गुलामांवर पाळत ठेवणाऱ्या पथकांचे 'कल्चर ".

काही महिन्यापूर्वी अमेरिकेत बाल्टिमोर या शहरात फ्रेडी ग्रे नावाच्या कृष्णवर्णीय तरुणास कल्पित अपराधावरून पोलिसांच्या गाडीत कोंबले गेले . त्याचा हात-पायात बेड्या होत्या , पण त्याचा गाडीचा सीट बेल्ट लावलेला नव्हता . पोलिसांच्या गाडीने वेगात वेडीवाकडी वळणे घेतली , आणि सावरता न येउन मानेचे मणके तुटून त्यात फ्रेडी चा मृत्यू झाला . या वर्षातच अमेरिकेत पोलिसांच्या हातून १३४४ निःशस्त्र काळे तरुण मारले गेले आहेत .
नशिबाने फ्रेडी च्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सहा पोलिस अधिकाऱ्यांवर खटला भरला गेला आहे (त्यात तीन जण कृष्णवर्णीय आहेत ) पण त्यातल्या एका पोलिसाला आज एका कृष्णवर्णीय जज ने पुरेशा पुराव्या-अभावी निर्दोष मुक्त केले .
बाल्टिमोर मध्ये गरीब काळ्यांच्या वस्त्या पूर्णपणे विलग आहेत . जज च्या वरील निर्णयामुळे बाल्टिमोर आज संतप्त आहे, आणि कधीही प्रचंड दंगली उठू शकतील . ग्रे च्या मृत्यू नंतरही मोठ्या दंगली उसळल्या होत्या .
अमेरीकेत्तील पोलिसांचे 'कल्चर " हे अजूनही पूर्वी गुलामांवर पाळत ठेवणाऱ्या पथकांचे आहे . काळ्यांना गोळ्या घालण्याच्या बाबतीत पोलिस बिनधास्त असतात!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

Oh, that's interesting!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑन द रन या पुस्तकाबद्दल इथेच (ऐसीवरच) ऐकलेले आहे.
http://www.ted.com/talks/alice_goffman_college_or_prison_two_destinies_o...
हा टेड टॉक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही अमेरीकेत असाल मिलिंद तर डोनाल्ड कडे तुमची चहाडी केलीच पाहिजे मला, तुम्हाला डीपोर्ट करायची गरज आहे.

आणि तुम्ही भारतात असाल तर चालु दे तुमचे रडगाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://aisiakshare.com/node/5070#comment-128318

अनुताई काहो ज्याला त्याला डिपोर्ट करणे, भारतातच सिटीझनशिप सोडून यायची आग्रही निमंत्रणं देणे, डोनाल्डने ग्रीन कार्ड परत घ्यावीत असे सारे आग्रह करताय?
सर्वांचीच बत्तीशी खरी नाय ठरत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0