नटसम्राट आणि कथासम्राट!

नटसम्राट हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कालच बघितला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आणि तितकेच महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम!

मी नटसम्राट नाटक बघितलेले नाही आणि नाटक वाचलेले सुद्धा नाही. म्हणून मनात कसलीही तुलना न करता हा चित्रपट मी बघू शकलो. अशा प्रकारच्या कथा असलेले इतर अनेक मराठी हिंदी चित्रपट येऊन गेले.

(उदा. राजेश खन्नाचा अवतार, सुलोचना चा मराठी चित्रपट एकटी, अमिताभचा बागबान, माझं घर माझा संसार, लेक चालली सासरला, माहेरची साडी वगैरे)

पण "नटसम्राट" हा अनेक बाबतीत मला "वेगळा" वाटला. यात कुणा एकाचीच बाजू बरोबर आणि एकाची चूकच असा पूर्वग्रहदूषित विचार लेखकाने केलेला नाही. तसेच मुलगा-सूनच फक्त नेहेमी चूकतात आणि लेक-जावई नेहेमी बरोबरच असतात असा एकतर्फी विचार सुद्धा यात मांडलेला नाही.

आजकाल एकीकडे सोशल मिडियावर "मुलगी-जावई हे महान देवी देवता असतात आणि मुलगा-सून हे नालायक राक्षसांचे अवतार असतात" अशा प्रकारचे जे चूकीचे, विषारी आणि अतिरेकी विचार फैलावले जात आहेत, त्याला छेद देत नवे विचार या चित्रपटाने मांडले आहेत.

"मुलगा किंवा मुलगी हे केवळ त्यांच्या लिंगभेदाने चांगले किंवा वाईट ठरत नसून त्यांच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ते चांगले किंवा वाईट ठरत असतात"

"जुनी पिढी नेहेमी बरोबरच असते आणि नवी पिढी नेहेमी चूकच असते असे न म्हणता, त्यांच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ते चूक किंवा बरोबर ठरत असतात"

हा चित्रपट मानवी स्वभावाच्या हटवादीपणा आणि तत्वांचा संघर्ष दाखवतो जो नव्या पिढीतल्या दोन कुटुंबात सुद्धा घडू शकतो किंवा जुन्या पिढीतल्या दोन कुटुंबात सुद्धा घडू शकतो.

या चित्रपटात कशावरही भाष्य केलेले नाही. फक्त घडणार्‍या घटना तटस्थपणे दाखवल्या आहेत, त्याबद्दल कुसुमाग्रज आणि महेश मांजरेकरांचे अभिनंदन!

"पिढी, वय किंवा लिंगभेदानुसार कुणी चांगला-वाईट किंवा चूक-बरोबर ठरत नसतो तर ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ठरतो"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

विचार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिला विचार आवडलेले मला आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मी चित्रपट पाहिलेला नाही मात्र नाटक पाहिले होते. माझा प्रतिसाद त्या अनुषंगाने आहे.)

नटसम्राटकडे फक्त नात्यांच्या दृष्टीने पाहणे हे एकांगी आहे. ती एक उत्तम आर्थिक दृष्टीकोन देणारी कलाकृतीदेखिल आहे!

आपल्या कमावत्या काळात साठवलेल्या पुंजीची योग्य प्रकारे गुंतवणूक करून, उतारवयात उपयोगी पडेल अशी व्यवस्था करणे अत्यंत जरूरीचे असते, हा तो विचार!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराच उशिराने पहिला आहे तुम्ही हा सिनेमा! एखाद्या प्रसिद्ध नटाने, निवृत्त झाल्यावर देखील त्याच धुंदीत, मस्तीत वागावे, जगावे, वास्तवतेपासून फारकत मनस्वी जगणे जगावे, ही मनाची अवस्था काय आहे, उन्माद आहे की कल्पनारम्यता आहे का, याचा मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करायला हवा.

मी देखील हा सिनेमा जानेवारी मध्ये पहिला होता. त्याबद्दल माझ्या ब्लॉग वर लिहिले होते. बाय द वे, कोणी सैराट पाहिला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मी अजून पाहिला नाही(आणि तसे काही कारण नाही), पण कोणी पहिला असेल तर समीक्षा वाचायला आवडेल..चर्चेतील सिनेमा आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तीस-चाळीस (खरंतर तीनशे) वर्षं जुन्या नाटकातले विचार नवे वाटताहेत हे पाहून भरुन आले. काहीतरी अक्षर आहे हे खरंय. नक्की काय ते ठरवता येत नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण साकारलेल्या नायक-खलनायकांचे गुणावगूण उतरलेला नटसम्राट या चित्रपटात उभाच रहात नाही Sad

नटसम्राट (२०१६): [ऑडीयो रिव्ह्यू] बरा अभिनय पण ढिसाळ पटकथा नि बेकार माध्यमांतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!