प्रीती

काही महीन्यांपूर्वी प्रीती फेसबुकवरती सापडली. या पूर्वीही अनेकदा शोध घेऊनही सापडली नव्हती ती अवचित गुगलवरती पहील्यांदा सापडली. फोटोवरुन मी तिला तत्काळ ओळखले व नंतर फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. तिने ती अ‍ॅक्सेप्ट केली तो दिवस अतिशय आनंदात गेला. कारण हॉस्टेलवरचे मनोरम दिवस आम्ही एकत्र एन्जॉय केलेले होते, तिला माझी सिक्रेटस जशी माहीत होती तशी मला तिची. अनेक एकत्र केलेले नाईटआऊटस व मग्गुगिरी डोळ्यांसमोर तरळून गेली. प्रीती सुंदरच दिसत होती. अंगयष्टी राखलेली, राँग साईड ऑफ ४० शी मध्ये असली तरी पस्तीशीची वाटणारी, डिझायनर कपडे व बॅकग्राऊंडला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील फोटो. कधी पॅरिसचे कलादालन तर कधी ग्रीक पुतळे, कधी बँकॉकच्या, सिंगापूरच्या इमारती तर कधी सिडनीचे ऑपेरा हाऊस. हे सर्व पाहून डोळे निवण्याआधी माझे लक्ष गेले ते तिच्या आडनावाकडे प्रीती शुक्ला. ह्म्म्म ... प्रीती श्रीवास्तव नाही. : (

हॉस्टेल ११ वरती आमच्या दोघींच्या रुम्स समोरासमोरच्या. सकाळी आंघोळी ला पळताना, मेसमध्ये दुपारी किंवा रात्री जेवताना, एकमेकींशी हाय हॅलो होत असे ज्याची परिणीती मैत्रीत कधी झाली त्याचा पत्ताही लागला नाही. मिथुन राशीची, प्रीती मला चटकन आवडली. फुलपाखरासारखी रंगीबेरंगी, लाइट हार्टेड, स्वभावाने गोड, मदतशील व जनरसही. प्रीतीच्या मैत्रीतील आकर्षणाचे श्रेय थोडे तिच्या फक्त तिच्या रुमवरती असणार्‍या इलेक्ट्रिकल हॉट प्लेटलाही जाते. दर नाईट आऊटला म्हणजे दर वीकेंडलाच आमचे रात्रीचे जागरण तिच्या रुममध्येच होई. कारण चहा व २ मिनटस मॅगी तिच्याकडे करता येत असे. त्याकरता मग बॉइज हॉस्टेल २ च्या जवळच्या चिंको (चायनीज कॉर्नर) मध्ये खेप घालावी लागत नसे. जरी अगदी १००% सुरक्षित असले तरी तिथे जऊन ऑर्डर करणे जीवावरती येई. त्याऐवजी कोरडा खाऊ व मॅगी, चहावर वेळ मारुन नेता येत असे.

ती इलेक्टिकल इंजिनिअरींग मध्ये पी एच डी करत होती. तिचा सिनीअर होता - संजय श्रीवास्तव. तोही पी एच डीच करत होता. पण २ वर्षे प्रीतीहून पुढे होता. मी त्याला त्या २ वर्षात कधीच पाहू शकले नाही कारण तशी संधी आलीच नाही पण ऐकून खूप होते. तो कसा हुषार आहे, अबोल आहे, प्रीतीला तो किती आवडतो, त्याचे अमेरीकेला जाण्याचे स्वप्न वगैरे वगैरे. प्रीतीला तो वेड्यासारखा आवडे. हणजे ती तासन तास स्वप्नाळू आवाजात तिच्या व त्याच्या भविष्याबद्दलचे मनसुबे मला सांगे, भरभरुन बोले. खरं त्याचा नकार हा आम्ही दोघींनीही तेव्हाच ताडायला हवा होता. कारण मुलींच्या खोलींवरती त्या त्या मुलीचा मित्र येत असे. पण प्रीतीकडे श्रीवास्तव कधीच आला नव्हता. तिने बोलावले नव्हते असे नाही पण त्याने नेहमीच टाळले. पण प्रीती आणि मी आमचे वय असे होते की प्लॅटॉनिक, अंतरावरच्या प्रेमावरती आमचा तेव्हा अगदी पूर्ण विश्वास होता.

प्रीतीने रविवारचा पेपर लावलेला होता व रविवारी सकाळी कधीकधी दारावर थाप मारुन ती मला त्या पेपरातील "लव्हर्स कॉर्नर" दाखवे. कोण्या नोमॅड का तत्सम नावाचा आय डी त्यात काहीबाही शेर, फिश्पाँड टाके. प्रीतीला वाटे लाजाळू असल्याने श्रीवास्तव या माध्यमातून तिच्याकडे प्रेम जाहीर करतो. बरे माझ्याही कधी लक्षात आले नाही की हे Pure delusion असू शकते. एकदाच मी तिला विचारले होते कशावरुन तो श्रीवास्तवच होता? यावर तिचे म्हणणे होते की तिला खात्री होती. मी मग फार खोदले नाही.

श्रीवास्तवचा थिसिस पूर्ण झाल्यावरती श्रीवास्तव निघून गेला. प्रीती वाट पहात असे त्याच्या पत्राची. तिनेही त्याला बरीच पत्रे पाठवली पण उत्तर कधीच आले नाही. शेवटी सैरभैर झाल्याने तिला इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा ताण झेपेनासा झाला, गाईडनेही आशा सोडली व एके दिवशी प्रीती तिच्या आईवडीलांबरोबर मध्य प्रदेशात निघून गेली. पुढे मी पासाआऊट झाले. कालांतराने मला प्रीतीच्या लग्नाची बातमी मैत्रिणीने सांगीतली. प्रीतीला पत्र पाठवुन मी प्रीतीचे अभिनंदन केले.

फेसबुकवर अ‍ॅड केल्यानंतर तिने श्रीवास्तवचा विषय कधीच काढला नाही. पण एके दिवशी मनाचा हिय्या करुन्,मीच तिला मेसेज केला. की बाई तू खुशीत दिसतेस खरी पण काय झाले तू सोडून गेल्यावरती तू काय केलेस? तुला श्रीवास्तव कधी भेटला का? कारण delusional असलं, फसवं धूसर असलं तरी तिने उत्कटच प्रेम केलेले होते. तिचे यावर उत्तर होते की बराच काळ शोक करुन, बराच काळ डिनायलमध्ये घालवुन, तिने श्रीवास्तव चॅप्टरच अ‍ॅम्प्युट केला होता.व एकदा ते वास्तव सिविअर केल्यानंतर खरं तर स्वीकारल्यानंतर तिने परत मागे वळून ना पाहीले ना तिला त्याबद्दल काही भावना आहेत. या सर्व कथेत एक सोलेस हा होता की त्याने कधीच तिला फसवी आशा दाखवली नव्हती, ना कधी तिचा फायदा मग आर्थिक अथवा कसाही घेण्याचा प्रयत्न केला होता.

खरं तर या तिच्या उत्तरानंतर मी विचारात पडले होते की असं आपल्या कल्पनेतील का होईना पण प्रियकराला तोडता येत असेल का? नवर्‍याच्या बाहूपाशात प्रीतीला एकदाही तो आठवला नसेल? मनात का होइना तिने कधीच प्रतारणा केली नसेल? पण हे विचारणारे कोणाला पेक्षाही विचारणारी मी कोण होते? तिच्या डागण्या तिला माहीत. तेव्हाही प्रीती फुलपाखरुच होती आत्ता फेसबुकवरही ती तशीच विविधरंगी मोहमयी फुलपाखरुच दिसत होती. नवरा सुखवस्तू भासला व लौकिकार्थाने तो यशस्वी तर होताच. प्रीती अनेकानेक देश फिरली होती, फिरत होती, नोकरी करणे ना तिची गरज होती ना विकल्प. एक टीनेजर मुलगाही होता. पण ती सुखी होती का? ना ती मला सांगणार होती ना फेसबुकवरचे मायावी फोटो आपण होऊन मला काही सांगत होते. माझ्या फ्रेन्ड लिस्टमध्ये फक्त एक आकडा वाढला होता, फ्रेन्ड्लिस्ट जरा अधिक फुगली होती. जय फेसबुक ज्याने लोक जवळ येण्यापेक्षा अधिक दुरावतानाच पाहीले आहेत. प्रामाणिक संवादापेक्षा, बेगडी आभासांच्या मागे धावतानाच पाहीले आहेत. पण मनातून मला वाटत राहीले ही नवी प्रीती भेटली नसती तरच बरे झाले असते कारण परत ना आम्ही मेसेज पाठवला ना फोन केला. फक्त फुले, पक्षी, फोटो, सुखद आभास नित्यनेमाने शेअर करतो.कदाचित श्रीवास्तवच्या चॅप्टरचाच मीही एक भाग होते, अँप्युट करण्यालायक. अगदी हेच कारण मला पटते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

प्रीतीच्या पुनर्भेटीच्या आनंदापेक्षाही, तिचा विसंवाद किंवा घुमेपणा मला बोचला. हे हायलाईट करता आलय की नाही देवच जाणे. बहुतेक नाही. पण सांगायचं हेच आहे की फेसबुकवरती लोक फारच "आनंदी आनंद गडे" दिसतात, बर्रच काही शेअर करतात पण त्याहूनही जास्त लपवितात. अगदी जुन्या ओळखींपासूनही. किंवा मग माझाच स्वभाव असा आहे की एकदा प्रेम केले की थोडंही, अगदी थोडसंही अंतर मला सहन होत नाही. एक प्रकारचा मनोविकारच म्हणायचा Sad
पण खरच अंतर अज्जिबात आवडत नाही .... थोडंही, नॉर्मलही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आता या लेखाची लिंक जंगलीजवानीला पाठवा बघू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता या लेखाची लिंक जंगलीजवानीला पाठवा बघू (डोळा मारत)

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलाय लेख. खूप आवडला. हे असं अ‍ॅम्प्युट करणं काही लोकांना जमतं. माझ्या एका जवळच्या मैत्रीणीने घरचे लव मॅरेज ला नाही म्हणतील म्हणून अरेंज मॅरेज केलं. ती नवीन अयुष्यात सुखी आणि खूश आहे. तो मात्र अजुनही तिच्यातून बाहेर पडला नाहीये. ४ वर्ष झाली तरी. तिला त्याच्याबद्दल विचारलं तर विषय टाळते. हे असं अ‍ॅम्प्युट करणं कसं काय जमतं काय माहित. अवघडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर अ‍ॅड केल्यानंतर तिने श्रीवास्तवचा विषय कधीच काढला नाही. पण एके दिवशी मनाचा हिय्या करुन्,मीच तिला मेसेज केला. की बाई तू खुशीत दिसतेस खरी पण काय झाले तू सोडून गेल्यावरती तू काय केलेस? तुला श्रीवास्तव कधी भेटला का?

हे विचारायची मला तरी हिंमत झाली नसती बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाच भाग काल्पनिक होता आबा. तिच्या घुमेपणानंतर मी तिला कधीच विचारु शकले नाही. Smile
पण ना तिने मला तितका गंभीर मेसेज कधी पाठविला.
आम्ही फक्त जुजबी बोललो. तिने लाइक्स केले मी केले. पण काहीतरी हरवलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान उतरलं आहे प्रीतीचं व्यक्तित्व.
माझ्या डॉक्टर मैत्रिणीच्या बाबतीतला किस्सा. पारंपारिक आणि दवणीय विचारांची मुलगी. तिची दोन प्रेमप्रकरणं झाली. पहिला तिच्या पेशंटचाच मुलगा. त्याची आईचं हिच्यावर प्रेम. परंतू त्याने कधीही आशा लावली नाही. पण ही बाई मनात, उघड प्रेम करतच राहिली त्याच्यावर. ते कश्याने संपुष्टात आलं आठवत नाही. खरं तर आता लाज वाटते, पण ती जे काही सांगत असायची ते मी लक्षपूर्वक कधी ऐकलच नसावं. कारण तिची ती दवणीय वर्णनं आणि भाषा ऐकून मला वैतागायलाच व्हायचं. कश्यात काही नसताना त्याच्या आईचा ती माझ्यासमोर सासूबाई म्हणून उल्लेख करायची, त्याच्या आवडीचे पदार्थ करून पाठवायची इत्यादी तर मला मूर्खपणाचंच वाटे. ते असो. त्याच्या स्पष्ट नकाराचा तिला जबर धक्का बसला, पण लवकरच ती सावरली.
काही वर्षांनी दुसरं. हे ही खूप सिरीयस आणि दोघांच्याही घरच्यांना माहित असलेलं. लग्नाची तारिख ठरायचीच बाकी होती.( त्या दरम्यान आमचं लग्न झालं तेव्हा तिने मला भेट दिलेली भांडी त्या दोघांनी जाऊन आणली होती. आणि तो किती व्यवस्थित खरेदी करतो हे तिने मला कौतुकाने सांगीतलेलं) पण तिला झालेल्या (किरकोळ) अपघाताने हे संपलं. तिच्या सांगण्यानुसार तिने लग्नाला नकार दिला. त्यानंतर सात आठ वर्षांनी तिच्या आयुष्यात अजून एकजण आला. तिने लग्न केलं. पण आताचं तिचं आयुष्य सुखी असेल पण समाधानी किती हे मलाही कळत नाही. तिने नवर्‍यानुसार स्वत:ला जे काही बदलून टाकलय की बस्स. आशा काळे वैगेरे नायिका हिच्यावरूनच बेतल्या असाव्यात असं वाटावं. आपल्या नवर्‍यासमोर आपण मूर्ख आहोत हे तिने मान्य करून टाकलेलं आहे, आणि ते ही अश्या आत्मविश्वासाने की माझी सगळं सांगणं तिच्यासमोर थिटं पडतं. तिने इतकंही पड खाऊन वागू नये असं मला वाटतं. अश्या लवचिक व्यक्तिमत्वांना जुन्या गोष्टी मनातून काढून टाकणं शक्य होत असावं का?
विचारलं पाहिजे तिला एकदा.

हे विचारायची मला तरी हिंमत झाली नसती बॉ.

माझीही अजून झालेली नाही. आता वाटतंय विचारावसं. बघू हिंमत होतेय का? (बहुतेक नाहीच. जखमेवरची खपली का काढा? असं म्हणेन )

शुचि, फेबु वरल्या शेअरींगबद्द्ल अगदी सहमत.

अंतर ठेवू न शकणे याला मनोविकार का म्हणावा? ते जमायला हवं असं वाटतं. पण मी फार अंतर राखून वागते. माझं आणि दुसर्^याचं खाजगीपणही जपते. त्यामुळे बरेचदा एकटं पडल्यासारखं होतं पण स्वतःच्याही स्वभावाला औषध नसतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे स्व पूर्ण विरघळू देतात काही जणी. पण कधीतरी उफाळून येतो व तो आजवर इतका सप्रेस केलेला असतो की ती वाफ वेड्या मार्गाने निघते Sad पाहीले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विचारायची मला तरी हिंमत झाली नसती बॉ.

ह्यात हिम्मती पेक्षा असे आपण खरंच विचारावे का? हा प्रश्न आहे. मला नाही वाटत असे कोणालाही त्याच्या दुखर्‍या नसे बद्दल विचारावे. तिला सांगायचे असेल तर ती सांगेलच.
आपण उगाच खपल्या काढु नयेत. किंवा बर्‍याच वेळेला एखादी व्यक्ती सावरली पण असु शकते, जुन्या आठवणी काढुन अजिबात टोचु नये. कधी कधी एखाद्या केस मधे त्या व्यक्तीला परीस्थितीची निगेटीव्ह वाजु दिसतच नसते. ती आपण जाउन दाखवु नये. जे काही समाधान असेल ते हिरावुन घेऊ नये.

जल गया जिस्म तो दिल भी तो जला होगा
अब कुरेदते हो राख, इरादा क्या है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेर आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यात हिम्मती पेक्षा असे आपण खरंच विचारावे का? हा प्रश्न आहे. मला नाही वाटत असे कोणालाही त्याच्या दुखर्‍या नसे बद्दल विचारावे. तिला सांगायचे असेल तर ती सांगेलच.
आपण उगाच खपल्या काढु नयेत. किंवा बर्‍याच वेळेला एखादी व्यक्ती सावरली पण असु शकते, जुन्या आठवणी काढुन अजिबात टोचु नये. कधी कधी एखाद्या केस मधे त्या व्यक्तीला परीस्थितीची निगेटीव्ह वाजु दिसतच नसते. ती आपण जाउन दाखवु नये. जे काही समाधान असेल ते हिरावुन घेऊ नये.

हे मान्यच आहे. मी सुद्धा असेच करीन.

मुद्द्याची दुसरी बाजू - Moral Inversion चा पण विचार करावा अशी सुचवणी.

म्हंजे असं की - why should we be so unconcerned about something so important to our friend ?

Yes. This is a delicate, close-to-heart matter to that girl.

परंतु - Especially in case of our close friends - should we be so indifferent, apathetic about their important emotional matters ?

तिला सांगायचं असेल तर ती सांगेलच --- हे non-interventionism, non-invasion of privacy च्या मूल्यांना धरून बरोबर आहे. अगदी लिबर्टेरियन थॉट. पण तिने सांगितले नाही तर त्याचा अर्थ असाही असू शकतो की तिला तुमच्याबद्दल तेवढं comfortable वाटत नाही.... की ज्या comfort च्या आधारावर ती तुमच्याशी त्या अतिनाजुक विषयावर स्वतःहून बोलेल. किंवा तिला असं ही अपराधीपण वाटत असेल की ती तिचं व्यक्तिगत रडगाणं तुमच्यासमोर गात्ये (आणि त्याच वेळी तुम्हाला तसं अजिबात वाटत नसेल).

मग (आपल्याच non-interventionism च्या मूल्यांना चिकटून न राहता) तिच्याशी स्वतःहून विषय हळुवार पणे सुरु करून comfort, विश्वास निर्माण करून थोडं बोललं तर तिला बरं वाटेलही कदाचित. तिचं/तुमचं सगळं बोलणं व्हर्बल असेलच असे नाही. नॉन-व्हर्बल सुद्धा असेल. व त्यातून कदाचित तिचं दु:ख हलकं होईलही. नैका ?

हे असं करणं रिस्की आहेच. प्रश्नच नाही. पण ...

( सध्या व्हिव्हियाना रॉटमन झेलिझर चं हे पुस्तक वाचतोय ... ज्यात त्यांनी मोरल इन्व्हर्जन ची चर्चा केलिये. की नीतीमूल्ये ही उलट होतात, केली जातात. कोणती व कशी होतात त्याबद्दलही लिहिलेय. झेलिझर ह्या समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु कसे असते ना प्रत्येकाचे दुख हे फक्त त्याचेच असते. ते दुसरे कोणी समजुन घेऊ शकत नाही ना वाटुन घेऊ शकत.
मी जर कोणाला विचारले आणि कोणी माझ्याशी काही शेअर केले तर मोस्टली काय होइल की मी सल्याच्या मोडे मधे जाईन.

असे कर, तसे करु नको. ह्या प्रॉब्लेम मधे काय इतके विशेष. रोज १ तास चाल. ऑफीस मधुन १५ दिवस सुट्टी घे आणि फिरुन ये. पुस्तके वाच वगैरे. - ह्या सल्ल्यांना काही अर्थ नसतो.

दुसरे कसे आहे की आपण आपले व्यक्तीमत्व लादत असतो दुसर्‍या व्यक्तीवर. एखादा उपाय मला पडत असेल उपयोगी, म्हणुन दुसर्‍याला उपयोग होईल् का? एखादी गोष्ट मला चिल्लर वाटत असेल, पण दुसर्‍या व्यक्तीला तिच खुप महत्वाची वाटत असेल.

असे व्यक्तीमत्व लादताना धोका असा होऊ शकतो की दुसरा माणुस अजुनच निराश होइल.

त्य व्यक्तीला वाटले तर ती सांगेल. तेंव्हा सुद्धा ऐकणार्‍यानी जजमेंटल न होणे आणि सल्लागार न बनणे महत्वाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे तर आपल्या ह्या चौकशी मागे आपले इंटेंट काय आहे ह्याची आपण स्वता आधी परीक्षा करावी ( जर आपण तितके समजदार असलो तर ). आपल्याला आपलीच दु:खे उगाळायची असु शकतात पण दुसर्‍यांच्या मार्फत. आणि वर हे ही सिद्ध करायचे असते की मी परीस्थिती जास्त चांगली मॅनेज केली.

साहीर म्हणालाच आहे ना, कौन रोता है कीसी और की खातीर ए दोस्त, सबको अपनी ही कीसी बात पे रोना आया.

-------
ह्या लेखातली ही वाक्य बघ.

आपल्या कल्पनेतील का होईना पण प्रियकराला तोडता येत असेल का? नवर्‍याच्या बाहूपाशात प्रीतीला एकदाही तो आठवला नसेल? मनात का होइना तिने कधीच प्रतारणा केली नसेल?

पण ती सुखी होती का?

म्हणजे तिला टोचणी असलीच पाहिजे असे कुठे तरी पक्के आहे. प्रतारणा वगैरे पण शब्द आपले विचार दाखवतात.
कदाचित प्रीती ला वाटतपण नसेल की ती प्रतारणा करतीय, पण विचारण्यानी तिच्या डोक्यात भुंगा सोडला जाइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पण विचारण्यानी तिच्या डोक्यात भुंगा सोडला जाइल.

.
.
सुपर लाईक.

क्या ब्बात है. अनु, _/\_

-----
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ओळखीतल्या वयस्कर व्यक्तीची हा प्रश्न. वर वर साधा वाटला तरी विचार करण्यासारखा आहे.

" दु:ख तर काय कोणीही शेअर करेल, पण तुमचे आनंद शेअर करणारी कीती लोक आहेत?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण विचारण्यानी तिच्या डोक्यात भुंगा सोडला जाइल.

(१) अनु, तुमच्या या शब्दांमगे ही गृहीतकमय भीती आहे की अन्य पार्टी (मी) माझ्या या नकारात्मक छट तिच्यापाशी व्यक्त करेन किंवा तशा त्या बोलण्याबोलण्यात व्यक्त होतील. तसं कदाचित होणारही नाही.
(२) संवादामध्ये थोडीफार विचारांची देवाणघेवाण ही होणारच. तेही नको असेल तर मग संवादच करु नका. चिडीचूप रहा. तसं तर मग तुम्ही सुप्रिम परफेक्ट असल्याशिवाय तोंडच उघडायला नको. तेवढी रिस्क तर संवादांमध्ये "लाजमी" है!
.

आपल्याला आपलीच दु:खे उगाळायची असु शकतात पण दुसर्‍यांच्या मार्फत. आणि वर हे ही सिद्ध करायचे असते की मी परीस्थिती जास्त चांगली मॅनेज केली.

हा सल्ला रास्त वाटला.
.

कौन रोता है कीसी और की खातीर ए दोस्त, सबको अपनी ही कीसी बात पे रोना आया.

हा शेर आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिने इतकंही पड खाऊन वागू नये असं मला वाटतं. अश्या लवचिक व्यक्तिमत्वांना जुन्या गोष्टी मनातून काढून टाकणं शक्य होत असावं का?

अजुन एक - लहानपणी जर आईचे लक्ष , प्रेम, अटेन्शन मिळविण्याकरता फार प्रयत्न करावे लागले असतील, आणि जर आई डिस्टन्ट असेल, तर ती पोकळी कधीच भरुन निघत नाही. मग पुढे तिचे रुपांतर अशा अटेन्शनच्या खाईखाईत होत असावे. वाट्टेल त्या मार्गाने, मग अगदी स्व ची आहुती देऊनही का होइना अटेन्शन, प्रेम मिळविण्याची धडपड होते.
मी freud नाही. माझे हे वक्तव्य चूकही असू शकेल पण मग अचूक/बुल्स आय असण्याचाही तितकाच संभव आहे. पण हे माझे ठाम नीरीक्षण्/मत आहे.
____
मुद्दाम हा प्रतिसाद वेगळा दिलेला आहे. मत जरुर मांडावे,.
We cancerians have a way of stretching everything back to childhood specially mother Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं लिहिलय . ह्यावरुन एक प्रतिसाद आठवला , " मी ऐसी जातो सोडून. फेसबुकवर वगैरे बोलत भेटत राहूच,. दोस्त राहूच " असं बॅट्या म्हणाला होता. तेव्हाचा माझा प्रतिसाद --
.
.

बॅटमॅननं विचारलय :-

सदस्य खाते नि:सारित करण्याची प्रक्रिया काय आहे?

म्हणजे त्याला ऐसी सोडून जायचय असं दिसतय. सहसा असं कुणालाही जावसं वातलं तर त्याला जाउ द्यावं असं मला एकीकडून वाटतं.
त्याला जाउ देणं तार्किक वाटतं. त्यामुळे कुणी "चल, निघू का यार आता" असं म्हणालं तर मी त्याला म्हणतो
"ठीकय, अवश्य. भेटत रहा, बोलत रहा. एन्जॉय."
कारण सतत प्रवाही गप्पा चालत राहिल्या असत्या, हसणं खिदळणं सुरु राहिलं असतं, मैफिल रंगात असली असती तर मुळात
"निघू का आता" असं विचारायचं व्यक्तीच्या डोक्यात आलच नसतं. कदाचित मैफल पूर्ण झालेली आहे; आता निघावसं वाटतं आहे.
म्हणजे सर्वाधिक रस घेण्यासारखा भाग संपलेला आहे. मग निघावसं वाटतय त्याने निघालेलच उत्तम, असं मला वाटतं.
.
.
पण हे झालं तर्क-विचार वगैरे ह्याबाजूनं. माणूस फक्त तर्कानं वागत नाही, जगत नाही. त्याला दरवेळी जे वाटत असतं ते तार्किक असतच असं नाही.
त्यामुळे कुणी निघतो म्हटलं की "नको ना जाउस" असंही म्हणावसं वाटतं.(बहुतांश वेळा मी म्हणत नाहिच; तो भाग वेगळा.)
आणि असं वाटण्यामागचं कारण म्हणजे "मी निघतो" असं कुणी म्हटलं की--
.
.
.
.
असो.
शुभेच्छा.
भेटत बोलत राहूच.
हॅप्पी जर्नी.
असं मी उघड म्हणतो; आतून जाणवत असतं --
( काळजी घे, भेटत रहू,दोस्त राहणारच आहोत; वगैरे ह्या सगळ्या फक्त म्हणायच्या गोष्टी. प्रत्यक्षात एक कॉमन फोरम कमी झाला की बोलण्याचे विषय आणि निमित्तही कमी होतात.) अनोळखी माणसं ओळखीची होणं ही जशी एक प्रोसेस असते, तशीच ओळखीची माणसं अनोळखी होत जाणं हीसुद्धा एक प्रोसेस असते.
ती ह्यामुळे सुरु होते. आपल्या गप्पांच्या संदर्भातले रेफरन्सेस गोठून जातात; थिजतात; कुजतात; नवीन सापडत नाहित.
मैत्री सायनोसायडल वेव्ह सारखी आधी वाढत गेलेली असते; नंतर त्याच वेव्ह सारखी कमी कमी होत जाते.

http://www.aisiakshare.com/node/287#comment-113911 हा तो प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुपर्ब!!! व्हेरी अ‍ॅप्ट = नेमके, मार्मिक!

.

आपल्या गप्पांच्या संदर्भातले रेफरन्सेस गोठून जातात; थिजतात; कुजतात; नवीन सापडत नाहित.

क्या बात है. हेच्च होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या गप्पांच्या संदर्भातले रेफरन्सेस गोठून जातात; थिजतात; कुजतात; नवीन सापडत नाहित.

अगदी हेच. ह्यापेक्षा चांगल्या शब्दात मांडताच येणार नाही. ह्यामुळे एकेकाळी (म्हणजे शाळेत वगैरे ) खूप जवळच्या असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी काही काळाने फेबुवर परत मैत्री झाली की म्हणावा तसा संवाद होत नाही .

अवांतर : मुली लग्नानंतर आडनाव बदलतात- {चिडचिड }; काहीजणी तर नावही बदलतात- {डबल चिडचिड}. अनोळखी नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येते मग (जर कंटाळा आला नसेल तर ) प्रोफाईल पहिली की कळतं की ही आपल्या शाळेत होती बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला आवडलेल्या पुरुषाचा अग्रेसिव्हली पाठपुरावा करणे आपल्या कल्चर मधल्या मुलींना (अजूनही!) जड जाते असे दिसते, आणि त्यातून या अशा शोकांतिका निर्माण होतात ! या मानसिकतेतून लवकर बाहेर पडणे जरूर आहे . अशा पाठपुराव्यात गैर काहीही नाही हे मान्य झाले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अशा पाठपुराव्यात गैर काहीही नाही हे मान्य झाले पाहिजे.

छोटीसी बात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
आपल्या भोवतालच्या चौकटी एवढ्या ठाम असतात की गैर काही नाही हे मुलींना स्वतःलाच पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0