चवथ्या घरातील प्लूटो

http://i2.wp.com/1.bp.blogspot.com/-6OG97DdJlvU/VEMqze9nHwI/AAAAAAAARJs/fwUbZ45HJi8/s1600/tumblr_maklsqqnly1qbsjqno1_500.png?resize=312%2C400
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.
भेसूर, भीतीदायक, थंड रक्ताचा, चेहरा लपवलेला खुनी कोणी असेल तर तो प्लूटो. मुळापासून उखडून काढणारा, Transformative , संपूर्ण उलथापालथ करणारा ग्रह कोणता असेल तर प्लूटो. असा अनुभव (ग्रह) खरं तर कुंडलीतील कोणत्याच घरात स्वागतार्ह नाही पण least of all चवथ्या घरात. जे घर कुंडलीचे गर्भाशय मानले जाते , कुंडलीतील सर्वाधिक vulnerable स्थान. लहानपणीचे घरातील वातावरण, घरातली परिस्थिती पोषक होती की अन्य काही ते जे स्थान पाहून कळते ते चवथे घर. खरं तर भावी आयुष्यात subconscious reflexes कसे होणार ते ठरविणारे स्थान.
.
प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही.
प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.
.
पूर्वी मी वाचलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू देते आहे -
.
काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "" पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत.
(१) पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना. या १८ वर्षाच्या मुलाने २ लहान मुलींचा (वय वर्षे १२ व १३)खून करुन, नंतर त्यांच्या शवांवर बलात्कार तर केलाच तरीही त्याच्या राग शांत होईना तेव्हा बूटांनी त्यांना चिरडले.
पण हे सर्व प्रक्षोभक आणी हिंसक व भडक लिहीण्यासाठी हा प्रतिसादप्रपंच नाही तर त्या मुलाशी व त्याच्या पालकांशी बोलून या मानसोपचारतज्ञाला जी "इनसाईट" मिळाली ती मला सांगायची आहे.
या मुलाची आई जी डोक्याने थोडी अधू होती, तिला मुलाचे रडणे सहन न झाल्याने, या मुलाला तान्हे असताना अंधार्‍या खोलीत रडत ठेऊन बाहेर निघून जात असे. असे महीनोंमहीने केल्याने त्या बाळाचे रडणे तर थांबले पण मानवी संपर्कातून जी ऊब व माया मिळते ती न मिळाल्याने, हा मुलगा माणसांवर विश्वास टाकणे, त्यांच्या सकारात्मक प्रोत्साहनास प्रतिसाद देणे , त्यांच्या भावनांशी एकरुप होणे अशा काही मुलभूत "ट्रिगर्स्"पासून वंचित राहीला. त्यातून त्याच्या संतापाचा, "सहानुभूती व सहवेदनेच्या अभावाचा" जन्म झाला.
लेखकाने खूप सोप्या पण वैद्यकीय भाषेत हे उलगडून दाखविले आहे. पुस्तक खाली ठेववतच नाही. या पुस्तकातील अन्य लहान मुलांच्या कथाही अशाच विद्रावक, भयानक पण दु:खाचा कढ आणणार्‍या होत्या. एक वेगळ्याच विषयावरचे पुस्तक.
गुडी -गुडी (गोग्गोड) पुस्तकांपेक्षा फार वेगळ्या अन व्यावहारीक विषयावरचे पुस्तक असे म्हणेन.
.
हे पुस्तक लायब्ररीत मिळाले. सर्वच कथा विचित्र व हृदयद्रावक वाटल्या.बालमानसोपचारतज्ञाचे काम इतके अवघड असेल याची कल्पना नव्हती.
(२) एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ तासांनी सापडल्यावर काही महीन्यांनी तिने फोटोच्या ढीगातून त्या खून्याला ओळखले. पुढे विटनेस म्हणून तिला वापरणार होते पण त्याची पूर्वतयारी म्हणून ती ४ वर्षाची असताना बाळाला मानसोपचारतज्ञाकडे पाठविले गेले.अन मग थेरपी सुरु झाली.
की मुलगी काय करत असेल बरं थेरपीत? तर डॉ. पेरींवर विश्वास बसल्यानंतर ती हळूहळू ओपन अप झाली व "तो' सीन स्वतःची स्वतः एनॅक्ट करु लागली. ती पेरींना हात बांधल्यासारख्या कल्पित अवस्थेत झोपवत असे.थोपटत असे, मधेच जाऊन दूध आणे व देई,खेळणे आणे व देई. पेरी अर्थातच 'त्या आईची" भूमिका करत असल्याने हालचाल करत नसत.मग ती त्यांच्या अंगावर झोपून "रॉक अन हम" करत असे.कधी रडत असे/हुंदके देत असे.हे असे दर सेशनमध्ये होई.या थेरपीचा की पॉईंट हा होता की त्या मुलीला सिचुएशनचा पूर्ण "कंट्रोल" पेरींनी दिला. जो कंट्रोल तिला "तेव्हा" मिळाला नाही तो या सेशनमध्ये तिला दिला गेला. अन हीलींग सुरु झाले.
पुढे ही मुलगी खूप 'प्रॉडक्टीव्ह" आयुष्य जगली,जगते आहे. तिला उत्तम ग्रेडस मिळाल्या. तिचे स्वतःचे कुटुंब आहे. ती एक द्याळू व संतुलीत व्यक्ती आहे. शी इज जस्ट डुईंग फाईन.
.
अर्थात फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागली.क्लोनॉडीन नावाच्या औषधामुळे तिचे निद्रेविषयक बरेच प्रश्न सुटले, बेल वाजल्यावर दचकणे आदि भीती दूर झाली वगैरे. याच कथेत औषधोपचारावरती एक फार मार्मीक मिमांसा केलेली आहे. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.
पुढेही सोप्या वैद्यकीय भाषेतील खूप विश्लेषण या कथेत वाचावयास मिळते.
ही कथा व हे एकंदर पुस्तकच मानवी मेंदूची गुंतागुंत सोडविणारे वेधक वाटले.
(३) एक शेवटची "केस" सांगते. अँबर नावाची मुलगी स्वतःच्या मनगटावर रेझर/सुरीने "कट्स" देत असे. बरेचदा असे "सेल्फ्-म्युटिलीएशन" करणार्‍या मुलामुलींचा भूतकाळ अंधारमय/यातनामय असतो आणि अँबरही याला अपवाद नव्हती.
७ वर्षाची असल्यापासून तिच्या सावत्र वडीलांनी केलेल्या लैंगिक शोषणाची ती शिकार होती. वडील दारु प्यायचे तेव्हा "तसे" वागायचे. भीतीमुळे तिने हे लपविले होतेच पण पुढेपुढे एकदाचे "ते" होऊन जाउ दे या हेतूने ती त्यांना दारु देणे/प्रव्होकेटीव्ह वागणे आदि करुन ती तो यातनामय प्रसंग हातावेगळा करत असे. पुढे २ वर्षांनी आईला ने वडीलांना तिच्याबरोबर पाहीले व हाकलून दिले. पण आईने काही मानसोपचारतज्ञाची मदत घेतली नाही.
लहानपणीच्या या स्मृती अँबरकरता इतक्या ओव्हरव्हेल्मींगली यातनामय होत्या की हळूहळू त्या स्मृतींपासून स्वतःला "डिसोसीएट" करायला ती मनगटावर "कट्स" देऊ लागली व "ट्रान्स" मध्ये जाऊ लागली. अशा प्रकारची मुले जे ड्रग्ज घेऊन साधतात ते ती स्वत:ला जखमा करुन साधू लागली.
तिला लहानपणाची लाज (शेम) व गुन्हेगार (गिल्ट) वाटे पण स्वतःला सुरक्षित करण्याची पॉवर तर हवी होती. यातून सुरु झाले एक समांतर आयुष्य!
प्रसंगी ती स्वतःला कावळा समजे. अतिशय चतुर/स्मार्ट पक्षी जो पॉवरफुल आहे, वाईटाचा पारीपत्य करणारा आहे. अन तो काळा हीडीस आहे, कोणालाही नको असलेलाही आहे. हवे तेव्हा ती त्या जगात निसटून जाई , जिथे ती कावळा असे. ती फक्त काळे कपडे घाले, शरीरावर काळे टटू रेखाटून घेत असे.
डॉ पेरींनी तिला कशी थेरपी दिली, तिला श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकविले, १ श्वास - १ पायरी- २ रा श्वास-दुसरी पायरी .... अशा १० पायर्‍या उतरुन तिला मनातल्या मनात जीन्याखालच्या अंधार्‍या पण सुरक्षित खोलीत जायला "स्मृती पासून डिसोसीएट करायला" शिकवले ज्यायोगे ती "कट्स" देईनाशी झाली.
पुढे याच थेरपीतून त्यांनी तिला हे पटवून दिले की जग "हीडीस समजून" तिला नाकारत नसून ती जगावर तिच्या शेम व गिल्टचे आरोपण करत एक सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी जगत आहे हे तिच्या लक्षात आणून दिले.
.
अर्थात औषधोपचारही लागलेच लागले. या औषधांचे मेंदूवर होणारे परीणाम व विश्लेषण केवळ वाचनीय आहे. या पुस्तकातून एक नक्की अर्थबोध झाला तो म्हणजे - बाळाची पहीली वर्षे फार फार नाजूक असतात अन आई -वडीलांचा रोल फार महत्त्वाचा (क्रुशिअल) ठरतो. दुसरे एक कळले ते हे की मुलांना रुटीन/एक स्ट्रक्चर (साचा) लागते. एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
.
प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे.

.
वरील पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे कारण बालमानसोपचारतज्ञाने लहान वयात घडलेल्या दुर्दैवी घटनांवर, trauma वरती यामध्ये भाष्य केलेले आहे. चवथे घर = बालपण, हिडीस life-altering/transforming trauma = प्लूटो
abuse मग तो लैंगिक असो की मानसिक, शारीरिक तो चवथ्या घरातील प्लूटो दाखवितो. ज्या घरात रात्री आश्रयाला जायचे, सुखेनैव निद्राधीन होण्याकरता जिथे आसरा शोधला तेच घर वखवखलेले , भुताटकीच्या पछाडलेले निघाले तर? चवथे घर हे जातकाच्या कुंडलीतील मध्यरात्र दाखविते, त्याचे घरटे, solace मिळण्याचे स्थान दाखविते. निदान इथे प्लूटो सारखा खुनी, अशुभ सैतानी ग्रह दडू नये.
ल्युसील क्लिफ्टनची कविताही पूर्वी उद्धृत केलेली होती ती परत देत नाही फक्त त्या धाग्याकडे निर्देश करते - http://www.aisiakshare.com/node/3596
.
प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. बरेचदा प्लूटो चवथ्या घरात पडलेली मुले अकाली प्रौढ तर होतातच पण त्यांच्या स्वसंरक्षणाचे एक callous mechanism तयार होते. हे जेव्हा मी वाचते तेव्हा मला वर सांगीतलेली ३ री केस आठवते. स्वतःला वास्तवापासून तोडून टाकून स्वप्नसृष्टीत रममाण होण्याची, अगतिकता, लाचारी, हतबलता.
.
प्लूटो हतबलता जाणवून देणारा अत्यंत dark, omnipotent ग्रह आहे. आणि चवथे घर सर्वाधिक vulnerable घर. हे दोन forces एकत्र येतात तेव्हा खूप क्लेश-यातनादायक अनुभव जरुर येतो.
.
हे जरुर वाचा -
http://astrolocherry.com/post/83371212060/astrolocherry-pluto-in-the-4th...
http://theastrologyplacemembership.com/2010/08/pluto-in-4th-house/

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

पंचम स्थानातील नेपच्यून चा काय प्रभाव पडतो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचलं-भावलं-कळलं-पटलं-ममत्व वाटलं तर १००% लिहीन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नका वाचू असलं काही !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

This is one of the best books थत्ते. त्या मानसोपचारतज्ञाच्या केसेस भयानक असतील पण त्याचं लहान मुलांच्या भावविश्वाचं अंडर्स्टँडींग नि-व्व-ळ जबरा आहे. जबरदस्त पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लूटो चा शोध लागल्यावर अजून २४८ वर्षांची एक प्रदक्शिणा तरी पुर्ण होउ द्या.कुंडलीतली बारा राशी तर फिरु द्यात. भारतीय ज्योतिषि त्याचा फार विचार करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

राशी नाय ओ घाटपांडे घरात.... घरात तर १२ च्या १२ फिरलाय की प्लुटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो तर एका दिवसात फिरतोय. अर्थात बारा राशी फिरेपर्यंत आपल्या लई पिढ्या जातील. सध्या घरातच भागवून टाकू चला! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्लुटो नसला/नव्हता तेव्हाही भागवत होतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसा काय? माझी समजा चवथ्या घरात वृषभ रास आहे म्हणजे कुंभ लग्न. प्लूटो त्या काही वर्षांमध्ये वृषभेचा आहे असे समजा मग माझ्या चवथ्या घरात तो ठाण मांडून नाही का बसणार? आता वृषभ तुमच्या १२ व्या घरात आहे म्हणजे मिथुन लग्न तर मग प्लुटो तुमच्या १२ व्या घरात नाही का ठाण मांडणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बारा घरं! कसले कसले ग्रह असतात लोकांचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे बरोबर आहे की हळू फिरणाय्रा ग्रहांच्या राशींना काही महत्त्व नसणार.एक वर्ष असणारा कर्केचा गुरू सगळ्यांच भलं करेल की.
प्लुटो अगोदर हे सर्व चतुर्थ स्थानावर होतं,त्यातले ग्रह वगैरे.एकूण त्यात प्लुटोच्या वाइटाचीच भर पडली.मीनेचा चंद्र व्ययात ( चतुर्थेश स्वामी आणि मानसिक सुखाचाही कारक व्ययात ) असले योगही भर घालत असतीलच.परदेशात क्रूरपणा जरा जास्तच आहे का?भारतात असा योगवाले कसे वागतील ? अमुक एक गोष्ट मिळवायचीच या हट्टापायी जरा अधिकच कडक वागतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्केचा गुरुही पुष्येचा असवा लागतो.
बाकी होय प्लूटो चा प्रभाव जास्त करुन पीढीवरुन पाहीला जातो.
परदेशात क्रूरपणा जास्त आहे असे वाटते. माझे असे नीरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0