे निगेटीव्ह आहे मुलांच्या सेलेबिलिटी साठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. मला वाटले "स्मोकिंग न करणे हे डिस्क्वालिफिकेशन आहे" असे वाघमारे म्हणाले तेच तुम्ही म्हणताहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिग्रेट व मर्दानगी, पौरुष याची लिंक प्रस्थापित करण्यात जाहिराती मार्केटिंग सिनेमे यशस्वी झाले होते.आता परिस्थिती बदलते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

याआधी अनेकदा म्हटलंय तसं व्यक्तीस्वातंत्र्य की अभिव्यक्तीस्वातंत्र्य असा झगडा असतो तेव्हा माझे मत व्यक्तीस्वातंत्र्याला असते. मात्र जर व्यक्तीस्वातंत्र्यामुळे दुसर्‍याला थेट (त्यातही शारीरीक) हानी पोहोचत असेल तर त्या व्यक्तीस्वातंत्र्यावर रोख हवी. धूर निघणार्‍या धुम्रपानामुळे भोवतालच्यांना इच्छा नसताना पॅसिव स्मोकिंग करावे लागते. तेव्हा सार्वजनिक ध्रुम्रपानावर बंदी हवी. अगदी एकापेक्षा अधिक घरे असणार्‍या गृहनिर्माणसंकुलातील फ्लॅटच्या ग्यालरीतही!

तरीही ज्यांना सिगारेट प्यायची आहे त्यांना स्वतःच्या/इतरांच्या घरात (त्या घरातील इतर सदस्यांची परवानगी घेऊन) सिगारेट प्यायची पूर्ण मुभा असावी!

===

सिनेमात धुम्रपान दाखवताना वैधानिक इशारा जरूर दाखवावा. त्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नुकसान झाले तरी मला ते सुयोग्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सिनेमात धुम्रपान दाखवताना वैधानिक इशारा जरूर दाखवावा. त्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नुकसान झाले तरी मला ते सुयोग्य वाटते.

सहमत, पण यापुढे जाऊन मी म्हणेन की वैधानिक इशार्‍यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नुकसान वगैरे होते असे मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकांनी केलेल्या धूम्रपानामुळे अभ्यासू आणि उत्साही वैद्यकीय संशोधकांना संशोधनासाठी कारण आणि स्वयंसेवक मिळतात. बरं, ते सुद्धा नाझी पद्धतीने नव्हे. हे सज्ञान लोक आपण होऊन फुके बनतात. सगळ्यांसाठीच विन-विन परिस्थिती आहे. ज्यांना अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास होतो त्यांनी धूरकाढ्यांपासून अंतर राखावं; ज्यांना त्रास होत नाही त्यांच्यावरून अप्रत्यक्ष धूम्रपानाचे फायदे-तोटे यांचा अभ्यास करता येईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यांना अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास होतो त्यांनी धूरकाढ्यांपासून अंतर राखावं

ROFL
नुसता खोकला वगैरे त्रास न होऊन सुद्धा जवळपास रहाणार्‍यांवर त्यांच्याही नकळात प्रैणाम होत असतो. तुम्हाला जाणवो अगर न जाणवो, अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास प्रत्येकाला होतो. तेव्हा धुरकांड्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा आणणे न्यायाला धरून ठरेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या घराच्या शेजारचं घर धूरकाढ्यांने विकत घेतलं तर आपण काय करू शकणार? एका घरातला धूरकाढा दुसऱ्या घरातल्या फोडणीच्या नावानेही शंख करू शकतो. त्यापेक्षा धूरकाढ्यांशी प्रत्यक्ष संपर्क कमी करून त्यांच्याशी फारतर इंटरनेट आणि फोनपुरती मैत्री ठेवावी. बाकी सामुदायिक कवायतीसारखं 'सुरक्षित अंतर ठेवा'.

किंबहुना, तू म्हणतोयस की कायदे/नियम बनवून धूरकाढ्यांवर बंधनं आणावीत. मी म्हणत्ये, ज्यांना धूर-न-काढ्यांना वाटतं त्यांनी सामाजिक दडपण निर्माण करावं.

--

ह्या निमित्ताने 'थँक यू फॉर स्मोकिंग' नावाचा चित्रपट आठवला. (पुन्हा बघितला पाहिजे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

if you can tap into people’s insecurities — if you can needle at their deepest feelings of inadequacy — then they will buy just about any damn thing you tell them to.

सिगरेटच्या मार्केटिंगबद्दलचा हा लेख अवश्य वाचा. रोचक आहे.

http://markmanson.net/insecurity?utm_campaign=mmnet-newsletter-2016-05-0...

it was both inevitable and in everybody’s best interests that the weak be exploited by the strong through media and propaganda. He called it “the invisible government” and generally thought the masses were stupid and deserving of whatever smart people convinced them to do.

But perhaps capitalism is only the most efficient means of fulfilling a population’s physical needs — needs for food, shelter, clothing, etc. Because in a capitalist system, it also becomes economical to feed into everyone’s insecurities, their vices and vulnerabilities, to promote their worst fears and constantly remind them of their shortcomings and failures. It becomes profitable to set new and unrealistic standards, to generate a culture of comparison and inferiority. Because people who constantly feel inferior make the best customers.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

But perhaps capitalism is only the most efficient means of fulfilling a population’s physical needs — needs for food, shelter, clothing, etc.

आणि

Because in a capitalist system, it also becomes economical to feed into everyone’s insecurities, their vices and vulnerabilities, to promote their worst fears and constantly remind them of their shortcomings and failures. It becomes profitable to set new and unrealistic standards, to generate a culture of comparison and inferiority. Because people who constantly feel inferior make the best customers.

या दोन भागांचा काही संबंध नाही. पण दुसर्‍या भागामुळे पहिला भाग चांगल्या प्रकारे साध्य होतो असं म्हटलं आहे. ते खरे नाही.
दुसर्‍या भागामुळे विक्रेत्यासाठी It is possible to sell any damn thing हे साध्य होतं. म्हणजेच ज्याची गरज नाही अशा वस्तू ग्राहकाच्या गळ्यात मारता येतात. अशा स्थितीत तरीसुद्धा मूलभूत गरजा जास्त चांगल्या पूर्ण होतात हा क्लेम करणे कैतरीच.

पहिला भाग खरा असेल पण दुसरा भाग हे त्याचे कारण नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कॉलिंग अनु व गब्बर.
गब्बर, थत्ते व अनु यांचे लक्ष वेधण्याकरताच तो भाग टाकला होता. त्या उतार्‍यातलं मला काहीही समजलं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेल्लो शुचि.

मला फक्त सिग्रेट बद्दल बोलायचे नाही,

माझ्या मते सर्व पदार्थ खुलेआम विकायला परवानगी पाहिजे अगदी ड्रग्स सुद्धा.
पण सिग्रेट किंवा ड्रग्स असे जे पदार्थ आहेत की जे घातक आहेत ते सिद्ध झाले आहे, त्या पदार्थांच्या मार्केटींग ला बंदी हवी. ज्या देशात जसा कायदा असेल त्याप्रमाणे पाकीटांवर धोके स्पष्ट लिहायला हवेत.

सिनेमात पण खाली जर काही ओळी देत असतील तर माझी त्याला काही हरकत नाही.

माझा विरोध भारतात/जगात जी बंदी घातली जाते त्याला आहे उ.दा. दारु बंदी, ड्रग विकायला बंदी. ह्या असल्या बंद्या घालणे चुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह के. थँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(चक्क) सहमत अहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

But perhaps capitalism is only the most efficient means of fulfilling a population’s physical needs — needs for food, shelter, clothing, etc. Because in a capitalist system, it also becomes economical to feed into everyone’s insecurities, their vices and vulnerabilities, to promote their worst fears and constantly remind them of their shortcomings and failures. It becomes profitable to set new and unrealistic standards, to generate a culture of comparison and inferiority. Because people who constantly feel inferior make the best customers.

मुद्दा ठीकठाक आहे.

हे सगळं पांडित्य फक्त त्याच वेळी आठवतं जेव्हा शेतकर्‍यांचे हितसंबंधांचा प्रश्न नसतो तेव्हा.

तंबाखु उत्पादक शेतकरी हा कॅपिटलिस्ट नसतो का ? तंबाखु चे उत्पादन कोण करतं ? तंबाखु च्या शेतीवरच बंदी घालावी असं म्हणत नाही कोणी. तंबाखु उत्पादक शेतकर्‍याला चौकात उभं करून लाथा घालाव्या असं कोणीही म्हणत नाही. पण तेच जर फिलिप मॉरीस, आयटीसी, बीएटी, आर्जेआर यांचा विषय आला रे आला की लगेच सगळे कवित्व आठवतं. मग ते भयप्रद चित्रं लावली पाहिजेत, इशारे प्रिंट केले पाहिजेत, सिगारेट वर एक्स्ट्रा टॅक्स लावून ते पैसे कॅन्सरग्रस्त गरिब लोकांना दिले पायजेत, चित्रपटांमधे अ‍ॅड नाय करता कामा वगैरे वगैरे.

अधोरेखित भागाबद्दल : व्यक्तीवादावर आधारीत भांडवलवाद हा स्वार्थ, लोभ यासारख्या vices and vulnerabilities वर आधारलेला आहे असा ढोल बडवत रहायचं. ते खरं आहे की खोटं, ते तपासून पहायला हवं की नको, ते तथाकथित दुर्गुण असले तरी त्यांचा सदुपयोग केला जाऊ शकतो का, केला गेलेला आहे का - हे प्रश्न निरर्थक आहेत असं गृहितच धरून चालायचं मुळी.. सगळ्यात महत्वाचं म्हंजे जो बलवान असतो तो नेहमी शोषणच करतो (कारण त्याला दुसरा उद्योगच नसतो ना) व बलहीन असतो तो शोषितच असतो (तो शोषकाकडे आकर्षित होतो - कसा ते विचारू नका. अगतिकता हेच एकमेव कारण) असंच ठसवायचं. जोडीला बलवानाची व्याख्या पण सोयिस्करपणे बदलायची आणि आपलं घोराख्यान चालू ठेवायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दुवा वाचते. निकोटिन + बॅन + फार्मर्स असे शब्द गुगल केले असता, फक्त चाइल्ड लेबर्स हा इश्यु दिसला म्हणजे शेतकर्‍यांवर चाप या करता की बालमजूरी ला उत्तेजन मिळू नये.
.
सतत आपले विचार ऐकल्याने खरच वाटते आहे, असं का बलवान आणी दुर्बळ यात चाप हा फक्त बलवानावर का लावला जातो? उत्तर सापडत नाही. बघू ऐसीवर वैचारीक ताकद असलेले खूप जण आहेत. त्यांच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत. (सापडलं उत्तर राघांनी दिलय - एक कामगार एक मत असे अनेक कामगार अनेक मतं. पण कंपनीचा ओनर फक्त एकच मत. म्हणून हा भेदभाव Sad )
____
दुव्यामध्ये क्लिष्ट विचार सोप्यात सोपे करण्याचा प्रयत्न करुन मांडले आहेत. पण हायेक यांचे नोबल प्राइझ मिळाल्यानंतरचे भाषण तर इतके क्लिष्ट आहे की एकही ओळ कळली नाही. काही दिवस मस्त चर्वण करता येइल. दुव्याबद्दलही धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हायेक यांचे नोबल प्राइझ मिळाल्यानंतरचे भाषण तर इतके क्लिष्ट आहे की एकही ओळ कळली नाही.

प्रिटेन्स ऑफ नॉलेज असा मथळा आहे त्या भाषणाचा. म्हंजे गब्बर ला असं भासवायला आवडतं की त्याला ते समजलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर तुमच्या खवत लिहीत नाहीये. इथेच लिहीतीये - कधीतरी असा लेख लिहाल का ज्यात व्यक्तीच्या गुण व तथाकथित अवगुण अथवा लिमिटेशन्स व हायेक यांची थेअरी तुमच्या शब्दात असेलच पण मुख्य म्हणजे त्या थिअरीस पूरक म्हणजे त्या गुणावगुणांचा उपयोग करुन घेतला गेलेली, अशी उदाहरणे असतील.
उदा से एखादी व्यक्ती सो कॉल्ड लोभी असेलही पण त्या अवगुणापोटीच, पैसे अमास करण्याच्या हावेपोटीच ती कदाचित अनेक बिझनेस अ‍ॅव्हेन्युज समाजास उपलब्ध करुन देते.
तुम्ही ही सपोर्टिंग उदाहरणे देऊन हायेक यांच्या "ट्रु इन्डिव्हिज्युएलिझम" -

उदा -
If all men were completely equal in their gifts and inclinations, we should have to treat them differently in order to achieve any sort of social organization. Fortunately, they are not equal; and it is only owing to this that the differentiation of functions need not be determined by the arbitrary decision of some organizing will ......

म्हणजे काय म्हणायचे आहे, जर सारेजण एकसमान असते तर एककल्लीपणामुळे प्रगतीस कशी बाधा आली असती .... वगैरे. स्पष्ट कराल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(टारगट मोड ऑन)

असा लेख लिहिला जाऊ शकतो ही "निर्वाण फॉलसी" आहे असा टारगट विचार मनात आला. म्हंजे आदर्शवाद्यांचा व समाजवाद्यांचा मुख्य मुद्दा जसा असतो की आपण एक पंधरावीस इन्स्टिट्युशन्स* बनवायच्या, समाजात इन्स्टॉल करायच्या आणि मग दोनचार वर्षं ट्रायल करायची आणि मग ट्रायल पिरियड संपला की सगळी सिस्टिम मस्त चालू होईल आणी अलबेला !!!

तसं कोणीतरी एकजण लेख लिहील मग त्यावर प्रश्न, उपप्रश्न, शंका, कुशंका येतील मग वादविवाद घडतील आणि मग सगळे जण वा वा छान छान मस्त लिहिलेत असं म्हणून घरी जातील. आणि सगळ्यांना जे समजायला हवे ते समजेल. युटोपिया.

*इन्स्टिट्युशन्स म्हंजे = अधिकार्/कर्तव्यांचा संच, कोर्ट, निर्वाचन आयोग, दक्षता आयोग, पोलिस, सीबीआय. तसेच परंपरा, वहिवाटी, शिष्टाचार वगैरे वगैरे.

(टारगट मोड ऑफ्फ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचि या लेखांबद्दल.
सिगरेट्चे मार्केटिंग बंद करणे अव्यवहार्य असे सर्वांना वाट्ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

सिगरेट ओढणार्यांचे पण प्रकार असतात.सर्वात खालचा प्रकार म्हणजे बिनकामी बेकार असणे आणि उगाच स्टाईल म्हणून सिगरेट फुकणे अन् तेही बापाच्या पैशाने.
डोक्यात जातात अशी लोकं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी