हो...! मला तुमचा पैसा हवाय...-मर्लिन मुनरो

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड/चार

‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...! पण त्यांत गैर काय...तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं का...? नाही ना...तुम्ही तिच्या करितां एखादा पैसेवाला मुलगांच शोधला असतां...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...?’

हा युक्तिवाद बॉलीवुडच्या चित्रपटांमधे कधीच बघायला मिळाला नाही. चित्रपटांमधे एक दृश्य हमखास आढळतं की नायिका गरीब आणि नायक हा एका कोट्याधीशाचा मुलगा असतो. मुलाच्या प्रेमाबद्दल कळल्यावर बाप त्या मुलीकडे जाऊन किंवा सिचुएशन प्रमाणे तिला आपल्या पैशाचा धाक दाखवून धमकावतो-

‘माझ्या मुलावर प्रेम नसून तुझा डोळा माझ्या पैशांवर आहे...माझ्या मुलाचा नाद सोडण्याकरितां तुला किती पैसे हवेत...? वगैरे-वगैरे...

यावर नायिकेचं उत्तर ठरलेलं असतं-

‘माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे...मला तुमचा पैसा नको...’

चित्रपट इतिहासात असे बरेच चित्रपट आहे ज्यांत ‘सासरा व नायिके दरम्यान झालेल्या करारावर’ संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा आहे...अगदी मीनाकुमारी पासून माला सिन्हा, रेखा पर्यंत...मोठी यादी आहे...आपल्या चित्रपटांमधे प्रसंगी नायिका-

‘मैं आपके बेटे की जिंदगी से दूर...बहुत दूर चली जाऊंगी जहां से मेरी छाया भी उन पर न पड सके...’

असं म्हणत नायकापासून दूर जाते...पण आपल्या भारतीय नायिकेने कधी चुकूनसुद्धा उलट प्रश्न विचारला नाही की-

‘हो...मला तुमचा पैसा हवाय, पण त्यांत गैर काय...!’

हा उलट प्रश्न 1953 साली आलेल्या ‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ या चित्रपटांत मर्लिन मुनरो ने आपल्या होणारया सासरयाला विचारला होता...

‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ पैसेवाला जोडीदार शोधत असलेल्या दोन मैत्रिणींची कहाणी होती. लोरालॉय ली (मर्लिन मुनरो) आणि डोरोथी शॉ (जेन रसेल) या दोघी मैत्रिणी अमेरिकन शो गर्ल्स आहेत. लोरालॉय ला हिरयांची अावड अाहे. ती पैसेवाल्या गॅस एसमंड (टाॅमी नूनॉन) च्या प्रेमात पडलीय. तर डोरोथी असा प्रियकर शोधतेय जो चार चौघांसारखा दिसणारा व प्रेमळ असेल.

दोघींचं एकमेकांवर जिवापाड प्रेम...इतकं की डोरोथी, लोरालॉय वर आपलं सर्वस्व ओवाळून टाकायला तयार असते. एकदा डोरोथीचा प्रियकर तिला लोरालॉयच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला देतो (फुकट...!) त्यावर ती (डोरोथी) त्यालाच कडक शब्दांत सुनावते-

‘खबरदार...माझ्या मैत्रिणीबद्दल पुन्हां असं काही बोललास तर...ती साधी भोळी मुलगी आहे...तिच्याबद्दल कुणी वाइट बाेललेलं मला बिलकुल चालणार नाही...’

पुढे एका घटनेत मदत बंद झाल्यावर त्यांचे पैसे संपतात. पर्समधील पैसे बघून डोरोथी एक कॉफीचा आर्डर देते. ऑर्डर सर्व झाल्यावर डोरोथी तो कप लोरालॉय कडे सरकवते...तर ती तो कप परत डोरोथी कडे ढकलते...डोरोथी एक सिप घेते नंतर लोरालॉय सिप करते...
हे सगळं नाट्य ‘वेन लव गोज रांग नथिंग गोज राइट...’ या गाण्या दरम्यान घडतं...या वेळेस दोघींच्या चेहेरयावरचे रिफ्लेक्सेस अप्रतिम असेच आहेत...

अशी असते त्यांची मैत्री...

लोरालॉय, गॅस सोबत फ्रांस मधे लग्न करायचा बेत ठरवते. पण नायकाचे वडील सीनियर एसमंड मुलाला तिच्या सोबत जाऊ देत नाही. दोघी मैत्रिणी नायका शिवाय फ्रांसच्या सफरीवर निघतात. बोट सुटण्या आधी नायक गॅस, लोरालॉय ला लेटर ऑफ क्रेडिट देतो, त्याप्रमाणे वाटेतील सगळा खर्च त्याचे वडील करणार आहेत. तो तिला बजावतो देखील की सफरी दरम्यान वागणूक नीट ठेव. कारण तुझ्या या सफरीवर आपलं भवितव्य अवलंबून आहे. (त्याच्या वडिलांना शंका असते की लोरालॉय ची लायकी आपली सून होण्याची नाही) म्हणून या सफरी दरम्यान हेर, अर्नी मेलोनी (इलियट रीड) कडून तिच्याबद्दल माहिती मिळवून मग ते आपला अभिप्राय देणार असतांत. म्हणून दोघी मैत्रिणी, लोरालॉय व डोराेथी सफरीवर निघतांत. आणि एक हेर (नायकाच्या वडिलांनी नेमलेला) त्यांच्यावर ‘नजर’ ठेवतो.

हिरे लोरालॉय चा वीक पाइंट...त्यांचा सहयात्री सर फ्रांसिस ‘पिगी’ बिकमेन (चार्ल्स कोबर्न) हिरयांच्या खाणीचा (डायमंड माइन्सचा) मालक आहे. त्याची बायको लेडी बिकमेन (नार्मा वर्डन) जवळ ‘डायमंड टियारा’ (हिरयांचा मुकुट) आहे. यात्रे दरम्यान ते मुकुट कुणीतरी चोरतं...या चोरीचा आळ मनरोवर येतो. या घटनेनंतर दोघा मैत्रिणींना, नायकाच्या वडिलांद्वारे मिळणारी मदत बंद होते. पण त्या दोघी या प्रसंगाने विचलित न होता पॅरिसच्या क्लबांमधे नाइट शो करुन-

‘वेन लव गोज रांग नथिंग गोज राइट...’

अाणि

‘डायमंड्स आर दि गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स...’

हे गीत गाऊन प्रेमभंगाचं दुख पचविण्याचा प्रयत्न करतात. कोर्टात सगळ्या गोष्टींचा खुलासा होऊन शेवट गोड होतो...

या चित्रपटांत ‘डायमंड्स आर दि गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स...’ या गीतानंतर लोरालॉय ली व नायकाच्या वडिलांची भेट होते...या भेटीचा प्रसंग, त्यातील सवाल-जवाब अप्रतिम असेच आहेत...

नायकाचे वडील गैरसमजातून प्रथम लोरालॉय ला, डोरोथी (लोरालॉयची मैत्रीण) समजून आपली पसंती दर्शवितात. पण हीच लोरालाॅय, त्यांच्या मुलाची प्रेयसी आहे, हे कळल्यावर ते तिला म्हणतात-

‘तू एक माडर्न, पैशाच्या मागे धावणारी लबाड मुलगी आहेस...पैशांकरितां तू वाट्टेल ते करायला तयार असतेस...’

यावर लोरालॉय उत्तर देते-

‘माझं हे रूप जगांकरितां आहे...या दुनियेत साध्या भोळयां मुलींचा वाली कुणीच नाही. पण मॉडर्न, फैशनेबल मुलींच्या पायावर जग लोटांगण घालतं...म्हणून जगापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी मला हे सोंग करावं लागतं...’

हे ऐकून ते प्रभावित होतात, तरी म्हणतात-

‘मला तर तुझ्याबद्दल काहीतरी वेगळंच सांगितल्या गेलं होतं...तू तर खूप चलाख, तेज दिसतेस. मला वाटतं की तुझं माझ्या मुलावर प्रेम नसून तुला माझा पैसा हवाय...’

यावर लोरालॉय स्पष्टपणे स्वीकारते-

‘यस मिस्टर एसमंड...,मला तुमचा पैसा हवाय...’

पुढे ती खुलासा करते-

‘पण त्यात गैर काय...! तुम्हाला जर एखादी मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं कां...! नाही ना...तिच्या करितां तुम्ही एखादा पैसेवाला मुलगाच शोधला असतां...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...!’

ते निरुत्तर होतात...

लोरालॉय पुढे म्हणते-‘डैडी...मला तुमच्या मुलाचं कौतुक वाटतं...त्याने माझ्या त्या रुपात देखील माझ्यावर विश्वास ठेवला...प्रेम केलं...म्हणूनच मला तो आवडतो, त्याच्यावर प्रेम आहे माझं...’

शेवट गोड होतो...

‘जेण्टलमेल प्रीफर ब्लाण्ड्स’ मधील लोरालॉय ली च्या रुपात वावरतांना मर्लिन मुनरोने एका मॉडर्न, चंचल, पैशांकरितां वाट्टेल ते करणारया मुलीची प्रतिमा पडद्यावर साकार केली होती.

पण सासरया समोर प्रांजळपणे ‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...!’ म्हणणारी मुनरो विसरतां येत नाही...

भारतीय चित्रपटांमधे हा युक्तिवाद, हा विचार कधीच बघायला मिळाला नाही.
-----------------

https://youtube/9HwGzNnVrWw

https://youtube/0Hp3000Dale

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखाच्या शीर्षकावरून विषय आवडता आहे हे समजले असूनही - लेख वाचला नाही. कारण एकच. लेखकाने मर्लिन मन्रो चा एकही फोटो इथे डकवलेला नाही. हा तिचा अपमान आहे. खरंतर नुसता फोटो टाकला असतात तरी भागलं असतं. पण नाही... क्लासी पणाचा अट्टाहास दुसरं काय ! Smile

दोनचार दणकट फोटो टाका तिचे ... मग आम्ही लेख वाचू. व मग प्रतिसाद देऊ. Smile

( आता लगेच - गब्बर तू फोटो का टाकत नाहीस !! असा प्रतिप्रश्न विचारू नका म्हंजे मिळवली. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्लिनचा विषय निघाला आणि फोटो नाही, बहूत गलत बात! हे घ्या....

Marlin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरिलिन मन्रो, बीचवर शिर्शासन करताना. #वल्ड_योगा_डे.

a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बॉर्र

गब्बर तू फोटो का टाकत नाहीस !! असा प्रतिप्रश्न विचारू नका म्हंजे मिळवली

असा प्रश्न न विचारता

गब्सु तू फोटो का टाकत नाहीस !!

असा प्रश्न विचारते. ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाच्या शेवटी मी दोन साइट दिल्या आहेत की...

फोटो कसा डकवतात ते जमत नाही हो...

साइट बघून ध्या न... जरा...प्लीज...

साइट पुन्हा देतोय

https://youtube/9HwGzNnVrWw

https://youtube/0Hp3000Dale

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

भारतीय चित्रपटांमधे हा युक्तिवाद, हा विचार कधीच बघायला मिळाला नाही.

मुद्दा बरोबर आहे.

पण बॉलिवूड हे भारतीय प्रेक्षकांना "जे हवं आहे" ते विकण्याच्या धंद्यामधे आहे. उदा. "पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ" वगैरे डायलॉग्स हे बहुतांश भारतीय लोकांना ऐकायला व पहायला खूप आवडतात. मग भारतीय चित्रपटांनी ते तसं दाखवलं तर त्यात चूक काहीच नाही. खरंतर पैसा व त्याचा अभाव यांचा चित्रपटसृष्टीने (आणि राजकारण्यांनी) अत्यंत मस्त वापर पैसा मिळवण्यासाठी केलेला आहे. पण आपल्याकडे ऐहिक बाबी धनसंपत्ती वगैरे ह्या अध्यात्मानुसारच अनिष्ट मानल्या गेलेल्या आहेत. गोंदवलेकर महाराज सुद्धा पैशाला "पैका" म्हणत असंत. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की जी गोष्ट अगदीच बिनमहत्वाची, कःपदार्थ आहे तिला असे संबोधतो.

नचिकेताची ष्टोरी सांगतात की नचिकेताला विश्वाच्या उत्पत्तीबद्दल जिज्ञासा होती. तो आपल्या पिताश्रींकडे गेला व त्यांना विचारले की विश्वाच्या उत्पत्तीबद्दल मला सांगा. पिताजींनी समोरच्या वटवृक्षाकडे बोट दाखवून म्हंटले की याचे बीज घेऊन ये. नचिकेत धावतपळत गेला व वडाचे फळ घेऊन आला. त्यातले बीज बाहेर काढले. वडाचे बीज आकाराने जेमतेम खसखशीएवढेच असते. नचिकेताने ते बीज फोडले. "छ्या !! आत काहीच नाही" म्हणाला. पिताजी त्यास म्हणाले की ह्या "काहीच नाही" ("nothing") मधून हा वटवृक्ष निर्माण झालेला आहे हे लक्षात ठेव.

"पैसा वाईट", "धट्टीकटी गरीबी व लुळीपांगळी श्रीमंती", "साधी राहणी व उच्च विचारसरणी" च्या गप्पा मारायच्या, "लोक पैशाच्या मागे लागलेले भोगवादी" असं बोंबलायचं आणि मग प्रत्यक्षात पैश्याच्या मागे लागायचं हा सामान्य भारतीय माणसाचा आवडता उद्योग असतो. शुभलाभ असं सांगणारी परंपरा असूनही लक्ष्मी ला वाईट म्हणायचं आणि मग लक्ष्मी नाही म्हणून रडायचं. एकतर ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला शिव्या घालायच्या आणि काही जमलं नाही तर त्याच्याकडून लक्ष्मी ओरबाडून घ्यायची. मागून वा ओरबाडून मिळत नसली की "माणूसकी राहीली नाही" किंवा "शोषण शोषण" असा कंठशोष करायचा. अमिताभचे अनेक चित्रपट हे ह्या "पैसा वाईट, माणूस श्रेष्ठ" संकल्पनेभोवती फिरतात. उदा. त्रिशूल. पण चित्रपटाच्या शेवटी सगळे हिरो-हिरॉईन्स श्रीमंत झालेले दाखवतात. भारतीयांच्या या मानसिक दुभंगलेपणामधूनच निर्माते लोक बक्कळ पैसा बनवतात. Capitalists make money out of this "nothing".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पैसा वाईट", "धट्टीकटी गरीबी व लुळीपांगळी श्रीमंती", "साधी राहणी व उच्च विचारसरणी" च्या गप्पा मारायच्या, "लोक पैशाच्या मागे लागलेले भोगवादी" असं बोंबलायचं आणि मग प्रत्यक्षात पैश्याच्या मागे लागायचं हा सामान्य भारतीय माणसाचा आवडता उद्योग असतो. शुभलाभ असं सांगणारी परंपरा असूनही लक्ष्मी ला वाईट म्हणायचं आणि मग लक्ष्मी नाही म्हणून रडायचं. एकतर ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला शिव्या घालायच्या आणि काही जमलं नाही तर त्याच्याकडून लक्ष्मी ओरबाडून घ्यायची. मागून वा ओरबाडून मिळत नसली की "माणूसकी राहीली नाही" किंवा "शोषण शोषण" असा कंठशोष करायचा. अमिताभचे अनेक चित्रपट हे ह्या "पैसा वाईट, माणूस श्रेष्ठ" संकल्पनेभोवती फिरतात. उदा. त्रिशूल. पण चित्रपटाच्या शेवटी सगळे हिरो-हिरॉईन्स श्रीमंत झालेले दाखवतात. भारतीयांच्या या मानसिक दुभंगलेपणामधूनच निर्माते लोक बक्कळ पैसा बनवतात. Capitalists make money out of this "nothing".

वा वा! एकच नंबर. जे बात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण आपल्याकडे ऐहिक बाबी धनसंपत्ती वगैरे ह्या अध्यात्मानुसारच अनिष्ट मानल्या गेलेल्या आहेत. गोंदवलेकर महाराज सुद्धा पैशाला "पैका" म्हणत असंत. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की जी गोष्ट अगदीच बिनमहत्वाची, कःपदार्थ आहे तिला असे संबोधतो.

ओशो रजनीश यांच्या मते ज्या व्यक्ती कडे मुबलक संप्पती आहे. ज्याची संप्पती जमवण्याची धावपळ बंद झालेली आहे. किंवा त्या प्राथमिक पैसे कमवण्याच्या जद्दोजहेद से जो पुढे निघुन आलेला आहे ( म्हणजे पुरेसे पैसे आरामात जगण्यास वा स्वतःचे छंद इत्यादी करण्या इतके) असा श्रीमंत सधन व्यक्ती असा समाजच
जास्त आध्यात्मिक होण्याची शक्यता आहे. अशी व्यक्ती अध्यात्म या त्यांच्या मते वरच्या स्तरावर वा असे म्हणु वैचारीकता इ. मध्ये प्रगती करु शकतो. तो अधिक एलिजिबल होतो या सर्व बाबींसाठी इ.अशा स्वरुपाची त्यांची मते आहेत.
त्यांचे म्हणणे जो व्यक्ती अजुन पैसा इत्यादी बेसीक्स मध्येच अडकलेला आहे तो वरच्या स्तरावरचा विचार करण्यास मोकळा राहत नाही.
त्यासाठी ते सधन समाज सधन कुटुंबातील मंडळी अध्यात्म वा त्यापेक्षा विचार , तत्वज्ञान इ. क्षेत्रात भरघोस कामगिरी करतांना आढळतात अधिक ब्रॉड माइंडेड सभ्य इ. इ. असतात अशी मांडणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्लोज पिरॅमिड अन काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. सर्व प्रकारचे लोक जगात आहेत व बिचार्‍या अशा म्हणजे लोभी लोकांनाही कुठेतरी लाइमलाईट मिळणे गरजेचे आहे. खिक्क!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्लिन मन्रोचे फोटो पाहिजेत हे बाकी मान्य.

झालंच तर भारतीय लोक प्रचंड ढोंगी आहेत. ते इतक्या नागडेपणी कधीच काही बोलू शकणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.
हे फक्त भारतातच होते असे नाही. समाजवाद्यांनी घेतलेला वसा आहे तो. जिथेजिथे समाजवादी तिथेतिथे पैश्याबद्दल हे असे "दीनदयाळ उपाध्याय" ष्टाईल डायलॉग मारून समज पसरवले जातात.
.
.

Bernie

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊद्या. तुम्ही हे चित्र पहा.
.
.

Monroe

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय गोड गायलय हे गाणं तिने.
.
https://pleasurephoto.files.wordpress.com/2012/12/marilyn-monroes-fragility-is-clearly-evident-in-this-photograph-taken-by-philippe-halsman-in-1952.png?w=450&h=442

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री धन्यवाद. नेमका हाच्च फटू मी यत्ता आठवीत असताना पेप्रातून कापून खोलीतल्या कपाटावर चिकटवलेला. लय भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुठला पेपर घेत होतात घरी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दै० पुढारी. त्याची तेव्हा गुरुवारी "भरारी" नामक पुरवणी येत असे. अनेक रोचक गोष्टी त्यात असत, इंका साम्राज्यापासून सुपरकंप्यूटरपर्यंत कुठल्याही विषयावर लेख वगैरे असत. त्यातच एके दिवशी मर्लिन मन्रोवरती लेख आलेला.

(अवांतरः याच भरारीत 'सुवर्णसुंदरी' नामक लेख आलेलाही आठवतो आहे. इंग्लंडच्या की अजून कुठल्या राजाने ही लाईफलाईक वस्तू शत्रूविरुद्ध वापरलेली असते. दिसायला एकदम टकाटक स्त्रीसारखी, थोडे विभ्रमही करणारी. पण पुरुषाने शिरकावाचा प्रयत्न केला रे केला की त्याचा 'कट'प्पा होत असे. इत्यादी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मर्लिन मन्रो सहन होत नाही. तिचे तीन सिनेमे कसेतरी बघितले, 'सम लाईक इट हॉट', 'सेवन यीअर इच' आणि 'हाऊ टू मॅरी अ मिलिओनेअर'. मूर्तीमंत ढपणा. तिच्यापेक्षा तिरळी मधुबाला बरीच बरी. तिला अभिनय करता येत असे अशी शंका अनेकदा येते.

'हाऊ टू मॅरी अ मिलिओनेअर'मध्येही असाच काहीतरी ड्‌वायलाक आहे. फक्त ती 'मला त्याचा पैसा नाही, तुमचा पैसा हवाय म्हणून मी त्याच्याशी लग्न करत्ये' असं काहीतरी भावी सासऱ्याला सांगते. हे सांगणारी मन्रो का बेट मिडलर, हे ही आठवत नाही. सगळ्या पांढऱ्या बाहुल्या सारख्याच दिसतात. आणि हे कथा-संवाद लिहिणाऱ्यांचं डोकं आहे, ह्या ढ बायांना नटण्या-मुरडण्यापलिकडे काहीही बुद्धी नाही हे सिनेमांमध्ये ओसंडून दिसत राहतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या ढ बायांना नटण्या-मुरडण्यापलिकडे काहीही बुद्धी नाही हे सिनेमांमध्ये ओसंडून दिसत राहतं.

नटणे मुरडणे हे काहीतरी अनिष्ट् आणि बुद्धी काहीतरी जास्त इष्ठ - असं काही आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या दृष्टीने ढ लोक फडतूस असतात. आणि फडतूस हा शब्द तुम्हीच तर ऐसीकरांना शिकवलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या दृष्टीने ढ लोक फडतूस असतात. आणि फडतूस हा शब्द तुम्हीच तर ऐसीकरांना शिकवलेला आहे.

ढ म्हंजे तुम्ही वृत्तीबद्दलच बोलताय ना ? की क्षमतेबद्दल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती, लगे रहो.
.
कोणाला तरी ढ, फडतूस म्हटल्यामुळे आपल्या चेहर्‍यावर जो एक वॉर्म ग्लो येतो, त्या ग्लोकरता, ऊठ्सूठ लोकांना फडतूस व ढ म्हणणे हे जस्टिफाएबल आहे Wink ROFL
.
हे मी तिरकसपणाने म्हणत नसून खरच सिन्सिअरली म्हणते आहे. तू कोणी प्रश्नांची फैर झाडली तरी गिल्टी वाटून घेऊ नकोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचे जे काही तीन सिनेमे बघितले त्याचं सार काय, तर बाईने सुंदर दिसावं, लाडेलाडे बोलावं, चष्मिष्ट असल्यास कूल पॉइंट्स कमी होतात पण हताश होऊ नये, पुरुषांना गटवण्यासाठी सतत मदतीची गरज असल्यासारखं वागावं, कोणीतरी श्रीमंत पुरुष गटवावा, श्रीमंत नाही सापडला तर प्रेमळ पुरुष गटवावा आणि हे केल्यामुळे ती सुखी होईल.

त्यातून बुद्धीला खुराक काय? एका बुळबुळीत भेंडीतून जेवढं पोषण मिळेल तेवढं पोषणही ह्या सिनेमांमधून होत नाही. ते सिनेमे एवढे कालबाह्य आहेत की आता ते करुण वाटतात. वर चिकटवलेल्या तिच्या सगळ्या फोटोंपेक्षा तिचा युलिसीस वाचतानाचा फोटो बघून मला तिच्याबद्दल जरा कुतूहल निर्माण झालं. नाहीतर पांढऱ्या बाहुलीचं मी काय करू? चेहेऱ्यावर चिमूटभर शहाणपणाही न दिसणाऱ्या लोकांना सुंदर म्हणणं मला तरी जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तथाकथित साधी रहाणी असेल तरच विचारसरणी (आपोआपच) उच्च असते असल्या कंडशनिंगच्या नावाने.....!!!
उलट फार साध्या रहाणार्‍या व्यक्तींना प्रेझेंटबल दिसायचं कसं याची 'अक्कल' नसते, त्या ढ पणालाच ते मिरवत असतात हे त्यांना कळत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपण म्हणताय ते खरं असूं शकेल...

पण हे आपण कां विसरतां की त्या अभिनय करतायत...

कदाचित त्या ढ असूं शकतील...पण माणसाच्या चेहेरयावरचे रिफ्लेक्सेस त्याबद्दल खूप काही सांगतात...

मी ज्या लिंक दिल्या होत्या त्यात दुसरया लिंक मधे कॉफी हाउस चा सीन आहे...त्यात मनरोचे रिफ्लेक्सेस बघां...टायमिंग अचूक आहे...

एकदा पिक्चर बघा हो...खिडक्या उघडून...

उगाच नाही तो केनेडी तिच्या मागे लागला...

तुम्ही ज्या ‘हाऊ टू मेरी ए मिलियनायर’ बद्दल लिहिलंय त्याची देखील अशीच कथा आहे...

तिघी मैत्रिणी पैसे वाल्या जोडीदार शोधत आहेत...

त्या चित्रपटांत मनरोचे डोळे अधूं दाखवलेले आहेत...चश्मा नसल्यावर तिला अंधुक दिसतं...

विमानातल्या सीन मधे ती नायकाच्या शेजारी बसून पुस्तक उलटं वाचत असते...

शेवटच्या सीन मधे उलगडा होतो...तिघा मैत्रिणींची टीम लीडर असलेल्या लाॅरेन बकॉलचा प्रियकर सगळयांत श्रीमंत निघतो...

मुद्दा असा की गोपी, राम और श्याम मधे दिलीप कुमार गावकरी दाखवला होता, म्हणजे त्याने तो रोल समर्थपणे केला.

आपल्या कितीतरी नायिकांनी गावंढळ मुलींचा राेल केलांय म्हणून त्या ढ होत्या असं म्हणणं चुकीचं ठरेल...

दुसरं मनरो सहन होत नाही...तिचा बस स्टाप पण चांगला पिक्चर आहे...

क्लब डांसर असलेली मनरो नायका बद्दल जाते, पण त्याआधी होणारी मनाची घालमेल तिने समर्थपणे दाखवलीय...

रिवर आफ नाे रिटर्न देखील तिचा असाच चांगला पिक्चर...राबर्ट मिच्यूम नी काम ठीक केलंय...

तिचा नायगरा बघितला...आवडला नाही...पण त्यात देखील तिचा थोडासा निगेटिव रोल होता...पण इंडियात राहून नायगरा जवळून अनुभवायला मिळाला...

असेल मनरो ढ, पण तिच्या शिवाय देखील चित्रपटांत इतर गोष्टी देखील असतात...

असं मला वाटतं...

चुकीचं ही असू शकेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

मन्रो चा "रिव्हर ऑफ नो रिटर्न" फार मस्त सिनेमा आहे. मन्रो चीप बारमधली गायिका दाखवली आहे. पण काऊबॉय मुव्ही असल्याने थ्रिलिंग आहे. थांबा अजुन एक गाणे ऐका. जेव्हा ती आपल्या प्रियकराची अत्यंत wistfully, longingly वाट पहात असते, वेडी होते मी ते गाणं ऐकताना-

If you listen you can hear it call wail-a-ree.
There is a river called THE RIVER OF NO RETURN
Sometimes it's peaceful and sometimes wild and free!
Love is a trav'ler on THE RIVER OF NO RETURN
Swept on for ever to be lost in the stormy sea
Wail-a-ree I can hear the river call [ no return, no return ]
I can hear my lover call come to me
I lost my love on the river and for ever my heart will yearn
Gone, gone for ever down THE RIVER OF NO RETURN

Wail-a-ree wail-a-re-e-ee
She'll/He'll never return to me! [ no return, no return, no return ]

_______

___
७ इयर्स ऑफ इच आवडला नव्हता.
डायमंडस आर फॉर एव्हर - सहन होणार नाही. लोभीपणा सहन होत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दि रिवर ऑफ नो रिटर्न मधील गाण्याची आठवण काढण्या बद्दल...

त्यांच्या सफरीचा थरार पुन्हां एकदा अनुभवावासा वाटतोय...

बघतो आज रात्री जमतंय कां...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

वा! क्या बात है. मी ही परत बघणारे. नवर्‍याने पाहीला नाहीये ..... मी हजारदा सांगूनही. आज त्याला सिनेमा पहायला लावते Wink
_____
I agree there is something SUPER-HOTTTT-HOTTT abt material girls Wink
___
हे एकदम झकास आहे. तिची बॉडी लँग्वेज व नाच सुभानल्ला!
.

.

I've looked around the country and I've seen it all,
And what I want, I'm ready to name!
It's big and strong and handsome and it's 6-feet tall,
I'm gonna file my claim!
.
I struck a real bonanza and he's rough and rash,
But what he's got, I'm ready to tame,
He's worth a fancy fortune but it's not in cash,
I'm gonna file my claim!
.
I got the fever, ooohhh the fever
But not for gold in the ground!
I want to tackle to something vital
That I can throw my fences around
.
A gal should never hustle with a pick and pan,
To dig for gold, that isn't her game.
I'll find the man who found it then I'll get that man!
Who's gonna help me file my claim!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचा बस स्टाप छोटया पडद्यावर बघितला होता...

पुन्हां बघायला मिळाला नाही...

तेव्हां तितकासा समजला नव्हतां...

इतकंच समजलं होतं की गावाचा गडी त्या बस स्टैंडवरील हाटेलात येतो आणि त्या बार गर्लच्या प्रेमांत पडतो...तिच्या मनाची चलबिचल होते...ती पळून जाण्याचा निर्णय घेते...पण शेवटी दोघं जातात...

एम आय राइट...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

हा बघते. Smile सुचविल्याबद्दल, थँक्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही ती 'ढ' होती का नाही या वादांत पडणार नाही. वरच्या उत्तमोत्तम फटुंचा आस्वाद घेणे, एवढेच आमच्या हातात आहे.
मधुबालाला तिरळी म्हटल्यामुळे मात्र आम्ही उदास झालोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधुबालाला तिरळी म्हटल्यामुळे मात्र आम्ही उदास झालोय.

सगळ्यांनाच मधुबालेचं सौंदर्य लक्षात येत नाही ओ. असतात एकेकांच्या मर्यादा.

(मधुब्रिगेडी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळ्यांनाच मधुबालेचं सौंदर्य लक्षात येत नाही ओ. असतात एकेकांच्या मर्यादा.

ROFL
बाकी आम्ही सुंदरांना सुंदरच म्हणतो. मर्लिन सुं-द-र-च्च आहे. अ हॉट मटीरीअल गर्ल.
मधुबाला सुंदर नाही - यावरती आम्ही ठाम आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधुबाला सुंदर नाही - यावरती आम्ही ठाम आहोत

.
आता घासूगुर्जी आले की ते हा आयडी नक्की उडवणार!!!!
शुचे, जा बाई, दिल्या घरी तू सुखी रहा....
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता घासूगुर्जी आले की ते हा आयडी नक्की उडवणार!!!!

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधुबाला सुंदर नाही - यावरती आम्ही ठाम आहोत.

माझ्या मधुबाला प्रेमी मित्रांनो हा शेर लक्षात ठेवा
चलो अच्छा हूआ काम आ गयी दिवानगी अपनी
वर्गना हम जमाने भर को समझाने कहॉ जाते
किंवा
'ग़ालिब' बुरा न मान जो वाइज़* बुरा कहे
ऐसा भी कोई है कि सब अच्छा कहें जिसे.
असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile कुल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांनाच मधुबालेचं सौंदर्य लक्षात येत नाही ओ. असतात एकेकांच्या मर्यादा.

लक्षात येत असतं ... फक्त मान्य करायला मात्र काकूं करण्याची वृत्ती असते. प्रश्न क्षमतेचा नसून वृत्तीचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पापिलवार गोष्टींना उगीचच हाड म्हणण्यातही एक वेगळेच थ्रिल असते म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://s3.amazonaws.com/lowres.cartoonstock.com/health-beauty-fairy_stories-fables-snow_white_and_the_seven_dwarfs-evil_queen-beauty-rron840_low.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युलिसिस वाचणारी मर्लिन.

eew

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंही material girl होण्याकरता मर्लिनसारखं बॉम्ब-शेल असणं गरजेचं असावच नव्हे ते प्रिरिक्विझिट असावं Wink उद्या ललिता पवार म्हणू लागली की मी मटिरीअल गर्ल आहे तर आपल्याला हसू नाही येणार? ROFL
.
आणि बाय द वे "जिस देश मे गंगा बहती है" मध्ये ललिता पवार, मधुबालाहूनही सुंदर दिसते ....... <होऊन जाऊ द्या रणधुमाळी मधु-ब्रिगेडर्स* ची>
.
* टिंकूने आंजा ला दिलेला शब्द

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललिता पवार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा कातिल!!! खरच मधुबालापेक्षा सुंदरच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बास का आता, उगीचच? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण मधू ब्रिगेडी नुसतेच "मतपरिवर्तन कसे करावे" याच्या थिअर्‍या टाकत बसतात. आता करुन दाखवा की मत-परिवर्तन का काय ते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता अद्रकचा स्वाद प्रत्येकाला घेता येईलच असे नाही. आम्ही फारतर तोंडाजवळ अद्रक नेऊ पण शेवटी ते ज्यानंत्यानं स्वतःच तोंडात टाकायचं आहे. शेवटी ग़ालिब मदतीला येतोच- "लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूँ ए जाहिद, हाय कम्बख़्त तूने तो पी ही नहीं!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या तू तरी लहान आहेस, अननुभवी असावास , रे गद्धेपंचवीशीत असावास . तू मधुबालाव्यतिरिक्त जग पाहीलं नसशील तर तो तुझा दोष नाही. पण काके-मामे-आजोबा-पणजोबा जेव्हा .... Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचं सोडा हो. मधुबालेपासून आलिया भट्टपर्यंत अनेक जणींवर जीव आहे आपला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमचं सोडा हो. मधुबालेपासून आलिया भट्टपर्यंत अनेक जणींवर जीव आहे आपला.

तुमच्या लिष्ट मधे Ashley Judd आणि drew barrymore का नाहीत ?

उपेक्षा, भेदभाव .... वगैरे वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याही आहेत ओ. फक्त काळाचे प्यारामीटर कळावे म्हणून अगोदरची नावे सांगितली इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस आय गॉट इट. तू ब्रॉड रेंज दिलीस. Smile एक आयडीया यावी म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ए हे! हा ह पु वा झाली
बघ बघ मांड्या बघ मांड्या बघ असं म्हणून हाताने आवरण सारून दाखवतेय!.. शी!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिस देश मे गंगा बहती है" मध्ये ललिता पवार, मधुबालाहूनही सुंदर दिसते ...

आम्हाला कधी 'जिस देशमें' मधे मधुबाला दिसली नव्हती हो! पदमिनी आणि मधुबालाची बहीण असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL तिमा Smile
फिरकी घेऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवं, जुन्या लोकांना अजून अल्झायमर झाला नाहीये हो. हे बघा,

Madhubala’s sister Chanchal was also an actress and bore a striking resemblance to her famous sibling. She appeared in Nazneen (1951), Naata (1955), Mahalon Ka Khwab (1960) and Jhumroo (1961) alongside Madhubala. She also played prominent roles in Mehboob Khan’s Mother India (1957) and Raj Kapoor’s Jis Desh Mein Ganga Behti Hai (1960). -Sampurn Media

रेफरन्स

http://www.thaindian.com/newsportal/entertainment/interesting-facts-and-...

ही चंचल, त्या प्रसिद्ध, 'होली आयी है कन्हाई' या गाण्यांतही होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवं, जुन्या लोकांना अजून अल्झायमर झाला नाहीये हो. हे बघा,

आणि होणारही नाही तिमा :). तथास्तु! आमेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0