"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका
.
साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे किंवा खरे तर आपले काही खरे दिसत नाही.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्यांचे छापील भाषण न वाचता भलतेच भाषण केले. अतिशय तावातावाने. कुठल्या साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष नव्हे, तर कुठल्या तरी कामगार युनियनचा नेता भाषण करतो आहे असा भास होत होता.
त्यांचे छापील भाषण सव्वाशे-दीडशे पानांचे आहे असे म्हणतात. आता ते महामंडळाने छापावे अशी मागणी सबनीसांनी केली आहे. ही मागणी २६ जानेवारीपूर्वी पूर्ण झाली नाही तर ते नंतर पत्नीसह उपोषणाला बसणार आहेत.