Submitted by देवदत्त on शनिवार, 02/11/2024 - 22:23
आज सकाळचीच गोष्ट.
एमेच एसेच ५५च्या एका निर्मनुष्य पट्ट्यात मी ड्राईव्ह करत होतो. सकाळचं कोवळं ऊन आणि नोव्हेंबरची गुलाबी थंडी असं आल्हाददायक वातावरण होतं. ट्रकमध्ये ज्वालाग्राही माल होता, पण लोडिंग करताना आम्ही सुयोग्य काळजी घेतली होती. एकूण, मी आणि क्लीनर प्रत्युत्पन्नमती (त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पंचतंत्र वाचायचे डोहाळे लागले होते म्हणे) दोघेही रिलॅक्स्ड होतो.
अचानक आम्हांला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरून एक वॅगनआर भरधाव येऊ लागली. खरंतर सर्व्हिस रोड खरोखर समांतर असता तर ती आमच्यापर्यंत कधीच पोचली नसती; पण तो हायवेला छेद देत होता.
Submitted by ऐसीअक्षरे on शुक्रवार, 16/08/2024 - 17:09
विज्ञानविषयक लिखाण करणारे वाई येथील बहुआयामी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे नुकतेच दुर्धर आजाराशी सामना करत निधन झाले. त्यांच्या एका सुहृदाने त्यांना वाहिलेली आदरांजली.
Submitted by गोडाती on बुधवार, 31/07/2024 - 00:35
Submitted by देवदत्त on सोमवार, 29/07/2024 - 01:35
जवळपास नऊ वर्षांपूर्वी प्रसाद, निखिल आणि मी गप्पा मारत बसलो होतो. सोविएत रशियन पुस्तकांबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं तिघांनाही वाटत होतं, पण नेमकं काय ते सुचत नव्हतं. अचानक प्रसाद म्हणाला "तुमच्या बोलण्यात सर्वात जास्त उल्लेख येतात ते लहानपणी वाचलेल्या रशियन पुस्तकांचे. त्या पुस्तकांचाच मागोवा घेतला तर?" ती कल्पना ताबडतोब क्लिक झाली, आणि आम्ही रिसर्चला सुरुवात केली.
Submitted by अमरेंद्र बाहुबली on शनिवार, 13/04/2024 - 01:05
चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
Submitted by अमरेंद्र बाहुबली on मंगळवार, 27/02/2024 - 10:42
सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.
Submitted by रेवती१९८० on गुरुवार, 22/02/2024 - 11:29
"सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.
Submitted by irawatiKhan on बुधवार, 14/02/2024 - 03:46
सोसायटीमधल्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं काल आम्ही सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरवलं. एक तर व्हॅलेंटाईन हा तमाशा आपला नाही. ती परक्यांची थेरे. आपली प्रभुरामाची भूमी. सीतामाईने नाही म्हंटले प्रभूंना 'व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करूया.' इथे या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. समाजाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. आपल्या परीने आपण समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, हाच आमचा विचार. पाचव्या मजल्यावरील ठाकरे सेक्रेटरी आहेत. त्यांना म्हंटलं, सरळ एक पत्रक छापूया. आणि डकवूया लिफ्ट जवळ. वाटलं तर लिफ्ट मध्ये, एवढंच काय प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया.
Submitted by irawatiKhan on मंगळवार, 13/02/2024 - 15:14
आज सकाळपासूनच टीव्ही लावला. इतकं पवित्र वाटत होते. लवकर उठलो. हिने १५ दिवसापूर्वीच उटणे आणले होते. ते काय आहे, कोपऱ्यावरच्या जोश्याकडे श्रीराम प्रतिष्ठापनादिनानिमित्त सुवासिक उटणे, गंध, उदबत्या आल्या आहेत. पेढे पण ठेवले आहेत. सातारी कंदी पेढे आण म्हंटले हिला. तर म्हणे शुगर सांभाळा आधी. अरे श्रीराम आहे माझा .. बघेल तोच. तोच काळजीवाहू, तोच जीवनदायी. या दिवशी पेढे नाही खायचे तर कधी? बायकोशी वाद घालण्याइतका वेळ नाही माझ्याकडे. मग मीच आणले जाऊन पेढे. शुगर काय शिंची.
Submitted by मन१ on शुक्रवार, 22/12/2023 - 09:21
"...तो बघा किचक. जुलमी आहे."
"अरे! पण लोक त्याच्या पाठीशी आहेत. तो करतोय ते बरोबरच आहे."
"किचक असता तर भीमानं मारला असता"
"बरोब्बर. मेला नाही, त्या अर्थी हा किचक नाहीच. सद्गुणांचा पुतळा आहे. सत्याचा विजय होतो हे खरं असेल तर ज्याचा विजय झालाय ते सत्यच असलं पायजे"
"तो सत्य आहे, म्हणजे रडणाऱ्या दासी, सेविका ह्या खोटरड्या स्वार्थी हलकट नीच आहेत. त्या मेलेल्या बऱ्या. त्यांना टांगता आलं नाही तरी निदान त्यांनी बूट टांगले हे उत्तमच केलं."
खदाखदा हसण्याचा आवाज.
पाने