दुपार

आमच्या गावात आज, आत्ता कुठे पहीली टळटळीत दुपार एक वर्षानंतर उगवली आहे. इतके दिवस बर्फ, पाऊस, ढगाळ हवाच होती. खरच खूप मस्त वाटते आहे, अशा उन्हामध्ये, गरम हवेत, चित्तवृत्ती उत्साहीत झालेल्या वेळी, ती दुपार आठवली नसती तरच नवल.

~ One day you will take my heart completely and make it more fiery than a dragon.
Your eyelashes will write on my heart the poem that could never come from the pen of a poet. ~

.
गर्दीत होते का ते दोघेजण? होय खरच अतोनात गर्दी होती. परिचित, अपरिचित, मित्र, नातेवाईक, ओळखीचे आणि अनोळखी सारेच आजूबाजूला होते. दोघांचेही लक्ष वेधून घेत होते, काही सटरफटर बोलत होते. एकांत मिळण्याची संधीच नव्हती, बिलकुल नव्हती. हवा होता एकांत, फार फार, खूप हवा होता आणि भेट मात्र झाली ती गर्दीत. पण प्रेमाला त्याचे काय? प्रेमाला ना अडसर असतो ना बंधने. वळणावळणाने समुद्राकडे धावणारी अवखळ नदी , वार्‍यावरती गिरक्या घेत टप टप पडणारे पाऊसाचे थेंब की फुलांचा सुगंध, या सर्वांसारखेच मनस्वी पणे प्रेम हे रस्ता शोधून काढतेच.
.
चेहरा मेरा था निगाहें उस की
ख़ामुशी में भी वो बातें उस की

.
आणि एवढ्या पसार्‍यात त्याचे डोळे माझ्यावर खिळले होते ना मला गर्दीचे भान राहीले ना त्याला. त्याच्या नजरेचे अस्तित्व माझे संपूर्ण मीपण बनून गेले. गर्दी धूसर होत गेली, विरळ होत गेली, धुक्यात गडप झाली आणि उरली फक्त त्याची एकाग्र, टोकदार नजर. त्या डोळ्यात मी हरवले आणि एवढ्या प्रखर उन्हात, आमच्या मौनातूनही आम्ही एकमेकांत विरघळत राहीलो. सोमकांत मणी जसा चंद्रप्रकाशात वितळतो त्याचे मौन माझ्या रक्तात विरघळत राहीले. आणि दोघांनाही धुंदी, चढत राहीली. काय की आम्ही अन्य लोकांना सोइस्कर, अगदी तर्कशुद्ध उत्तरे तर देत होतो, त्यांच्याबरोबर बोलत तर होतो आणि तरीही कोणत्यातरी समांतर जगात, फक्त दोघेच एकमेकांना नजरेने पीत होतो.
.
मेरे चेहरे पे ग़ज़ल लिखती गईं
शेर कहती हुई आँखें उस की

.
त्या डोळ्यात मी काय वाचले नाही? नजरेनेच माझ्यावरती एक हळूवार गझल तो रचित गेला आणि ती धीट, ऊष्ण नजर मी पीत गेले. माझा चेहरा जणू गुलाबी , सुगंधी प्रेमपत्र झाला होता, ज्यावर तो काव्य करत गेला.मी मोहरत .
राहीले. माझा श्वास सुगंधी होत राहीला. एवढ्या गर्दीत गुप्तपणे,त्याची फक्त त्याची होत राहीले. नजरेने माझे एकेक अवगुंठन तो उतरवत गेला, मी गात्रागात्रात त्याने लिहीलेली गझल त्या दिवशी, शोषून घेत गेले.

.
ध्यान में उस के ये आलम था कभी
आँख महताब की यादें उस की

.
जेव्हा जेव्हा विरहात मला त्याची आठवण येते मला तीच दुपार आठवते. अशी रखरखीत दुपार जी माझ्याकरता चांदणी रात्र बनून बरसत राहीली, जिच्यात मी मनसोक्त नहात निघाले, डुंबत राहीले, चांदणझोक्यावरती मला झुलवत राहीली.त्याचेच विचार, त्याची स्वप्ने, तो असा बोलतो, तो असा चालतो, असा कटाक्ष टाकतो तो असा हसतो. नाही आमची भेट मी विसरु नाही शकत. जेव्हा जेव्हा मला तो आठवतो, वेळ कोणतीही असो, आकाशत चंद्र उगवतो.
.
नीन्द इस सोच से टूटी अक्सर
किस तरह कटती हैं रातें उस की

.
आता तो काय करत असेल, पुस्तक वाचत असेल, मद्यचषकात स्वतःला झोकून देत असेल, गाण्यांच्या सुरावटीवर हिंदोळत असेल की .... की माझ्या आठवणीने धुंदावुन गेलेला असेल. त्याला माझी आठवण तरी येत असेल का त्याला ती दुपार व्याकुळ करत असेल का? विरहात तो देखील माझ्याकरता पोळून निघत असेल का? की हे सर्व फक्त माझ्या मनाचेच खेळ?
.
दूर रह कर भी सदा रहती है
मुझ को थामे हुए बाहें उस की

.
परत भेटणे शक्य नाही हे मी जाणते. वास्तव काही असेल तर तो आहे हा दुरावा. पण कल्पनेत तर मी त्याची होऊन राहू शकते, त्याच्या बाहूपाशात बद्ध शहारु शकते. स्वप्नांना ना नैतिकतेचे बंधन, ना समाजाचे. माझ्या कल्पनेच्या राज्यात त्याच्या मीठीत बद्ध होत, त्याने त्या दिवशी, पापण्यांनी लिहीलेली ती गझल मी पुनःपुनः वाचू शकते.
.
फ़ैसला मौज-ए-हवा ने लिक्खा
आँधियाँ मेरी बहारें उस की

.
तो आला तोच वसंत होऊन माझ्यावर सुगंधाची, कोमलतेची लयलुट करत. माझ्याकरता मात्र ती एक वावटळ ठरली, अशी वावटळ जिने जुन्या मला पार उडवुन लावले आणि एक नवीनच रुपाला, मूर्तीमंत समर्पणाला जिने जन्म दिला. असे होते का कधी? दोन प्रेमिकांकरता एक वसंत बनुनयेतो तर दुसरा वावटळीत सापडतो. मला पूर्वी कधी वाटले नसते असे होऊ शकते पण पूर्वी मी त्याला भेटले देखील तर नव्हते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile

खूप छान तरल लिहितेस तू शुचि ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवीना शाकीर यांच्यासारखं नेमकं आणि कॉन्सन्ट्रेटेड + तरल २ ओळींत लिहीता येत नसल्या कारणाने असे सो कॉल्ड तरल उतारेच्या उतारे रचावे लागतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अशी रखरखीत दुपार जी माझ्याकरता चांदणी रात्र बनून बरसत राहीली, जिच्यात मी मनसोक्त नहात निघाले, डुंबत राहीले, चांदणझोक्यावरती मला झुलवत राहीली.त्याचेच विचार, त्याची स्वप्ने, तो असा बोलतो, तो असा चालतो, असा कटाक्ष टाकतो तो असा हसतो. नाही आमची भेट मी विसरु नाही शकत. जेव्हा जेव्हा मला तो आठवतो, वेळ कोणतीही असो, आकाशत चंद्र उगवतो."
Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इक बार वक्त से लम्हा गिरा कहीं,
वहां दास्तां मिली, लम्हा कही नही!
.
http://www.platris.com/httpdocs/images/leaninglovers_r2_c15.jpg
.
साभार - http://www.platris.com/leaninglovers.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है
लोग कहते हैं के बस हाथ की रेखा है
हमने देखा है दो तक़दीरों को जुड़ते हुए..
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चार बार आणलेत तरी कसे?
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे ते कोटस आहेत ना एच टी एम एल पॅनलवरती ते रीपीट केलेत ४ दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक आडवी लाईन जोडली कि अर्थिंग/ग्राउंडिंगचे चिन्ह तयार होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह शूट तुला कळलय ज्की अगोदरच. मूर्तिमंत डँबिसत्व बाळगतोस बॅट्या!!! Wink
मी झोपेत आहे बाबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संध्याकाळ नि ग्रेस हे अद्वैत प्रसिद्ध आहे पण त्यांच्या कवितांत दुपारही एके ठिकाणी आलेली आठवते-

दुपारचे सचित्र ऊन मृगजळास लांबवी
अनंत इंद्रियांतले स्वतंत्र शोक जागवी
जिथे उभारली घरे तिथे अपार शून्यता
दुपारच्या उन्हातली विचित्र एकसंधता
समुद्र आटतील का ? अतर्क्य सूर्य वाहतो
अशी अवेळ साधुनी मनात कोण हिंडतो‌‌?
तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा
उन्हात पाय वाजती कुणात जीव गुंतला..

- ग्रेस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर आणि थोडी तरी कळेल असे वाटून देणारी. इथे दिल्याबद्दल धन्यवाद अमुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पामराला याचा अर्थ - अर्धामुर्धा, 'तुम्हाला कळलेला', "साधारण असा असेल बहुदा" अशा कॅटॅगरीतलाही चालेल - कोणी सांगेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मृगजळ व जीव गुंतणे यातून हूरहूर जाणवली मला. बस्स! बाकी मग त्यांचा तो शब्दातीत अनुभव. सलग व्याकुळ शब्द गुंफुन मांडण्याचा विफल आणि फोल फॉर अ गुड रीझन, प्रयत्न केलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भगवंताच्या काव्याला मायमराठीत आणणारे जसे माऊली होते तद्वत कविराजांच्या शब्दांना ज्येष्ठ इंडो-चायनीज तज्ज्ञ भाऊ-ली लवकरच सुलभ मराठीत आणणार आहेत. ष्टे टून्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दुपारचें ऊन … [संध्याकाळच्या कविता]
“दुपारचे सचित्र ऊन मृगजळांस लांबवी
अनंत इद्रियांतले स्वतंत्र शोक जागवी…
जिथे उभारली घरें तिथे अपार शून्यता
दुपारच्या उन्हातली विचित्र एकसंधता …
समुद्र आटतील का?अतर्क्य सूर्य वाहतो
अशी अवेळ साधुनी मनांत कोण हिंडतो ?
तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा
उन्हात पाय वाजती कुणात जीव गुंतला… “
दुपारच्या असह्य उन्हामुळे मृगजळाचा भास निर्मित होत आहे आणि पाण्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर येत आहे.या उन्हामुळे अनेक माणसांचे आपापले दु:ख प्रकट होत आहे. कोणी घराबाहेर दिसत नाही कारण उन्हामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत.मला भीती वाटते की सूर्याच्या या कल्पनातीत वागण्यामुळे समुद्रातले पाणीही आटून जाईल का? पण अशा अवेळी ही मला कोणाची तरी आठवण येत आहे. मी तृषाक्रांत झालो आहे आणि तीव्र उष्म्यामुळे तुझा गळाही निळा पडला आहे.पण अशा भयंकर उन्हातही तू मला भेटावयास येणारी प्रिय व्यक्ती कोण आहेस ?

_________________-
From the book:
'ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे' [उत्तरार्ध]
ग्रेसच्या कविता भाग - २
[प्रकाशन वर्ष 2016]
लेखक: श्रीनिवास हवालदार
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. विजयानगर विजयानगर कॉलनी. पुणे-411030,महाराष्ट्र,

फेसबुक वरुन साभार..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं आहे होय? पण मग हे असं अतर्क्य लिहिण्यापेक्षा माझ्यासारख्या तमाम 'रामभाउना' कळेल असं का नाही लिहीत? म्हणजे साधारण हे असं;

उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी
सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी

जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती
वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली

ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी
सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी

अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे?
तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी

भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे?
ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?

पण मग श्रीनिवास हवालदार काही ही कविता उलगडून सांगायच्या भानगडीत पडले नसते, त्यांच्या पोटावर पाय उगाच Blum 3 Blum 3

ता.क.: "जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती" - शेवटचा शब्द नीट वाचा हां. 'ठ' चा 'थ' केलात तर 'गृहात'चा संदर्भ भलताच लागेल ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आवरा!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नतमस्तक.. हाहाहा.. 'थ' म्हणे.. लोल.. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवर्त नभ एकटे सतत तापलेली हवा
उन्हात जणु मैथिली तुझशी शोधते राघवा ,
विवस्त्र मृगतंद्रीने क्षितिज वाहते की पुढे,
तृषार्त बिलगे मला सभय चातकांचा थवा .

तुझे तटचि पांगळे तरीही विश्व यावे गळी ...

(जाऊ दे, दमलो!) पण दुपारबद्दलच्या ग्रेस यांच्या कवितात हीही धरली जावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अरे वा! कवितेतील प्रतिमासृष्टीसोबतच पृथ्वी वृत्ताच्या चालीत म्हणताना अजून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे को की! ही विसरलोच होतो. आभार!
त्या निमित्ताने खवचट खान यांच्या 'कोंबडी का पळाली?' या अजरामर धाग्यावर दिलेला स्वतःचाच प्रतिसाद आठवला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती सुंदर लिहीलय! शुची, 'नेमकं आणि कॉन्सन्ट्रेटेड' वैगेरे तेव्हढ्याच नेमकेपणाने पण सविस्तर सांगता येणे ते ही त्यातला भाव न हरवता, ही सुद्धा कला आहे. फार छान जमतं ते तुला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंतरा धन्यवाद. अजुनी न्याय झालेला नाहीए. एक लेख लिहीन अजुन पण कसा परफेक्टो!!! आज प्रयत्न करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात.

.
capable हात - प्रेमळ हात - कलाकाराचे हात - कामगाराचे हात - पापी माणसाचेही हातच - शी! ते जाऊ देत!
माझ्या प्रियकराचे हात - माझ्या प्रियकराच्या हातात गुंफलेले माझे हात!
एवढं आकर्षण का वाटतं आपल्याला हातांचं. हातांबद्दल का इन्टेन्स भावना मनात उमटतात - मग त्या loathing, संताप, घृणेच्या असो अथवा कोवळ्या तरल आठवणींनी भिजलेल्या असो. बरं आपले हात अजिबातच सुंदर नाहीत. नखं खाल्लेले हात सुंदर दिसावेत कसे? आपलं जाऊ देत. त्याचे हात कसे होते? मऊ - किंचीत खरखरीत -ऊष्ण आणि आश्वासक.
काय तर म्हणे तुझं भविष्य सांगते. करणार काय इतके लोक आजूबाजूला असताना, तुझा हात हातात धरणार तरी कसा. आणि हात धरला नाही तर मनातील गूज तुझ्यापर्यंत पोचणार तरी कसं! मग आयडीया केली - तुझे रवि-चंद्राचे ऊंचवटे तुलाच दाखवत गेले, त्या उंचवट्यांवरुन नदीसारख्या झेपावणार्‍या रेषांवरती माझ्या बोटांनी रेखाटत गेले.
ही बघ ही रवीरेषा
.... किती छान वाटतं तुझा हात हातात धरायला.
हं तुझी अंतःकरण रेषा उत्तम आहे.
.....नाही ना सोडायचा हात मला.
अन्य उंचवट्यावर नको पण शुक्रावर जाळी हवी बरं का.
.....हा क्षण फ्रीझ होऊ देत. मला नाहीच मुळी सोडायचा तुझा हात.
.

I wish to write a poem about
the lush green prairies of singing birds.
our palms turn into,
when we cup them in each other's palms

.
तुझा हात प्रथम हातात धरला होता तेव्हा खरच मला भास झाला - कुठेतरी किलबिलत्या पक्ष्याची पिल्ले घरट्यामधुन पहील्यांदा झेप घेत होती. कुठेतरी उल्कापात होताना, टपटप चांदण्या सांडत होत्या. केशरी देठाच्या नाजूक शुभ्र प्राजक्तफुलांचा सडा ढगाळ, कुंद हवेत नक्की कुठेतरी ओल्या मातीवर पडत होता.
.
ते जाऊ देत. कॉफी येईपर्यंत....मला भविष्य सांगण्याचे ढोंग वठवता येतय. : )
हं, अरे ही बघ तुझी रवीरेषा केवढी खोल आणि तेजस्वी आहे.
...... मला जितकं आवडतं तितकच तुला आवडतय का? सांग ना आवडतय का? ट्रा ला ला ला....
ह्म्म्म चंद्रावरील रेघा, म्हणजे परदेशप्रवास. भरपूर आहे बरं का.
.... खरं तर फक्त हातात हातच धरायचा का? अजुनही काहीच प्रगती नाही होणार का? ...

नाही होणार दुपारी भर रखरखीत उन्हात कॉफीची वाट पहाताना, आजूबाजूला नातेवाईक, मित्रांचा कोलाहल असताना अधिक प्रगती होणार नाही. पण मिळालं तेवढही कमी नव्हतं.
.
परत गुलजारच आठवतात..

जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है
लोग कहते हैं के बस हाथ की रेखा है
हमने देखा है दो तक़दीरों को जुड़ते हुए..

__________

.
Wise men say Only fools rush in
But I can't help Falling in love with you.
.
Shall I stay Would it be a sin
If I can't help Falling in love with you
.
Like a river flows Surely to the sea
Darling, so it goes Some things are meant to be
.
So take my hand Take my whole life, too
For I can't help Falling in love with you

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता, गद्य , "proem" आवड्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय मस्त लिहिलंय शुचि ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तापल्या दुपारच्या वेळेला शुद्ध सारंग ऐकायला छान वाटतो म्हणतात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेसच्या लेखात आलेली हि आणखी एक दुपार..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच सुंदर, आवडली. हिवाळी दुपार मलाही आवडते. पण उन्हाळी दुपार एखाद्या राक्षसी सारखी भासते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0